संक्षिप्त चालू घडामोडी 18 डिसेंबर 2014

 • IMG_90906867867428 भारतीय प्रक्षेपकातून अंतराळात मानव पाठविण्याच्या दिशेने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) गुरुवारी 18 डिसेंबर 2014 रोजी यशस्वी पाऊल टाकले.
 • आतापर्यंतच्या सर्वाधिक वजनाच्या यानाने गुरुवारी श्रीहरीकोटा येथून यशस्वीपणे उड्डाण केले आणि इस्रोने भारतीय अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात नवा इतिहास लिहिला.
 • तब्बल 630 टन वजनाच्या जीएसएलव्ही मार्क-3 या यानाने गुरुवारी सकाळी यशस्वीपणे उड्डाण केले.
 • प्रयोग म्हणून करण्यात आलेल्या उड्डाणाने पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले.
 • सतीश धवन अंतराळ केंद्रातील प्रक्षेपक तळावरून गुरुवारी सकाळी नऊ वाजता या यानाने अंतराळाच्या दिशेने झेप घेतली. या प्रायोगिक उड्डाणामध्ये इस्रोने या स्वरुपाच्या उड्डाणासाठी लागणाऱया सर्व चाचण्या घेतल्या. या सर्व चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्याचे इस्रोने म्हटले आहे.
 • गुरुवारी झालेले उड्डाण मानवरहित होते.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील कर्नाली पंचायतीअंतर्गत येणारी येणारी कर्नाली, पिपालीया, वादिया आणि बागलीपुरा ही चार गावे दत्तक घेतली आहे.
 • पेशावरमधील शाळेत तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर जागे झालेल्या पाकिस्तान सरकारने मृत्युदंडाच्या शिक्षेवर असलेली बंदी उठविली आहे.
 • चर्च ऑफ इंग्लंडने परंपरा मोडत एका महिलेची बिशपपदी नेमणूक केली. रेवरंड लिबी लेन (वय 48) असे या पहिल्या महिला बिशपचे नाव असून, त्यांची स्टॉकपोर्ट येथे बिशपपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 • अर्थविवंचनेत असलेल्या 'स्पाइसजेट' हवाई प्रवास कंपनीची सेवा इंधनाअभावी ठप्प पडली आहे.. तेल कंपन्यांनी उधारीवर इंधन पुरविण्यास नकार दिल्याने स्पाइसजेटच्या एकाही विमानाचे उड्डाण होऊ शकलेले नाही.
 • अमेरिकेतील भारतीय महिलांसाठी प्रथमच न्यूजर्सी येथे आयोजित करण्यात आलेल्या सौंदर्य स्पर्धेत पुण्याची नमिता दोडवाडकर "मिसेस इंडिया यूएसए' या मुकुटाची मानकरी ठरल्या आहेत.
 • थोरियम इंधनावर चालणारी आणि पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या ऍडव्हान्स हेवी वॉटर अणुभट्टीची उभारणी महाराष्ट्रातील तारापूर येथे होईल.
  2016 पर्यंत स्थापना कार्य पूर्ण होईल आणि 2020 पर्यंत ही अणुभट्टी पूर्णतः कार्यान्वित होईल.
 • नासाच्या मार्स रोव्हर क्युरिऑसिटीने प्रथमच मंगळावर कार्बनी रेणू असल्याचा पुरावा दिला आहे. सेंद्रिय रेणू हे कुठल्याही ग्रहावरील सजीवांचा मूळ घटक असतात.
 • सोनी पिक्‍चर्स कंपनीवर नुकत्याच झालेल्या मोठ्या सायबर हल्ल्यामध्ये जेम्स बॉंड मालिकेमधील "स्पेक्‍टर' या आगामी चित्रपटाचे प्राथमिक कथानक चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले आहे.
 • अप्रत्यक्ष करांचे जाळे सुटसुटीत करून केंद्राच्या महसुलात अधिकाधिक वाढ करण्याच्या उद्देशाने प्रस्तावित करण्यात आलेल्या वस्तू व सेवा कराला (जीएसटी) अखेरीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनातच यासंदर्भातील सुधारित विधेयकाला मंजुरी मिळवून घेण्याचे आता केंद्र सरकारचे पुढचे लक्ष्य असेल. 1 एप्रिल 2016 पासून देशभरात जीएसटीची अंमलबजावणी करण्याचा केंद्र सरकारचा इरादा आहे
  केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने आता संसदेतही या विधेयकाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. जीएसटीमुळे केंद्रीय पातळीवर उत्पादन शुल्क व सेवा कर तर राज्य पातळीवर मूल्यवर्धित कर (व्हॅट) व स्थानिक कर रद्दबातल ठरतील. राज्यांच्या आग्रहामुळे पेट्रोलियम पदार्थावरील कर जीएसटीच्या कक्षेत न आणण्याचे केंद्राने मान्य केले आहे. मात्र, त्याबदल्यात राज्यांना प्रवेश करांवर पाणी सोडावे लागणार आहे.
 • विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन २४ डिसेंबरपर्यंत चालणार असल्याची माहिती कामकाज समितीने दिली आहे.
 • स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देत कमीतकमी गुंतवणुकीमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी अरुणाचल प्रदेशच्या भारतीय जनता पक्षाने "नमो इंडिया‘ या प्रकल्पाचे उद्‌घाटन केले.
आम्ही परीक्षांच्या दृष्टीने महत्त्वाचे तेवढेच सादर करतो. आशा आहे आपल्याला हे आवडेल.
आवडल्यास डाव्या बाजूच्या फेसबुक लाईकला क्लिक करा.

आता PDF स्वरूपात वा प्रिंटआउट काढण्यासाठी ह्या बटणाचा वापर करा.

Print Friendly and PDF