संक्षिप्त चालू घडामोडी 15 नोव्हेंबर 2014

 • जमिनीवरून शक्तीशाली मारा करणाऱया पृथ्वी-2 या आण्विकpruthvi क्षेपणास्त्राची शुक्रवारी 14 नोव्हेंबर रोजी चंडीपूर येथे लष्कराकडून यशस्वी चाचणी घेण्यात आली.
 • 350 किमीचा पल्ला असलेले पृथ्वी-2 हे स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र आहे.
 • पृथ्वी-2 या क्षेपणास्त्राची सुमारे 500 ते 1000 किलो स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे.
 • पंतप्रधान मोदी सध्या ऑस्ट्रेलिया च्या दौऱ्यावर आहेत.
 • ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पंतप्रधान मोदी सिडनी, कॅनबेरा आणि मेलबर्नला भेट देणार आहेत.
 •  ब्रिस्बेन येथे ते जी-20 शिखर परिषदेला उपस्थित राहतील.
 • त्यांनी क्वीन्सलॅन्ड तंत्रज्ञान विद्यापीठाला भेट दिली.
 • पहिली नवीनीकरणीय ऊर्जा जागतिक गुंतवणूक बैठक 15 ते 17 फेब्रुवारीला नवी दिल्लीत होणे नियोजित आहे.
 • नवीनीकरणीय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी पातळीवर होणारी ही पहिलीच बैठक आहे.
 • या कार्यक्रमाला देश विदेशातील 200 हून अधिक गुंतवणूकदार सहभागी होण्याची शक्यता आहे.
 • भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने उद्योगाच्या वाढीसाठी केलेल्या चांगल्या कार्याबद्दल या मंत्रालयाला आयएसओ 9001:2008 हे प्रमाणपत्र मिळाले आहे.
 •  चंद्रशेखर संत यांचे निधन झाले . ते ज्येष्ठ क्रीडा पत्रकार होते.
 • मंगळ मोहिमेचे यशस्वी संचालन करणारे डॉ. ए. ए. पिल्लाई यांना राष्ट्रपतींच्या हस्ते वर्ष 2014 चा लाल बहादूर शास्त्री यांचे नांवे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट सार्वजनिक प्रशासनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला .
 • 1874 मध्ये जागतिक पोस्टल युनियनची स्वीसच्या राजधानीत स्थापना झाल्यानिमित्त दरवर्षी 9 ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो.
 • भारतीय टपाल खात्याने 9 ते 15 ऑक्टोबर या काळात राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा केला.
 • 2014 चा प्रतिष्ठेचा  शांती स्वरूप भटनागर पुरस्कार  10 शास्त्रज्ञांना देण्यात आला,
  • जैविक विज्ञान –डॉ. रुप मलिक, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई.
  • रासायनिक विज्ञान – डॉ. कवीरायानी रामकृष्ण प्रसाद, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरू, डॉ. सौविक मैती, इन्स्टिट्यूट ऑफ जेनोमिक्स ॲण्ड इंटेग्रेसिव्ह बायोलॉजी, नवी दिल्ली.
  • पृथ्वी, वातावरण, महासागर आणि ग्रह विज्ञान – डॉ. सच्चिदानंद  त्रिपाठी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर
  • अभियांत्रिकी विज्ञान-डॉ. एस.व्ही.वेंकट मोहन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, हैदराबाद, डॉ. सोमेन चक्रवर्ती,  इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई.
  • गणितीय विज्ञान – डॉ. कौशल कुमार वर्मा,  इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, बेंगळुरू.
  • वैद्यकीय विज्ञान – डॉ. अनुराग अग्रवाल,  इंस्टिटयूट ऑफ जिनोमिक्स ॲण्ड इंट्रिग्रेटीव्ही बायोलॉजी (सीएसआयआर-आयजीआयबी)
  • भौतिक विज्ञान – डॉ. प्रताप रायचौधरी, टाटा इंन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई., डॉ. सादिकली अब्बास रंगवाला,  रामन रिसर्च इन्स्टिटयूट, बेंगळुरू
 • 5 लाख रुपये, मानपत्र आणि तबक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय शास्त्रज्ञांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात.
 • 2014 हे सुप्रसिध्द गझल गायिका बेगम अख्तर यांच्या 'जन्मशताब्दी वर्ष' म्हणून साजरे केले जात आहे.
 • बेगम अख्तर (दि. 7 ऑक्टोबर 1914-30 ऑक्टोबर 1974) यांना पद्मभूषण, पद्मश्री व संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार देण्यात आले होते. गझलच्या गान सम्राज्ञी असा किताब त्यांना मिळाला होता.
 • बेगम अख्तर यांच्या स्मरणार्थ काढलेल्या रु. 100 आणि रु. 5 या मूल्यांचे नाणे या निमित्ताने प्रकाशित करण्यात आले आहे.
 • रेल्वेचे प्रकल्प वर्षानुवर्षे खितपत न पडता ते नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी  यापुढे रेल्वे अधिकाऱ्यांनी नियोजित वेळेत प्रकल्पाचे काम पूर्ण केल्यास त्यांना प्रकल्पाच्या एकूण किंमतीच्या दोन टक्के रक्कम बक्षिस म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे.
 • सुधारित एलपीजी थेट लाभ हस्तांतरण योजना पहिल्या टप्प्यात शनिवार 15 नोव्हेंबर रोजी  54 जिल्ह्यात सुरू करण्यात येणार आहे तर देशाच्या उर्वरित भागात 1 जानेवारी 2015 रोजी लागू होईल.
 • सन  2014 मध्ये केंद्र सरकारने आयोजित केलेल्या राष्ट्रीय मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून पहिले मानसिक आरोग्य धोरण जाहीर करण्यात आले. मानसिक आरोग्य सेवा केंद्रांचा सार्वत्रिक वापर शक्य व्हावा हे या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
 • राष्ट्रीय मानसिक आरोग्य दिन ==>10 ऑक्टोबर
 • या धोरणाला मेंटल हेल्थ ॲक्शन प्लॅन 365 ची जोड देण्यात आली आहे.