संक्षिप्त चालू घडामोडी 26 डिसेंबर 2014

 • मुंबईत 45 वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा इंडियन सायन्स काँग्रेस अर्थात भारतीय विज्ञान परिषद आयोजित करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये 3 ते 7 जानेवारी 2015 दरम्यान 102 व्या राष्ट्रीय सायन्स काँग्रेसचं आयोजन करण्यात आलं आहे.
 • या कार्यक्रमाचं यजमानपद मुंबई विद्यापीठ भूषवणार आहे. सुमारे 12,000 प्रतिनिधी भव्य दिव्य अशा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 7 नोबेल पारितोषिक विजेते मान्यवर तसेच इतर चार तुल्यबळ शास्त्रज्ञ यांची उपस्थितीसुध्दा या कार्यक्रमाला लाभणार आहे.
 • "मानवी विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान" ही या कार्यक्रमाची संकल्पना (Theme) आहे.
 • 3 जानेवारी 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडियन सायन्स काँग्रेसचे उदघाटन होणार आहे.
 • या कार्यक्रमादरम्यान प्रमुख चर्चासत्र तसेच परिसंवादाव्यतिरिक्त चिल्ड्रन्स सायन्स काँग्रेस, वुमन्स सायन्स काँग्रेस आणि विज्ञान समन्वयक संमेलन आदींचंही आयोजन करण्यात आलं आहे.
 • माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम यांच्या हस्ते चिल्ड्रन्स सायन्स काँग्रेसचं उदघाटन होणार आहे.
 • या कार्यक्रमाचाच एक भाग असलेल्या भव्य विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन वांद्रे-कुर्ला संकुलाजवळील एमएमआरडीए मैदानात करण्यात आलं आहे.
 • वैद्यकीय क्षेत्रात 2001 साली नोबेल पुरस्कार पटकावलेले पॉल नर्स, 2002 साली रसायन शास्त्राचे नोबेल पारितोषिक पटकावलेले स्वित्झर्लंडचे कुर्ट वुर्थरिच, 2009 चे रसायन शास्त्राचे नोबेल पुरस्कारविजेते इस्राइलचे ॲडा ई योनाथ, 2013 साली वैद्यकीय क्षेत्रात नोबेल पुरस्कार पटकावलेले रॅण्डी सेकमॅन आदी दिग्गज मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे.
 • या कार्यक्रमाचं आणखी एक आकर्षण म्हणजे यंदाच्या वर्षी नोबेल पुरस्काराने सन्मा‍नित करण्यात आलेले कैलास सत्यार्थी तसेच 2006 चे नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
 • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष के. राधाकृष्णन्, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर हे सुध्दा  या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
 • वाजपेयीचा जन्मदिवस (25 डिसेंबर) 'सुशासन दिन' (Good Governance Day) म्हणून साजरा करण्यात आला.
 • भारताचा युवा खेळाडू कदम्बी श्रीकांतने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
 • पुरुष गटात पहिल्या पाच क्रमांकांमध्ये स्थान मिळविणारा तो तिसरा भारतीय खेळाडू आहे.
 • त्याने चीन खुल्या स्पर्धेत विजेतेपद मिळवत कारकीर्दीतील सर्वोच्च कामगिरीची नोंद केली होती. तसेच या 21 वर्षीय खेळाडूने हाँगकाँग व दुबईमधील स्पर्धामध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल गाठली होती.
 • मोठ्या लाभधारकांसोबत विस्तृत विचार-विनीमय करण्यासाठी अर्थ मंत्रालयाचा अर्थ सेवा विभाग महाराष्ट्रातल्या पुणे येथील राष्ट्रीय बॅकिंग व्यवस्थापन संस्थेत 2 व 3 जानेवारी 2015 रोजी बँक आणि आर्थिक संस्थांसाठी एक उच्च स्तरीय रिट्रीट आयोजित करण्याचा करत आहे.
 • या रिट्रीटला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा, रिझर्व बँक गव्हर्नर डॉ. रघुराम राजन, अर्थ सचिव राजीव महर्षी, अर्थ सेवा विभागाचे सचिव डॉ. हसमुख अधिया आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या सर्व बँका व आर्थिक संस्थांचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सहभागी होणार आहेत.
 • रिट्रीटच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सुधारणा करण्यासंदर्भातील ‘ब्लू प्रिंट’ साठी बँकिंग क्षेत्रातील संचालक, तज्ज्ञांशी चर्चा करणार आहेत.
 • बाबरी मशीदप्रकरणातील सर्वात वयोवृद्ध याचिकाकर्ते मोहम्मद फारूक यांचे येथे निधन झाले. ते 100 वर्षांचे होते. रामजन्मभूमी वादात मुस्लिमांची बाजू मांडणाऱ्या सात प्रमुख याचिकाकर्त्यांपैकी ते एक होते.
