संक्षिप्त चालू घडामोडी 29 डिसेंबर 2014

 • जळगावचा विजय चौधरी ठरला महाराष्ट्र केसरी.
  अंतिम कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या सचिन येलभरला हरवले
 • आसाममधील बोडो दहशतवाद्यांच्या हिंसाचाराला पायबंद घालण्यासाठी केंद्र आणि आसाम राज्य सरकारने आता संयुक्‍त लष्करी कारवाईला प्रारंभ केला असून, आसाम रायफल्स, निमलष्करी दले आणि आसाम पोलिस यांनी ऑपरेशन "ऑल आउट “ ही मोहीम सुरू केली आहे.
 • पुढील वर्षीपासुन तीन राज्य स्पर्धा व 'ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव' यांच्या नावासह चार विभागीय चषक स्पर्धा नव्याने सुरु करण्याचा तसेच 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धेचा दर्जा टिकवण्यासाठी गावोगावी, गल्लोगल्ली 'केसरी' नावाने सुरू असलेल्या कुस्ती स्पर्धावर बंदी घालण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वार्षिक सभेत घेण्यात आला.
 • केंद्र सरकारची समुद्र विज्ञान संस्था (एनआयओ) आणि राज्याच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) एकत्रित अहवालात महाराष्ट्राचा समुद्रकिनारा देशात सर्वाधिक प्रदूषित आहे, असा ठपका ठेवला आहे.
 • झपाट्याने वाढणारे औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि कोणत्याही प्रक्रियेविना पाण्यात सोडण्यात येणारे रासायनिक प्रदूषित घटक याला जबाबदार असल्याचे अहवालात म्हटले आहे. या प्रदूषणामुळे सागरी जैववैविध्य आणि मासेमारीवरही परिणाम झाला असल्याचे अहवालात म्हटले आहे.
 • विशेषत: मुंबई आणि गुजरातच्या दिशेचा सागरी किनारा सर्वाधिक प्रदूषित आहे. त्या तुलनेत कोकण किनारपट्टी कमी प्रदूषित असल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच राज्यातील प्रमुख 18 खाड्या आणि नदींच्या मुखांजवळील प्रदूषण चिंताजनक आहे.
 • "स्टेट ऍडॉप्शन रीसोर्स ऍथॉरिटी‘ने केलेल्या एका सर्व्हेनुसार अनाथांना दत्तक घेणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, दत्तक घेण्यासाठी मुलांपेक्षा मुलींना अधिक पसंती दिली दिली आहे.
 • इंडोनेशियाहून सिंगापूरच्या दिशेने जाणारे एअर एशियाचे विमान QZ 8501 उड्डाणानंतर अचानक बेपत्ता झाले आहे. या विमानात सुमारे 162 प्रवासी प्रवास करत होते.
 • इंदूर येथील कमला नेहरू प्राणीसंग्रहायलयात तीन वर्षाचा ‘रज्जन’ हा पांढरा वाघ होता.अत्यंत विषारी कोब्रा साप चावल्याने जगात दुर्मीळ असलेल्या पांढ-या वाघाचा प्राणीसंग्रहालयात मृत्यू झाला.
 • चिनी पेन ड्राईव्हच्या किंमत स्पध्रेत भारतीय उत्पादकांची दमछाक होत आहे. याबाबत योग्य सरकारकडून चीनमधून होणा-या या उपकरणांच्या अति स्वस्त आयातीवर अँटी-डम्पिंग कर लावण्याचा विचार सरकार करत आहे. यामुळे सहज आणि स्वस्तात उपलब्ध होणारे चिनी पेन ड्राईव्ह महागणार आहेत. 3.12 डॉलर प्रति पेन ड्राईव्हपर्यंत हा कर लावला जाण्याची शक्यता आहे.
 • Windows_10_Logo.svg  ह्यावर्षी मायक्रोसॉफ्ट’ने ‘विंडो 10’ ही नवी ऑपरेटिंग सिस्टीम जगासमोर आणली असून स्टार्ट मेन्यूला यामध्ये पुन्हा स्थान देण्यात Windows_10आले आहे. ग्राहकांकडून आलेल्या तीव्र नाराजी नंतर स्टार्ट मेन्यूला पुन्हा स्थान देण्यात आले. कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब्लेट आणि स्मार्टफोनवर अ‍ॅडजस्ट होणारी ही ऑपरेटिंग सिस्टीम असून गुगलच्या अँड्रॉईडला टक्कर देण्याची तयारी केली आहे.
 • सध्या ही संगणक प्रणाली ‘बीटा टेस्टिंग’ अवस्थेत असून 2015 मध्ये ती बाजारात सर्वसामान्य ग्राहकांना उपलब्ध होईल.
 • देशात 38 लाख कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या किरकोळ क्षेत्राच्या तुलनेत ई-व्यापाराची फार मोठा नसला तरी 2014 या वर्षात या व्यवसायाने मारलेली मुसंडी दुर्लक्ष करता येणार नाही. 2014 मध्ये या व्यवसायाने 1 लाख कोटी रुपयांची वाढ नोंदवली
 • फ्लिपकार्टने या वर्षात दोनदा निधी उभारणी केली. पहिल्यांदा 1 अब्ज डॉलर तर त्यानंतर 70 कोटी डॉलर या कंपनीने उभारले. यासह ही कंपनी 7 अब्ज डॉलर मूल्य असलेली कंपनी म्हणून समोर आली. याबरोबरच मिंत्राचे विलीनीकरण झाले. तर स्नॅपडीलनेही 62.7 कोटी डॉलरची गुंतवणूक सॉफ्टबँकेकडून मिळवली. त्याच वेळी अ‍ॅमेझॉन या अमेरिकन कंपनीनेही याच वर्षात 2 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.
 • यंदाचा राजीव गांधी एक्‍सलन्स पुरस्कार तरुण उद्योजक राजश्री ऊर्फ उल्का विश्‍वासराव यांना नुकताच नवी दिल्लीत झालेल्या विशेष समारंभात तमिळनाडूचे माजी राज्यपाल भीष्म नारायण सिंह यांच्या हस्ते देण्यात आला.
  राजीव गांधी एक्‍सलन्स पुरस्कार दर वर्षी इंडियन सॉलिडॅरिटी कौन्सिलतर्फे देण्यात येतो. राजश्री विश्‍वासराव यांनी समर्थ ऍडव्हर्टायझर्स ही जाहिरात कंपनी स्थापन केली. त्याचबरोबर समर्थ सावली हॉटेल्सच्या त्या भागीदार आहेत, तर समर्थ मंथन या द्वैमासिकाच्या त्या संपादिका आहेत.
डाव्या बाजूच्या फेसबुक लाईकला क्लिक करायला विसरू नका.