संक्षिप्त चालू घडामोडी 16 नोव्हेंबर 2014

 • ऑस्ट्रेलियात कालपासून (शनिवार) जी - 20 शिखर परिषदेला सुरुवातG20 Logo_CMYK_tweaked झाली आहे.
 • जी- 20 शिखर परिषद सुरु होण्यापूर्वी रशिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तणाव वाढला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष या परिषदेत सहभागी होण्यासाठी हजर झाले आहेत. तर त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवर रशियाच्या चार युद्धनौका तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाराज झालेल्या ऑस्ट्रेलियाने देखील त्यांच्या ताफ्यातील तीन युद्धनौका रशियाच्या जहाजांवर नजर ठेवण्यासाठी तैनात केल्या आहेत.  रशियाच्या वतीने केले जाणारे हे शक्तीप्रदर्शन असल्याचे मानले जात आहे.
 •  262975_147553095330260_6298205_nबालदिनापासून ता. 14 नोव्हेंबर ते ता. 31 डिसेंबर या कालावधीत राज्यात  "स्वच्छ बालक अभियान" राबविले जाणार आहे.
 • भारतीय प्रशासन सेवेतील अधिका-यांसाठी घेण्यात येणारा प्रशिक्षण कालावधी कमी करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. यासंदर्भातील नेमण्यात आलेल्या किरण अग्रवाल समितीने केंद्रीय कार्मिक मंत्रालयाकडे ही शिफारस केली आहे
 • आयएएस अधिका-यांच्या प्रशिक्षणाच्या कालावधीसंदर्भात केंद्र सरकारने ऑक्टोबर २०१३मध्ये समिती नेमली होती. या समितीने फेब्रुवारी २०१४मध्ये आपला अहवाल सादर केला होता.
 • विशेष म्हणजे अय्यर समिती आणि दुस-या प्रशासकीय सुधारणा समितीने आयएएस अधिका-यांच्या प्रशिक्षणाचा कालावधी कमी करण्याच्या प्रस्तावाचे समर्थन केले आहे. तर लाल बहादूर शास्त्री अकादमीच्या संचालकांना प्रशिक्षणाचा कालावधी कमी करण्यास विरोध केला आहे.
 • यूएन विमेन्सचा फरहान अख्तर गुडविल ब्रॅंड ऍम्बेसेडरFarhan-Akhtar
 • महिलांच्या असुरक्षिततेच्या प्रश्‍नाकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी 2012 मध्ये अभिनेता- दिग्दर्शक फरहान अख्तर याने "मेन्स अगेन्स्ट रेप अँड डिस्क्रिमिनेशन" (मर्द) ही चळवळ सोशल नेटवर्किंग साइट्‌सवर सुरू केली आणि काही काळातच ती देशभरात पसरली होती.
  फरहानच्या रूपाने पुरुषाची नियुक्ती झाली आहे.
 • राज्यसभा सदस्य तथा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने आंध्र प्रदेशमधील नेलोरे जिल्ह्यातील पी.आर.कांडरिगा हे गाव सांसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत दत्तक घेतले आहे.
  सोनिया गांधी यांनी रायबरेलीमधील उर्वा हे गाव दत्तक घेतले, तर राहुल गांधी यांनी अमेठीमधील जगदीशपूर हे गाव दत्तक घेतले.
 • प्रचंड खर्च करून बांधण्यात आलेल्या तसेच वेळोवेळी खर्चात वाढ होत असलेल्या मात्र फार कमी वेळा उपयोगात आलेल्या "सुवर्ण विधानसौध" या इमारतीच्या चौकशी प्रकरणी कर्नाटक सरकारने अखेर चौकशी समिती नेमली आहे.
 • हिवाळी अधिवेशनापासून राज्यसभेत प्रश्‍नोत्तराचा तास सकाळी 11 ऐवजी दुपारी बारा ते एक या काळात होणार आहे. राज्यसभेच्या कामकाजाची वेळही एका तासाने वाढवून सायंकाळी पाचऐवजी सहा करण्यात आली आहे.
  गोंधळ कमी होण्यासाठी प्रश्‍नोत्तराच्या तासाची वेळ बदलण्याचा राज्यसभाध्यक्षांचा हा तिसरा प्रयत्न असून, यापूर्वी पंधराव्या लोकसभा काळातील त्यांचे दोन प्रयत्न सपशेल अपयशी ठरले आहेत.
 • केंद्रीय विद्यालयातील सहावी ते आठवीतील  अभ्यासक्रमात तृतीय भाषा म्हणून जर्मनऐवजी संस्कृत भाषा अंर्तभूत केली.
 • "इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट" (आयएफपीआरआय) या संस्थेच्या ताज्या जागतिक पोषणविषयक बालकांची खुरटी वाढ आणि कुपोषण यांचे प्रमाण 2005 ते 2006 आणि 2012 मध्ये साडेअकरा टक्‍क्‍यांनी कमी करण्याच्या कामगिरीबद्दल महाराष्ट्राची पाठ थोपटण्यात आली आहे.
