प्रश्नमंजुषा -159


1. 'फेडरल कोर्ट ऑफ इंडिया' चे 'सर्वोच्च न्यायालयात ' रुपांतर कधी झाले ?

A. 26 नोव्हेंबर 1949
B. 26 जानेवारी 1950
C. 14 जानेवारी 1935
D. 9 डिसेंबर 1946

Click for answer 
B. 26 जानेवारी 1950

2. भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती _____________ कडून होते.

A. राष्ट्रपती
B. पंतप्रधान
C. अर्थमंत्री
D. सभापती

Click for answer 
A. राष्ट्रपती


3. घटकराज्याचा 'संचित निधी ' सुरक्षित ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे ?

A. मुख्यमंत्री
B. मंत्रीमंडळ
C. राज्यपाल
D. विधानसभा सभापती

Click for answer 
C. राज्यपाल

4. घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली ?

A. आयर्लंड
B. यु.के.
C. यु.एस.ए.
D. ऑस्ट्रेलिया

Click for answer 
C. यु.एस.ए.

5. राज्याच्या विधानपरिषदेत सदस्य संख्येपैकी किती सदस्यांची राज्यपालांकडून नियुक्ती केली जाते ?

A. 1/12
B. 1/3
C. 1/4
D. 1/6

Click for answer 
D. 1/6

6. घटक राज्याचे कोणते सभागृह प्रथम परंतु कनिष्ठ आहे ?

A. विधानसभा
B. विधानपरिषद
C. राज्यसभा
D. लोकसभा

Click for answer 
A. विधानसभा

7. विधानसभा सभागृहाची सदस्य संख्या मर्यादा __________ इतकी ठरविण्यात आली आहे.

A. 60 ते 500
B. 75 ते 300
C. 40 ते 450
D. यापैकी नाही

Click for answer 
A. 60 ते 500

8. घटकराज्याचा राज्यपाल , विधानसभा ,विधानपरिषद मिळून घटकराज्याचे कायदेमंडळ तयार होईल असे घटनेच्या कोणत्या कलमात सांगितले आहे ?

A. कलम 168
B. कलम 171
C. कलम 169
D. कलम 75

Click for answer 
A. कलम 168


9. भारतीय नागरिकांच्या ______ अधिकारांचा समावेश घटनेच्या विभाग 3 कलम 14 ते 18 मध्ये केल आहे.

A. समतेचा
B. स्वातंत्र्याचा
C. धर्माचा
D. संपत्तीचा

Click for answer 
A. समतेचा

10. केंद्र व घटकराज्य यांच्यातील राजस्व विभाजन ___________ अधिनियमावर आधारित आहे.

A. अधिनियम 1920
B. अधिनियम 1967
C. अधिनियम 1935
D. अधिनियम 1974

Click for answer 
C. अधिनियम 1935
Read More »

प्रश्नमंजुषा -158


1. माहितीच्या अधिकाराचा कायदा सर्वप्रथम कोणत्या देशात अस्तित्वात आला?

A. द. आफ्रिका
B. ऑस्ट्रेलिया
C. यु.एस.ए.(अमेरिका)
D. स्विडन

Click for answer 
D. स्विडन

2. माहितीचा अधिकार अधिनियम नुसार लोकसभेचे तत्संबंधित किंवा तदनुषंगिक बाबीं करिता 'सक्षम अधिकारी ' _____ असतील.
A. लोकसभेचे अध्यक्ष
B. लोकसभेचे उपाध्यक्ष
C. कायदा मंत्री
D. पंतप्रधान

Click for answer 
A. लोकसभेचे अध्यक्ष

3. जर मागितलेली माहिती, एखाद्या व्यक्तीचे जीवित वा स्वातंत्र्य या संबंधातील असेल तर, विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून _______ च्या आत ती माहिती देण्यात येईल.

A. दोन दिवस
B. 48 तास
C. 24 तास
D. 6 तास

Click for answer 
B. 48 तास

4. खालीलपैकी कोणती माहिती प्रकट करणे बंधनकारक नाही ?

A. विदेशी शासनाकडून विश्वास पूर्वक मिळालेली माहिती
B. जी प्रकट केल्याने संसदेच्या किंवा राज्य विधानमंडळाच्या विशेषाधिकारांचा भंग होईल अशी माहिती
C. जी प्रकट केल्याने न्यायालयाचा अवमान होईल अशी माहिती
D. वरीलपैकी सर्व

Click for answer 
D. वरीलपैकी सर्व

5. प्रत्येक माहिती आयुक्त, पदधारणाच्या दिनांकापासून ________ वर्षाच्या कालावधीसाठी आपले पद धारण करेल.

