सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 83


821. नदीखोरे क्षेत्राच्या चढत्या भाजणीनुसार खालीलपैकी योग्य क्रम कोणता ? general-knowledge-quiz

A. कावेरी, नर्मदा, गोदावरी, कृष्णा
B. कावेरी, कृष्णा, गोदावरी, नर्मदा
C. कावेरी, गोदावरी, नर्मदा, कृष्णा
D. कावेरी, नर्मदा, कृष्णा, गोदावरी


Click for answer

D. कावेरी, नर्मदा, कृष्णा, गोदावरी
822. खालीलपैकी कोणती एक जोडी अचूक जुळते ?

A. गुरूशिखर- 1727 मी.
B. कळसूबाई- 1646 मी.
C. धुपगड- 1530 मी.
D. माकुर्णी- 1694 मी.


Click for answer

B. कळसूबाई- 1646 मी.
823. दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात _____________ प्रकारची मृदा आढळते.

A. क्षारयुक्त व अल्कली
B. रेगूर
C. जांभी
D. दलदलीची


Click for answer

C. जांभी
824. हिमालय हा ____________________ आहे.

A. अर्वाचीन वली पर्वत
B. अवशिष्ट पर्वत
C. ठोकळ्यांचा पर्वत
D. ज्वालामुखीय पर्वत


Click for answer

A. अर्वाचीन वली पर्वत
825. भूऔष्णिक विद्युतनिर्मिती केंद्र _____________ येथे आहे.

A. पेंच
B. मणिकरण
C. कोयना
D. मंडी


Click for answer

B. मणिकरण
826. खालीलपैकी कोणती एक जोडी योग्य प्रकारे जोडण्यात आलेली नाही ?

A. सतलज-भाक्रा नांगल
B. महानदी-हिराकूड
C. गोदावरी-जायकवाडी
D. नर्मदा-चांदोली


Click for answer

D. नर्मदा-चांदोली
827. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो ?

A. गडचिरोली
B. आंबोली
C. अहिरी
D. महाबळेश्वर


Click for answer

B. आंबोली
828. खालीलपैकी कोणते तरंग भूकंपाशी निगडीत नाहीत ?

A. पी-तरंग
B. एस-तरंग
C. पृष्ठीय-तरंग
D. विद्युत चुंबकीय तरंग


Click for answer

D. विद्युत चुंबकीय तरंग
829. महाराष्ट्र राज्य आरोग्य विद्यापीठ कोणत्या शहरात आहे ?

A. नाशिक
B. नागपूर
C. पुणे
D. औरंगाबाद


Click for answer

A. नाशिक
830. पहिल्या पंचवार्षिक योजनेत ____________ ला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले होते.

A. व्यापार
B. शेती
C. औद्योगिकीकरण
D. गुंतवणूक


Click for answer

B. शेती