संक्षिप्त चालू घडामोडी 14 नोव्हेंबर 2014

  • मुंबईकर रोहित शर्मा ने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिकrohit-sharma धावा रचणाऱ्या विरेंद्र सेहवागच्या 219 धावांचा विक्रम मोडीत काढत 264 धावांची ऐतिहासिक खेळी केली.
  • विरोधी संघ: श्रीलंका मैदान: ईडन गार्डन
  • रोहितचे हे दुसरे द्विशतक आहे. याआधी मुंबईकर रोहीतने 209 धावांची खेळी साकारली होती.
  • एकदिवशीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजवर केवळ 4 वेळा द्विशतकी खेळी खेळली गेली आणि ह्या चारही खेळी भारतीय खेळाडूंच्या आहेत.
    रोहित शर्मा - 264 श्रीलंके विरुध्द. 209 ऑस्ट्रेलिया विरुध्द
    विरेंद्र सेहवाग - 219 वेस्टइंडीज विरुध्द
    सचिन तेंडुलकर -200 नाबाद - दक्षिण आफ्रिकेविरुध्द
  • आंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेटमध्ये
    • पहिली शतकी खेळी खेळणारा खेळाडू-डेनिस अमिस (इंग्लंड)
    • पहिली द्विशतकी खेळी खेळणारा खेळाडू-सचिन तेंडुलकर
    • 250 धावांची खेळी खेळणारा पहिला खेळाडू -रोहित शर्मा
  • 220px-V.R.Krishna_Iyerन्यायमूर्ती व्ही. आर. कृष्णा अय्यर यांनी 100 वा वाढदिवस साजरा केला.
  • ते सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. 1973 साली ते  न्यायमूर्ती पदावर स्थानापन्न झाले होते.
  • 1952 साली ते केरळच्या विधानसभेवर निवडूनही गेले होते. त्यांनी केरळ मध्ये कायदा, ऊर्जा, जलसिंचन,तुरुंग,समाज कल्याण या खात्यांचे मंत्री म्हणूनही काम पाहिले होते.
  • 1999 साली त्यांना 'पद्मविभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • ते पूर्वाश्रमीच्या आयुष्यात राजकारणी असलेले सर्वोच्च न्यायालयाचे शेवटचे न्यायमूर्ती आहेत.
  • कोट्टायमच्या महात्मा गांधी विद्यापीठाला इंदिरा गांधी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना व समन्वय असे दोनही पुरस्कार या विद्यापीठाने पटाकवले आहेत.
  • अन्न सुरक्षेशी निगडित मुद्दयांवर निर्माण झालेल्या पेचाबाबत भारतीय शेतकऱ्याचे हित जोपासत भारत आणि अमेरिकेने तोडगा काढला आहे.
  • सार्वजनिक वितरणासाठीच्या अन्नधान्य साठयाबाबतच्या  भारताच्या प्रस्तावाला पाठिंबा  द्यायला अमेरिकेनं मान्यता दर्शवल्यानं जागतिक व्यापार परिषदेच्या जनरल कौन्सिलमध्ये यासंदर्भात सुधारणा होईल आणि त्यामुळे ट्रेड फॅसिलीएशन ॲग्रीमेंट (टीएफए) चा गेले काही महिने अडकलेला मार्ग मोकळा होईल.
  • भारताच्या भूमिकेमागची कारणे
    2001 मध्ये संमत झालेला दोहा विकास अजंडा ही विकासाला समर्पित पहिली फेरी होती.  बाजारपेठेशी संपर्क आणि विकासाच्या मुद्याची सुयोग्य सांगड यात घातली गेली होती. बाली पॅकेजलाही भारतानं पाठिंबा दिला होता. मात्र काही घडामोडींमुळे भारताला त्यात सुधारणा सुचवण्यावाचून पर्यायच राहिला नाही. त्यामुळे जोपर्यंत भारताच्या चिंताची दखल घेण्याचे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत टीएफए कराराच्या सुधारणांविषयी मतैक्यासाठी तयार होणे भारतासाठी कठीणच होते.
