संक्षिप्त चालू घडामोडी 2 जानेवारी 2015

 • केंद्र सरकारने नियोजन आयोगाच्या जागी  निती आयोग (भारत परिवर्तन राष्ट्रीय संस्था) या नव्या संस्थेची स्थापना केली आहे.
 • सरकारच्या धोरणांना दिशा दाखवण्यासाठी आणि गती प्रदान करण्यासाठी आवश्यक  विचारमंथन  करणारा गट म्हणून ही संस्था काम करणार आहे.
 • हा आयोग सरकारला केंद्रीय आणि राज्य पातळीवर राबविल्या जाणाऱ्या धोरणांमधील महत्त्वाच्या पैलूंवर संबंधित व्यूहात्मक आणि तांत्रिक मार्गदर्शनाचे  काम करणार आहे.
 • यामध्ये आर्थिक आघाडीवरील  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय  महत्त्व असलेल्या विषयांचा, देशाबरोबरच परदेशातील  सर्वोत्तम  रिवाजांचा अवलंब आणि नव्या धोरणात्मक  संकल्पनांचा व विशिष्ट मुद्दयांवर आधारित पाठबळाचा समावेश असेल.
 • israel पॅलेस्टाइनला स्वतंत्र देशाचा दर्जा देण्याचा सुरक्षा मंडळांचा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे इस्रायलने त्यांच्या फौजा या प्रदेशातून मागे घेण्याची मुदत आता इ.स. 2017 झाली आहे.
 • हा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात मांडण्यात आला असता त्याला अर्जेटिना, चॅड, चिली, चीन, फ्रान्स, जॉर्डन, लक्झेमबर्ग व रशिया यांनी पाठिंबा दिला.
 • पाच स्थायी सदस्य देशांपैकी कुणीही नकाराधिकार वापरला नसतानाही हा ठराव फेटाळला गेला. ठराव संमत होण्यास नऊ मते कमी पडली.
 • अमेरिका व ऑस्ट्रेलिया या देशांनी ठरावाला विरोध केला तर इंग्लंड, नायजेरिया व दक्षिण कोरिया, रवांडा व लिथुआनिया या देशांनी तटस्थता बाळगली.
 • इस्रायल व पॅलेस्टाइन हे स्वतंत्र, सार्वभौम व भरभराट होणारे देश असावेत असा दृष्टिकोन या ठरावामागे होता. प्रस्तावित तोडग्यासाठी वाटाघाटींकरिता एक वर्षांची मुदत दिली होती व इस्रायलने 2017 पर्यंत पश्चिम किनारा भागातून फौजा माघारी घेण्याचे म्हटले होते.
 • महिलांच्या सुरक्षिततेसाठी दिल्ली पोलिसांनी  तयार केलेल्या "हिम्मत" या मोबाईल ॲपचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी उदघाटन केले.
 • संकटात असताना या ॲपचा  वापर करुन महिलांना पोलिसांची  मदत मिळवता येणार आहे.
 • संरक्षण दलांच्या वैद्यकीय सेवा विभागाचा (AFMC) 251 वा वर्धापन दिन नवी दिल्ली येथे साजरा करण्यात आला.
 • छत्तीसगड सरकारने संपूर्ण राज्यात प्लॅस्टिकच्या पिशव्यांना संपूर्ण बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
 • चीनच्या 24 वर्षीय युवतीने जगातील सर्वांत युवा अब्जाधीश होण्याचा मान पटकावला आहे. तिने संपत्तीत फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्गलाही मागे टाकले आहे.
 • केई पेरना होई तिंग असे तिचे नाव असून, ती चीनच्या लोगन प्रॉपर्टी रीअल इस्टेट डेव्हलपरचे सीईओ जी हैपेंग यांची मुलगी आहे. या कंपनीचे 85 टक्के समभाग तिच्या नावावर असून, त्याची मालमत्ता सुमारे 1 अब्ज 30 कोटी अमेरिकी डॉलर्स इतकी आहे.
 • लंडन विद्यापीठातून पदवी घेतलेल्या केई सध्या हॉंगकॉंगमध्ये राहते. लोगन प्रॉपर्टीचे मुख्यालय दक्षिण चीनच्या शेनझेन शहरात असून, मध्यम आणि उच्चवर्गीयांसाठी घरांची निर्मिती करतात.
 • अर्थमंत्रालयाने देशातील सर्व राष्ट्रीय वस्तू वायदा बाजारांसाठी (कमॉडिटी एक्स्चेंज) सामाईक 'क्लिअरिंग कॉर्पोरेशन' स्थापण्याबाबत प्रस्तावावर सार्वजनिक अभिप्राय मागवले आहेत.
 • तमिळनाडूमध्ये सुरू करण्यात आलेल्या स्वस्त दरातील "अम्मा” कॅन्टीनला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि प्रतिसादही मिळाल्याने आता कर्नाटकातही अशाप्रकारचे "अय्या" कॅन्टीन लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.
