मुलभूत सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी प्रश्नमंजुषा-6


1. ________ हे सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर आहे. Basic-gk-current-quiz

A. महाबळेश्वर
B. धुपगड
C. कळसूबाई
D. महादेव


Click for answer

C. कळसूबाई
2. _________ हा जायकवाडी बहुउद्देशीय प्रकल्पावरील जलाशय आहे.

A. नागार्जुन सागर
B. नाथ सागर
C. शिवाजी सागर
D. गोविंद सागर


Click for answer

B. नाथ सागर
3. पंढरपूर हे प्रसिध्द तीर्थक्षेत्र ____________ नदीकाठी वसलेले आहे.

A. नीरा
B. गोदावरी
C. कृष्णा
D. भीमा


Click for answer

D. भीमा
4. भारतात पशुगणना दर ______________ वर्षांनी केली जाते.

A. दोन
B. तीन
C. पाच
D. दहा


Click for answer

C. पाच
5. धवलक्रांती ___________ शी संबंधित आहे.

A. शेती व्यवसाय
B. मस्त्य व्यवसाय
C. दुग्ध व्यवसाय
D. कुक्कुटपालन व्यवसाय


Click for answer

C. दुग्ध व्यवसाय
6. लक्षद्वीप बेटे ही_____________________ यांचे उदाहरण आहे.

A. प्रवाळीय निर्मित
B. विवर्तनीय निर्मित
C. ज्वालामुखीय निर्मित
D. जलोदीय निर्मित


Click for answer

A. प्रवाळीय निर्मित
7. _____________ हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.

A. चिल्का
B. सांभर
C. लोणार
D. वेम्बनाड


Click for answer

C. लोणार
8. महाराष्ट्रातील ____________ हा आकाराने सर्वात लहान जिल्हा आहे.

A. हिंगोली
B. भंडारा
C. मुंबई शहर
D. नाशिक


Click for answer

C. मुंबई शहर
9. दोन रेखावृत्तातील सर्वात जास्त अंतर विषुववृत्तावर ______________ कि.मी. असते.

A. 110
B. 115
C. 105
D. 120


Click for answer

A. 110
10. महाराष्ट्र पठार _____________ खडकापासून बनलेले आहे.

A. वालुकाश्म
B. स्लेट
C. संगमरवर
D. बेसॉल्ट


Click for answer

D. बेसॉल्ट