 • सायबर गुन्हयांचे  सर्वसमावेशक पध्दतीने निवारण करण्यासाठी  गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शैक्षणिक व व्यावसायिकांच्या एका तज्ञ अभ्यास गटाची स्थापना करायला मंजूरी दिली आहे, जेणेकरुन देशातील सायबर गुन्हयांचे  निवारण करणे शक्य होईल. सायबर गुन्हयाच्या प्रत्येक  पैलूचा सामना करण्याच्या  सूचना देखील हा तज्ञ गट देणार आहे.
 • पाच सदस्यीय तज्ञ अभ्यास गटात सी-डॅक, पुण्याचे महासंचालक डॉ. रजत मूना, भारतीय विज्ञान संस्था बंगळुरुचे प्राध्यापक  कृष्णन, सर्ट इनचे महासंचालक डॉ. गुलशन राय, आयआयटी कानपूरचे संगणक विज्ञानाचे प्राध्यापक डॉ. मनीन्द्र अग्रवाल आणि बंगळरुचे प्राध्यापक डॉ. डी. दास यांचा समावेश आहे. गृहमंत्रालयाचे संयुक्त सचिव (केंद्र-राज्य) कुमार अलोक गटाचे संयोजक असणार आहेत.
 • मागील दोन-तीन वर्षात देशात सायबर गुन्हयांच्या प्रमाणात अंदाजे 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 • शिवाय देशांतर्गत सायबर गुन्ह्यांचे भारत सहज लक्ष्य होते त्यामुळे सायबर गुन्हे मुक्त वातावरण निर्मिती करणे गरजेचे आहे. ह्या पार्श्वभूमीवर हा गट महत्त्वाचा ठरतो.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरूवारी वाराणसी मतदार संघात जाऊन स्वच्छता मोहिमेचा आढावा घेतला. यावेळी मोदींनी आणखी नऊ जणांना 'स्वच्छ भारत' अभियानात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले.
 • मुंबईच्या डबेवाल्यांसोबत माजी क्रिकेटपटू सौरभ गांगुली आणि हास्यकलाकार कपिल शर्मा याशिवाय माजी प्रशासकीय अधिकारी किरण बेदी, नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य, नृत्यांगना सोनल मानसिंग, इनाडू गुप्रचे रामोजी राव, इंडिया ग्रुपचे अरुण पुरी तसेच चार्टड अकाऊंटंट्सची संघटना (आयसीएआय) यांना मोदींनी स्वच्छ भारत अभियानाला हातभार लावण्यासाठी निमंत्रित केलं आहे.
 • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यातील जिल्हावार पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली असून शिवसेनेला मुंबई शहर जिल्ह्याचे पालकत्व देण्यात आले आहे. सुभाष देसाई मुंबई शहरचे तर शिक्षणमंत्री विनोद तावडे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहेत.
 • पालकमंत्र्यांची सविस्तर यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
 • गरीब  विद्यार्थ्यांसाठी सुपर-30 (आयआयटी प्रवेश परीक्षेशी निगडीत) या गटाची स्थापन करणारे आनंद कुमार यांनी मेंदूला चालना देणारा रिअ‍ॅलिटी शो तयार करण्याची कल्पना मांडली आहे
 • झारखंडमध्ये बहुमताने निवडून आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने(भाजप) रघुवर दास यांची झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड केली आहे.
 • दास यांच्या रुपाने बिगर आदिवासी चेहऱयाला प्रथमच मुख्यमंत्रीपदाची संधी मिळत आहे.
 • रघुवर दास हे टाटा स्टील कंपनीचे माजी कर्मचारी असून जमशेदपूर-पूर्व मतदार संघातून ते सलग पाचव्यांदा निवडून आले आहेत.
 • भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेवरील नदी किनाऱ्यानजीक असलेल्या भागांमधून दहशतवादी वारंवार घुसखोरीचा प्रयत्न करीत आहेत.
 • यावर खबरदारीचा उपाय म्हणून सीमा सुरक्षा दलाकडून 'लेसर वॉल' उभारण्यात येणार आहे. सध्या अशा प्रकारचे तंत्रज्ञान इस्राइल आणि सिंगापूर या देशांत वापरले जाते.
 • तीनदा 'एम्मी' पुरस्कार विजेते ठरलेले दिग्दर्शक जोसेफ सरजट (वय८९) यांचे निधन झाले. त्यांचा 1974 मधील 'द टेकिंग ऑफ पेलहॅम वन टू थ्री अँड मॅकआर्थर' हा साहसपट गाजला होता.
 • लासी, द इनव्हेडर्स, द मॅन फ्रॉम अंकल, स्टार ट्रेक या मालिकांचे दिग्दर्शन त्यांनी केले. कलोस्स- द फॉर्बिन प्रोजेक्ट, द मॅन या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले.
