सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 99


981. उत्तरेकडून दक्षिणेकडे डोंगररांगांच्या स्थानानुसार योग्य क्रम लावा.general-knowledge-quiz

A. सातपुडा-सातमाळा-अजिंठा-हरिश्चंद्र-बालाघाट-शंभू महादेव डोंगर
B. शंभू महादेव डोंगर-सातमाळा-अजिंठा-सातपुडा-बालाघाट
C. हरिश्चंद्र-बालाघाट-सातपुडा-सातमाळा-अजिंठा-शंभू महादेव डोंगर
D. सातमाळा-अजिंठा-हरिश्चंद्र-बालाघाट-शंभू महादेव डोंगर-सातपुडा


Click for answer

A. सातपुडा-सातमाळा-अजिंठा-हरिश्चंद्र-बालाघाट-शंभू महादेव डोंगर
982. खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?
I.भारतात सन 1853 मध्ये मुंबई ते ठाणे हा पहिला लोहमार्ग सुरू झाला.
II.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 हा महाराष्ट्रातील मुंबई नाशिक व धुळे शहरांना जोडतो.
III. जवाहरलाल नेहरू पोर्ट हे मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यास मदत करते.

A. केवळ I व II
B. केवळ II व III
C. केवळ I व III
D. वरील सर्व


Click for answer

D. वरील सर्व
983. बिहू उत्सव साजरे करणारे राज्य _____________________.

A. महाराष्ट्र
B. आसाम
C. ओडिशा
D. तामीळनाडू


Click for answer

B. आसाम
984. लोकमान्य टिळकांनी 'गीतारहस्य' हा ग्रंथ ____________ च्या तुरुंगात लिहिला.

A. अंदमान
B. मंडाले
C. अहमदनगर
D. डोंगरी


Click for answer

B. मंडाले
985. महर्षी कर्व्यांना 3 जून 1916 रोजी स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाची प्रेरणा कुणाकडून मिळाली ?

A. अमेरिकन वुमेन्स युनिव्हर्सिटी
B. मास्को वुमेन्स युनिव्हर्सिटी
C. जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी
D. फ्रान्स वुमेन्स युनिव्हर्सिटी


Click for answer

C. जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी
986. गोपाळ गणेश आगरकर यांचा 'सुधारक' हे साप्ताहिक चालू करण्यामागचा उद्देश काय होता ?

A. पाश्चिमात्य शिक्षणाचा स्वीकार
B. स्त्री-पुरूष समानतेचा स्वीकार
C. नवीन वैचारिक दृष्टीकोनाचा स्वीकार
D. व्यक्ती-स्वातंत्र्याचा स्वीकार


Click for answer

A. पाश्चिमात्य शिक्षणाचा स्वीकार
987. महर्षी कर्व्यानी 21 एप्रिल 1944 मध्ये स्थापन केलेल्या 'समता संघा' चा पुढे कुठल्या संस्थेत अंर्तभाव झाला ?

A. जाती-निर्मूलन संस्था
B. स्त्री-पुरूष समानता संघ
C. स्त्री-पुरूष शिक्षण संघ
D. सर्व धर्मीय संघ


Click for answer

A. जाती-निर्मूलन संस्था
988. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 1923 साली लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील कोणत्या प्रबंधाबद्दल 'डॉक्टर ऑफ सायन्स' ही पदवी दिली ?

A. द प्रॉब्लेम्स ऑफ रूपी
B. द प्रॉब्लेम्स ऑफ मनी
C. द इव्होल्युशन ऍट प्रिन्सीपल फायनान्स इन ब्रिटीश इंडिया
D. ऍडमिनीस्ट्रेशन ऍण्ड फायनान्स ऍट द ईस्ट इंडिया कंपनी


Click for answer

A. द प्रॉब्लेम्स ऑफ रूपी
989. पाण्याचा ताण सहन करणारे, कडक थंडीत येणारे व विम्ल जमिनीत येणारे कोणते तृणधान्य भारतात घेतात ?

A. गहू
B. सातू
C. बाजरी
D. ज्वारी


Click for answer

B. सातू
990. महाराष्ट्र राज्यात जास्तीत जास्त वापरात असलेली सिंचन पध्दती ______________ आहे.

A. ठिबक सिंचन पध्दती
B. तुषार सिंचन पध्दती
C. सरी पध्दती
D. सीमा सिंचन पध्दती


Click for answer

C. सरी पध्दती