 • पुण्यात 14 ऑक्‍टोबरला सुखोई- 30 ला अपघात झाल्यानंतर या विमानांची उड्डाणे थांबविण्यात आली होती. मात्र आता अहवाल आल्यानंतर सुखोई -30 ही लढाऊ विमाने एका आठवड्यात पुन्हा आकाशात झेपावतील,
 • सरकारी कर्मचाऱ्यांनी दरवर्षी शासनास सादर करण्याची मालमत्तेची माहिती आता सर्व निमशासकीय संस्था, महानगरपालिका, नगरपरिषदांमधील कर्मचाऱ्यांना देखील द्यावी लागणार आहे.
 • गुजरातपाठोपाठ आता कर्नाटकातही निवडणुकीत मतदान सक्तीचे केले जाणार आहे.
 • आढावा : ह्या वर्षभरात घडलेल्या महत्त्वाच्या घटना: स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण
 • जपानच्या गुंतवणूक प्रस्तावांना अधिक गती देण्यासाठी केंद्र सरकारच्या औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागानं जपान प्लस या विशेष व्यवस्थापन पथकाची स्थापना केली आहे.
 • 4000 किलोमीटर पल्‍ला असणा-या अण्‍वस्‍त्रवाहू अग्‍नी-4 या क्षेपणास्‍त्राची ओडिशातल्‍या व्हिलर बेटावरून 20 जानेवारी 2014 रोजी  यशस्‍वी चाचणी करण्‍यात आली.
 • केंद्रीय सतर्कता आयोग, CVC ने  11 आणि 12 फेब्रुवारी 2014 रोजी सुवर्ण महोत्‍सव साजरा केला.
 • केंद्रीय राखीव पोलिस दलाच्‍या विशेष महासंचालक म्‍हणून काम पाहणा-या अरुणा बहुगुणा आयपीएस यांची सरदार वल्‍लभभाई पटेल, राष्‍ट्रीय पोलिस अकादमीच्‍या संचालकपदी नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.
 • सुरेश जंध्‍याला यांनी नवे प्राप्‍तीकर महासंचालक
 • नवी दिल्‍ली येथे राष्‍ट्रीय वक्‍फ विकास महामंडळ स्थापन करण्यात आले असून त्याचे अधिकृत भागभांडवल 500 कोटी रुपये असून याद्वारे वक्‍फ जमिनींवर पारदर्शक पध्‍दतीने सामुदायिक कारणांसाठी शाळा, महाविद्यालये, रुग्‍णालये अशा सोयीसुविधांसाठी आर्थिक स्रोत उपलब्‍ध करून देणे शक्‍य होईल.
 •  राष्‍ट्रीय किशोर स्‍वास्‍थ कार्यक्रम RKSKचा प्रारंभ नवी दिल्‍लीत rkskतत्कालीन केंद्रीय आरोग्‍य आणि कुटुंब कल्‍याणमंत्री गुलाम नबी आझाद यांच्‍या हस्‍ते झाला.
 • एकूण लोकसंख्‍येच्‍या 21 टक्‍के भाग व्‍यापणा-या सुमारे 243 दशलक्ष युवकांच्‍या आरोग्‍यासाठी हा कार्यक्रम राबविला जात आहे.मानसिक आरोग्‍य, पोषण, घटकांचा गैरवापर, लिंगभेद, यासारख्‍या बाबी हाताळण्‍यासाठी राष्‍ट्रीय किशोर स्‍वास्‍थ कार्यक्रमांतर्गत नविन दिशा मिळणार आहे.
 • 10 ते 19 वयोगटातील ग्रामीण  आणि शहरी भागातील मुले, मुली, विवाहित, अविवाहित, गरीब, श्रीमंत, शाळेत शिकणारा अथवा न शिकणारा म्‍हणजे युवक अशी 'आरकेएसके' कार्यक्रमाची व्‍याख्‍या आहे.
 • पंतप्रधानांचे सल्‍लागार सॅम पित्रोदा यांनी मुलांसाठी महात्‍मा गांधी या संकेतस्‍थळाचे 31 जानेवारी  2014 रोजी उद्घाटन केले.
 • 6 ते 15 वर्ष वयाच्‍या मुलांसाठी इंग्रजी आणि हिंदी भाषांमधून 'गांधीवर संशोधन' असा या संकेत स्‍थळाचा उद्देश आहे. या संकेत स्‍थळावर गांधीजींच्‍या जन्‍मापासूनच्‍या सर्व कथा दृक आणि श्राव्‍य माध्‍यमातून मुलांना दाखविण्‍यात येणार आहे.  तसेच मुलांसाठी विविध खेळ आणि प्रश्‍नमंजुषा सुध्‍दा आयोजित करण्‍यात आल्‍या आहेत.
 • हे संकेतस्‍थळ www.searchforgandhi.in या नावाने उपलब्‍ध आहे.
उपक्रम आवडला ? डाव्या बाजूचे 'फेसबुक' लाईक करून दिलखुलास दाद द्या.