संक्षिप्त चालू घडामोडी 7 नोव्हेंबर 2014

स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या चालू घडामोडी आता सारांश स्वरुपात
 • माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन.
 • प्रवीण परदेशी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव.
 • अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने (नासा) सोडलेल्या मार्सcuriosity रोव्हर "क्‍युरिऑसिटी” ला मंगळाच्या पृष्ठभागावर खनिज घटक सापडल्याचे "नासा"ने जाहीर केले.
 • "क्‍युरिऑसिटी‘ रोव्हरने सप्टेंबरअखेरीस येथील "माउंट शार्प‘च्या पायथ्याजवळील खडकाला छिद्र पाडत मातीचा नमुना गोळा केला होता. त्यानंतर या मातीची रोव्हरमध्ये असलेल्या यंत्राद्वारे तपासणी करण्यात आली.
 • या मातीमध्ये मंगळावर इतर ठिकाणी असलेल्या मातीपेक्षा अधिक प्रमाणात हिमॅटाइट खनिज असल्याचे दिसून आले, असे "नासा‘ने सांगितले.
 • हिमॅटाइट हे आयर्न ऑक्‍साइड खनिज असून त्याच्या अभ्यासाद्वारे ते तयार झाले त्या काळातील पर्यावरणाचा अभ्यास करणे शक्‍य आहे.
 • यंदा फेसबुकवरील आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्यात भारत सर्वांत पुढे असल्याचे समोर आले आहे.
 • तसेच युजर्सच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी सर्वाधिक विनंती करणारा भारत हा अमेरिकेनंतरचा दुसरा देश ठरला आहे.
 • अनावश्यक समित्या व कायदे रद्द करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून अन्न मंत्रालयाने साखर उद्योग विकास मंडळ (डीसीएसआय) बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • साखर नियंत्रण व परवाना मुक्त करण्यात आल्यानंतर या मंडळाची कुठलीही भूमिका उरली नव्हती.
 • डीसीएसआयची स्थापना १९५४ मध्ये औद्योगिक विकास व नियंत्रण कायद्यानुसार करण्यात आली होती.
 • साखर उद्योग १९९८ मध्ये परवानामुक्त करण्यात आला असून मे २०१३ मध्ये साखर क्षेत्रातील आणखी काही नियंत्रणे उठवण्यात आली आहेत.
 • मुख्य माहिती आयुक्तांची (सीआयसी) निवड करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय निवड समितीमध्ये लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा समावेश करण्यात आला आहे.
 • नरेंद्र मोदी या समितीचे अध्यक्ष असून त्यांनी अरुण जेटली आणि मल्लिकार्जुन खरगे यांची या समितीवर नियुक्ती केली आहे.
 • लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाबाबत अद्यापही सुस्पष्टता नसल्याने विधि मंत्रालयाच्या सल्ल्यावरून  खरगे  यांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 • आण्विक दहशतीच्या छायेतून जगाची मुक्तता करण्याच्या उद्दिष्टानेnuclear=summit अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पुढाकार घेत २०१६ मध्ये आण्विक सुरक्षा परिषदेचे आयोजन केले होते.
 • मात्र त्यासाठीच्या नियोजनाच्या बैठकीस रशिया अनुपस्थित राहिल्यामुळे ओबामा यांच्या प्रयत्नांना सुरुंग लागला आहे.
 • २०१० पासून अशा परिषदांची मालिका अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी सुरू केली.
 • त्यानंतर अण्वस्त्रनिर्मिती क्षमता राखणाऱ्या देशांची संख्या ३९ वरून २५ पर्यंत खाली आली.
 • २०१६ मध्ये हेग येथे 'आण्विक सुरक्षा परिषद' होणार आहे. या परिषदेत ३५ देशांचा सहभाग अपेक्षित आहे
 • 'इंटर गव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज' या संस्थेच्या (आयपीसीसी) अहवालाचा आढावा घेतल्यानंतर असे सांगण्यात आले की, गेल्या आठ लाख वर्षांत तीन प्रमुख हरितगृह वायूंचे प्रमाण एवढे कधीच नव्हते.
 • पुढील महिन्यात लिमा येथे हवामान बदलांवर बैठक होत आहे.
 • त्यात इ.स.२०१५ मध्ये जागतिक तपमान वाढ २ अंश सेल्सियसच्या मर्यादेत ठेवण्याचा निर्धार केला जाणार आहे.
 • आयपीसीसीच्या २६ वर्षांच्या इतिहासातील हा पाचवा अहवाल आहे.