A. 10
B. 2
C. 5
D. 7

Click for answer 
C. 5


6. मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्तास, निलंबित करण्याआधी राष्ट्रपतींना __________ चा अभिप्राय घेवून त्यानुसार कारवाई करता येईल.

A. सर्वोच्च न्यायालय
B. विरोधी पक्ष नेता
C. पंतप्रधान
D. निवडणूक आयुक्त

Click for answer 
A. सर्वोच्च न्यायालय

7. राज्य मुख्य माहिती आयुक्ताची व राज्य माहिती आयुक्ताची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या शिफारसी नुसार ______________ द्‍वारे केली जाते.

A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. राज्यपाल
D. विधानसभा

Click for answer 
C. राज्यपाल

8. केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोगास कोणत्याही बाबींची चौकशी करताना _________ चे अधिकार निहित करण्यात आले आहेत.

A. फौजदारी न्यायालय
B. चौकशी न्यायालय (ट्रायल कोर्ट)
C. सत्र न्यायालय
D. दिवाणी न्यायालय

Click for answer 
D. दिवाणी न्यायालय


9. केंद्रीय जन माहिती अधिकारी किंवा राज्य जन माहिती अधिकारी यांच्या निर्णयाविरोधात ________ दिवसांत अपील करता येते.

A. 20
B. 30
C. 40
D. 60

Click for answer 
B. 30

10. अर्जदाराचे कोणतेही नुकसान अथवा अन्य हानीस जबाबदार सार्वजनिक प्राधिकरणाला भरपाई देण्याचे आदेश देण्याचे अधिकार _____________ ला आहे.

A. केंद्रीय माहिती आयोग / राज्य माहिती आयोग
B. केंद्रीय जन माहिती आयोग
C. राज्य जन माहिती आयोग
D. राज्यपाल

Click for answer 
A. केंद्रीय माहिती आयोग / राज्य माहिती आयोग
Read More »

प्रश्नमंजुषा -157


1. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक धोरणाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत ?

A. आ.ह.साळुंखे
B. हरी नरके
C. विनायक मेटे
D. हर्षवर्धन देशमुख

Click for answer 
A. आ.ह.साळुंखे

2. 2010 चा 'मिस युनिव्हर्स 'किताब कोणी मिळवला ?

A. जीमेना नवारेत
B. युक्ता मुखी
C. निकोल फारिया
D. गिफ्टी ईमन्युअल

Click for answer 
A. जीमेना नवारेत

3. _____________ हे महाराष्ट्रात पादत्राणे बनविण्यासाठी प्रसिध्द आहे.

A. सातारा
B. कोल्हापूर
C. पुणे
D. अमरावती

Click for answer 
B. कोल्हापूर

4. _________ मध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते.

A. दुध
B. अंडी
C. हिरव्या पालेभाज्या
D. द्विदल धान्ये

Click for answer 
C. हिरव्या पालेभाज्या

5. महाराष्ट्रात किती नगर परिषदा स्थापन करण्यात आल्या आहेत ?

A. 03
B. 05
C. 33
D. 221

Click for answer 
B. 05

6. खालीलपैकी 'हिंदू ' ह्या कादंबरीचे लेखक कोण आहेत ?

A. आनंद यादव
B. नरेंद्र जाधव
C. मोहन धारिया
D. भालचंद्र नेमाडे

Click for answer 
D. भालचंद्र नेमाडे

7. "आगाखान कप " ___________ खेळाशी संबंधित आहे.

A. हॉकी
B. फुटबॉल
C. क्रिकेट
D. गोल्फ

Click for answer 
A. हॉकी

8. जुलै 2010 मध्ये महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश ह्या राज्यांमध्ये ____________ धरणामुळे पाणी वाटप प्रश्न निर्माण झाला.

A. टेंभली
B. बाभळी
C. पोचमपाड
D. श्रीरामसागर

Click for answer 
B. बाभळी

मानसिक क्षमता चाचणी / अंकगणित

9. एका कुटुंबात चार सदस्य आहेत. त्यांच्या वयांची बेरीज 122 वर्षे आहे. वडील व मुलगा अनुक्रमे आई व मुलीपेक्षा
8 वर्षांनी मोठे आहेत. मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निमपट असेल तर मुलीचे वय किती असेल ?

A. 18 वर्षे
B. 15 वर्षे
C. 11 वर्षे
D. 23 वर्षे

Click for answer 
B. 15 वर्षे

स्पष्टीकरण :
मुलाचे वय x वर्षे मानले तर वडिलांचे वय 2x असेल. म्हणजेच आईचे वय 2x-8 तर बहिणीचे वय x-8 वर्षे असेल.

