संक्षिप्त चालू घडामोडी 8 नोव्हेंबर 2014

स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या चालू घडामोडी आता सारांश स्वरुपात
 • सांसद आदर्श गाव योजनेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचाsaansad-adarsh-gram मतदारसंघ असलेल्या वाराणसीमधील जयापूर या गावाची निवड केली आहे.
 • खासदाराने स्वतः त्याच्या क्षेत्रातील गावांचा विकास अनुभवावा आणि त्या माध्यमातून देशाचा विकास व्हावा हा या योजनेचा उद्देश.
 • गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे देशाचे भावी संरक्षणमंत्री असतील.manohar-parrikar
 • रविवारी पर्रिकर हे देशाचे संरक्षणमंत्री म्हणून शपथ घेत आहेत.
 • सोमवारी ते (10 नोव्हेंबर रोजी) ते उत्तरप्रदेशमधून राज्यसभेवर जाण्यासाठी अर्ज दाखल करतील.
 • सरकारचे विविध कल्याणकारी कार्यक्रम राबविण्यासाठी देशभरातील लक्षावधी सेवानिवृत्त नागरिकांची मदत घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
 • ही मदत ऐच्छिक पद्धतीने घेण्यात येणार.
 • याकामी निवृत्तिवेतन व सेवानिवृत्त कल्याण विभागाने पुढाकार घेतला असून, त्यासाठी 'संकल्प' ही संकल्पना राबविण्यात येणार आहे
 • कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱयांवर दबाव ठेवण्यासाठी प्रति मंत्रिमंडळ समित्या (शॅडो कॅबिनेट) नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
 • संसदेचे हिवाळी अधिवेशन येत्या २४ नोव्हेंबरपासून सुरू होते आहे. त्यापार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
 • हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सात प्रति मंत्रिमंडळ समित्या स्थापन करण्याचे पक्षाने ठरविले आहे. या समित्यांमध्ये माजी केंद्रीय मंत्री ए. के. अॅंटनी, एम. वीरप्पा मोईली, आनंद शर्मा, ऑस्कर फर्नांडिस यांच्यासह लोकसभेतील पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांचा समावेश आहे
 • विशाखापट्टनम बंदराजवळ भारतीय नौदलाचे "अस्त्रवाहिनी ए-72" हे जहाज बुडाले.
 • चीनने फेसबुक, ट्विटरवरची बंदी सध्या उठवली आहे. apec
 • आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन (अपेक)च्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर ही बंदी उठवण्यात आली आहे.
 •   आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी ही सुविधा चीनने प्रथमच उपलब्ध करून दिली आहे. 
 • १० नोव्हेंबरपासून बीजिंग येथे ही परिषद सुरू होत आहे.
 • चीनमध्ये दलाई लामा यांच्या संबंधित सर्व गुगल सर्चवरही बंदी आहे. मात्र परिषदेदरम्यान ही सर्च टर्म खुली करण्यात आली आहे.
 • ब्रिटन संसदेसमोरील चौकात महात्मा गांधी यांचा पुतळा उभारण्यासlord-meghnad-desai आवश्यक असलेले एक दशलक्ष पौंड गोळा करण्याकरिता जनजागृतीसाठी भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ लॉर्ड मेघनाद देसाई हे सत्याग्रह करणार आहेत.
 • महात्मा गांधी यांचा पुतळा उभारण्यासाठी आवश्यक असलेला निधी गोळा करण्यासाठी ७४ वर्षीय देसाई यांनी महात्मा गांधी स्मृती विश्वस्त संस्था स्थापन केली आहे.
 • फ्रान्समध्ये "सीवायडी-टिडिव्ही" (CYD-TDV) या डेंग्यूच्या पहिल्या लसीची यशस्वी चाचणी करण्यात आली असून ती वर्षाअखेरीस भारतात उपलब्ध होइल.
 • अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठित निवडणुकीत जोरदार विजय प्राप्त करीत रिपब्लिकन पक्षाने सिनेटमध्ये बहुमत मिळवले आहे. या निकालांमुळे बराक ओबामांना खूप मोठा झटका बसला आहे.
