सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 66


651. जेव्हा आपण सपाट आरशापासून 4 मीटर दूर जातो तेव्हा आपण व आपली प्रतिमा यांमधील अंतर general-science-quiz

A. 8 मीटरने कमी होते.
B. 8 मीटरने वाढते.
C. 4 मीटरने कमी होते.
D. 4 मीटरने वाढते.


Click for answer

B. 8 मीटरने वाढते.
652. कोणत्याही प्रकारच्या काचेचा मुख्य घटक ________________ हा असतो.

A. लेड कार्बोनेट
B. धातूची सिलीकेट्स
C. सोडियम कार्बोनेट
D. लेड ऑक्साईड


Click for answer

B. धातूची सिलीकेट्स
653. खाली दिलेल्या पदार्थांपैकी कोणता एक पदार्थ वितळताना आकुंचन पावतो ?

A. बर्फ
B. शिसे
C. काच
D. पॅराफिन


Click for answer

A. बर्फ
654.रासायनिक अभिक्रियेचा प्रकार ओळखा.
NH3+HCl----> NH4Cl

A. अपघटन अभिक्रिया
B. दुहेरी अभिक्रिया
C. संयोग अभिक्रिया
D. विस्थापन अभिक्रिया


Click for answer

C. संयोग अभिक्रिया
655. आहारात कोणत्या जीवनसत्त्वाच्या अधिक्यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा येतो ?

A. जीवनसत्त्व अ
B. जीवनसत्त्व ब
C. जीवनसत्त्व क
D. जीवनसत्त्व ड


Click for answer

A. जीवनसत्त्व अ
656. हृदयाकडून फुफ्फुसाकडे डिऑक्सिजनेटेड रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीस __________ असे म्हणतात.

A. संवेदना ग्राहक
B. रॅमस
C. फुफ्फुस-नीला
D. फुफ्फुस-रोहिणी


Click for answer

D. फुफ्फुस-रोहिणी
657. रक्ताच्या कर्करोगास ____________ हे नाव आहे .

A. ल्युकेमिया
B. ऍनेमिया
C. पॉलीसायथेमिया
D. ल्युकोपोनिया


Click for answer

A. ल्युकेमिया
658. गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत कोणी मांडला ?

A. बोहर
B. न्यूटन
C. आईनस्टाईन
D. नेपियर


Click for answer

B. न्यूटन
659. गटात न बसणारा शब्द ओळखा : पारा, लोखंड, सोने, गंधक

A. पारा
B. लोखंड
C. सोने
D. गंधक


Click for answer

D. गंधक
660. मधुमेह कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो ?

A. इन्सुलिन
B. ग्लुकोज
C. कॅल्शियम
D. सुक्रोज


Click for answer

A. इन्सुलिन