एकत्रितपणे त्यांच्या वयांची बेरीज 122 वर्षे आहे.

म्हणून x+2x+(2x-8)+(x-8)=122

यावरून 6x-16=122

म्हणजेच 6x=122+16=138

x=138/6=23 वर्षे

मुलीचे वय x-8=23-8= 15 वर्षे असेल.10. पाच निकालांची सरासरी 46 गुण आहे तर पहिल्या चार निकालांची सरासरी 45 गुण आहे. तर पाचव्या विषयात किती गुण मिळाले ?

A. 50
B. 1
C. 10
D. 12.5

Click for answer 
A. 50

स्पष्टीकरण :
पाच गुणांची सरासरी 46 गुण असेल तर त्या विषयांत मिळालेल्या गुणांची एकूण बेरीज 46x5=230

पहिल्या चार निकालांची सरासरी 45 गुण म्हणजेच त्यातील एकूण गुण = 45x4=180

वरील दोन विधानांवरून पाचव्या विषयातील गुण = 230-180= 50 गुण

Read More »

चीनची नवीन उपग्रह यंत्रणा
चीन ने स्वत:ची जी.पी.एस. सारखी उपग्रह यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
सविस्तर माहिती खालील ठिकाणी उपलब्ध आहे.

http://www.gkgscurrent.blogspot.com/2011/12/beidou-or-big-dipper-chinas-own.html
Read More »

प्रश्नमंजुषा -156


1. 'राईट टू रिकॉल ' ची मागणी भारतात कोण करत आहे ?

A. राहुल गांधी
B. राज ठाकरे
C. अण्णा हजारे
D. लालकृष्ण अडवाणी

Click for answer 
C. अण्णा हजारे

2. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला केव्हा झाला ?

A. 11 सप्टेंबर 2011
B. 12 सप्टेंबर 2011
C. 25 सप्टेंबर 2011
D. 26 सप्टेंबर 2011

Click for answer 
A. 11 सप्टेंबर 2011


3. भारताने 18 मे 1974 रोजी पहिली अणुचाचणी कोठे घेतली ?

A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. मध्यप्रदेश
D. राजस्थान

Click for answer 
D. राजस्थान

4. संयुक्त राष्ट्रांचा जागतिक पर्यावरण दिन कोणता आहे ?

A. 10 जून
B. 5 जून
C. 15 जून
D. 20 जून

Click for answer 
B. 5 जून

5. 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद कोठे संपन्न झाली ?

A. ब्राझिल
B. जपान
C. न्यूझीलंड
D. चीन

Click for answer 
A. ब्राझिल

6. भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारली गेली ?

A. 26 नोव्हेंबर 1949
B. 26 डिसेंबर 1949
C. 26 जानेवारी 1949
D. 26 जानेवारी 1950

Click for answer 
A. 26 नोव्हेंबर 1949

7. 2010 मध्ये 'नर्मदा बचाव' आंदोलनाने किती वर्ष पूर्ण केली ?

A. 25
B. 15
C. 50
D. 30

Click for answer 
A. 25


8. महाराष्ट्रातील विधानपरिषदेत किती सदस्य आहेत ?

A. 78
B. 77
C. 76
D. 79

Click for answer 
A. 78

9. खालीलपैकी कोण तेराव्या वित्त(2010-2015) आयोगाचे अध्यक्ष आहेत ?

A. सी.रंगराजन
B. डॉ. विजय केळकर
C. डॉ. वाय.व्ही.रेड्डी
D. डॉ. एस.आचार्य

Click for answer 
B. डॉ. विजय केळकर

10. बिहार राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

A. लालूप्रसाद यादव
B. शरद यादव
C. नितीश कुमार
D. रामविलास पासवान

Click for answer 
C. नितीश कुमार
Read More »

प्रश्नमंजुषा -155


1. ऑक्टोबर 2011 च्या विधानसभा पोटनिवडणुकीत खडकवासला मतदारसंघातून कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून आला?

A. काँग्रेस
B. राष्ट्रवादी काँग्रेस
C. भाजपा
D. महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Click for answer 
C. भाजपा

2. विशेष पटपडताळणी कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची शाळांमधील हजेरी तपासण्याचे काम सुरु करण्यासाठी शासनाने परिपत्रक केव्हा काढले ?
A. जून 2010
B. जुलै 2010
C. ऑगस्ट 2011
D. सप्टेंबर 2011

Click for answer 
D. सप्टेंबर 2011


3. छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती ?

