संक्षिप्त चालू घडामोडी 24 नोव्हेंबर 2014

 • नॉर्वेचा अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसन ठरला बुध्दिबळाचा जगज्जेता.magnus carlsen त्याने विश्वविजेते पदाचा आव्हानवीर विश्वनाथन आनंद चा एक डाव बाकी ठेवून पराभव केला आहे.
 • कार्लसनने अकरा डावांमध्ये तीन विजय मिळवले तर, आनंदला फक्त एक विजय मिळवता आला होता.
 • आनंदने आतापर्यंत पाचवेळा जगज्जेतेपद मिळवले आहे तर कार्लसनने सलग दुस-यांदा विजेतेपद मिळवले.
 • फादर कुरियाकोस इलायस छवारा आणि सिस्टर इफारासिया या केरळच्या दोन कॅथॉलिक ख्रिश्चन धर्मगुरुंना पोप फ्रान्सिस यांनी रविवारी ‘संत’पद बहाल केले.
 • केरळच्या शंभरवर्ष जुन्या असलेल्या सायरो मलबार कॅथॉलिक चर्चमधील आतापर्यंत तिघांना ‘संत’पद देण्यात आले आहे.
 • यापूर्वी २००८ मध्ये सिस्टर अल्फान्सा यांना ‘संत’पद मिळाले होते.
 • मत्स्य उत्पादनात वाढ होण्यासाठी सरकार, देशात नीलक्रांतीची सुरुवात करणार असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी म्हटले आहे.
 • मत्स्य उत्पादन क्षेत्रात भारताचा दुसरा क्रमांक आहे.
 • विश्व मत्स्य दिन : 21 नोव्हेंबर
 • preah vihearथायलंड आणि कंबोडिया यांच्या सीमेवर असलेल्या प्रेह विहार या वादग्रस्त शिव मंदिराचे व्यवस्थापन संयुक्तपणे करण्याचा निर्णय भारत आणि चीन यांनी घेतला आहे. हे मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत असून, त्याच्या मालकीवरून थायलंड आणि कंबोडियामध्ये युद्धेही झाली आहेत.
 • राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने 12 राज्यातल्या 42 दुग्ध प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र, पंजाब, हरयाणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यात सुमारे 22102.72 लाख रुपयांचे हे प्रकल्प आहेत.
 • कोटय़वधी रुपयांच्या शारदा चिट फंड घोटाळाप्रकरणी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने (सीबीआय)तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य श्रींजय बोस यांना पाच तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली.
 • sarita deviइंचिऑन आशियाई स्पर्धेतील आक्षेपार्ह वर्तनाबद्दल भारतीय महिला बॉक्सर सरिता देवी हिच्यावर आशियाई ऑलिम्पिक समितीने (ओसीए) कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. सरिता देवीने आपल्या वर्तनाबद्दल बिनशर्त माफी मागितल्यानंतर तिला केवळ कठोर सूचना देऊन सोडण्याचा निर्णय ओसीएने जाहीर केला.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशातील 700 रेल्वेस्थानकांचा ‘स्वच्छ भारत अभियाना’त समावेश करण्याचा निर्णय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला आहे.
 • आयआयटी मुंबईने नवीन डायलिसीस मशीन तयार केले आहे. या मशीनमुळे डायलिसीसच्या खर्चात निम्म्यापेक्षा अधिक बचत होणार आहे.
 • या मशीनचे नामकरण ‘फायबर मेब्रन’ आहे.
 • बोफोर्स तोफांच्या खरेदीनंतर ३० वर्षानंतर भारतीय लष्करासाठी ८१४ तोफा खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या व्यवहारासाठी १५,७५० कोटी रुपये खर्च होणार आहे.
 • या ८१४ तोफा १५५ एमएम/५२ च्या असणार आहेत. या तोफांचे उत्पादन भारतात करण्याची अट घालण्यात आली आहे.
 • दक्षिण चीनी समुद्रातील स्पार्टली बेटांवर चीन विमानतळ बांधण्याच्या प्रयत्नांत असल्याचे उपग्रहांतून टिपलेल्या छायाचित्रांमधून दिसून आले आहे.
 • ऑस्कर विजेते अमेरिकी दिग्दर्शक माइक निकोलस यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या द ग्रॅज्युएट या चित्रपटाला १९६७ मध्ये ऑस्कर मिळाले होते.
 • birju maharajविख्यात कथ्थक गुरू पंडित बिर्जू महाराज यांना यंदाचा आदित्य विक्रम बिर्ला कला शिखर पुरस्कार राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते शनिवारी मुंबईत समारंभपूर्वक देण्यात आला.
 • संगीत कला केंद्राच्या वतीने दरवर्षी नामांकित कलाकारांना हा पुरस्कार देण्यात येतो.