संक्षिप्त चालू घडामोडी 26 नोव्हेंबर 2014

  • केंद्र सरकारने  "स्वच्छ भारत कोष" स्थापन करण्यात आल्याची घोषणा केली.
  • या कोषामध्ये जमा होणारी रक्कम ग्रामीण, शहरी भागांसह शाळांमध्ये स्वच्छतागृहे बांधण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
  • देशभरात राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेसाठी या कोषाच्या माध्यमातून निधी जमा केला जाणार आहे.
  • सामाजिक कृतज्ञतेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या देणग्या आणि कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबीलीटी (सीएसआर) अंतर्गत उद्योग क्षेत्रातून मिळणारा फंड स्वच्छ भारत कोषामध्ये जमा करण्यात येणार असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले
  • सीबीआय प्रमुखांची निवड करण्याच्या प्रक्रियेत लोकसभेतील सर्वात मोठय़ा पक्षाच्या नेत्याचा समावेश केला जाईल आणि त्या समितीमधील कोणतेही पद रिक्त असले तरी प्रमुखांची निवड अवैध ठरविली जाणार नाही, अशी दुरुस्ती डीएसपीई कायद्यात सुचविणारे विधेयक सरकारच्या वतीने मांडण्यात येणार आहे.
  • चक हगेलअमेरिकेचे संरक्षणमंत्री चक हेगेल यांनी  आपल्या पदाचा राजीनामा दिला असून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत काम करण्याचे त्यांनी मान्य केले आहे
  • पृथ्वीवरील सर्वात जुने पाणी कॅनडा मधील ओंटारिओ येथील टिमिन्स खाणीत सापडले असून ते 1.5 अब्ज वर्षांपूर्वीचे आहे.
  • त्याचा उपयोग पृथ्वीवरील जीवसृष्टी व मंगळाच्या अभ्यासासाठी होणार आहे.
  • लँकेस्टर विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाचे डॉ. ग्रेग हॉलंड यांनी मॅंचेस्टर विद्यापीठ व दोन कॅनेडियन विद्यापीठाच्या संशोधकांसह हा पाण्याचा साठा सापडला आहे.
  • अजित दोवलचीनसमवेत सीमाप्रश्नावर चर्चा करण्यासाठी एनडीए सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित दोवल यांची भारताचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे.
  • सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भारत आणि चीनने 2003 मध्ये विशेष प्रतिनिधी नियुक्त करून एक यंत्रणा उभी केली.
  • आतापर्यंत दोन्ही बाजूंनी या पातळीवर चर्चेच्या 17 फेऱ्या झाल्या असून त्यामधून काही प्रमाणात प्रगती झाली आहे.
  • भविष्य निर्वाह निधी ऑनलाईन पद्धतीने काढण्याची सुविधा डिसेंबरपासून प्रत्यक्षात येणार आहे, असे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हटले आहे
  • चीनने तिबेटमधून वाहणा-या यारलंग झँगबो नदीवर धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्याचे जाहीर केले आहे. यारलंग झँगबो ही नदी भारतात ब्रम्हपुत्रा नदीच्या नावाने ओळखली जाते.
  • चीनने बांधलेल्या या धरणामुळे भारत आणि बांगलादेशची चिंता वाढली आहे कारण या धरणामुळे भारत आणि बांगलादेशात पूरस्थिती निर्माण होऊ शकते तसेच भूस्खलनाचा धोकाही वाढला आहे.
  • भारताने वेळोवेळी या प्रकल्पाबद्दल चीनकडे चिंता व्यक्त केली आहे.
  • केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) अध्यक्षपदी माजी सनदी अधिकारी दीपक गुप्ता यांची केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे.
  • आयोगाच्या एखाद्या सदस्यालाच अध्यक्षपद देण्याची प्रथा होती. या वेळी मात्र बाहेरच्या व्यक्तीला अध्यक्षपदी नियुक्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • कॉंग्रेसचे ज्येष्ठ निष्ठावंत नेते आणि माजी पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
  • हेरगिरीचे प्रगत शस्त्र असलेल्या छुप्या पद्धतीने कारवाया करणाऱ्या रेजिन व्हायरसने सायबर जगताला विळखा घातला आहे.
  • या व्हायरसला "बॅकडोअर ट्रोजन” म्हणून ओळखले जाते. विविध यंत्रणांचा वेध घेण्यासाठी या व्हायरसची निर्मिती आणि वापर केला जात असल्याचे सांगितले जाते.
  • इटालियन संशोधक व कलाकार लिओनार्दो दा विंची याने प्रथम चक्रीवादळे ओळखली असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
  • लिओनार्दो दा विंची हा कलाकार, वैज्ञानिक, संशोधक, संगीतकार होता.
