संक्षिप्त चालू घडामोडी 10 नोव्हेंबर 2014

 • अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या मध्यम पल्ल्याच्या 'अग्नी-2'agni-2 या क्षेपणास्त्राची 9 नोव्हेंबर 2014 रोजी  यशस्वी चाचणी करण्यात आली.
 • ओडीशाच्या किनारपट्टीजवळ व्हिलर बेटावरील 'इंटिग्रेटेड टेस्ट रेंज'वर  ही चाचणी घेतली गेली.
 • जमिनीवरून जमिनीवर मारा करणा-या या क्षेपणास्त्राचा पल्ला सुमारे 2000 किमी. एवढा आहे.
 • डीआरडीओने विकसित केलेल्या अग्नि क्षेपणास्त्रांच्या मालिकेतील अग्नि-2 हे एक क्षेपणास्त्र आहे. 'अग्नी-2'च्या निर्मितीला 1997 मध्ये प्रारंभ झाला. हे क्षेपणास्त्र दोन टप्प्यांचे असून, ते घन इंधनावर उड्डाण करते. त्याची लांबी वीस मीटर असून, उड्डाणसमयी त्याचे वजन 17 टन असते.हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रवाहू आहे.
 • 2001 पासून 'अग्नी-2' संरक्षण दलांत तैनात झाले आहे.
 • अग्नि क्षेपणास्त्रांच्या मालिकेत 700 किमीचा पल्ला असलेले अग्नि-1, तीन हजार किमीचा पल्ला असलेले अग्नि–3, चार हजार किमी पल्ला असणारे अग्नि–4 आणि पाच हजार किमीचा पल्ला असणारे अग्नि–5 या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. गेल्या वर्षी सात एप्रिल रोजी अग्नि–2 ची यशस्वी चाचणी पार पडली होती.
 • केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, 21 नव्या मंत्र्यांचा समावेशmanohar parikkar
 • 14 राज्यमंत्री, चार कॅबिनेट मंत्री आणि तीन राज्यमंत्र्यांनी(स्वतंत्र प्रभार)  शपथ घेतली.
 • गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह जे.पी.नड्डा, सुरेश प्रभू, वीरेंद्र सिंह चौधरी यांनी केंद्रीय कॅबिनेटमंत्रिपदाची शपथ घेतली तर बंडारु दत्तात्रय, राजीव प्रताप रुडी, महेश शर्मा यांनी राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार)पदाची शपथ घेतली. यासोबतच गिरीराज सिंग, मोहन कुंदारिया, सनवर लाल जट, हरिभाई पार्थीभाई चौधरी, राम कृपाल यादव, मुख्तार अब्बास नक्वी, हंसराज आहिर ,डॉ. रामशंकर कटेरिया , वाय.एस.चौधरी, जयंत सिन्हा ,राज्यवर्धन सिंग राठोड , बाबूल सुप्रियो, साध्वी निरंजन ज्योती, विजय सम्पला यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
 • राज्यवर्धन सिंग राठोड हे ऑलम्पिक पदक विजेते नेमबाज आहेत.
 • जर्मनीचे दोन भाग पाडणारी बर्लिन येथील भिंत पाडल्याला रविवारी 9Google-Doodle नोव्हेंबर 2014 रोजी 25 वर्षे पूर्ण झाली.
 • यानिमित्त गुगलने विशेष डूडल तयार केले. जर्मनीचे दोन भाग पाडणारी बर्लिन येथील भिंत 1990 च्या करारानुसार टप्प्याटप्प्याने पाडून टाकण्यात आली.
 • डूडलच्या स्वरुपात एक मिनिटांपेक्षा अधिक अवधीची चित्रफित तयार करून ते जगभर प्रकाशित करण्यात आले.यासाठी गुगलने आपल्या विविध सहका-यांकडून प्राप्त झालेल्या 17 आंतरराष्ट्रीय चित्रफितींचा वापर करण्यात आला. तसेच जर्मनीच्या राष्ट्रीय संग्रहातील छायाचित्रेही यामध्ये वापरण्यात आली आहेत.
 • मॉर्गन स्टिफ यांनी या चित्रफितीचे संपादन केले आहे.
 • गुगलच्या होम पेजवर दिसणारा गुगलचा खास  लोगो म्हणजेच डूडल. एखाद्या थोर व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याचे स्मरण शिवाय सुटीचा दिवस, वर्धापनदिन, स्मृतीदिन डूडलच्या माध्यमातून करण्यात येते.
 • जगभरात व्यवसाय असलेल्या अमेरिकन फास्टफुड चेन 'बर्गर किंग'burger-king येत्या दोन-तीन महिन्यांमध्ये  देशात 12 आउटलेट्स सुरू करून अधिकृत करणार.
