सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 102


1011. खालीलपैकी लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान असलेला सार्वभौम देश कोणता ? quiz-time

A. मोनॅको
B. चीन
C. व्हॅटिकन सिटी
D. फिजी


Click for answer
C. व्हॅटिकन सिटी

आंतरराष्ट्रीय पातळीवर सार्वभौम मानल्या गेलेल्या व्हॅटिकन सिटीची लोकसंख्या आहे फक्त 842. हजारापेक्षाही कमी लोकसंख्या असलेला हा देश ख्रिश्चन धर्मगुरू पोप यांचे निवासस्थान आहे.
1012. 1976 साली कोणत्या घटनादुरुस्तीने 'समाजवाद' हा शब्द संविधानाच्या सरनाम्यात घालण्यात आला ?

A. 42 वी घटनादुरुस्ती
B. 43 वी घटनादुरुस्ती
C. 41 वी घटनादुरुस्ती
D. 45 वी घटनादुरुस्ती


Click for answer
A. 42 वी घटनादुरुस्ती
1013. राज्यसभेवर सर्वात प्रथम नामनियुक्त करण्यात आलेले चित्रपटसृष्टीतील व्यक्तिमत्त्व कोण ?

A. लता मंगेशकर
B. पृथ्वीराज कपूर
C. राज कपूर
D. बलराज सहानी


Click for answer
B. पृथ्वीराज कपूर
1014. मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले होते ?

A. भाऊ महाजन
B. विष्णुशास्त्री चिपळूणकर
C. बाळशास्त्री जांभेकर
D. लोकहितवादी


Click for answer
C. बाळशास्त्री जांभेकर
1015. महाराष्ट्राचे 'बुकर टी. वॉशिंग्टन' ह्या शब्दात कोणाचा गौरव केला जातो ?

A. कर्मवीर भाऊराव पाटील
B. महर्षी धोंडो केशव कर्वे
C. महात्मा ज्योतिबा फुले
D. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे


Click for answer
A. कर्मवीर भाऊराव पाटील
1016. संघराज्य सरकारमध्ये _________________________.

A. सर्व अधिकार केंद्र सरकारला आहेत.
B. सर्व अधिकार राज्य शासनाला असतात.
C. राज्याला अधिकार असतात पण केंद्र सरकार मार्गदर्शक असते.
D. राज्य आणि केंद्र यांमध्ये अधिकार विभाजित असतात.


Click for answer
D. राज्य आणि केंद्र यांमध्ये अधिकार विभाजित असतात.
1017. खालीलपैकी कोणत्या हक्कास डॉ.आंबेडकर यांनी राज्यघटनेचे 'हृदय आणि आत्मा' असे म्हटले आहे ?

A. घटनात्मक उपायांचा अधिकार
B. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार
C. समतेचा अधिकार
D. मालमत्तेचा अधिकार


Click for answer
A. घटनात्मक उपायांचा अधिकार
1018. राज्यघटनेच्या अनुच्छेद 326 मध्ये 61 वी घटनादुरूस्ती करून ____________________ व्यवस्था करण्यात आली.

A. निवडणूकीच्या संदर्भात आचार संहितेबाबत
B. मतदारांना ओळखपत्र देण्याबाबत
C. मतदारांचे वय 21 वर्षावरून 18 वर्षे करणेबाबत
D. मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक्स मशीनचा वापर करणे बाबत


Click for answer
C. मतदारांचे वय 21 वर्षावरून 18 वर्षे करणेबाबत
1019. खालीलपैकी कोणत्या राज्यात "आधार" कार्ड सर्वप्रथम वितरीत केले गेले ?

A. गुजरात
B. महाराष्ट्र
C. आसाम
D. तामिळनाडू


Click for answer
B. महाराष्ट्र
1020. भारतात _______________ मध्ये महिलांसाठी जागा राखीव आहेत.

A. लोकसभा
B. राज्य विधिमंडळ
C. पंचायत राज संस्था
D. यापैकी नाही


Click for answer
C. पंचायत राज संस्था