संक्षिप्त चालू घडामोडी- 2 नोव्हेंबर 2014

(परीक्षेसाठी उपयुक्त चालू घडामोडी संक्षिप्त मुद्देसूद स्वरुपात.)
चालू घडामोडी प्रश्नमंजुषाही अपलोड केलेली आहे. पोस्टसच्या यादीतून योग्य ते पोस्ट पहा.
युनियन कार्बाइड या अमेरिकन कंपनीचा माजी प्रमुख आणि भोपाळ वायूanderson गळती प्रकरणी फरार घोषित करण्यात आलेल्या वॉरेन अँडरसन याचा मृत्यू झाला.
1984 मध्ये 2-3 डिसेंबरला रात्री भोपाळमध्ये युनियन कार्बाइडच्या प्लांटमधून वायूगळती झाल्यानंतर सुमारे चार हजारांवर नागरिकांचा मृत्यू झाला होता.
इंदिरा गांधी राष्ट्रीय एकता पुरस्कार राजीव गांधी स‌‍‌द्-भावना पुरस्कार विजेत्यांना देण्यात येणारी पुरस्कारांची रक्कम वाढवण्यात आली आहे. पुरस्कारप्राप्त व्यक्तींना याआधी पाच लाख रुपये दिले जात असत. आता ही रक्कम दहा लाख झाली आहे.
हे दोन्ही पुरस्कार दरवर्षी दिले जातात. परंतु पुरस्कारांचे राष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन आता एक वर्षाच्या अंतराने देण्यात येणार आहेत.
सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन हे पुरस्कार दिले जातात.
atmरिझव्‍‌र्ह बँकेच्या नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार एक नोव्हेंबरपासून मुंबई, दिल्ली, चेन्नई, कलकत्ता, हैद्राबाद आणि बंगलोर या सहा शहरांमधून स्वत:चे खाते असलेल्या बँकेच्या एटीएममधून एका महिन्यात पाच वेळा नि:शुल्क पैसे काढता येणार आहेत.
पुढील प्रत्येक  व्यवहारावर 20 रूपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. याशिवाय दुस-या बॅँकांच्या एटीएम मधून पाच ऐवजी तीन वेळा नि:शुल्क पैसे काढता येणार आहेत.
मरिन पोल्युशन बुलेटिन या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधन निबंधात प्रकाशित अहवालानुसार भारतात कोलकाता हे सर्वात प्रदूषित महानगर.

patel31 ऑक्टोबरचा 'हुतात्मा दिन' आता लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरा झाला. त्यादिवशी  'रन फॉर युनिटी' आयोजित करण्यात आली होती.
आकाशवाणीच्या वतीने पुरवण्यात येणारी एसएमएस वृत्तसेवा आसामी,All-India-Radio-News गुजराती, तमिळ आणि मल्याळम या चार भाषांमध्येही सुरू करण्यात आल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याने दिली आहे.

या आधीपासून मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, डोंगरी आणि नेपाळी भाषांमध्ये पुरवण्यात येत आहे.
‘व्यवसाय करण्यास सोपे’ या निकषावर जागतिक बँकेने केलेल्या 189 देशांच्या यादीत भारत 142 व्या पायरीवर आहे
केंद्र सरकारने परदेशी बँकांमधील 627 खातेधारकांची यादी सर्वोच्च न्यायालयात सादर केली.
देश-परदेशातील पर्यटकांची सर्व गरजा ओळखून त्याचे ख-या अर्थाने वाटाड्या ठरणारे ‘ट्रिपगेटर’ अ‍ॅँड्राइड अ‍ॅप पर्यटन खात्याने विकसित केले आहे.
इबोला या विषाणूच्या संसर्गावर लशीच्या चाचण्या करण्यास स्वित्झर्लंड सरकारची परवानगी मिळत असून तेथे या आठवडय़ात त्या सुरू होतील.
स्वीडनने पॅलेस्टाइनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून म्हणून अधिकृतरीत्या मान्यता दिली.
सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांचा ‘ब्रॅडमन हॉल ऑफ फेममध्ये’ समावेश करण्यात आला.
झांबियाचे राष्ट्राध्यक्ष मायकल साटा यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. लंडनमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्म साफ करण्याचे काम करणारा हा तरुण कामगार झांबियाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचला. पदावर येताच त्यांनी भ्रष्टाचारविरोधी अभियान हाती घेतले होते.
गुगलचे व्हाईस-प्रेसिडेन्ट अॅलन युस्टेस यांनी वयाच्या 57 व्या वर्षी आकाशातून सर्वाधिक उंचीवरून पृथ्वीवर उडी घेत ‘स्कायडायव्हिंग’चा विक्रम मोडीत काढला.
अफ्रिकेतील देश बुर्किना फासोमध्ये सरकारविरोधी आंदोलनात 30 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
जगातील सर्वात मूल्यवान ३८ लाख कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या अ‍ॅपल कंपनीचे सीईओ टीम कूक हे समलैंगिक आहेत. त्यांनी स्वत: तशी कबुली दिली.