चालू घडामोडी-27 ऑक्टोबर 2014


मराठी चालू घडामोडी प्रश्नमंजुषा-599 
1. घरात वीजपुरवठा करण्यासाठी कार्बन डाय ऑक्साईडचे रूपांतर विजेत करणारे पर्यावरणस्नेही उपकरण शोधून काढणाऱ्या कोणत्या भारतीय अमेरिकी विद्यार्थ्यांला अमेरिकेचा यावर्षीचा सर्वोत्कृष्ट तरुण वैज्ञानिक पुरस्कार मिळाला आहे ?

A. साहिल दोशी
B. रत्नाकर माहिमकर
C. अरविंद पांडे
D. सत्यजित कपूर


Click for answer
A. साहिल दोशी

डिस्कव्हरी एज्युकेशन ३ एम यंग सायंटिस्ट चॅलेंज स्पर्धा २०१४ या मुलाने जिंकली आहे. पारितोषिक २५ हजार डॉलरचे असून त्याला कोस्टारिकाचा दौरा करण्याची संधीही मिळणार आहे. पोल्युसेल नावाचे उपकरण त्याने तयार केले असून त्यात कार्बन डाय ऑक्साईडचे रूपांतर विजेत केले जाते, त्यामुळे कार्बनचे उत्सर्जन वाढण्याचा तर प्रश्नच नाही, पण उलट कार्बन पदचिन्हे कमी होतात.
2. कोणत्या देशाच्या संसदेवर नुकताच दहशतवादी हल्ला झाला ?

A. अमेरिका
B. कॅनडा
C. ऑस्ट्रेलिया
D. ब्रिटन


Click for answer
B. कॅनडा
3. कोणत्या देशातील श्री थेंदायुथपनी मंदिराचा नुकताच तेथील राष्ट्रीय स्मारक म्हणून समावेश केल्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे ?

A. थायलंड
B. कंबोडिया
C. सिंगापूर
D. व्हिएतनाम


Click for answer
C. सिंगापूर

155 वर्षे जुने असलेले हे मंदिर राष्ट्रीय स्मारकाच्या यादीतील हे तिसरे हिंदू मंदिर ठरले आहे. या मंदिराची निर्मिती 1859मध्ये नट्टुकोट्टई चेट्टियार यांच्यातर्फे करण्यात आली होती. यापूर्वी राष्ट्रीय वारसा मंडळाने या मंदिराला जागतिक स्मारकाचा दर्जा दिला आहे. श्री मुरुगन हा या मंदिराचा मुख्य देव असून, येथे शिव-पार्वतीचीही स्वतंत्र मंदिरे आहेत. या मंदिराला चेट्टीअर मंदिर म्हणूनच ओळखले जाते.
4. 'हुडहुड' या महाचक्रीवादळाचा फटका बसलेले आंध्र प्रदेशातील चेपालूगाडा हे गाव कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी दत्तक घेतले आहे ?

A. नितीन गडकरी
B. उमा भारती
C. अरुण जेटली
D. एम. वेंकय्या नायडू


Click for answer
D. एम. वेंकय्या नायडू
5. भारत-चीन संस्कृतीचे आदानप्रदान करण्याबाबत सामंजस्य करारांतर्गत भारताची 'व्हायकॉम-१८' आणि चीनची 'ताही अँड शिने' या दोन कंपन्या संयुक्तपणे कोणत्या चित्रपटाची निर्मिती करत आहेत ?

A. ब्राम्होस
B. पंचशील
C. भारती
D. कुंगफू-योग


Click for answer
D. कुंगफू-योग

योगविद्या ही भारताची जगाला देणगी, तर कुंगफू ही स्वसंरक्षणाची कला चीनचे जागतिक योगदान. या दोन नावांचा संयोग साधत दोन्ही देशांच्या संस्कृतीची जगाला ओळख करून देणारा एक चित्रपट उभय देशांतील अग्रगण्य चित्रपटनिर्मिती कंपन्या संयुक्तरीत्या तयार करणार आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा हाँगकाँगमधील प्रख्यात दिग्दर्शक स्टॅन्ली टोंग या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.जगविख्यात कलाकार जॅकी चॅन या चित्रपटात काम करण्याची शक्यता आहे.
6. आंबेगाव तालुक्‍याच्या डोंगरी व दुर्गम आदिवासी भागात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते अभियंता आनंद हरदेव कपूर यांचे अलीकडेच निधन झाले. ते कोणत्या योजनेचे जनक म्हणून त्यांना ओळखले जातात ?

A. पडकई
B. निर्मल ग्राम
C. विज्ञानजत्रा
D. लोकबिरदरी


Click for answer
A. पडकई
7. गूगलने _____________ या नावाने नवीन इमेल सर्विच लॉन्च केली असून ती जुन्या इमेलपेक्षा अधिक सोपी व उपयोगी आहे. google

A. इनबॉक्स
B. गुगल-प्लस
C. जीमेल
D. हॉटमेल


Click for answer
A. इनबॉक्स
8. जम्मू-काश्मीरच्या पूरग्रस्तांसाठी पंतप्रधान निधीतून किती कोटी रुपयांची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे ?

A. 545 कोटी रुपये
B. 745 कोटी रुपये
C. 945 कोटी रुपये
D. 1145 कोटी रुपये


Click for answer
B. 745 कोटी रुपये
9. 1970 च्या दशकात 'वॉटरगेट' प्रकरणाचा पर्दाफाश करून अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना राजीनामा देण्यास भाग पाडणारे _____________चे माजी संपादक व ज्येष्ठ पत्रकार बेन्जामिन ब्रॅडली (93) यांचे अलीकडेच निधन झाले.

A. न्युयॉर्क टाईम्स
B. वॉशिंग्टन पोस्ट
C. यूएसए टुडे
D. लॉसएंजल्स टुडे


Click for answer
B. वॉशिंग्टन पोस्ट
10. पुण्याजवळ झालेल्या एका अपघातानंतर भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील कोणत्या प्रकारची लढाऊ विमाने तांत्रिक फेरचाचणीत उत्तीर्ण झाल्यानंतरच या विमानांच्या उड्डाणाबाबत हिरवा कंदील घेण्याचा निर्णय घेत सद्य स्थितीत या जातीची सर्व विमाने न उडवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे ?

A. मिग-21
B. सुखोई-30
C. जग्वार
D. तेजस


Click for answer
B. सुखोई-30