 • अमरापूकर यांचा जन्म १९५० सालचा. जन्मगाव (नगर जिल्ह्य़ातील) amrapurkarशेवगाव तालुक्यातील अमरापूर (ज्यावरून त्यांचं नाव अमरापूरकर पडलं), धोरजळ आणि देवाची आळंदी या तीन ठिकाणी त्यांचं बालपण गेलं.
 • अमरापूरकरांनी परभणीला ऑल इंडिया रेडिओवर उद्घोषक म्हणून नोकरीही करायला सुरुवात केली. सहा महिन्यात राजीनामा दिला.
 • 'हॅन्ड्स अप' या मराठी नाटकामध्ये १९८१ मध्ये त्यांनी पहिली भूमिका साकारली. त्यांचे पहिलेच नाटक सुपरहिट झाले. ह्याच नाटकातील काम पाहुन दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी त्यांना 'अर्धसत्य' मधील 'रामा शेट्टी' ची भूमिका दिली.
 • मराठीतील शैलीदार कथालेखक श्री. दा. पानवलकर यांच्या 'सूर्य' या कथेवर गोविंद निहलानी यांनी विजय तेंडुलकर यांच्याकडून कथा-पटकथा लिहून घेऊन 'अर्धसत्य' हा चित्रपट १९८४ साली केला.  अर्धसत्य' या चित्रपटातील त्यांचा 'रामा शेट्टी' भाव खाऊन गेला.
 • महेश भट्ट दिग्दर्शित 'सडक' चित्रपटातील 'महाराणी' ह्या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.
 • ३० वर्षांमध्ये अमरापूरकर यांनी जवळपास ४५० हून अधिक हिंदी चित्रपटांत आणि ७०-८० मराठी चित्रपटांत भूमिका केल्या.  याशिवाय भोजपुरी, गुजराती, बंगाली, उडिया चित्रपटांमध्ये काम केलं.
 • 'कन्यादान'सारख्या काही नाटकांचं दिग्दर्शनही केलं.
 • त्याचबरोबर 'किमयागार' हे नाटकही लिहिलं.
 • रिचर्ड बोलेस्लाव्हस्की यांच्या 'अ‍ॅक्टिंग - द फर्स्ट सिक्स लेसन्स' या पुस्तकावर आधारित सदाशिव अमरापूरकर आणि आनंद विनायक जातेगांवकर यांनी 'अभिनयाचे प्राथमिक सहा पाठ' हे पुस्तक लिहिलं आहे.
 • मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलनापासून ते अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल आंदोलनापर्यंत विविध आंदोलनात ते सक्रिय सहभागी झाले होते.
 • त्यांच्या काही गाजलेल्या कलाकृती
  • मराठी नाटकेछिन्न,
   काही स्वप्न विकायचीयेत,
   हवा अंधारा कवडसा,
   ज्याचा त्याचा विठोबा,
   यात्रिक.
  • मराठी चित्रपटझेडपी,
   वास्तुपुरुष,
   जन्मठेप,
   २२ जून १८९७,
   पैंजन,
   आई पाहिजे.
  • दूरदर्शन मालिका-राज से स्वराज तक
 • सचिन तेंडुलकर चे आत्मकथन 'प्लेइंग इट माय वे' हे सध्या चर्चेच्याsachin केंद्रस्थानी आहे.
 • प्रसिध्द खेळाडू आणि त्यांचे चरित्र/आत्मचरित्र ह्यांच्या संकीर्ण यादीसाठी येथे क्लिक करा.
 • शीख धर्माचे प्रवर्तक गुरूनानक देव यांचा जन्म 15 एप्रिल 1469 मध्ये 'तलवंडी' येथे झाला होता. सध्या हे स्थळ पाकिस्तानात आहे. गुरूनानक यांच्या जन्मानंतर तलवंडीचे नामकरण ननकाना असे झाले.
आपल्याला पोस्ट आवडल्यास डाव्या बाजूला असलेले फेसबुक लाईक वर क्लिक करा.