  • आंतरराष्ट्रीय व्यापार आणि अन्नसुरक्षा यांच्यातले संबंध हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. अन्न सुरक्षेविषयीच्या चिंताची जागतिक व्यापार परिषदेच्या संबंधित नियमांनी दखल घेतली असली तरी अन्न सुरक्षेपेक्षा कृषी व्यापार मुक्त करण्यावरच त्याचा प्राथमिक रोख राहिला आहे.
  • hand-in-handभारत आणि चीन यांच्यातल्या "हातात हात" या संयुक्त सरावाच्या श्रृंखलेचा एक भाग म्हणून येत्या 16 तारखेपासून पुण्यातल्या औंध  येथे संयुक्त सराव होणार आहे. भारतीय लष्कर आणि चीनचे पीपल्स लिबरेशन आर्मी यांच्यातला हा चौथा एकत्रित  सराव असेल.
  • दहशतवादाचा मुकाबला  करण्यासाठीची तंत्र एकमेकांनी जाणून घ्यावीत तसेच उभय देशाच्या लष्करात निकोप संबंध राहावेत हा यामागचा हेतू आहे.
  • कौशल्य प्रशिक्षणावर आधारित नोकरीची हमी देणाऱ्या "सीखो और कमाओ" ही योजना अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाशी संबंधित आहे.
  • स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबूल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त 11 नोव्हेंबर रोजी "राष्ट्रीय शिक्षण दिन" आयोजित करण्यात आला.
  • कर्नल राज्यवर्धनसिंह  राठोड हे माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री म्हणून कार्यरत.
  • तर अरूण जेटली हे त्या खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत.
  • आधार कार्डच्या धर्तीवर निवृत्ती वेतन धारकांसाठी "जीवन प्रमाण" हे डिजिटल प्रमाणपत्र सुरू करण्यात आले आहे. 
  • या प्रमाणपत्रांमुळे कोट्यवधी निवृत्ती धारकांना फायदा होणार आहे.  निवृत्ती वेतन धारकांना निवृत्ती वेतन प्राप्त करून घेण्यासाठी दरवर्षी हयातीचा दाखला सादर करावा लागतो.
  • आता या प्रमाणपत्रामुळे या प्रक्रियेपासून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे. 
  • निवडणूक आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने यासंबंधित सॉफ्टवेअर ॲप्लीकेशन विकसित करण्यात आले आहे.
  • इस्रायलच्या इस्त्राइल ऐरोस्पेस इंडस्ट्रीज (IAI) आणि भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) संयुक्तपणे विकसित केलेल्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र एलआरएसएम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी इस्त्राइल मध्ये नुकतीच घेण्यात आली.
  • "मेक इन इंडिया" कार्यक्रमासाठी रोजगार व प्रशिक्षण महासंचालनालयाकडून देशाच्या विविध भागात नवीन 12 प्रगत प्रशिक्षण संस्था सुरू केल्या जाणार.
  • चांगले शिक्षक निर्माण करण्यासाठी 27 प्रगत प्रशिक्षण संस्था सुरू केल्या जातील. त्यातील 12 प्रारंभी सुरु केल्या जातील.
  • याकरिता 200 कोटी रुपये खर्च येईल. कौशल्य मार्गदर्शक प्रशिक्षण योजनेअंतर्गत या योजनेत प्रारंभी 9200 व्यवसाय मार्गदर्शकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
  • 14 ते 16 नोव्हेंबर 2014 या कालावधीत दिल्लीच्या सिरी फोर्ट सभागृहात "स्वच्छता" या विषयावर राष्ट्रीय बाल फिल्म महोत्सव आयोजित केला जाणार आहे.
  • टेनिसपटू सानिया मिर्झा उदघाटन .सोहळ्याचे मुख्य अतिथीपद भूषवणार आहे.
  • पहिल्या दिवशी "पप्पू की पगदंडी" या चित्रपटाने या समारंभाचा प्रारंभ होईल.
  • माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने चिल्ड्रेन फिल्म सोसायटी ऑफ इंडिया या महोत्सवाचे आयोजन करणार आहे.
  • भारतीय रेल्वेने बायो-डिझेल या पर्यायी इंधनाचा वापर करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे पर्यावरण स्वच्छ राखण्यास मदत होईल.
