सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-49


481. लोखंडी वस्तूंना गंजण्यापासून बचाव करण्यासाठी त्यांच्यावर __________ या धातूचे विलेपन केले जाते. general-science-quiz

A. पोलाद
B. क्रोमिअम
C. चांदी
D. सोने


Click for answer

B. क्रोमिअम
482. जो पदार्थ पाण्यात विरघळला असता OH-आयन देतो त्यास _____________ म्हणतात.

A. आम्ल
B. आम्लारी
C. उत्प्रेरक
D. क्षपणक


Click for answer

B. आम्लारी
483. 'लोडस्टोन' म्हणजेच __________________.

A. कृत्रिम चुंबक
B. नैसर्गिक चुंबक
C. मृदू चुंबक
D. यापैकी नाही


Click for answer

B. नैसर्गिक चुंबक
484. दोलायमान विद्युतधारेसच _____________ असेही म्हणतात.

A. प्रत्यावर्ती धारा
B. लंब धारा
C. दिष्ट धारा
D. दोलक धारा


Click for answer

A. प्रत्यावर्ती धारा
485. पितळ हा _______________ द्रावणाचा प्रकार असते.

A. द्रवामध्ये स्थायू
B. द्रवामध्ये वायू
C. वायूमध्ये वायू
D. स्थायूमध्ये स्थायू


Click for answer

D. स्थायूमध्ये स्थायू
486. अतिसंवाहकतेच्या शोधाचे श्रेय ______________ या शास्त्रज्ञाला दिले जाते.

A. ओनेस
B. फॅरडे
C. एडिसन
D. वॅट


Click for answer

A. ओनेस
487. विद्युतघटाच्या धन अग्र व ऋण अग्र यांच्या विद्युत पातळीमधील फरकासच __________________ म्हणतात.

A. विद्युतरोध
B. विद्युतप्रवाह
C. विद्युतप्रभार
D. विभवांतर


Click for answer

D. विभवांतर
488. 1 न्यूटन = ____________ डाईन

A. 10 5
B. 10 7
C. 10 9
D. 10 10


Click for answer

A. 10 5
489. जैवडिझेल कशापासून मिळवतात ?

A. करंजा
B. जाथ्रोफा
C. मका
D. यापैकी सर्व


Click for answer

D. यापैकी सर्व
490. वटवाघूळ __________________ ध्वनी निर्माण करतात.

A. श्राव्य
B. अवश्राव्य
C. श्राव्यातीत
D. यापैकी नाही


Click for answer

C. श्राव्यातीत