चालू घडामोडी-31 ऑक्टोबर 2014


मराठी चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 603

1. 31 ऑक्टोबर रोजी कोणत्या महान नेत्याच्या जयंतीनिमित्त 'राष्ट्रीय एकता दिन' साजरा केला जाणार आहे ?current-affair-quiz

A. इंदिरा गांधी
B. राजीव गांधी
C. सरदार वल्लभभाई पटेल
D. श्यामाप्रसाद मुखर्जी


Click for answer
C. सरदार वल्लभभाई पटेल
2. पंतप्रधान जन-धन योजनेशी संबंधित सर्व माहिती देणाऱ्या कोणती वेबसाइट नुकतीच सुरू करण्यात आली आहे ? jan-dhan-yojana

A. www.jandhan.gov.in
B. www.india.gov.in
C. www.pmjdy.gov.in
D. www.mygov.nic.in


Click for answer
C. www.pmjdy.gov.in
3. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सरदार पटेलांच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी गुजरात सरकारने ह्या प्रकल्पाचे काम कोणत्या कंपनीला दिले आहे ?

A. टर्नर कन्स्ट्रक्शन
B. जयप्रकाश असोसिएट
C. लार्सन अँड टुब्रो
D. लान्को इन्फ्राटेक


Click for answer
C. लार्सन अँड टुब्रो

लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा पुतळा उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवला आहे. या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'साठी २,९७९ कोटी रुपये खर्च येणार असून, तो जगातील सर्वांत उंच पुतळा ठरेल. या प्रकल्पाची 'वर्क ऑर्डर' गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या उपस्थितीत 'एल अँड टी' कंपनीला देण्यात आली.

'स्टॅच्यू ऑफ युनिटी' प्रकल्पाची वैशिष्ट्ये

> १८२ मीटर उंचीचा जगातील सर्वांत उंच पुतळा.
> सध्या जगात सर्वांत उंच असलेला अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा ९३ मीटर उंचीचा
> सरदार वल्लभभाई यांच्या पुतळ्यासाठी लागणार ७५ हजार घनमीटर काँक्रीट, पाच हजार ७०० मेट्रिक टन स्टील स्ट्रक्चर, १८ हजार ५०० लोखंडी सळ्या आणि २२ हजार ५०० टन ब्राँझ.
> गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील कावेडिया भागात सरदार सरोवर धरणाच्या दक्षिणेला तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या साधू बेटावर हा पुतळा उभारला जाणार.
> ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी, सरदार पटेलांच्या जयंतीदिनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाची घोषणा केली होती.
> पुतळा उभारण्यासाठी देशभरातील सात लाख गावांमधून लोखंड गोळा केल्याचा गुजरात सरकारचा दावा.
> या प्रकल्पासाठी गुजरात सरकारने जगभरातून निविदा मागवल्या होत्या. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 'एल अँड टी' कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात आली आहे.
> दुबईतील 'बुर्ज खलिफा' ही सर्वोच्च इमारत बांधणारी 'टर्नर कन्स्ट्रक्शन' ही कंपनी या प्रकल्पात सल्लागार म्हणून काम करणार आहे.
4. जपानस्थित टेलिकॉम आणि इंटरनेट क्षेत्रातील आघाडीच्या 'सॉफ्टबँक'ने देशातील कोणत्या ऑनलाइन रिटेलर कंपनीत 627 दशलक्ष डॉलर अर्थात 3762 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे ?

A. अमेझॉन
B. फ्लिपकार्ट
C. स्नॅपडील
D. मंत्रा


Click for answer
C. स्नॅपडील

देशातील ऑनलाइन बाजाराचा वाढता विस्तार लक्षात घेता जपानमधील सर्वांत श्रीमंत उद्योगपती असणाऱ्या मासायोशी सोन यांनी हा निर्णय घेतल्याचे 'सॉफ्टबँक'तर्फे स्पष्ट करण्यात आले. या गुंतवणुकचा विनियोग 'स्नॅपडील'तर्फे विस्तारीकरणात आणि कंपन्या ताब्यात घेण्यासाठी करण्यात येणार आहे. या शिवाय 'स्नॅपडील'कडून मोबाइल टेक्नॉलॉजीमध्येही गुंतवणूक करण्यात येणार आहे.
5. अमेरिकेतील बराक ओबामा प्रशासनाने स्वीडनमधील राजदूत म्हणून कोणत्या अमेरिकी भारतीय असलेल्या महिलेचे नाव निश्चित केले आहे ?