  • प्रारंभी रेल्वे एकूण इंधन वापरात 5 टक्के बायो डिझेलचा उपयोग करील. रेल्वेला दरवर्षी 2 अब्ज लिटर डिझेल लागते.
  • बायो-डिझेलमध्ये जत्रोफा या वृक्षापासून काढलेले तेल वापरण्यात येते.
  • संयुक्त राष्ट्राच्या मानवी अधिकार मंडळ (युएनएचआरसी) या संस्थेवर भारताची पुनर्नियुक्ती झाली आहे.
  • आदिवासींच्या सर्वसमावेशक विकासासाठी सरकारने वनबंधू कल्याण योजनेची सुरुवात केली.
  • आदिवासींच्या कल्याणासाठी असलेल्या विविध योजनांचे विलिनीकरण करण्यावर आणि त्यांच्यात साक्षरतेचा दर वाढवण्यावर या योजनेत भर दिला जाणार आहे.
  • महाराष्ट्रासह निवडक राज्यांमध्ये ही योजना प्रायोगिक स्वरुपात राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत एका तालुक्यासाठी केंद्राकडून 10 कोटी रुपये उपलब्ध केले जाणार आहेत.
  • प्रसार भारतीचे सीईओ जवाहर सरकार यांची आशिया-प्रशांत प्रसारण संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
  • भारतीय राष्ट्रीय अभियांत्रिकी अकादमी आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांनी संयुक्तपणे  30 ऑक्टोबर ते 1  नोव्हेंबर या काळात "इंजिनिअर्स कॉन्क्लेव्ह 2014" या अभियंत्यांच्या परिषद आयोजित केली होती.
  • बंगळूरुच्या  इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्सच्या जे.एन. टाटा सभागृहात ही परिषद पार पडली.
  • कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, इंजिनियर्स इंडिया लि. आणि नॅशनल बिल्डींग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लि. या कंपन्यांना अलीकडे नवरत्न दर्जा प्राप्त झाला.
  • रेल्वे मंत्रालयाच्या रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाने यावर्षीचा "एजिस ग्रॅहम बेल पुरस्कार पटकावला आहे. दूरसंचार, इंटरनेट, मिडिया आणि शैक्षणिक मनोरंजन या क्षेत्रात नवीनतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच या क्षेत्रातील योगदानाला ओळख मिळवून देण्यासाठी एजिस ग्रॅहम बेल पुरस्कार देण्यात येतो.
  • रेलटेलने "इनोव्हेटिव्ह मॅनेज्ड सर्व्हिसेस" या गटामध्ये  हा पुरस्कार जिंकला आहे.
  • रेलटेलच्या "रेल वायर" या रिटेल  ब्रॉडबॅन्ड उपक्रमाला हा पुरस्कार मिळाला आहे.
  • बीड लोकसभा मतदारसंघात दि. 15 ऑक्टोबर रोजी झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या प्रितम मुंडे यांनी सुमारे 7 लाख मते मिळवून भारताच्या निवडणुकीच्या इतिहासात विक्रम नोंदविला. आजपर्यंत एवढे प्रचंड बहुमत कोणत्याही संसद सदस्याला मिळालेले नाही.
  • प्रितम मुंडे यांना एकूण 9,16,923 मते मिळाली. त्याचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे अशोक शंकरराव पाटील यांना 2,24,679 मते मिळाली.
  • यापूर्वीचा विक्रम 2004 च्या निवडणुकीत सी.पी.आय(एम) पक्षाचे अनिल बसू यांनी केला होता. त्यांना आरामबाग लोकसभा मतदारसंघात 5,92,502 मताधिक्याने विजय मिळविला होता.
  • 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी बडोदा मतदारसंघात 5.7 लाख मतांनी विजय मिळवला होता. मात्र वाराणसी मतदारसंघ कायम ठेवण्यासाठी त्यांनी बडोदा मतदार संघातून राजीनामा दिला होता.
  • केंद्र सरकारने टॅक्सी प्रवास सुरिक्षत करण्यासाठी पर्यटक टॅक्सीजना इलेक्ट्रॉनिक चिप लावण्याचे ठरवले असून त्यामुळे टॅक्सीच्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल
  • टॅक्सींना चिप लावली तर आपोआप टॅक्सी चालकाचा बायोडाटा उपलब्ध होईल. त्यामुळे कुठलाही गैरप्रकार करण्याचे धाडस होणार नाही व झालेच तर लगेच पकडला जाईल.