 • जागतिक तापमानवाढ २ अंश सेल्सियस ( ३.६ अंश फॅरनहीट) मर्यादेत ठेवण्यासाठी वेळ निघून चालली असून सध्याचे कार्बन उत्सर्जन बघता त्यातून मोठा धोका होऊ शकतो, असे मत संयुक्त राष्ट्रांच्या हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
 • रोनाल्डोला यावर्षीचा 'गोल्डन बूट' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 • मात्र ह्या वर्षी त्याला हा पुरस्कार लुईस सुआरेज याच्यासोबत वाटून घ्यावा लागला.
 • रोनाल्डोला तिसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला.
 • अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिना प्रांताच्या गव्हर्नर पदी भारतीय अमेरिकन उमेदवार निकी हॅले यांची पुन्हा निवड झाली आहे. त्या रिपब्लिकन पक्षाच्या सदस्या आहेत.
 • हवा प्रदूषणाचा भारतातील अन्नधान्य उत्पादनावर अनिष्ट परिणाम झाला असून, अलीकडच्या काळे धुके व इतर प्रदूषणामुळे उत्पादन निम्म्यावर आल्याचा निष्कर्ष काढला आहे.
 • कॅलिफोर्निया विद्यापीठातील शास्त्रज्ञ जेनिफर बर्नी यांनी केलेल्या संशोधनात काही महत्त्वाचे निष्कर्ष हाती आले आहेत. "प्रोसेडिंग्ज ऑफ नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेस” या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या "वायुप्रदूषणाचा भारतीय शेतीवर झालेला परिणाम” या शोधनिबंधामध्ये याचा ऊहापोह करण्यात आला आहे.
 • लोकसंख्येची घनता असलेल्या राज्यांत ४ वर्षांत गव्हाची  उत्पादकता ५० टक्के घटली. धुरामुळे होणारे प्रदूषण यात प्रमुख आहे. कार्बनसह इतर दुषित रासायनिक घटकांचा फटका ९० टक्के, तर हानीत ग्लोबल वार्मिंगचा वाटा १० टक्के आहे.
 • वाढत्या प्रदूषणामुळे अनेक पिकांची एकरी उत्पादकता  निम्म्यावर आली आहे.
 • उत्तर प्रदेश, हरियाना आणि पंजाबमधील शेतकरी गव्हाचा शिल्लक राहिलेला भुसा शेतातच जाळून टाकतात, त्यामुळेही प्रदूषणात भर पडते. आता यावर "राष्ट्रीय हरित लवादा”ची करडी नजर असेल.
 • शेतकऱ्यांनी उघड्यावर भुसा जाळू नये यासाठी निश्‍चित मार्गदर्शक तत्त्वे तयार करा, असे आदेश लवादाने कृषी मंत्रालयास दिले आहेत.
 • आसाराम बापू यांचा ओजस्वी पक्ष दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात.
 • आसाराम बापूंचे पुत्र नारायण साई यांनी स्थापन केला होता ओजस्वी पक्ष.
 • "फोर्ब्स”ने प्रसिद्ध केलेल्या जगातील प्रभावशाली नेत्यांच्या यादीत रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी सलग दुसऱ्या वर्षी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.
 • क्रमांक, नेत्याचे नाव, पद
  1 व्लादीमिर पुतीन, अध्यक्ष, रशिया
  2 बराक ओबामा, अध्यक्ष, अमेरिका
  3 शि जिनपिंग, अध्यक्ष, चीन
  4 पोप फ्रान्सिस, ख्रिस्ती धर्मगुरू
  5 अँजेला मर्केल, चॅन्सलर, जर्मनी
 • गेल्या वर्षीच्या यादीतील पहिले पाच नेतेच या वेळीही सर्वोच्च पाचांमध्ये आहेत.
 • या यादीमध्ये 72 नेत्यांचा समावेश आहे.
 • त्यात नव्याने आलेल्या बारा जागतिक नेत्यांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या यादीतील स्थान पंधरावे आहे.
 • 'अलिबाबा'चे संस्थापक व चीनचे सर्वात श्रीमंत नागरिक जॅक मा हे तिसाव्या क्रमांकावर आहेत.
 • नेपाळची राजधानी काठमांडू शहरापासून नवी दिल्लीपर्यंत याnepal महिन्याच्या अखेरपर्यंत बससेवा सुरू करण्यात येणार आहे.
 • 18 व्या सार्क परिषदेदरम्यान भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांदरम्यान मोटार वाहन करारावर सह्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या दोन्ही राजधानीच्या शहरांमध्ये बससेवा सुरू करण्यात येणार आहे.
आपल्याला पोस्ट आवडल्यास डाव्या बाजूला असलेले फेसबुक लाईक वर क्लिक  करा.