A. रायपूर
B. बंकुरा
C. मालडा
D. नडिया

Click for answer 
A. रायपूर

4. आंध्रप्रदेशात कोणत्या मागणीसाठी ऑक्टोबर 2011 मध्ये रेल-रोको आंदोलन केले गेले ?

A. वेगळे तेलंगणा राज्य
B. महागाईच्या विरोधात
C. विद्यार्थी फी वाढ
D. संपूर्ण विकासासाठी

Click for answer 
A. वेगळे तेलंगणा राज्य

5. महिलांच्या 12 व्या मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक कोणाला मिळाले ?

A. पी.टी.उषा
B. मेरी कोम
C. सानिया मिर्झा
D. दीपिका

Click for answer 
B. मेरी कोम

6. 1 जून 2011 ला कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली ?

A. आंध्रप्रदेश
B. तामिळनाडू
C. केरळ
D. झारखंड

Click for answer 
D. झारखंड


7. कोणत्या देशात 42 वर्षाच्या हुकूमशाहीचा ऑक्टोबर 2011 मध्ये अंत झाला ?

A. लिबिया
B. इराण
C. इराक
D. जर्मनी

Click for answer 
A. लिबिया

8. गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियम कोणत्या वर्षी पास झाला ?

A. 1992
B. 1993
C. 1994
D. 1995

Click for answer 
C. 1994

9. कारगील प्रश्न कोणत्या दोन देशांचा होता ?

A. भारत-चीन
B. भारत-बांगलादेश
C. भारत-पाकिस्तान
D. भारत-नेपाळ

Click for answer 
C. भारत-पाकिस्तान

10. शेतकर्‍यांनी पाण्याची बँक कोणत्या जिल्ह्यात ऑक्टोबर 2011 मध्ये सुरु केली ?

A. सातारा
B. पुणे
C. कोल्हापूर
D. नागपूर

Click for answer 
A. सातारा
Read More »

{ विशेष } 2012 राष्ट्रीय गणिती वर्ष

2012  " राष्ट्रीय गणिती वर्ष (National Mathematical Year )"
22  डिसेंबर = राष्ट्रीय गणित दिवस (National Mathematics Day)
----------------------------------------------------------------------------


सुप्रसिद्ध भारतीय गणित-तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचे हे  125  वे जन्मशताब्दी  वर्ष. त्यांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा यथोचित सन्मान करण्यासाठी भारत सरकार 2012  हे वर्ष राष्ट्रीय गणिती वर्ष म्हणून साजरे करणार . शिवाय यापुढे 22  डिसेंबर हा रामानुजन यांचा जन्मदिवस दरवर्षी  'राष्ट्रीय गणित दिवस' म्हणून साजरा केला जाईल.श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22  डिसेंबर 1887 रोजी तामिळनाडू मधील इरोड (Erode) ह्या छोट्याशा गावात झाला.(योगायोगाची बाब म्हणजे 1983 चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे ,'चंद्रशेखर  लिमिट ' ह्या खगोलीय-भौतिकशास्त्रातील कल्पनेचे जनक डॉ.एस.चंद्रशेखर  ह्यांचे हि मूळ गाव हेच.) अतिशय गरीब आणि खडतर परिस्थितीत जन्माला आलेल्या रामानुजन ह्यांना महाविद्यालयीन जीवनात अपयशाला तोंड द्यावे लागले.अत्युच्च कोटीची गणिती प्रतिभा लाभलेल्या रामानुजन ह्यांना इतर विषयांत काठावर उत्तीर्ण होणे हि अवघड जात होते. तद् नंतरच्या आयुष्यात क्लार्क म्हणून काम करत असतानाच  त्यांनी गणितातील त्यांचा व्यासंग जपला.( अल्बर्ट आईनस्टाईन हे देखील ज्या काळात त्यांनी सापेक्षतेचा सिध्दांत मांडला तेव्हा पेटंट च्या कार्यालयात कारकुनी स्वरूपाचेच काम करीत होते. )  त्रिनिटी कॉलेज , लंडन येथील प्राध्यापक सुविख्यात गणिती जी.एच.हार्डी ह्यांच्याशी त्यांनी पत्रांद्वारे संवाद साधला. प्राध्यापक हार्डींनाही ह्या गणितीची ओळख पटली. त्यांच्याच निमंत्रणावरून रामानुजन ह्यांनी इंग्लंड दौराही केला. अर्थात ह्याच कालखंडाने त्यांच्या प्रतिभेची जगाला ओळख करून दिली. मात्र अल्पावधीतच त्यांना परत यावे लागले आणि परतल्यानंतर अवघ्या वर्षभरात प्रकृती अस्वास्थ्यामुळे वयाच्या 32  व्या वर्षीच (26 एप्रिल 1920) त्यांचे निधन झाले. लंडन येथील प्राध्यापक जी.एन.वॅटसन ह्यांनी 1918 ते 1951 ह्या कालखंडात रामानुजन ह्यांच्या मागे राहिलेल्या वह्यांच्या आधारे रामानुजन ह्यांची प्रमेये  (Theorems stated by Ramanujan) ह्या  शीर्षकाखाली  30 प्रमेये प्रकाशित केली. सांख्यिकी ने ह्या आधीच रामानुजन ह्यांचा गौरव करण्यासाठी विशिष्ट संख्यांना ना 'रामानुजन -हार्डी संख्या (Ramanujan–Hardy number)' असे नामकरण केले आहे. राष्ट्राच्या ह्या महान गणीतीला आमचाही सलाम !!!


