सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-60


591. खालीलपैकी कोणते भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य हे संघराज्याचे वैशिष्ट्य नाही ? indian-parliament

A. लिखित संविधान
B. एक नागरिकत्व
C. दुहेरी शासन
D. मुलभूत अधिकार


Click for answer

B. एक नागरिकत्व
592. भारतीय संविधानाने मुलभूत अधिकारांची तरतूद ही कोणत्या देशातून स्वीकारली ?

A. ग्रेट ब्रिटन
B. अमेरिका
C. आयर्लंड
D. ऑस्ट्रेलिया


Click for answer

B. अमेरिका
593. अवकाश शास्त्राचे जनक कोणाला म्हणतात ?

A. हिपार्कस
B. गॅलिलिओ
C. एडविन हबल
D. आर्यभट्ट


Click for answer

A. हिपार्कस
594. खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज संस्थांशी संबंधित नाही ?

A. बलवंतराय मेहता समिती
B. अशोक मेहता समिती
C. वसंतराव नाईक समिती
D. राजमन्नार समिती


Click for answer

D. राजमन्नार समिती
595. खालीलपैकी कोणत्या पदार्थाची घनता सर्वात कमी आहे ?

A. पाणी
B. रॉकेल
C. मध
D. ग्लिसरीन


Click for answer

B. रॉकेल
596. लांबी खूप मोठी, मंद प्रवाही आणि रुंद दऱ्यांतून वाहणारी ही __________ नदीची वैशिष्ट्ये आहेत ?

A. वैतरणा
B. सावित्री
C. पाताळगंगा
D. कृष्णा


Click for answer

D. कृष्णा
597. जिल्हा परिषद __________ वर कर लावू शकते.

A. यात्रा
B. पाणी
C. बाजार
D. वरील सर्व


Click for answer

D. वरील सर्व
598. "भारतीय संविधानातील 32 वे कलम भारतीय संविधानाचा आत्मा व हृदय होय" हे विधान कोणी केले ?

A. डॉ.राजेंद्रप्रसाद
B. पंडित नेहरू
C. प्रो.एच.व्ही.कामत
D. डॉ.बी.आर.आंबेडकर


Click for answer

D. डॉ.बी.आर.आंबेडकर
599. एखाद्या वस्तूचा वेग तिप्पट केल्यास त्याची गतीज ऊर्जा ____________ पटीने वाढते.

A. तीन
B. सहा
C. नऊ
D. सत्तावीस


Click for answer

C. नऊ
600. 'रोबोटिक्स' ह्या संज्ञेचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाचे नाव काय ?

A. इसॅक ऍसिमोव्ह
B. अल्बर्ट आईनस्टाईन
C. सर अलेक्झांडर
D. फ्लेमिंग


Click for answer

A. इसॅक ऍसिमोव्ह