 • आपल्या पहिल्याच आशियाई बहुस्तरीय शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी 11 नोव्हेंबर रोजी रवाना होत आहेत.  "आसिआन" आणि "पूर्व आशियाई शिखर परिषद" (ईस्ट एशिया समिट) अशा दोन बहुस्तरीय परिषदांमध्ये ते सहभागी होतील.
 • यानंतर ते "जी-20" परिषदेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होतील आणि परतताना ते फिजीलाही भेट देणार आहेत.
 • त्याचप्रमाणे म्यानमारमधील लोकशाही स्थापनेसाठी लढा देणाऱ्या आणि नोबेल पारितोषकविजेत्या नेत्या आँग सान स्यू की यांनाही भेटणार आहेत.
 • डोंगरभागात राहणाऱ्या पुरोहितांचे स्थलांतर थांबविण्यासाठी उत्तराखंड सरकारने त्यांना दर महिना 800 रुपये निवृत्तिवेतन देण्याचा निर्णय घेतला आहे.
 • आयपीओप्रकरणी फसवणूक केल्याबाबत दोषी आढळलेल्या डीएलएफवरdlf भांडवली बाजार नियामक सेबीने तीन वर्षाची बंदी घातली होती.
 • तथापि, म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवलेले 1806 कोटी रुपयांची गुंतवणूक पुढच्या महिन्यापर्यंत काढून घेण्याबाबत रोखे अपीलीय लवादाने हिरवा कंदील दाखवला आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गंगेच्या घाटावर साफसफाई करत काशीवासीयांना स्वच्छतेचा संदेश दिला, त्या निमित्ताने चर्चेत आलेला घाट ==>"अस्सी" घाट
 • मोदी यांनी या मोहिमेसाठी नऊ मान्यवरांची नियुक्‍ती केली, या नऊ जणांनी आणखी नऊ जण नेमावे, आणि त्यांच्या माध्यमातून गंगा स्वच्छतेचा संदेश लोकांपर्यंत पोचवावा, असे आवाहनही त्यांनी केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, क्रिकेटपटू महंमद कैफ, सुरेश रैना, भोजपुरी कलाकार मनोज तिवारी, गायक कैलाश खेर, चित्रकूट अपंग विद्यापीठाचे कुलगुरू स्वामी राम भद्राचार्य, लेखक मनू शर्मा, पद्मश्री देवीप्रसाद द्विवेदी, दूरदर्शनचे कलाकार राजू श्रीवास्तव या नऊ जणांची स्वच्छता मोहिमेसाठी मोदींनी निवड केली.
 • देशात सर्वाधिक ग्राहक संख्या असलेल्या भारती एअरटेलने मुंबईतील सेवा पुरवठादार लूप मोबाइलचा व्यवसाय आणि मालमत्ता खरेदीची योजना गुंडाळली आहे.
 • 700 कोटी रुपयांमध्ये निश्चित झालेला हा व्यवहार गुंडाळला गेला.
 • कन्याकुमारी येथील विवेकानंद शिलास्मारकाचे निर्माते आणि विवेकानंद केंद्राचे संस्थापक श्री. एकनाथजी रानडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
 • पूर्व चिनी समुद्रातील स्वामित्वावरून आमनेसामने आलेल्या चीन आणि जपान या दोन्ही देशांनी आता चर्चेचा मार्ग निवडला आहे. हा सागरी वाद कायम स्वरूपी मिटविण्यासाठी दोन्ही देशांत चार कलमी करार झाला आहे.
 • 'लोहमित्र' म्हणून प्रसिद्ध असलेल्या चीन व पाकिस्तान या देशांनी 20 करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. चीन पाकिस्तानमध्ये 46 मिलियन डॉलरची गुंतवणूक करणार.पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांच्यात हा करार झाला.
 • चीनच्या आधिपत्याखालील हाँगकाँगला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला जपानमधील ख्यातनाम कादंबरीकार हारुकी मुराकामी यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
 • धनादेशा संदर्भातील घोटाळे वाढल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता धनादेश व्यवहारातही ग्राहकांना एसएमएस सुविधा देणे बँकांना बंधनकारक केले आहे.
 • धनादेश वठवण्यासाठी आल्यानंतर खातेधारक आणि पैसे काढणारा दोघांना तात्काळ एसएमएस संदेशाव्दारे बँकांकडून सूचना मिळणार आहे.
 • अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खोमेनी यांना इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेसंदर्भात एक पत्र लिहिल्याचे वृत्त चर्चेत आहे.
 • अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे यांच्याjabbar-patel हस्ते 'विष्णुदास भावे पुरस्कार’ डॉ. जब्बार पटेल यांना प्रदान करण्यात आला.