{
काय आहेत हे ' रामानुजन  हार्डी संख्या ' ?
रामानुजन जेव्हा प्राध्यापक हार्डीना भेटण्यास लंडनला गेले तेव्हा त्यांनी जी टॅक्सी (cab) केली होती , तिचा क्रमांक होता  1729  ह्या संख्येला पहिल्यावर ह्या हाडाच्या गणीतीला आनंद झाला ,त्याचे कारण त्यांनी सांगितले ते म्हणजे हि संख्या दोन संख्याच्या घनाची बेरीज म्हणून दोन वेगवेगळ्या प्रकारे लिहिता येतो.
1729=13+123=93+103
अर्थात  आता अशा संख्यांना रामानुजन  हार्डी संख्या म्हणतात.
}  

Read More »

प्रश्नमंजुषा -154


1. 5 जून हा दिवस ____________ म्हणून साजरा केला जातो.

A. पर्यावरण दिन
B. शिक्षक दिन
C. साक्षरता दिन
D. महिला दिन

Click for answer 
A. पर्यावरण दिन

2. 7 सप्टेंबर 2011 रोजी शक्तिशाली बॉम्बस्फोट झालेले भारतातील शहर कोणते ?

A. मुंबई
B. हैद्राबाद
C. दिल्ली
D. चंदीगड

Click for answer 
C. दिल्ली


3. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते स्थळ 'युनेस्कोने' जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले नाही ?

A. अजंठा लेणी
B. एलिफंटा लेण्या
C. छत्रपती शिवाजी टर्मिनस
D. महाबळेश्वर

Click for answer 
D. महाबळेश्वर

4. 'डाँग फेंग 21 डी' हे नाव कशाशी संबंधित आहे ?

A. उपग्रह
B. क्षेपणास्त्र
C. शस्त्रास्त्र
D. अण्वस्त्र

Click for answer 
B. क्षेपणास्त्र


5. MKCL च्या __________शाखेमुळे महाराष्ट्रातील लोकांना संगणक शिक्षण घेण्याची सोय अधिक सुलभ झाली आहे.

A. DTH
B. ETH
C. STD
D. यापैकी नाही

Click for answer 
B. ETH

6. 5 फेब्रुवारी 2011 रोजी अत्याधुनिक 'सी-130 हर्क़्युलिस' हे विमान भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केले ?

A. इंग्लंड
B. रशिया
C. यु.एस.ए.(अमेरिका)
D. चीन

Click for answer 
C. यु.एस.ए.(अमेरिका)

7. इंदिरा गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे किमान वय किती असावे लागते ?

A. 60
B. 65
C. 58
D. 55

Click for answer 
B. 65


8. महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये किती ग्राम न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय राज्यशासनाने सप्टेंबर 2011 मध्ये जाहीर केला ?

A. 15
B. 30
C. 40
D. 45

Click for answer 
B. 30

9. 2010 हे वर्ष युनोतर्फे __________ वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

A. महिला वर्ष
B. पर्यावरण रक्षण वर्ष
C. आंतरराष्ट्रीय जैवविविधता वर्ष
D. दहशतवाद विरोधी वर्ष

Click for answer 
C. आंतरराष्ट्रीय जैवविविधता वर्ष

10. भारतीय संविधानाच्या 113 व्या घटनादुरुस्तीन्वये कोणत्या राज्याचे नाव बदलण्यात आले ?

