संक्षिप्त चालू घडामोडी 9 नोव्हेंबर 2014

स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या चालू घडामोडी आता सारांश स्वरुपात
 • लक्ष्मीकांत पार्सेकर गोव्याचे नवे मुख्यमंत्री
 • भारतीय लष्करातील पहिली महिला कर्नल होण्याचा बहूमान लीनाleena-gaurav गौरव यांनी मिळवला असून त्या कायदे विभागात मुख्य विधी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
 • सचिनच्या 'प्लेइंग इट माय वे' या आत्मचरित्रानेही विक्रीचा विक्रमsachin केला आहे.
 • प्रकाशनाआधीच दीड लाख लोकांनी ऑर्डर नोंदविली आहे.
 • यापूर्वी 'अॅपल'चे प्रणेते स्टीव्ह जॉब्ज यांच्या जीवनावर वॉल्टर इसाकसन यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राच्या एक लाख तीस हजार प्रतींची विक्री भारतात झाली होती.
 • पान मसाला, जर्दा आणि सुगंधी सुपारी अशा निवडक तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर आता बिहारमध्येही बंदी
 • ऍनाकोंडा अजगर एका मनुष्यास गिळण्यासंदर्भात असलेला 'ईटन petaअलाइव्ह' हा कार्यक्रम डिस्कव्हरी वाहिनीने दाखवू नये, असे आवाहन पेटा या वन्यजीव हक्क संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या संस्थेने केले आहे.
 • ईटन अलाइव्ह या कार्यक्रमात २६ वर्षीय अमेरिकन वन्यजीव तज्ज्ञ पॉल रसोल हा अॅमेझोनच्या जंगलात 'स्नेकप्रूफ सुट'मध्ये एका ऍनाकोंडा्या पोटात शिरण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, रसोल याला ऍनाकोंडा प्रत्यक्ष गिळतानाचे चित्रीकरण दाखवण्यात येणार नाही.
 • मणिपूरमधील लष्करी विशेषाधिकार कायद्याच्या विरोधात उपोषणirom-sharmila करणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांच्या उपोषणाला चौदा वर्षे पूर्ण झाली.
 • प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने 'नॅशनल अ‍ॅवॉर्ड्स फॉर एक्सलन्स इन जर्नालिझम'  पुरस्कार जाहीर केले असून त्यात उत्तम  लेखन गटात 'द हिंदू'च्या राही गायकवाड, तर 'आउटलुक' च्या नेहा भट यांचा समावेश आहे.
 • छायाचित्र पत्रकारितेत वृत्तछायाचित्र गटात 'द इंडियन एक्स्प्रेस' चे नीरज प्रियदर्शी व पीटीआयचे कमल किशोर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • देशात जातनिहाय जनगणना करण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचाsupreme-court निर्णय सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्दबातल ठरवला.
 • मद्रास उच्च न्यायालयाने २०१० मध्ये देशभर जातनिहाय जनगणना करण्याचे आदेश दिले होते.
 • मात्र हे आदेश देताना मद्रास उच्च न्यायालयाने आपल्या मर्यादांचे उल्लंघन केले आहे. एखादे सार्वजनिक धोरण योग्य आणि स्वीकारार्ह आहे की नाही किंवा आहे त्या धोरणापेक्षा एखादे नवीन धोरण आखता येऊ शकते काय, हे पाहणे न्यायालयाचे काम नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने म्हटले आहे.
 • स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान (एलपीजी सबसिडी) ग्राहकाच्या थेट बँक खात्यात वळते करण्याची योजना (मॉडिफाइड डायरेक्ट कॅश सबसिडी ट्रान्सफर स्कीम) येत्या एक जानेवारी 2015 पासून पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.
 • देशातील 54 जिल्ह्यात ही योजना 15 नोव्हेंबरपासून सुरु होणार.
 • 'इबोला' या संसर्गजन्य आजाराला रोखण्यासाठी जगभरातून प्रयत्न केले ibolaजात आहेत. या प्रयत्नात आता फेसबुकने देखील पुढाकार घेतला आहे.
 • जपानचे पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे आणि चीनचे अध्यक्ष क्शी जिनपिंग यांच्यात पुढील आठवडय़ात शिखर बैठक होणार आहे.
 • उभय नेत्यांमधील ही पहिलीच बैठक आहे.
 • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी अभिनेते विजय पाटकर यांची निवड झाली.
 • ग्रामविकास योजनेअंतर्गत एका गावाचा विकास करण्यासाठी आपण सातारा जिल्ह्यातील एनकुले गावाची निवड केली आहे- शरद पवार
आपल्याला पोस्ट आवडल्यास डाव्या बाजूला असलेले फेसबुक लाईक वर क्लिक करा.