चालू घडामोडी-22 ऑक्टोबर 2014


 मराठी चालू घडामोडी प्रश्नमंजुषा-597


तुम्ही हि पोस्ट्स वाचली असतीलच ?:
चालू घडामोडी-21 ऑक्टोबर 2014
चालू घडामोडी-20 ऑक्टोबर 2014
चालू घडामोडी-19 ऑक्टोबर 2014
चालू घडामोडी-18 ऑक्टोबर 2014
चालू घडामोडी-17 ऑक्टोबर 2014
चालू घडामोडी-16 ऑक्टोबर 2014
चालू घडामोडी-15 ऑक्टोबर 2014
चालू घडामोडी-14 ऑक्टोबर 2014

1. प्रयोगासाठी प्रथम प्राण्यांवर वापर करून त्यानंतर बाजारात आणलेल्या सौंदर्यप्रसाधनांची (अॅनिमल टेस्टेड कॉस्मेटिक्स) आयात करण्यास बंदी आणणारा पहिला दक्षिण आशियातील देश कोणता ? animal-test

A. भारत
B. मालदीव
C. सिंगापूर
D. इंडोनेशिया


Click for answer

A. भारत

ही बंदी एका विशेष उपनियमांतर्गत अंमलात आणण्यात येणार असून, औषधे आणि सौंदर्यप्रसाधने नियमावली २०१४ अंतर्गत हा उपनियम समाविष्ट करण्यात येणार आहे. याबाबतची अधिसूचना १३ नोव्हेंबरला जारी करण्यात येणार आहे.
2. 'पीसीआर' चाचणी कोणत्या आजारा संदर्भात आहे ?

A. एड्स
B. इबोला
C. मलेरिया
D. स्वाईन फ्ल्यू


Click for answer

B. इबोला

इबोलाची लक्षणे दिसू लागण्याआधीच पीसीआर (पॉलिमिरेज चेन रिअ‍ॅक्शन) चाचणीद्वारे रासायनिक परिणामांद्वारे रक्तांतील या साथीचे विषाणू शोधता येतील.
'प्रायमरडिझाइन' या इंग्लंडमधील उच्च तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या कंपनीने ही चाचणी विकसित केली आहे.
3. गेली दोन वर्षे गुप्त मोहिमेवर असलेले अमेरिकेचे अंतराळ यान अलीकडेच कॅलिफोर्नियाच्या दक्षिण किनाऱ्यावरील लष्करी तळावर सुरक्षितरित्या उतरले. ह्या मोहिमेचे नाव काय होते ?

A. एक्स-37 बी
B. एचपी-46 के
C. सीआर-4 टी
D. मिशन एक्स


Click for answer

A. एक्स-37 बी
4. आपल्या महिला कर्मचाऱ्यांना एग फ्री​झिंगसाठी(बीजांड गोठवण्याची प्रक्रिया) आर्थिक मदत देऊ केली म्हणून कोणती/कोणत्या बहुराष्ट्रीय कंपनी/कंपन्या चर्चेत होती/होत्या?

A. अॅपल
B. फेसबुक
C. गुगल
D. (A) व (B) दोन्हीही


Click for answer

D. (A) व (B) दोन्हीही
5. कर्नाटक सरकारकडून प्रस्ताव आल्यानंतर आठ वर्षांनी केंद्र सरकारने कर्नाटकमधील 12 शहरांच्या नामकरणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे झालेल्या बेळगाव च्या कोणत्या नामकरणामुळे मराठी जनमत दुखावले गेले आहे ?

A. बेळगावी
B. कन्नडिगा
C. कानडी
D. बेळूगावी


Click for answer

A. बेळगावी

कर्नाटकमधील १२ शहरांचे नामकरण कन्नड भाषेतील उच्चारांप्रमाणे असावे, असा प्रस्ताव कर्नाटक सरकारने २००६ मध्ये दिला होता.

बेळगाव (बेळगावी), मंगलोर (मंगळुरू), बेल्लारी (बल्लारी), बिजापूर (विजापुरा), चिकमंगळूर (चिकमंगळुरू), गुलबर्गा (कलाबुरागी), मैसोर (मैसूर), हुबळी (हुब्बळ्ळी) आदींचे नामकरण करण्यात आले आहे.
6. ध्वनीवेगाइतकीच क्षमता असलेले व 700 किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा अचूक भेद करण्याची क्षमता असलेल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या कोणत्या क्षेपणास्त्राची नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आली ?

A. प्रल्हाद
B. निर्भय
C. धनुष
D. नाग


Click for answer

B. निर्भय

ब्राह्मोस क्षेपणास्त्र हे २९० किलोमीटरचा पल्ला असलेले पहिले आंतरखंडीय ध्वनातीत वेग असलेले अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र. हे क्षेपणास्त्र भारत आणि रशिया यांच्या संयुक्त प्रयत्नांनी तयार करण्यात आले होते. मात्र त्यापेक्षा अधिक क्षमतेचे 'निर्भय' क्षेपणास्त्र संपूर्णपणे भारतीय बनावटीचे असून, 'संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे'तर्फे (डीआरडीओ) विकसित करण्यात आले आहे.
7. 'संरक्षण संशोधन विकास आणि संघटने'चे (डीआरडीओ) महासंचालक कोण आहेत ?

A. के.राधाकृष्णन
B. माधवन नायर
C. अविनाश चंदर
D. आर,चिदंबरम


Click for answer

C. अविनाश चंदर
8. ईशान्य भारतातील लोकांवर दिल्लीसह देशभरात होत असलेल्या वांशिक हल्ल्यांविषयी केंद्र सरकारने कोणती समिती स्थापन केली होती ?

A. मायाराम समिती
B. वर्मा समिती
C. बेझबरुआ समिती
D. शिवराज पाटील समिती


Click for answer

C. बेझबरुआ समिती
9. युनोने 2013 हे वर्ष ___________ म्हणून घोषित केले होते. un

A. बालिका वर्ष
B. युवक वर्ष
C. सहकार वर्ष
D. जलसहकार्य वर्ष


Click for answer

D. जलसहकार्य वर्ष
10. व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्राचे किती टक्के क्षेत्र पर्यटन क्षेत्र म्हणून केंद्र सरकारने घोषित केले ?

A. 10%
B. 20%
C. 30%
D. 40%


Click for answer

B. 20%