संक्षिप्त चालू घडामोडी 12 नोव्हेंबर 2014

 • स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांच्या 125nehru व्या जयंतीनिमित्त कॉंग्रेसने दोन दिवसीय 'नेहरु आंतरराष्‍ट्रीय संमेलन' आयोजित केले आहे.
 • 17 नोव्हेंबरला नेहरु संमेलनचे उद्‍घाटन होणार असून 18 नोव्हेंबरला समारोप होणार आहे.दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये 17 आणि 18 नोव्हेंबरला दोन दिवसीय संमेलन होईल.
 • पंडित जवाहर लाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला होता.
 • 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964 या कालावधीत त्यांनी स्वतंत्र भारताचे पंतप्रधान पद भूषविले.
 • पदावर कार्यरत असताना मृत्यू पावलेले ते पहिले भारतीय पंतप्रधान.
 • त्यांचे दिल्लीतील समाधी स्थळ: शांतीवन
 • महाराष्ट्रातही शाळांमध्ये स्वच्छता आणि आरोग्य विषयाकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी बालस्वच्छता मोहीम राज्यात 14 ते 19 नोव्हेंबरदरम्यान राबवण्यात येणार आहे.
 • मराठी रंगभूमी दिन 5  नोव्हेंबर रोजी साजरा केला गेला.
 • 20 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या दरम्यान गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपटiffi महोत्सवाची (इफ्फी) होणार आहे.
 • इंडियाचे भारत असे नामकरण करावे अशी मागणी करणारी याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
 • नाव बदलण्यासाठी योग्य त्या विभागाशी संर्पक साधण्याची सूचना केली.  आणि त्या प्रतिसादानंतर याचिकाकर्ता पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करु शकतो असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
 • "असोचेम"ने केलेल्या सर्वेक्षणात भारतात मधुमेह झालेल्यांची संख्याworld diabetes day वेगाने वाढत असल्याचा निष्कर्ष. 2006 मध्ये देशात मधुमेह झालेल्या नागरिकांची संख्या अडीच कोटी 2014 मध्ये  तब्बल 6 कोटी 80 लाख झाली आहे.
 • 14 नोव्हेंबरला असलेल्या जागतिक मधुमेह दिनानिमित्त "असोचेम"ने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
 • 2035 पर्यंत देशातील मधुमेहींची संख्या 12 कोटी 50 लाखांवर जाण्याचा धोका या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. मधुमेही व्यक्तींच्या टक्केवारीत दिल्ली शहर अग्रस्थानी असून त्या नंतर मुंबईचा क्रमांक लागतो.
 • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या विस्तारात गोव्याचे खासदार श्रीपादnaik नाईक यांना योग मंत्रिपद देण्यात आले आहे.
 • याआधी "आयुष" हा आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारित येत होता.
 • मात्र, आता  त्याला स्वतंत्र मंत्रालयाचा दर्जा देण्यात आला आहे.
 • ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदार यांचा समन्वय साधून शेतकऱ्याला रास्त भाव मिळावा, या उद्देशाने राज्य सरकारने अखेर ऊसदर नियंत्रण समिती स्थापन केली आहे.
 • समितीची रचना डॉ. रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली आहे.
 • पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये धुडघूस घालणा-या कामतापूर लिबरेशन ऑर्गनायजेशन (केएलओ) या दहशतवादी संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. या संघटनेवर केंद्रीय गृह विभागाने परिपत्रक काढून बंदी आणली आहे.
 • गुजरात राज्यात यापुढे होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याGujarat-Travel-Map निवडणुकीसाठी प्रत्येक मतदाराला मतदान हे करावेच लागणार आहे. जो मतदान करणार नाही त्याच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे.
 • तेथील शासनाने स्थानिक स्वराज्य संस्था कायदा विधेयक 2009 ला मंजुरी देतानाच निवडणुकीत महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याचा निर्णयही घेतला आहे.
 • निवडणुकीसाठी मतदान करताना जर मतदाराला एकही उमेदवार योग्य वाटत नसल्यास त्याला नकाराधिकार नोंदविता येऊ शकतो.
 • मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदान बंधनकारक करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय अयोग्य असल्याचे मत निवडणुक आयोग आयुक्त एच. एस. ब्रह्मा यांनी मांडले आहे.
 • भारतीय मुळची अमेरिकन नागरिक अदिती हर्डिकर यांची व्हाईटaditi hardikar हाऊसमध्ये एलजीबीटी समुदाय आणि एएपीआय (एशियन अमेरिकन ऍन्ड पॅसिफिक आयलँडर) समुदायाच्या जनतेसोबतच्या संपर्कासाठी महत्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
 • बंगलोरच्या ग्रामीण भागात राबवण्यात आलेला ‘वॉटर एटीएम’चा नाविन्यपूर्ण उपक्रम आता बंगलोर शहरातही राबवण्यात येत आहे.