A. बिहार
B. ओरिसा
C. मध्यप्रदेश
D. अरुणाचल प्रदेश

Click for answer 
B. ओरिसा
Read More »

प्रश्नमंजुषा -153


1. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेले नव्हते ?

A. सुधारक
B. जनता
C. समता
D. प्रबुध्द भारत

Click for answer 
A. सुधारक

2.डॉ.इंदिरा आहुजा या खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील तज्ञ समजल्या जातात?

A. स्त्री रोग
B. वारली चित्रकला
C. नृत्यक्षेत्र
D. समाजकार्य

Click for answer 
A. स्त्री रोग

3. महाराष्ट्रातील हळद आणि आले यांचे उत्पादन करणारे जिल्हे कोणते ?

A. सातारा आणि सांगली
B. कोल्हापूर आणि पुणे
C. परभणी आणि नांदेड
D. कोल्हापूर आणि सोलापूर

Click for answer 
A. सातारा आणि सांगली

4. महाराष्ट्रात 'मालवणी ' हि भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते ?

A. पश्चिम महाराष्ट्र
B. खानदेश
C. कोकण
D. पठार

Click for answer 
C. कोकण

5. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात लहान आहे ?

A. अकोला
B. हिंगोली
C. वाशीम
D. मुंबई शहर

Click for answer 
D. मुंबई शहर

6. ब्रिटीश सत्तेविरुध्द उठाव करणारे क्रांतिकारक उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके यांच्यासमोर कोणाचा आदर्श होता ?

A. न्या.म.गो.रानडे
B. छत्रपती शिवाजी महाराज
C. गणेश वासुदेव जोशी
D. स्वा.वि.दा.सावरकर

Click for answer 
B. छत्रपती शिवाजी महाराज

7. मँगेनीजचे साठे महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतात ?

A. नागपूर
B. वाशीम
C. चंद्रपूर
D. गडचिरोली

Click for answer 
A. नागपूर

8. भारताने आजपर्यंत किती आण्विक चाचण्या केल्या ?

A. दोन
B. एक
C. पाच
D. सहा

Click for answer 
D. सहा

9. राष्ट्रीय सभेची (काँग्रेस) स्थापना होण्यापूर्वी अखिल भारतीय चळवळीचे केंद्र बनावी यासाठी कोलकाता येथे कोणती राजकीय संघटना कार्यरत होती ?

A. सार्वजनिक सभा
B. महाजन सभा
C. प्रार्थना सभा
D. इंडीयन असोसिएशन

Click for answer 
D. इंडीयन असोसिएशन

10. महाराष्ट्रात तारापूर या ठिकाणी कुठल्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते ?

A. औष्णिक
B. जलविद्युत
C. पवनविद्युत
D. अणुउर्जा

Click for answer 
D. अणुउर्जा
Read More »

प्रश्नमंजुषा -152


1. रोजगार हमी योजनेंतर्गत खालीलपैकी कोणता प्रकल्प अंतर्भूत केलेला नाही ?

A. मृदुसंधारण
B. रस्ते विकास
C. विमानतळ विकास
D. जलसिंचन

Click for answer 
C. विमानतळ विकास


2.खालीलपैकी कोणते तत्त्वज्ञान सत्यशोधक समाजाचे नाही ?

A. जगात ईश्वर एकच असून त्याचे स्वरूप सर्वव्यापी , निर्गुण व निराकारी आहे.
B. सर्व मानवप्राणी त्याची लेकरे आहेत.
C. भिन्न भिन्न धर्मामध्ये ईश्वरविषयक विविध कल्पना असल्या तरी ती सर्वशक्तिमान अशा एकाच परमेश्वराची स्वरूपे आहेत असे मानणे.
D. मनुष्य प्राणी हा गुणाने श्रेष्ठ ठरतो, जातीने नाही.

Click for answer 
C. भिन्न भिन्न धर्मामध्ये ईश्वरविषयक विविध कल्पना असल्या तरी ती सर्वशक्तिमान अशा एकाच परमेश्वराची स्वरूपे आहेत असे मानणे.

3. खालीलपैकी महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर कोणते ?

A. नागपूर
B. पुणे
C. मुंबई
D. अमरावती

Click for answer 
A. नागपूर

4. बकिंगहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे?

A. पंजाब व हरियाणा
B. महाराष्ट्र व गोवा
C. आंध्रप्रदेश व तामिळनाडू
D. केरळ व कर्नाटक

Click for answer 
C. आंध्रप्रदेश व तामिळनाडू


5. विष्णुशास्त्री पंडित यांनी कोणत्या वृत्तपत्रातून विधवांच्या दु:खांना वाचा फोडली?

