संक्षिप्त चालू घडामोडी 6 जानेवारी 2015

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (NITI- निती) आयोगावर पुढील नियुक्त्या केल्या आहेत.niti-ayog
  उपाध्यक्ष: अरविंद पानगरिया, अर्थतज्ञ
  पूर्ण वेळ सदस्य:
  विवेक देबरॉय , अर्थतज्ञ
  डॉ. व्ही. के. सारस्वत, माजी सचिव संरक्षण संशोधन आणि विकास, DRDO चे माजी प्रमुख
  पदसिध्द सदस्य:
  राजनाथ सिंह  - केंद्रीय मंत्री
  अरुण जेटली - केंद्रीय मंत्री
  सुरेश प्रभू - केंद्रीय मंत्री
  राधा मोहन सिंग - केंद्रीय मंत्री
  विशेष निमंत्रित
  नितीन गडकरी - केंद्रीय मंत्री
  थावर चंद गेहलोत - केंद्रीय मंत्री
  स्मृति झुबिन इराणी - केंद्रीय मंत्री
 • पंतप्रधान हे नीतीआयोगाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत.
 • प्रमुख उद्देश
  >> राज्यांच्या स‌क्रिय भागीदारीने राष्ट्रीय विकास साधण्यासाठी दृष्टिकोन विकसित करणे. मुख्यमंत्र्यांना 'राष्ट्रीय अजेंडा'चे प्रारुप उपलब्ध करून देणे.
  >> सशक्त राज्येच सशक्त देशाची निर्मिती करू शकतो, हे तथ्य स्वीकारून राज्यांबरोबर नियमितपणे संरचनात्मक सहकार्य, तंत्राच्या माध्यमातून सहकार्य आणि संघराज्यास चालना देणे.
  >> गावपातळीवर योजना तयार करण्यासाठी तंत्र विकसित करून हळूहळू उच्च स्तरावर त्याची अंमलबजावणी करणे.
  >> जे क्षेत्र विशेषकरून सोपविले गेले असेल, त्यामध्ये आर्थिक धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेचे हित जोपासणे.
  >> समाजातील आर्थिक मागास घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांचा आर्थिक विकास साधणे. योजनाबद्ध आणि दीर्घ काळासाठीचे धोरण तयार करणे.
  >> राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय 'थिंक टँक' आणि शैक्षणिक व धोरण संशोधन संस्थांना प्रोत्साहन देणे.
  >> विकासाचा अजेंडा राबविण्यास गती देण्यासाठी आंतरक्षेत्रीय आणि आंतरविभागीय आणि मुद्द्यांच्या सोडवणुकीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
 • याशिवाय सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नायब राज्यपालांचा समावेश नीती आयोगात आहे. पूर्वीच्या नियोजन आयोगात मुख्यमंत्र्यांचा आणि नायब राज्यपालांचा असा समावेश नव्हता.
 • मात्र पूर्वीच्या नियोजन आयोगाला राज्यांना निधी वाटप करण्याचा अधिकार होता. तसा अधिकार नीती आयोगाला असेल किंवा नाही याविषयी अद्यापही
  स्पष्टता नाही.
 • अरविंद पानगरिया हे कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक असून. खुल्या अर्थव्यवस्थेचे आणि मोदींच्या 'गुजरात मॉडेल'चे खंदे समर्थक असलेल्या पनगरीया ह्यांनी आशियाई विकास बँकेचे मुख्य अर्थतज्ञ म्हणून पद भूषविले आहे.
 • त्यांना आधीच्या यूपीए शासनाच्या काळात 2012 साली पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
 • त्यांनी मनमोहन सिंग यांचे मित्र असलेले अमेरिकन-भारतीय अर्थतज्ञ जगदीश भगवती यांच्या सोबत लिहिलेले 'Why Growth Matters: How Economic Growth in India Reduced Poverty and the Lessons for Other Developing Countries' आणि 'India's Tryst with Destiny: Debunking the Myths that Undermine Progress and Addressing New Challenges'  ही पुस्तके विशेष प्रसिध्द आहेत.
 • याशिवाय त्यांनी लिहिलेले 'India: The Emerging Giant' हे पुस्तक प्रसिध्द आहे.
 • स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अँबेसेडर म्हणून माजी क्रिकेटर व्ही.व्ही.एस लक्ष्मण , बॅडमिंटन प्रशिक्षक पी. गोपीचंद आणि बुद्धिबळपटू कोनेरु हंपी यांच्यासह पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांची नावे केंद्र सरकारने घोषीत केली आहेत.