 • त्यांना 1985 मध्ये 'लव्ह इज नेव्हर सायलेंट', 1990 मध्ये 'कॅरोलिन' व  1992 मध्ये 'मिस रोज व्हाइट' चित्रपटांसाठी 'एम्मी' पुरस्कार मिळाला.
 • प्रथमच पाकिस्तान व रशिया यांच्यात 1.7 अब्ज डॉलर्सचा ऊर्जा करार झाला आहे व त्यात कराची ते लाहोर दरम्यान गॅस पाइपलाइन टाकण्यात येणार आहे.
 • रशिया सध्या आर्थिक संकटात असल्याने त्यांना अशा प्रकारच्या कराराची गरज आहेच, त्यात पाकिस्तानात ऊर्जेची टंचाई आहे.
 • रशिया पाकिस्तानला कराची स्टील मिल्स स्थापन करण्यात मदत करणार असून तेल व वायू विकसन संस्था निर्माण करण्यास मदत करणार आहे. सध्या पाकिस्तानात तेल शोधनासाठी रशियाची उपकरणे वापरली जातात.
 • पाकिस्तानने सध्या गॅसच्या दोन पाइपलाइन तयार केल्या असून इराण- पाकिस्तान गॅस पाइपलाइन प्रकल्प बासनात गेला आहे, त्यात ग्वादर व कराची ते लाहोर पाइपलाईन बसवण्याच्या तो प्रयत्नात होता.
 • चीनशी ग्वादर गॅस पाइपलाइनसाठी 3 अब्ज डॉलरचा करार करण्यात आला आहे.
 • आसाममध्ये सर्वसामान्य आदिवासींवर हल्ला करून तब्बल ७८ जणांची हत्या करणाऱ्या नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड (एनडीएफबी) या संघटनेविरोधात केंद्र सरकार कठोर पावले उचलणार आहे.
 • स्वयंपाकाचा गॅस अधिकाधिक प्रमाणात उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारने पाच किलो वजनाचा सिलिंडर सवलतीतील बाजारात आणला आहे. सर्व महानगरांमध्ये हा सिलिंडर निवडक पेट्रोल पंप व किराणा दुकानांमध्ये उपलब्ध होईल.
 • नोंदणीकृत ग्राहकांना हा पाच किलो वजनाचा सिलिंडर त्यांच्या एलपीजी वितरकाकडे 155 रुपयांना उपलब्ध असेल. नोंदणीकृत नसलेल्या ग्राहकांना हा सिलिंडर अल्पशा कागदपत्रांच्या सादरीकरणानंतर निवडक पेट्रोल पंप व किराणा दुकानांवर उपलब्ध होऊ शकणार आहे. त्याची किंमत 351 रुपये असेल.
  शिवाय त्यासाठी त्यांना आधी बुकिंगही करावे लागणार नाही.
 • माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.
 • pravasi bhartiy divas  7 ते 9 जानेवारी या कालावधीत गांधीनगर येथे होणाऱ्या प्रवासी भारतीय दिनाच्या उपक्रमात गुंतवणूकदारांना आकर्षित करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
 • विशेष म्हणजे यंदा महात्मा गांधी यांच्या दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतण्यास 100 वर्षे पूर्ण होत आहेत.
 • जगभरात विखुरलेल्या भारतीयांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या 13 व्या 'प्रवासी भारतीय दिवस' उपक्रमात यंदा 'मेक इन् इंडिया', 'गंगा शुद्धीकरण प्रकल्प' आणि आर्थिक सुधारणांचे कार्यक्रम अधोरेखित करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे
 • तीन आरोपींना राजद्रोहाच्या खटल्यात गोवण्याच्या विशेष लवादाच्या  निर्णयाला आव्हान देण्यात आल्यावरून पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्यावरील खटल्याला विशेष लवादाने स्थगिती दिली आहे.
 • 2014 मधील चर्चेतील चर्चित पुस्तकांचा विचार करता, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार संजय बारू यांच्या सिंग यांच्यावरील 'द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' या पुस्तकाने खळबळ उडवून दिली होती. देशाची समृद्ध नैसर्गिक संपत्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळ्या सोन्याची अर्थात, कोळशाची केंद्रीय पातळीवरील निर्णयाने कशी राख केली, याचा उलगडा करणारे पी. सी. परख यांचे 'क्रुसेडर ऑर कॉन्स्पिरेटर? कोलगेट अ‍ॅण्ड अदर ट्रथ', तर परराष्ट्र  नीतीतील मुरब्बी नटवर सिंह यांच्या 'युवर्स सिन्सिअरली' अशा पुस्तकांनी सत्ताधाऱ्यांना 'लक्ष्य' केले होते.
 डाव्या बाजूच्या फेसबुक लाईकला क्लिक करायला विसरू नका.

आता PDF स्वरूपात वा प्रिंटआउट काढण्यासाठी ह्या बटणाचा वापर करा.

Print Friendly and PDF