A. संवाद कौमुदी
B. पुना ऑब्झर्व्हर
C. सुधारक
D. इंदुप्रकाश

Click for answer 
D. इंदुप्रकाश

6. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ?

A. महाबळेश्वर
B. कळसूबाई
C. अस्तंभा
D. साल्हेर

Click for answer 
B. कळसूबाई

7. खालीलपैकी कोणती बँक व्यक्तिगत खाते उघडण्यास प्रतिबंध करते?

A. स्टेट बँक ऑफ इंडिया
B. रिझर्व्ह बँक
C. युनियन बँक
D. कॅनरा बँक

Click for answer 
B. रिझर्व्ह बँक

8. महाराष्ट्रातील पहिल्या बंडखोर विचारवंत ज्यांनी 'स्त्री-पुरूष तुलना' नावाचा ग्रंथ लिहिला त्यांचे नाव काय?

A. रमाबाई रानडे
B. ताराबाई शिंदे
C. सावित्रीबाई फुले
D. पंडिता रमाबाई

Click for answer 
B. ताराबाई शिंदे

9. महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि प्रमुख नदी कोणती आहे?

A. नर्मदा
B. तापी
C. भीमा
D. गोदावरी

Click for answer 
D. गोदावरी

10. महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. ठाणे
B. औरंगाबाद
C. रायगड
D. सिंधुदुर्ग

Click for answer 
D. सिंधुदुर्ग
Read More »

प्रश्नमंजुषा -151


1. खडकवासला विधानसभा मतदार संघ हा कोणत्या लोकसभा मतदार संघाचा भाग आहे?

A. पुणे
B. बारामती
C. सातारा
D. मावळ

Click for answer 
B. बारामती

2.खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक तापमान कक्षा सर्वात जास्त आढळते ?

A. सातारा
B. आंबोली
C. अलिबाग
D. नागपूर

Click for answer 
D. नागपूर

3. गोपाळ हरी देशमुख हे कोणत्या टोपण नावाने प्रसिध्द होते ?

A. सुधारक
B. न्यायमूर्ती
C. लोकहितवादी
D. मवाळ नेते

Click for answer 
C. लोकहितवादी

4. राष्ट्रीय चित्रफीत संग्रहालयाचे मुख्य केंद्र खालीलपैकी कोठे आहे ?

A. मुंबई
B. औरंगाबाद
C. कोल्हापूर
D. पुणे

Click for answer 
D. पुणे

5. विश्वकोश या प्रसिध्द मराठी ज्ञानकोशाचे संपादन खालीलपैकी प्रामुख्याने कोणी केले ?

A. पां.वा.काणे
B. लक्ष्मणशास्त्री जोशी
C. भीमराव आंबेडकर
D. विजया वाड

Click for answer 
B. लक्ष्मणशास्त्री जोशी

6. तिसरे इंग्रज-मराठा युद्धातला मराठ्यांचा सेनापती कोण होता ?

A. त्रिंबकजी डेंगळे
B. गंगाधर शास्त्री
C. बापू गोखले
D. यशवंतराव होळकर

Click for answer 
C. बापू गोखले

7. महाराष्ट्राचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ?

A. चार
B. पाच
C. सहा
D. सात

Click for answer 
C. सहा

8. "औंढा नागनाथ" हे प्रसिध्द ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. बीड
B. परभणी
C. औरंगाबाद
D. हिंगोली

Click for answer 
D. हिंगोली

9. इ.स.1857 चा उठाव नागपूर येथे अयशस्वी का झाला ? त्याचे महत्त्वाचे कारण कोणते ?

A. नागपूर येथे राष्ट्रवादी भावनेचा अभाव होता.
B. ब्रिटिशांकडे आधुनिक शस्त्रास्त्रे होती.
C. नागपूरकरांमध्ये एकवाक्यता नव्हती.
D. नागपूरची राणी बाकाबाई हि ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिली.

Click for answer 
D. नागपूरची राणी बाकाबाई हि ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिली.


10. महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली ?

A. 1 मे 1961
B. 1 मे 1960
C. 15 ऑगस्ट 1960
D. 26 जानेवारी 1961

Click for answer 
B. 1 मे 1960
Read More »

प्रश्नमंजुषा -150


1. इंग्रजी शिक्षणाची सुरुवात भारतात कोणत्या वर्षी झाली ?

A. 1818
B. 1835
C. 1905
D. 1935

Click for answer 
B. 1835

2. __________ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र होय.

