संक्षिप्त चालू घडामोडी 27 डिसेंबर 2014

 • K. Radhakrishnan नेचर या ख्यातनाम जर्नलने प्रसिद्ध केलेल्या 2014 मधील जगातील 10 सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञांच्या यादीत इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन यांचा समावेश.
 • भारतात राहूनच काम करणा-या भारतीय शास्त्रज्ञाची निवड होण्याची ही पहिलीच वेळ.
 • 26 डिसेंबर, 2004. सुमात्रा बेटांच्या उत्तरेला समुद्रात 9.2 रिश्‍टर तीव्रतेचा भूकंप बसल्याने प्रचंड त्सुनामी आली होती, त्या घटनेला काल दहा वर्षे पूर्ण झाली.
 • या त्सुनामीचा फटका हिंदी महासागरातील भारतासह अनेक देशांना बसला.
 • चौदा देशांतील तब्बल दोन लाख 30 हजार जणांना यामध्ये प्राण गमवावा लागला होता.
 • 17 लाख नागरिक विस्थापित झाले होते आणि साडे सात अब्ज डॉलरचे आर्थिक नुकसान झाले होते.
 • वादळ, त्सुनामी तसेच हवामानाशी संबंधित नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना देण्याऱ्या एसएमएसवर आधारित इशारा प्रणालीचे केंद्रीय भूविज्ञानमंत्री हर्षवर्धन यांनी  'सुप्रशासन दिवस'च्या औचित्याने उद्घाटन केले.
 • k. balachandar दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आलेले व "एक दुजे के लिए" या चित्रपटाचे प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक के. बालचंदर यांचे नुकतेच निधन झाले.
 • तमिळ चित्रपटसृष्टीमधील पितामह म्हणून त्यांना ओळखले जाते.
 • चित्रपटांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल 2010 मध्ये सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
 • पेशावरमधील लष्कराच्या शाळेवरील हल्ल्याचा कट रचणाऱया तालिबानी म्होरक्याला कंठस्नान घालण्यात आल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
 • पाकिस्तानच्या सुरक्षा दलाकडून राबवण्यात आलेल्या मोहिमेत गुंडी परिसरात सद्दाम हा पेशावर हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी ठार झाला असून त्याच्या साथीदाराला ताब्यात घेण्यात यश आल्याची माहिती पाकिस्तानने प्रसारित केली आहे.
 • मलेशियातील केलांटन, तेरेगानू, पेहलांग आणि पेरेक प्रांतात पुराने थैमान घातले आहे.
 • देशांतर्गत शेतकरी आणि उद्योगांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारने कच्चे तेल आणि वनस्पती तेलाच्या आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णायांतर्गत अर्थ मंत्रालयाने कच्च्या तेलासाठी 2.5 टक्के; तर वनस्पती तेलासाठी 5 टक्के आयात शुल्क वाढविले आहे.
 • आयात शुल्कात करण्यात आलेल्या या वाढीनंतर कच्च्या तेलावरील एकूण आयात शुल्क 7.5 टक्के; तर वनस्पती तेलावरील एकूण आयात शुल्क 15 टक्के झाले आहे.
 • जगात सर्वांत मोठे सर्चइंजिन म्हणून वापरात असलेल्या गुगलच्या बहुचर्चित स्वयंचित कार ‘गुफी‘चे गेल्या आठवड्यात सादरीकरण करण्यात आले आहे. गुगलने तयार करण्यात आलेल्या या मोटारीचा हा नमुना असून, नव्या वर्षात या मोटारीची चाचणी सॅन फ्रॅन्सिस्को येथील बे एरियामध्ये सार्वजनिक रस्त्यांवर केली जाणार आहे.
  गुगलने तयार केलेली चालकाशिवाय चालू शकणारी ही मोटार सुरू करण्यासाठी व थांबवण्यासाठी एक बटन देण्यात आले आहे. मात्र, ती स्वयंचलित असल्याने नियंत्रणासाठी स्टेअरिंग आणि ब्रेक या कारमध्ये नाहीत. दोन माणसे बसू शकणारी ही मोटार रस्यावर उतरवण्यासाठी गुगलला सरकारच्या परवानगी आवश्यकता आहे.