  • व्हॉलिबॉलचा सामना पाहण्याचा प्रयत्न केल्याच्या "गुन्ह्या'मुळे तुरुंगवास भोगत असलेल्या घोन्चेह घवामी (वय 25) या ब्रिटिश-इराणी तरुणीची अखेर न्यायालयाकडून जामिनावर सुटका करण्यात आली आहे
  • रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय समितीने 10 कार्यकारी संचालकांची आठ सरकारी बँकांचे संभाव्य अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवडयादी तयार केली आहे
  • अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘नॅशनल बुक अॅवॉर्ड’साठी यंदा भारतीय वंशाचे लेखक आनंद गोपाल यांना युद्धग्रस्त अफगाणिस्तानातील प्रत्यक्ष जीवनावर आधारित पुस्तकासाठी ‘कथाबाह्य विभागा’त नामांकन मिळाले आहे.
  • अंधासाठीच्या मर्यादित षटकांच्या विश्वचषक  क्रिकेट स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होणार आहेत.
  • गेराल्ड डोनोव्हन या 47 वर्षांच्या ब्रिटिश फोटोग्राफरने बुर्ज खलिफा या जगातील सर्वांत उंच इमारतीवरून ‘सेल्फी’ टिपली आहे.
    'दुबई 360' या प्रकल्पासाठी फोटोग्राफी झाल्यानंतर डोनोव्हन यांनी 'बुर्ज खलिफा'च्या सर्वोच्च टोकावरून 'सेल्फी'ही काढली.
    बुर्ज खलिफा या 2722 फूट उंचीच्या इमारतीवरून 360 अंशांमध्ये काढलेले फोटो आणि व्हिडिओच्या साह्याने दुबईची व्हर्च्युअल टूर घडवून आणणे हा 'दुबई 360' या प्रकल्पाचा उद्देश आहे.
  • अरुणाचल प्रदेशमधील नमसाईची 18 वा जिल्हा म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली.
  • तब्बल पंधरा वर्षांनंतर पुन्हा आढळलेल्या एका दुर्मिळ पक्ष्याच्या प्रजातीस भारतीय वंशाचे संशोधक आणि पक्षीतज्ज्ञ नवज्योत सोधी यांचे नाव देण्यात आले आहे. "सुलावेसी फ्लायकॅचर‘ हा आखूड पंख असणारा पक्षी सर्वप्रथम इंडोनेशियामध्ये आढळून आला होता. या पक्ष्याचे "मुस्कीकापा सोधी‘ असे नामकरण करण्यात आले आहे.
  • भारताच्या महिला बॉक्सर्सना जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त झाले नाही.
  • सर्जूबाला (४८ किलो) आणि स्विटी (८१ किलो) यांना अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • हिवाळी अधिवेशनात "कामगार कायदेदुरुस्ती विधेयक-2011” राज्यसभेत मंजूर.
  • राज्यसभेत मोदी सरकार अल्पमतात आहे ह्या पार्श्वभूमीवर ही बाब महत्त्वाची आहे.
  • या कायद्यानुसार भांडवलदारांना कामगारांच्या संख्येची नोंद ठेवणे सक्तीचे असल्याची संख्या 19 वरून थेट 40 वर नेण्यात आली आहे.
  • त्यामुळे नव्या कायद्याने छोट्या उद्योगांतील, तसेच असंघटित कामगार व महानगरांतील स्थलांतरित मजूर यात प्रचंड भरडले जातील, अशी भीती विरोधी पक्षांनी व्यक्त केली आहे.
  • पंतप्रधान मोदी यांच्या नेपाळ दौऱ्यात खालील करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या
    • - नेपाळ सरकारबरोबर परिवहनविषयक करार. यानुसार, काही विशिष्ट मार्गांवर दोन्ही देशांतील वाहनांना परवानगी.
    • - भारतातून नेपाळमध्ये पाचशे आणि एक हजाराच्या पंचवीस हजार रुपये किमतीपर्यंतच्या नोटा नेण्यास परवानगी. याआधी फक्त शंभर रुपयांच्या नोटांना परवानगी होती.
    • - नवी दिल्ली- काठमांडू बससेवेला हिरवा झेंडा.
    • - बोधगयेतील बोधीवृक्षाची फांदी लुंबिनी येथे लावण्यासाठी नेपाळ सरकारकडे सुपूर्द.
    • - अत्याधुनिक ध्रुव मार्क-3 हे हेलिकॉप्टर नेपाळ सरकारला भेट.
  • उसळणारा चेंडू डोक्यावर आदळल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कसोटी फलंदाज फिल ह्युजेसला  इस्पितळात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
  • सार्कप्रादेशिक संबंध सुधारावे आणि आर्थिक विकासासाठी योग्य वातावरण तयार व्हावे, यासाठी सार्क परिषदेस 26 नोव्हेंबर पासून काठमांडू (नेपाळ) येथे सुरूवात होत आहे.