सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 73


721. खालीलपैकी किंमत वाढीस थेट जबाबदार घटक कोणता ? general-knowledge-quiz

A. प्रत्यक्ष कर
B. अप्रत्यक्ष कर
C. अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष कर
D. वरीलपैकी कोणतेही नाही


Click for answer
B. अप्रत्यक्ष कर
722. पहिला 'सहकारी पतसंस्था अधिनियम' (First Co-operative Credit Society Act) कोणत्या वर्षी संमत झाला ?

A. 1934
B. 1904
C. 1885
D. 1949


Click for answer
B. 1904
723. 'राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक'(NABARD) खालीलपैकी कोणत्या बँकांची तपासणी करू शकते ?

A. खाजगी
B. सार्वजनिक
C. सहकारी
D. कोणतीच नाही


Click for answer
C. सहकारी
724. भारतात नियोजन मंडळाची स्थापना केव्हा झाली ?

A. मार्च 1950
B. एप्रिल 1950
C. मार्च 1951
D. मार्च 1949


Click for answer
A. मार्च 1950
725. भारतात कोणत्या वर्षी 'सेवा कर' (Service Tax) लागू करण्यात आला ?

A. 1994-95
B. 1997-98
C. 2001-02
D. 1985-86


Click for answer
A. 1994-95
726. भारतात प्रच्छन्न (छुपी) बेरोजगारी (Disguised Unemployment) प्रामुख्याने _________ क्षेत्रात आढळून येते.

A. औद्योगिक
B. कृषी
C. मच्छीमारी
D. वाहतूक आणि दळणवळण\


Click for answer
B. कृषी
727. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कधी अंमलात आला ?

A. फेब्रुवारी 2006
B. मार्च 2007
C. एप्रिल 2008
D. फेब्रुवारी 2005


Click for answer
A. फेब्रुवारी 2006
728. कोणत्या वर्षात ''आयात-निर्यात बँके'ची (Import and Export Bank) स्थापना झाली ?

A. 1969
B. 1980
C. 1982
D. 1984


Click for answer
C. 1982
729. खालीलपैकी कोणता कर 'प्रत्यक्ष कर' आहे ?

A. शेतसारा
B. परदेशी प्रवास कर
C. अबकारी कर
D. करमणूक कर


Click for answer
A. शेतसारा
730. मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास ___________ असे म्हणतात.

A. आवर्तीगणन दर
B. कसर दर
C. बँक दर
D. व्याज दर


Click for answer
C. बँक दर