 • एक रुपयाच्या कागदी नोटेची बंद करण्यात आलेली छपाई दोन दशकांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा सुरु करण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे. त्यामुळे लवकरच त्याबाबत निर्णय होऊन एक रुपयाच्या नोटेचा पुनर्जन्म होणार अहे.
 • अर्थ मंत्रालय ‘कॉयनेज कायदा 2011'मध्ये बदल केल्यानंतर केंद्र सरकार ‘एक रुपया नोटा नियम, 2015'नुसार एक रुपयांच्या कागदी नोटांची छपाई करू शकणार आहे.
 • एक रुपयाच्या कागदी नोटेच्या मूल्यापेक्षा छपाई खर्च जास्त येत असल्याने सरकारने कमी मूल्यांच्या नोटांची छपाई बंद केली होती.
 • आसाममध्ये 70 जणांची हत्या करणा-या एनडीएफबी(एस)या बोडो दहशतवाद्यांच्या संघटनेवरील बंदी केंद्र सरकारने आणखी पाच वर्षासाठी वाढवली आहे.
 • नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या धर्तीवर महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा स्थापन करणार,  ट्विटरद्वारे मागितला जनतेचा अभिप्राय मागवण्यात आला आहे.
 • विमा क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा 26 टक्क्यांवरून 49 टक्क्यांपर्यंत वाढविणारे आणि कोळसा खाणवाटप पुन्हा सुरू करण्यासाठीच्या अध्यादेशावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 26 डिसेंबर 2014 ला स्वाक्षरी केली.
 • भारताने संयुक्त राष्ट्राच्या त्सुनामी निवारण निधीमध्ये 10 लाख डॉलर्स देण्याची तयारी दर्शवली आहे.
 • कोकणी भाषेतील प्रभावशाली कवयित्री, चिंतनशील लेखिका डॉ. माधवी सरदेसाई यांचे अलीकडेच कर्करोगाने निधन झाले.
 • सरदेसाई यांना ‘मंथन’ या समीक्षात्मक लेखसंग्रहासाठी 2014 चा साहित्य अकादमी पुरस्कार नुकताच जाहीर झाला होता. गोवा विद्यापीठात कोकणी भाषेच्या विभागप्रमुख काम करणाऱ्या सरदेसाई यांनी कविता, समीक्षा आदी क्षेत्रात विपुल लिखाण केले.
 • अपघात किंवा तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी तातडीने रक्ताची गरज लागते. हे रक्त तात्काळ उपलब्ध होईल याची शक्यता नसते. त्यातच रक्तगटाची मोठी समस्या उभी राहते. या सर्व अडचणींवर मात करणारे संशोधन दिल्ली विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केले आहे. त्यांनी हिमोग्लोबिनवर आधारित रक्ताला पर्याय विकसित केला आहे.. दिल्लीच्या शास्त्रज्ञांनी रक्ताला पर्याय म्हणून ‘आर्टिफिशयल हिमोग्लोबिन’ (कृत्रिम हिमोग्लोबिन) तयार केले आहे.
 • भारतात एक बाटली रक्तासाठी हजार ते दोन हजार रुपये मोजावे लागतात. मात्र हे ‘आर्टिफिशयल हिमोग्लोबिन’ 10 ते  12 टक्के स्वस्त किमतीत उपलब्ध होऊ शकते. विशेष म्हणजे रक्त साठवणुकीची क्षमता 40 ते 50 दिवस असते. मात्र, हे ‘आर्टिफिशयल हिमोग्लोबिन’ तीन वर्षे साठवता येऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे.
 • हिवाळी अधिवेशनातील गोंधळपर्वात किमान दीड आठवडा कामकाज ठप्प पडलेल्या राज्यसभेत दिल्लीतील 1200 हून जास्त अनधिकृत वस्त्या नियमित करण्याच्या "दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (विशेष दुरुस्ती)-2014 या विधेयकावर सर्वपक्षीय मतैक्‍य झाले. दिल्लीतील अशा वस्त्यांच्या पुनर्वसन योजनेत महाराष्ट्रात राबविल्या गेलेल्या "झोपडपट्टी निर्मूलन-पुनर्वसन‘ कायद्याचे रोल मॉडेल समोर ठेवण्यात येणार आहे.
डाव्या बाजूच्या फेसबुक लाईक वर क्लिक करायला विसरू नका.

आता PDF स्वरूपात वा प्रिंटआउट काढण्यासाठी ह्या बटणाचा वापर करा.

Print Friendly and PDF