चालू घडामोडी-1 नोव्हेंबर 2014


मराठी चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 604

1. प्रसारभारतीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

A. डॉ. ए. सूर्य प्रकाश
B. ओ.पी. केजरीवाल
C. मृणाल पाण्डे
D. बलबीर पुरी


Click for answer
A. डॉ. ए. सूर्य प्रकाश
2. कोणत्या फ्रेंच तेलकंपनीचे प्रमुख (सीईओ) ख्रिस्तोफ द मार्गेरी यांचा अलीकडे विमान अपघातात मृत्यू झाला ?

A. सर्वो
B. एल्फ
C. टोटल
D. शेल


Click for answer
C. टोटल
3. भीमाशंकराच्या परिसरातील पडकई योजनेद्वारे आंबेगाव तालुक्यातील महादेव कोळी, ठाकर व कातकरी या आदिवासींच्या जीवनात बदल घडविण्याऱ्या आनंद हरदेव कपूर यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या संस्थेशी निगडीत होते ? anand-kapoor

A. शाश्वत
B. वनराई
C. समता
D. मुख्यधारा


Click for answer
A. शाश्वत

मंचर-आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागातील आदिवासींना संघटित करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे 'शाश्वत' या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक सदस्य आनंद हरदेव कपूर यांनी गेली ३० वर्षे या भागात कामाचे जाळे उभे केले. राज्य सरकारच्या आदिवासी उपयोजना समितीचे सदस्य, पडकई योजनेचे जनक, डिंभे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा लढा उभारणारे सेनापती, आदिवासी मच्छीमार सहकारी संस्थेचे संस्थापक अशी अनेक रूपे असलेल्या आनंद कपूर यांचे २४ ऑक्टोबरला निधन झाले.

खरगपूरच्या आयआयटीमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या या बुद्धिमंताने आदिवासींना आपलेसे केले आणि सोप्या मासेमारीतून जगण्याचा पहिला मार्ग दाखविला.नापासांनी शिक्षण अर्धवट सोडू नये, यासाठी एक निवासी प्राथमिक शाळादेखील सुरू झाली आणि आदिवासी महिला-मुलांच्या आरोग्याची काळजी घेणारी आरोग्य शिबिरे आदिवासी पाडय़ात भरू लागली.

'संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमा'अंतर्गत (यूएनडीपी) इक्वेटर इनिशिएटिव्ह हा प्रतिष्ठेचा पुरस्कार २०१२ मध्ये शाश्वतला जाहीर झाला. पुणे जिल्ह्य़ाच्या एका उपेक्षित कोपऱ्यात केलेल्या लक्षणीय कामगिरीबद्दल ब्राझीलमध्ये झालेल्या परिषदेत आनंद कपूर यांनी हा पुरस्कार स्वीकारला होता.
4. इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथे झालेल्या वन्यजीवन चित्रपट महोत्सवात पांडा पुरस्कार (ग्रीन ऑस्कर) कोणत्या 27 वर्षीय भारतीय तरुणीला मिळाला ?

A. अश्विका कपूर
B. अरुंधती देशमुख
C. आसावरी देशपांडे
D. बीना घोष


Click for answer
A. अश्विका कपूर

तिला ज्या चित्रपटासाठी ग्रीन ऑस्कर मिळाले आहे त्याचे नाव 'सिरोक्को- हाऊ डड बिकेम स्टड' असे आहे. ही चित्रमय कहाणी ककापो प्रजातीच्या सिरोक्को या पोपटाची आहे. आता आपल्या पृथ्वीवर केवळ १२५ ककापो पोपट उरले आहेत व त्यांचे नामकरणही झाले आहे. न्यूझीलंडमध्ये आढळणाऱ्या व नष्टचर्याच्या मार्गावर असलेल्या ककापोला माओरी भाषेत निशाचर पोपट म्हणतात. त्यात सिरोक्को ही उपप्रजात आहे. त्यावर अश्विकाने गेल्या वर्षी अभ्यासाचा भाग म्हणून केवळ ४९३५० रुपये खर्च करून सिरोक्कोवरचा चित्रपट बनवला होता. त्याला आता पुरस्कार मिळाला आहे.
5. केंद्र सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

A. रघुराम राजन
B. कौशिक बासू
C. अरविंद सुब्रमणियन
D. अमर्त्य सेन


Click for answer
C. अरविंद सुब्रमणियन
6. जोको विडोदो यांनी 20 ऑक्टोबर रोजी कोणत्या देशाच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली ?

A. मलेशिया
B. इंडोनेशिया
C. मालदीव
D. फिजी


Click for answer
B. इंडोनेशिया
7. सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) महासंचालक कोण आहेत ?BSF

A. भारतभूषण नाईक
B. सुनील मित्रा
C. राणा कपूर
D. देवेंद्रकुमार पाठक


Click for answer
D. देवेंद्रकुमार पाठक

सीमावर्ती भागातील भारतीयांवर हल्ले करून पाकिस्तान दबाव आणू शकत नाही, असे बजावत प्रत्येक आगळिकीला जशाच तसे प्रत्युत्तर देण्याचे धोरण ठेवून पाकिस्तानी रेंजर्स व लष्कराला नरमाईची भूमिका भाग पाडण्याची व्यूहरचना सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) महासंचालक देवेंद्रकुमार पाठक यांच्या युद्ध कौशल्य व अनुभवाची प्रचीती देत आहे.
8. खालीलपैकी कोणता कालावधी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय राज्यशासनाने 2014 मध्ये घेतला ?

A. 1 ते 15 जानेवारी
B. 15 ते 28 फेब्रुवारी
C. 1 ते 15 मे
D. 1 ते 15 ऑगस्ट


Click for answer
C. 1 ते 15 मे
9. 26 जून 2014 पासून WTO-जागतिक व्यापार संघटनेचा 160 वा सदस्य देश म्हणून कोणता देश समाविष्ट करण्यात आला ? WTO

A. दक्षिण सुदान
B. येमेन
C. तैवान
D. अल्जेरिया


Click for answer
B. येमेन
10. 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धा कोठे होणे नियोजित आहे ?

A. गोल्डकोस्ट सिटी (ऑस्ट्रेलिया)
B. ग्लासगो (स्कॉटलंड)
C. गुआंगझू (चीन)
D. रिओ-दि-जानेरो (ब्राझील)


Click for answer
A. गोल्डकोस्ट सिटी (ऑस्ट्रेलिया)