A. निना दुवूलारी
B. अझिता राजी
C. स्वाती दांडेकर
D. कमला हॅरीस


Click for answer
B. अझिता राजी
6. मायकल साटा ऊर्फ किंग कोब्रा यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. ते कोणत्या आफ्रिकन देशाचे राष्ट्राध्यक्ष होते ?

A. झांबिया
B. झिम्बाब्वे
C. इथोपिया
D. लिबिया


Click for answer
A. झांबिया

लंडनमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्म साफ करण्याचे काम करणारा हा तरुण कामगार झांबियाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचला. पदावर येताच त्यांनी भ्रष्टाचारविरोधी अभियान हाती घेतले होते. त्यांच्या प्रखर भूमिकेमुळे त्यांना राजकीय शत्रूही भरपूर होते. मायकल साटा यांचा मृत्यू लंडन येथे उपचार घेत असताना झाला.
7. शेती, आरोग्यसेवा, ऊर्जा, सुरक्षा, आपतकलीन नियोजन आदी विविध उद्योगांमधील समस्यांवर आपोआप पर्याय (automate solutions) उपलब्ध करून देता येतील, यासाठी विखुरलेल्या यंत्रणा एकमेकांशी जोडण्याचा तब्बल 900 कोटी रुपये खर्चाचा इंटरनेट वर आधारित कोणता महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे ? Internet-of-things

A. इंटरनेट ऑफ थिंग्स
B. सुपर इंटरनेट
C. इंटरनेट ऑफ इंटरनेट
D. मेगा-इंटरनेट


Click for answer
A. इंटरनेट ऑफ थिंग्स

सन २०२० पर्यंत अशी यंत्रणा उभी करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. प्रकल्पाच्या सुरुवातीला विविध कामांसाठी २० कोटी यंत्रणा एकमेकांशी जोडल्या जातील.
8. चित्रपटसृष्टीतील जागतिक प्रतिष्ठेच्या शिलिंगेल फिल्म फेस्टिव्हल 2014 मध्ये मराठी दिग्दर्शक अमोल गुप्ते यांच्या कोणत्या हिंदी सिनेमाला "लहान मुलांसाठीच्या ज्युनिअर फिल्म विभागात" सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले ?

A. हवा-हवाई
B. सुपर नानी
C. जलपरी
D. बम बम बोले


Click for answer
A. हवा-हवाई
9. नासाने पाठवलेल्या कोणत्या मानवरहित मालवाहू रॉकेटचा उड्डाण होताच नुकताच स्फोट झाला ?

A. अँटरिस
B. ओरीयन
C. कोलंबिया
D. SMAP


Click for answer
A. अँटरिस

अमेरिकेच्या 'नासा' या अंतराळ संशोधन संस्थेच्या कंत्राटातील मानवरहित खासगी रॉकेटचा मंगळवारी उड्डाणानंतर अवघ्या सहा सेकंदांतच स्फोट होऊन ते उद्‍‍ध्वस्त झाले. व्हर्जिनिया येथील कमर्शियल लाँचपॅडवरून त्याचे उड्डाण झाले होते.

ऑर्बिटल सायन्सेस कॉर्पोरेशनचे हे अँटरिस रॉकेट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर असलेल्या सहा अंतराळवीरांसाठी ५,००० पौंड वजनाच्या साहित्याचा साठा घेऊन जात होते. मंगळवारी स्थानिक वेळेनुसार ६ वाजून २२ मिनिटांनी अटलांटिक महासागरातील वॉलप्स फ्लाइट फॅसिलिटी येथून त्याचे उड्डाण झाले. मात्र सहा सेकंदातच त्याचा स्फोट झाला.
10. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 'स्वच्छ भारत' अभियानाबद्दल त्यांची प्रशंसा करून ही मोहीम भारतात, विशेषत: ग्रामीण भागात यशस्वी व्हावी म्हणून आपला पाठिंबा राहील, असे नुकतेच संयुक्त राष्ट्रांच्या कोणत्या विशेषीकृत संस्थेने जाहीर केले आहे ?

A. युनेस्को
B. युनिसेफ
C. WHO
D. विपो


Click for answer
B. युनिसेफ