संक्षिप्त चालू घडामोडी 25 डिसेंबर 2014

 • pandit malviy भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व पंडित मदनमोहन मालवीय यांना 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर
 • बनारस हिंदू विश्वविद्यापीठ व हिंदू महासभेचे संस्थापक, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ पंडित मदनमोहन मालवीय यांनाही मरणोत्तर 'भारतरत्न' सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
 • प्रजासत्ताकदिनी, 26 जानेवारीला समारंभपूर्वक हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात येईल.
 • विशेष म्हणजे आज 25 डिसेंबर 2014 रोजी वाजपेयी यांचा गुरुवारी 90वा वाढदिवस आहे तर मालवीय यांची 153वी जयंती आहे.
 • 2005 पूर्वीच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी रिझर्व बँकेने आणखी सहा महिन्यांची मुदत दिली.
 • चलनात असलेल्या नोटांत संगती असावी आणि बनावट नोटांची तस्करी रोखण्यास मदत व्हावी या अनुषंगाने रिझर्व्ह बँकेने 2005  पूर्वी नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • त्यावर 30 जून 2015 पासून अंमलबजावणी होणार असल्याने, त्यापूर्वी नागरिकांनी नोटा बदलून घेण्याचे आवाहन बँकांनी केले आहे.
 • ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचे 'नटखट' हे आत्मचरित्र रविवारी (28 डिसेंबर) ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात (पुणे) प्रकाशित होणार आहे.
 • दुबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देण्यात येणारा 'जीवन गौरव पुरस्कार' यंदा प्रख्यात गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे.
 • हा चित्रपट महोत्सव 10 ते 17 डिसेंबर या कालावधीत होणार आहे.
 • पुणे येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स तसेच नागपूर येथील महाराष्ट्र अँटिबायोटिक्स या कंपन्यांसह देशातील बंद पडलेल्या औषध तसेच रासायनिक खतांच्या कंपन्या सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
 • एका महिला प्रवाशावर टॅक्सीचालकाने बलात्कार केल्यानंतर उबर या कॅब सेवेवर घातलेली बंदी उठवण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
 • जपानमध्ये मध्यावधी निवडणुकांनंतर यश मिळवलेल्या शिन्झो अ‍ॅबे यांना तेथील संसदेने पंतप्रधानपदी आरूढ केले आहे.
 • ते पुन्हा पंतप्रधान होत असतानाच चीनने, राज्यघटना बदलाल तर याद राखा, असा इशारा जपानला दिला आहे.
 • तारो असो हे उपपंतप्रधान झाले असून अर्थ मंत्री किशिगा हे परराष्ट्र मंत्री, तर योईची मियावाझा हे उद्योग मंत्री झाले आहेत.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पंडित प्रबोध कुमार मिश्रा यांच्या "वंदे भारतम्" या पुस्तकाचे  प्रकाशन करण्यात आले. संस्कृत भाषेतील राष्ट्रीय  कवितांचा संग्रह या पुस्तकात करण्यात आला आहे. या कविता ओडिशातील विविध वृत्तपत्रात यापूर्वी प्रकाशित झाल्या आहेत.
 • गेली 30 पेक्षा अधिक वर्षे न्यू यॉर्कमधे आयबी‌एम कंपनीच्या थॉमस जे. वॉट्सन संशोधन केंद्रात कार्यरत डॉ. राजीव वसंत जोशी यांना ऑक्टोबर 2014 मध्ये 'न्यू जर्सी इन्व्हेंटर हॉल ऑफ द फेम' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
 • email आज जलद संपर्काचे माध्यम बनलेला ईमेल 2014 मध्ये 32 वर्षांचा झाला. मात्र आजच्या काळातील संदेशवहनाचे महत्त्वाचे माध्यम झालेला हा ईमेल म्हणजे मुंबईत जन्मलेल्या एका अमेरिकन- भारतीयाने जगाला दिलेली देणगी आहे.
 • व्ही. ए. शिवा अय्यादुराई या भारतीय-अमेरिकनानेच 1978 मध्ये ईमेलचा शोध लावला होता आणि त्यावेळी ते जेमतेम 14 वर्षांचे होते!
 • 1982 मध्ये अमेरिकन सरकारने अय्यादुराई यांना ईमेलचा कॉपीराईट बहाल करून ईमेलचा निर्माता म्हणून त्याच्या नावावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केले. त्यावेळी सॉफ्टवेअरमधील संशोधनाच्या संरक्षणासाठी कॉपीराइट हा एकमेव मार्ग होता.
 • काळ्या पैशांच्या मुद्द्यावरून काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारशी पंगा घेणारे आणि लोकसभा निवडणुकीआधी नरेंद्र मोदी यांचा जाहीर प्रचार करणारे स्वदेशीचे कट्टर पुरस्कर्ते योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर केंद्र सरकारच्या खादी व ग्रामोद्योगाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे.
 डाव्या बाजूच्या फेसबुक लाईकला क्लिक करायला विसरू नका.

आता PDF स्वरूपात वा प्रिंटआउट काढण्यासाठी ह्या बटणाचा वापर करा.

Print Friendly and PDF