  • दुसरी सेवा परिषद दिल्लीत सुरू.
  • सेवा आणि उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्मितीची गरज असल्यावर भर दिला जेणेकरून कृषी क्षेत्रातील बेरोजगारांना अर्थपूर्ण रोजगार मिळू शकेल.
  • जास्तीत जास्त  परदेशी  पर्यटकांना आकर्षित  करण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी 2010 मध्ये  व्हीओए अर्थात व्हिसा ऑन अरायव्हल ही योजना सुरु केली.
  • सुरुवातीला ही सेवा फक्त फिनलँड, जपान, ल्युमबर्ग, न्यूझीलंड आणि सिंगापूर  या पाच देशांपुरती मर्यादित होती.
  • आता कंबोडिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, फिलिपाइन्स, लाओस, म्यानमार आणि नुकतीच दक्षिण कोरिया या देशांतील पर्यटकांसाठीही ही सेवा सुरु करण्यात आली आहे.
  • ऑस्लो येथे घेण्यात आलेल्या डिजिटल विनर्स परिषदेत  उत्कृष्ट अॅपसाठी 2014 चा आशिया पुरस्कार रघू कांचुस्तंभम यांना मिळाला. त्यांच्या अॅपचे नाव 'लाइव्हलीहूड 360' असे आहे.
  • त्याला हा आशियातील पुरस्कार मिळाला असून नॉर्वेच्या टेलेनॉर या मोबाईल ऑपरेटर कंपनीकडून हा पुरस्कार दिला जातो.
  • जीएसएलव्ही मार्क-3 ची डिसेंबरमध्ये चाचणी प्रस्तावित. इस्त्रो 4 हजार किलो वजनी उपग्रह प्रक्षेपित करणार.
  • इस्त्रोचे प्रमुख के. राधाकृष्णन
  • दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांच्या (आसियान) 25 व्या शिखर परिषदasean म्यानमारची राजधानी ने पी तॉ येथे संपन्न झाली.
  • 1967 मध्ये आसियान स्थापन झाली. मलेशिया, इंडोनेशिया, फिलीपाईन्स, सिंगापूर आणि थायलंड यांनी एकत्र येऊन प्रांतीय गट स्थापन केला. ब्रुनेई, व्हिएतनाम, लाओ पीडीआर, म्यानमार  आणि कंबोडिया हे नंतर त्यात सहभागी झाले.
  • परस्पर हिताचे प्रांतीक आणि आंतरराष्ट्रीय मुद्दे या परिषदेच्या बैठकीत अग्रस्थानी.
  • परिषदेदरम्यान दहा देशांच्या नेत्यांनी  भारत, चीन, जपान, कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, रशिया आणि अमेरिकेच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली.
  • 12 वे विद्रोही साहित्य संमेलन बीड येथे होणार असून अध्यक्षपदी प्रा.डॉ.रूपा बोधी-कुलकर्णी यांची निवड झाली आहे.13 व 14 डिसेंबरला हे संमेलन नियोजित आहे.
  • आदित्य विक्रम बिर्ला संगीत कला अकादमीचा जीवनगौरव पुरस्कार कथ्थक नृत्य प्रकारासाठी सुप्रसिध्द असलेले पंडित बिरजू महाराज यांना दिला जाणार.
  • नाशिकच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘कृषी औद्योगिक समाजरचना, व्यवस्थापन प्रशासन ’ पुरस्कारासाठी शरद जोशी यांची निवड करण्यात आली आहे.
  • यूपीएससीच्या परीक्षेत प्रश्नांचे इंग्रजीतून हिंदीत अनुवाद करण्यासाठी कोणती प्रणाली वापरली जाते त्यासंदर्भातील माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. अनुवादित प्रश्नासंदर्भात अडचणी येऊ नये यासाठी ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आपल्याला आमचा हा उपक्रम आवडला असल्यास डाव्या बाजूच्या 'फेसबुक लाईक'वर क्लिक करा. आपली दाद आमच्यासाठी अमुल्य आहे.