 • छत्तीसगडमधील रायगड या शहराच्या महापौरपदी तृतीयपंथी मधू किन्नर यांची निवड झाली आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी एलईडी दिव्यांचे "प्रकाश पथ" प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग असे वर्णन करत दिल्लीत घरगुती कार्यक्षम प्रकाश कार्यक्रमाअंतर्गत एलईडी दिवे वितरण योजनेचा तसेच एलईडी आधारित गृह आणि पथ दिव्यांच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा शुभारंभ  केला.
 • पंतप्रधानांनी साऊथ ब्लॉकमधील एक दिवा बदलून त्या जागी एलईडी दिवा लावला.
 • साऊथ ब्लॉकमध्ये  सर्वत्र एलईडी दिवे वापरल्यास दर महिन्याला 7 हजार युनिट्सची बचत होईल.
 • एलईडी दिव्यांचा प्रसार करुन ऊर्जा संरक्षण करणे ही लोक चळवळ बनविण्याचे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.
 • पिढ्यानपिढ्या दगडफोडीच्या व्यवसायातून आपली उपजिविका भागविणाऱ्या वडार समाजातील कुटुंबांना त्यांच्या पारंपरिक व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या वार्षिक 200 ब्रासपर्यंतच्या दगडावर स्वामित्वधन आकारणीमध्ये सूट देण्याबाबत निर्णय राज्यासरकारने घेतला आहे.
 • रेल्वेच्या टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या तसेच ही निर्णय प्रक्रिया जलद करण्याच्या दृष्टीने, याबाबतचे अधिकार रेल्वेमंत्र्यांकडून रेल्वेचे संबंधित विभाग (झोन) आणि निर्मिती विभागांचे प्रमुख यांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला आहे.
 • अमेरिकेच्या सिनेटवरील लोकांमधून निवडून आलेले पहिले कृष्णवर्णीय सिनेटर एडवर्ड डब्ल्यू. ब्रूक यांचे फ्लोरिडातील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.
 • रिपब्लकन पक्षाचे आणि उदारमतवादी विचारांचे ब्रूक हे 1966 मध्ये मेसॅच्युसेट्समधून सिनेटवर निवडून गेले.
 • अमेरिकेतील नागरी युद्धानंतरच्या सुधारणावादी कालखंडात सिनेटमध्ये निवडून गेलेले ते पहिले कृष्णवर्णीय सदस्य होते.
 • अमेरिकेच्या काँग्रेसतर्फे दिला जाणारा 'काँग्रेशनल गोल्ड मेडल' या सर्वोच्च नागरी सन्मानाने त्यांना 2009 मध्ये ओबामांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले होते.
 • राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय-सामाजिक व राजकीय आंदोलनातील 1 नोव्हेंबपर्यंतचे सर्व किरकोळ खटले मागे घेणार.
 • विश्वचषक संपेपर्यंत डंकन फ्लेचरच भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक
 • हायकोर्टाने सीबीआयला  पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्याप्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश दिलेले आहेत.
 • बिहार सरकार अभिनेत्री रेखाला राज्याचा पर्यटन ब्रँड अ‍ॅम्बॅसेडर बनविण्याच्या तयारीत आहे.
 • अल् कायदा, लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनांवर पाकिस्तान योग्य प्रकारे कारवाई करत आहे, असे प्रमाणपत्र अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी दिले आहे.
 • त्यामुळे अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळू शकणाऱ्या आर्थिक मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
 • मात्र या नंतर अमेरीकन प्रशासनाने असे प्रमाणपत्र दिले नसल्याचे स्पष्ट करत आधीच्या भूमिकेवरून 'घूमजाव' केले आहे.
 • भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी: रावसाहेब दानवे
 • राज्याचे टोलधोरण विषयक सूचना प्रस्तावित करण्यासाठी सी. पी. जोशी समिती नेमण्यात आली आहे.
आम्ही आमच्या प्रत्येक पोस्ट ची नेमकी वाचक संख्या काढत आहोत. त्याचा उपयोग आम्हाला काही सदर वगळण्यासाठी आणि काही नवीन सदरे सुरू करण्यासाठी होईल.
तेव्हा तुम्ही वाचत असलेल्या प्रत्येक पोस्टसाठी ‘फेसबुक लाईक’ क्लिक करा. म्हणजे आमचे काम सोपे होईल. Thank you !!

आता PDF स्वरूपात वा प्रिंटआउट काढण्यासाठी PrintFriendly ह्या बटणाचा वापर करा.

Print Friendly and PDF