 • बंगलोर ग्रामीणच्या टंचाईग्रस्त भागामध्ये प्रीपेड स्मार्टकार्ड सिस्टीमद्वारे पाणी पुरवण्याचा उपक्रम राबवण्यात आला. या माध्यमातून येथील नागरिकांना केवळ पाच रुपयांत २० लिटर पाणी पुरवण्यात आले.
 • 9/11 च्या हल्ल्यात उदध्‍वस्त झालेले वर्ल्ड ट्रेड सेंटरची इमारत पुन्हा दिमाखात उभी झाली आहे. ही वन वर्ल्ड ट्रेड सेंटरची इमारत 1776 फूट उंच आहे. यात एकूण 104 मजले आहेत.
 • मालदीवमध्‍ये 3 नोव्हेंबर रोजी 'विजय दिवस' साजरा करण्‍यात आला.maldives-map
  3 नोव्हेंबर 1988 रोजी अब्दुल्ला लुत्फी आणि सिल्की मणिक या दोन माल‍दीवच्या नागरिकांनी श्रीलंकेतील पीपल्स लिबरेशन ऑर्गनायझेशन ऑफ तमिळ इलमच्या मदतीने मा‍लदीवमध्‍ये घुसखोरी घडवून आणली होती.
 • मात्र तत्कालीन तेथील सरकारच्या आवाहनांनंतर  भारतीय लष्‍करांने ऑपरेशन कॅक्टस् अंतर्गत आठ तासांमध्‍ये 22 पैकी 19 ग‍निमांना यमसदनी धाडले. अशा पध्‍दतीने भारताने मालदीवच्या सार्वभौमचे रक्षण केले.
 • मालदीव-भारताचे पूर्वीपासून खूप चांगले संबंध होते. सध्‍याचे राष्‍ट्राध्‍यक्ष अब्दुल्ला गयूम सत्तेत आल्याबरोबर भारताशी संबंध बिघडले आहेत.
 • बांगलादेशचा माध्‍यम सम्राट मीर कासीम अली याला युध्‍दगुन्ह्यात फाशीची शिक्षा सुनावण्‍यात आली आहे. 1971 मध्‍ये चितगाव येथे छळछावणी उभारुन स्वातंत्र्यसैनिकांचा मोठ्या प्रमाणावर छळ केला होता. अलीवर 14 आरोपपैकी 10 मध्‍ये तो दोषी आढळला आहे. दिगंत मीडिया कॉर्पोरेशनचा तो मालक आहे.
 • कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर 8 महिलांच्या दुर्दैवी मृत्यू मुळे चर्चेत आलेले राज्य ==> छत्तीसगड
 • छत्तीसगडमध्ये बिलासपूरमधील तख्तापूर येथील रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर आठ महिलांचा मृत्यू झाला असून सुमारे 30 इतर महिलांची प्रकृती गंभीर आहे.
 • निर्मल भारत अभियान हे नाव आता कालबाह्य होणार असून, यालाswachh bharat abhiyan स्वच्छ भारत अभियान असे नाव देण्यात आले आहे. याअंतर्गत नव्या सरकारने बदल करून अधिकाधिक वैयक्तिक शौचालये बांधावीत यासाठी बारा हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. अनुदानात राज्य सरकारने तीन हजारांची वाढ केली असून स्वच्छ भारत मिशनमधूनच अनुदानाचे वाटप होणार आहे. यापुढे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून स्वच्छतागृहासाठी मिळणारे अनुदान बंद करण्यात आले आहे.
 • ग्रामीण भागात सामुदायिक व वैयक्तिक स्वच्छतेतून ग्रामस्थांचे आरोग्य व जीवनमान उंचावण्यासाठी केंद्राने 2004 पासून संपूर्ण स्वच्छता अभियान हाती घेतले.
 • यात पहिल्यांदा दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांनाच स्वच्छतागृह बांधण्यासाठी प्रोत्साहन अनुदान मिळत होते. एप्रिल 2012 पासून या अभियानाचे रूपांतर निर्मल भारत अभियानात झाले.
 • विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून फुटून बाहेर पडलेल्या राज्यभरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी नव्या झेंड्याखाली एकत्रित येत बळिराजा शेतकरी संघटनेची स्थापना केली आहे.
 • संघटनेचे नेते बी. जी. पाटील यांनी नव्या शेतकरी संघटनेची घोषणा केली.
 • मुलींमुळे मुले आकर्षित होतात, त्यामुळे ग्रंथालयात मुलांची संख्या वाढते असा विचित्र तर्क मांडून मुलींना ग्रंथालयात प्रवेश बंदी घालण्याच्या विवादास्पद निर्णयामुळे चर्चेत आलेले विद्यापीठ==>अलीगड मुस्लिम विद्यापीठ
आपल्याला आमचा हा उपक्रम आवडला असल्यास डाव्या बाजूच्या 'फेसबुक लाईक'वर क्लिक करा. आपली दाद आमच्यासाठी अमुल्य आहे.