चालू घडामोडी-20 ऑक्टोबर 2014


मराठी चालू घडामोडी प्रश्नमंजुषा-595

तुम्ही हे वाचलेत का ?:
चालू घडामोडी-19 ऑक्टोबर 2014
चालू घडामोडी-18 ऑक्टोबर 2014
चालू घडामोडी-17 ऑक्टोबर 2014
चालू घडामोडी-16 ऑक्टोबर 2014
चालू घडामोडी-15 ऑक्टोबर 2014
चालू घडामोडी-14 ऑक्टोबर 2014

1. अमेरिकेच्या न्याय खात्याच्या नागरी हक्क विभागाच्या प्रमुखपदी भारतीय वंशाच्या ______________ यांची नियुक्ती करण्याचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी निश्चित केले आहे. vanita-gupta

A. तुलसी गबार्ड
B. वनिता गुप्ता
C. निक्की हॅले
D. क्षमा सावंत


Click for answer

B. वनिता गुप्ता

अमेरिकन नागरी हक्क संघटनेच्या कायदेशीर उपसंचालक असलेल्या ३९ वर्षीय वनिता गुप्ता यांची बुधवारी न्याय खात्याच्या नागरी हक्क विभागप्रमुखपदी तात्कालिक नेमणूक करण्यात आली असून, या पदावर नियुक्ती करण्यासाठी वर्षअखेरीपर्यंत त्यांच्या नावाची शिफारस होणे अपेक्षित आहे.
2. मंगळ ग्रहाला किती उपग्रह आहेत ?

A. दोन
B. पाच
C. सात
D. अकरा


Click for answer

A. दोन

सुमारे 20 दिवसांपूर्वी मंगळ ग्रहाच्या कक्षेमध्ये यशस्वीरित्या प्रवेश केल्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) मंगलयानाने फोबोस, या मंगळाभोवती फिरणाऱ्या सर्वांत मोठ्या नैसर्गिक उपग्रहाची छायाचित्रे पाठविली.

फोबोस व डिमोस या दोन उपग्रहांचा शोध 1877 मध्ये लावण्यात आला होता.
3. "हुदहुद" वादळामुळे उद्‌ध्वस्त झालेल्या आंध्र प्रदेशला पंतप्रधान नरेंद्र मोदी किती रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे ?

A. शंभर हजार कोटी
B. एक हजार कोटी
C. दहा हजार कोटी
D. एक कोटी


Click for answer

B. एक हजार कोटी
4. राज्यात 13 व्या विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी सरासरी किती टक्के मतदान झाले ?

A. 84
B. 74
C. 64
D. 54


Click for answer

C. 64
5. तृतीयपंथी मुलांना शालेय प्रवेशामध्ये 25 टक्के आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कोणत्या राज्याने घेतला आहे ?

A. केरळ
B. राजस्थान
C. दिल्ली
D. उत्तरप्रदेश


Click for answer

C. दिल्ली
6. केंद्र सरकारने मुख्य आर्थिक सल्लागारपदी ________________यांची निवड केली आहे.

A. अरविंद सुब्रमण्यन
B. कौशिक बासू
C. अमर्त्य सेन
D. भालचंद्र मुणगेकर


Click for answer

A. अरविंद सुब्रमण्यन

सुब्रमण्यन सद्या अमेरिकेतील वॉशिंग्टन शहरातील पीटर्सन इस्टिटयुट ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत वरिष्ठ संशोधक आहेत. केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी या पदासाठी त्यांच्या नावाची शिफारस केली होती.

दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर सुब्रमण्यन यांनी इंडियन इस्टीट्यूट ऑफ अहमदाबाद येथून एमबीए पूर्ण केले. नंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून एम.फिल आणि पी.एचडी पूर्ण केली.
7. भारतात सर्वाधिक बालकामगार _______________ या राज्यात असून सर्वात कमी _______ राज्यात आहेत.

A. ओडिशा- महाराष्ट्र
B. महाराष्ट्र- गुजरात
C. आंध्रप्रदेश- केरळ
D. केरळ- आंध्रप्रदेश


Click for answer

C. आंध्रप्रदेश- केरळ
8. दिल्लीच्या मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट सिस्टीमने महिलांच्या सुरक्षिततेसाठी मोबाईल फोनवर वापरता येणारे __________ हे नवीन सुरक्षा साधन तयार केले आहे.

A. टेलटेल
B. इन डेंजर
C. हेल्प मी
D. ट्रॅक मी


Click for answer

A. टेलटेल
9. IPL-7 चा विजेता संघ कोणता ?

A. राजस्थान रॉयल्स
B. मुंबई इंडियन्स
C. कोलकाता नाईट रायडर्स
D. चेन्नई सुपरकिंग्ज


Click for answer

C. कोलकाता नाईट रायडर्स
10. IPL-7 मध्ये सर्वाधिक धावा ____________ ने फटकावल्या तर सर्वाधिक बळी _______ ने घेतले.

A. मोहित शर्मा, रॉबिन उथाप्पा
B. रॉबिन उथाप्पा, मोहित शर्मा
C. रोहित शर्मा, इरफान पठाण
D. सुरेश रैना, आर.आश्विन


Click for answer

B. रॉबिन उथाप्पा, मोहित शर्मा