सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-47


461. गोपाळ हरी देशमुखांनी 'लोकहितवादी' या नावाने _____________ या साप्ताहिकातून लिखाण केले. लोकहितवादी

A. दर्पण
B. प्रभाकर
C. सुधारक
D. दीनमित्र


Click for answer
B. प्रभाकर
462. 'सार्वजनिक सत्यधर्म' हे पुस्तक कोणी लिहिले ?

A. का. त्र्यं. तेलंग
B. स्वामी दयानंद सरस्वती
C. भाऊ महाजन
D. महात्मा ज्योतिबा फुले


Click for answer
D. महात्मा ज्योतिबा फुले
463. भाऊराव पाटील यांनी 'रयत शिक्षण संस्थे' ची स्थापना कोणत्या वर्षी केली ?रयत-शिक्षण

A. 1919
B. 1923
C. 1930
D. 1935


Click for answer
A. 1919
464. डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या मते, राष्ट्रैक्याच्या (National Integration) मार्गातील पहिला अडथळा कोणता ? डॉ. बी. आर. आंबेडकर

A. जातीयता
B. मनाचा संकुचितपणा
C. समाजविघातक प्रवृत्ती
D. धार्मिक विविधता


Click for answer
A. जातीयता
465. महाराष्ट्रात 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया' ची (Depressed Classes Mission Society of India) स्थापना कोणी केली ?

A. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B. महात्मा ज्योतिबा फुले
C. विठ्ठल रामजी शिंदे
D. महर्षी अण्णासाहेब कर्वे


Click for answer
C. विठ्ठल रामजी शिंदे
466. खालीलपैकी कोणत्या नदीकाठी नांदेड शहर वसलेले आहे ?

A. कृष्णा
B. भीमा
C. गोदावरी
D. प्रवरा


Click for answer
C. गोदावरी
467. घटनादुरुस्ती प्रक्रिया राज्यघटनेच्या ________ या कलमात स्पष्ट करण्यात आली आहे.

A. 227
B. 368
C. 370
D. 352


Click for answer
B. 368
468. खंबाटकी घाट कोणत्या मार्गावर आहे ?

A. मुंबई-पुणे
B. पुणे-बंगळूर
C. पुणे-सोलापूर
D. मुंबई-नाशिक


Click for answer
B. पुणे-बंगळूर
469. खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये प्रामुख्याने औषधी व रसायन उत्पादनाचे कारखाने (Drugs & Pharmaceuticals Industries) आहेत ?

A. नागपूर
B. मुंबई
C. पुणे
D. कोल्हापूर


Click for answer
B. मुंबई
470. खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे ?

A. 1884: राष्ट्रीय सभेची स्थापना
B. 1960: महाराष्ट्र राज्याची स्थापना
C. 1857: ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना
D. 1922: लोकमान्य टिळकांचा मृत्यू


Click for answer
B. 1960: महाराष्ट्र राज्याची स्थापना