 • अय्या कॅन्टीन योजनेच्या पहिल्या टप्प्यात बेळगावसह बंगळूर, हुबळी, धारवाड, मंगळूर, म्हैसूर, दावणगेरे, शिमोगा, तुमकूर, बळ्ळारी, गुलबर्ग्याचा समावेश आहे. तमिळनाडूप्रमाणेच या कॅन्टीनमध्ये एक रुपयाला इडली आणि पाच रुपयांना भात-आमटी मिळणार आहे.
 • मायक्रोसॉफ्टने "विंडोज 10"  ह्या नवीन संगणक प्रणालीबरोबर नवीन ब्राऊजर देण्याचे ठरवले असून त्याचे नाव 'स्पार्टन' असे आहे.
 • 21 जानेवारीपासून हा ब्राऊजर प्रदर्शित करण्यात येणार आहे. स्पार्टनची औपचारिक सुरुवात येथे होत असली तरी विंडोज 10 उन्हाळ्यापर्यंत प्रदर्शित होणार नाही.
 • अत्यंत कमी जागा वापरणारा हा ब्राऊजर डेस्कटॉप व मोबाईल डिव्हाइसेसमध्ये वापरला जाणार आहे, पण त्याला विंडोज दहा आवश्यक असेल .इंटरनेट एक्स्प्लोरर हा विकसक (Developers) व वापरकर्ते( Users) यांच्यात फारसा भरवशाचा राहिलेला नाही.
 • आशियातील एकमेव व सर्वांत मोठा नाट्यहोत्सव अशी ख्याती असलेला राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचा (एन. एस. डी.) "भारत रंग महोत्सव‘ यंदा 1 ते 18 फेब्रुवारीदरम्यान दिल्लीत आगळ्यावेगळ्या स्वरूपात साजरा होणार आहे.
 • या महोत्सवाची यंदाची संकल्पना "लोककला‘ ही आहे. या वर्षी सादर होणाऱ्या जवळपास सव्वाशे नाट्यकृतींमध्ये मराठी नाटकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.
 • नाटकांचा महाकुंभ म्हणविल्या जाणाऱ्या भारत रंग महोत्सवाला पंधरा वर्षांची परंपरा आहे.  1999 मध्ये या महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. देशातील उत्तमोत्तम नाट्यकृती एकाच ठिकाणी पाहाता याव्यात, हा या मागचा उद्देश आहे.
 • परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केलेल्या ई-रिक्षांच्या राजधानी दिल्लीतील मुक्त वावरासाठी केंद्राने आणखी एका अध्यादेशाचा आधार घेतला आहे. ई-रिक्षा सेवा योजनेसाठीचा अध्यादेश आज जारी करण्यात आला. 
 • दिल्लीत आणखी 10 हजार रिक्षांना परवानगी देण्याचा निर्णयही सरकारने केला.
 • पश्चिम आफ्रिकेतील इबोलाची साथ ही एक मुलगा वटवाघळे असलेल्या पोकळ झाडाशी खेळत असताना त्याच्यामध्ये आली व तेथून पसरली असे आता स्पष्ट झाले आहे.
 • आग्नेय गिनीमध्ये एमिली क्वामोने हा त्यानंतर वर्षभर आजारी पडला तो खरेतर इबोलाचा पहिला रुग्ण होता. तो दोन वर्षांचा होता. त्याचा आजार उन्हाळ्यापर्यंत समजला नव्हता.
 • इबोलामुळे पश्चिम आफ्रिकेत 8000 लोक ठार झाले आहेत.
 • व्यावसायिक सन बेड्सवर ऑस्ट्रेलियात बंदी घालण्यात येत आहे. जास्त सूर्यप्रकाश घेतल्याने त्वचेचा कर्करोग होतो असे जगात दिसून आले आहे. त्यामुळे कृत्रिमरीत्या टॅनिंग म्हणजे त्वचा काळसर करण्याकरिता व्यावसायिक सन बेडसचा वापर केला जातो. न्यू साऊथ वेल्स व व्हिक्टोरिया, दक्षिण ऑस्ट्रेलिया, टास्मानिया, क्वीन्सलँड व सिडनीत 1 जानेवारीपासून ही बंदी घालण्यात येत आहे.
 • ब्राझीलनंतर सन बेडसवर बंदी घालणारा ऑस्ट्रेलिया हा दुसरा देश आहे.
 • गुप्तचर विभागात (इंटेलिजन्स ब्युरो) विशेष संचालक पदावर कार्यरत असलेले अशोक प्रसाद, आयपीएस यांची गृहमंत्रालयाच्या विशेष सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विक्रीकर निरीक्षक आणि कर सहाय्यक 2014 या परीक्षांकरिता नियमित प्रकाशित होणाऱ्या संक्षिप्त चालू घडामोडींव्यतिरिक्त सरावासाठी प्रश्नमंजुषा सुरू करावी असे आपले मत असेल तर डाव्या बाजूच्या फेसबुक लाईकवर क्लिक करा.

आता PDF स्वरूपात वा प्रिंटआउट काढण्यासाठी ह्या बटणाचा वापर करा.

Print Friendly and PDF