चालू घडामोडी- 5 नोव्हेंबर 2014


मराठी चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 608

1. कोणत्या राज्यातील विधानसभा बरखास्त करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजूरी दिली आहे. त्यामुळे तेथील विधानसभा निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला आहे ?

A. जम्मू आणि काश्मीर
B. दिल्ली
C. त्रिपुरा
D. सिक्कीम


Click for answer
B. दिल्ली
2. खालीलपैकी कोणत्या देशात राष्ट्रध्वज बदलण्यासाठी तेथील सरकारकडून 2016 मध्ये सार्वजनिक मतचाचणी घेण्यात येणार आहे ?mpsc-online-quiz

A. अमेरिका
B. ब्राझील
C. कॅनडा
D. न्युझीलंड


Click for answer
D. न्युझीलंड

ब्रिटनच्या युनियन जॅकची छाप असलेला सध्याचा राष्ट्रध्वज बदलून "सिल्व्हर फर्न‘ या वनस्पतीचे चित्र असलेला ध्वज तयार करण्याचा पंतप्रधान जॉन की यांचा विचार आहे. ध्वज बदलण्याचा मुद्दा वादाचा ठरण्याची शक्‍यता असल्याने पंतप्रधान की यांनी या मुद्द्यावर मतदानासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. पूर्वी ब्रिटिशांची वसाहत असलेल्या न्यूझीलंडने आता शंभर वर्षांपासून असलेला ध्वज सोडून ठळकपणे न्यूझीलंडचा वाटेल असा "किवी‘ ध्वज स्वीकारण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.

काळ्या पार्श्वभूमीवर सिल्व्हर फर्नची पाने असा नवा ध्वज असावा, अशी इच्छा जॉन की यांनी यापूर्वीच बोलून दाखविली आहे. न्युझीलंडचे अनेक संघ याआधीपासूनच असा ध्वज वापरत आहेत.
3. संशोधकांनी अलीकडे जाहीर केलेल्या निष्कर्षांनुसार मंगळावर माणूस जास्तीत जास्त काळ जगू शकेल ? mars

A. 1 दिवस
B. 68 दिवस
C. 20 वर्षे
D. 100 वर्षे


Click for answer
B. 68 दिवस
4. केंद्र सरकार कोठे केंद्र सरकार कोठे प्राणिसंग्रहालय शास्त्र केंद्र उभारणार आहे ?

A. मुंबई
B. डेहराडून
C. भोपाळ
D. नवी दिल्ली


Click for answer
D. नवी दिल्ली

देशातील प्राणिसंग्रहालयांच्या कामकाजात बदल घडवणे, सध्याची कार्यपद्धत अधिक शास्त्रशुद्ध करणे, प्राणिसंग्रहालये पर्यटकांना अधिक आपलीशी वाटतील अशी करणे, हा यामागील हेतू आहे. प्रस्तावित संस्था केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून काम करेल, तसेच धोक्‍यात असलेल्या प्रजातींच्या संवर्धनासाठी ही संस्था मार्गदर्शन करेल.
5. गंगेचे प्रदूषण नेमक्या कोणत्या कारणामुळे होत आहे, यासाठी केंद्र सरकार कडून किती विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत ?

A. 1
B. 2
C. 12
D. 25


Click for answer
D. 25

सरकारने स्थापन केलेल्या समित्यांनी केलेल्या अहवालानुसार कारवाई करण्यात येणार आहे. गंगा नदीच्या उगमापासून शेवटपर्यंत तिच्या होणाऱ्या प्रदुषणाबाबत ही समिती तपासणी करणार आहे. विविध कारखान्यांकडून गंगा नदीत सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्याबाबतही कारवाई करण्यात येणार आहे. या समित्या सर्व माहिती जलसंधारण मंत्रालयाकडे देणार आहेत.
6. 10 नोव्हेंबर रोजी विसाव्या कोलकता आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवाचे (केआयएफएफ) उद्‌घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे ?

A. शाहरुख खान
B. अमिताभ बच्चन
C. आमीर खान
D. (A) आणि (B)


Click for answer
D. (A) आणि (B)
7. नानावटी-मेहता आयोगाचा अंतिम अहवाल लवकरच सादर होणार होण्याची शक्यता आहे. हा आयोग कशाशी संबंधित आहे ?

A. बाबरी मशिदीचा विद्ध्वंस
B. गुजरात दंगल
C. 1984 दिल्ली शिख हत्याकांड
D. ईशान्य भारतीयांच्यावर होणारे हल्ले


Click for answer
B. गुजरात दंगल
8. विविध स्तरांवर सुधारणा घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारने आता गुजरातच्या धर्तीवरच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कोणती योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे ?

A. कौशल्ययुक्त जीवन
B. तणावमुक्त नौकरी
C. स्वान्त सुखाय
D. जियो दिलसे


Click for answer
C. स्वान्त सुखाय

नागरिकांच्या सरकारकडून असलेल्या प्रचंड आणि विविध प्रकारच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मात्र, प्रशासकीय रचना आणि योजनांच्या निर्णय प्रक्रियेत कर्मचाऱ्यांना असलेले मर्यादित स्वातंत्र्य यामुळे हा वेग कमी होतो. "स्वान्त सुखाय‘मुळे सरकारी कर्मचाऱ्यांना योजना तयार करण्यात स्वायत्तता मिळून ते त्यांच्यातील ऊर्जेचा आणि ज्ञानाचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करतील, अशी सरकारला आशा आहे. अशा प्रकारची योजना गुजरातमध्ये गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे.

स्वान्त सुखाय योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोणताही सरकारी कर्मचारी पूर्वपरवानगी शिवाय ही योजना राबवू शकतो. कर्मचाऱ्याने त्याच्या दैनंदिन कामकाजात व्यत्यय न येऊ देता ही योजना राबवायची आहे. कर्मचारी आपल्या आवडीच्या कोणत्याही विषयात काम करू शकणार आहे. अर्थात, हा विषय सार्वजनिक आणि राष्ट्रीय हिताचा असायला हवा, तसेच अराजकीय आणि धर्मनिरपेक्ष असायला हवा, हा नियम आहे.
9. अमेरिकेतील शिकागोमधील नुकताच खालीलपैकी कोणी दोन गगनचुंबी इमारतींमधील (स्कायस्क्रॅपर्स) 138 मीटर अंतर शेकडो फूट उंचीवरील एका दोरीवरून डोळ्यांवर कापड बांधून चालण्याचा विक्रम केला ?

A.ख्रिस ब्रॉड
B.लान्स गिब्ज
C.रिचर्ड शेक्‍नर
D.निक वॅलेंडा


Click for answer
D.निक वॅलेंडा
10. 'मित्र-शक्ती' हा संयुक्त लष्करी सराव भारताने कोणत्या देशासोबत सरू केला आहे ?

A. नेपाळ
B. बांगलादेश
C. श्रीलंका
D. भूतान


Click for answer
C. श्रीलंका