A. केसरी
B. काळ
C. दर्पण
D. दिग्दर्शन

Click for answer 
C. दर्पण

3. महाराष्ट्रात __________ ह्या जिल्ह्यात तुलनेने अधिक पाऊस पडतो.

A. सातारा
B. रायगड
C. सिंधुदुर्ग
D. गडचिरोली

Click for answer 
C. सिंधुदुर्ग


4. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा गुजरात राज्याला लागून आहेत.

I. नंदुरबार
II. धुळे
III. ठाणे
IV. नाशिक
V. मुंबई उपनगर
VI. मुंबई शहर

A. I,II,III,IV
B. I,II,IV
C. I,II,III
D. वरील सर्व

Click for answer 
A. I,II,III,IV

5. 'विकिपीडिया' ह्या ऑनलाईन नफ्यासाठी काम न करता सामुहिक सहकार्याने तयार झालेल्या जगातील सर्वात मोठ्या मोफत विश्वकोशाचा निर्माता कोण ?

A. मार्क झुकरबर्ग
B. बिल गेट्स
C. जिमी वेल्स
D. ज्युलीयन असांजे

Click for answer 
C. जिमी वेल्स

6. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?

A. मुंबई
B. दिल्ली
C. कोलकाता
D. आग्रा

Click for answer 
B. दिल्ली

7. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार कायद्यासमोर समानता बहाल करण्यात आली आहे ?

A. कलम 14
B. कलम 15
C. कलम 16
D. कलम 17

Click for answer 
A. कलम 14

8. टाटा सामाजिक विज्ञान संस्था ( Tata Institute of Social Sciences)कोठे आहे?

A. नागपूर
B. औरंगाबाद
C. पुणे
D. मुंबई

Click for answer 
D. मुंबई

9. लोकमान्य टिळकांनी कॉंग्रेसचे अध्यक्षपद किती वेळा भूषविले ?

A. एक
B. दोन
C. तीन
D. एकदाही नाही.

Click for answer 
D. एकदाही नाही.

10. कॉंग्रेस सर्वसमावेशक नाही ह्या कारणासाठी कोणत्या महान समाजसुधारकाने कॉंग्रेसला विरोध केला आणि तिने तळागाळातील लोकांना, शेतकरी वर्गाला समाविष्ट करावे असे आवाहन केले ?

A. महात्मा फुले
B. गोपाळ गणेश आगरकर
C. महर्षी कर्वे
D. न्यायमूर्ती रानडे

Click for answer 
A. महात्मा फुले
Read More »

प्रश्नमंजुषा -149


1. 'इंडिया अन्ड ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस ' हा ग्रंथ रिझर्व्ह बँकेच्या कोणत्या आजी/ माजी गव्हर्नर यांनी लिहिला आहे ?

A. अर्कल स्मिथ
B. सी.डी.देशमुख
C. वाय.व्ही.रेड्डी
D. डी.सुब्बाराव

Click for answer 
C. वाय.व्ही.रेड्डी

2. GATT-"जनरल अग्रीमेंट ऑन टेरिफ अन्ड ट्रेड (जकात आणि व्यापारविषयक सर्वसामान्य करार) " ची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
A. 1945
B. 1948
C. 1965
D. 1995

Click for answer 
B. 1948

3. GATT कराराची जागा घेणारी जागतिक व्यापार संघटना अर्थात WTO कोणत्या वर्षी अस्तित्वात आली ?

A. 1948
B. 1965
C. 1995
D. 1998

Click for answer 
C. 1995

4. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

A. नवी दिल्ली
B. वॉशिंग्टन डी.सी.
C. जिनिव्हा
D. दोहा

Click for answer 
C. जिनिव्हा

5. सध्या जागतिक व्यापार संघटनेच्या डायरेक्टर-जनरल पदावर ____________ हे विराजमान आहेत.

A. पास्कल लॅमी
B. क्रिस्टीन लागार्दे
C. डोमिनिक स्ट्रॉस - क्हान
D. बराक ओबामा

Click for answer 
A. पास्कल लॅमी

6. 1 जानेवारी 1995 ला स्थापन झालेली 'जागतिक व्यापार संघटना ' प्रामुख्याने ____________ ह्या उद्दिष्टाच्या साठी कार्यरत आहे.

A. नियंत्रित व्यापार
B. अनियंत्रित व्यापार
C. खुला व्यापार
D. देशांतर्गत व्यापार

Click for answer 
C. खुला व्यापार

7. 'गरिबी हटाव' ही घोषणा कोणत्या भारतीय पंतप्रधानाने केली होती ?

A. इंदिरा गांधी
B. मोरारजी देसाई
C. चौधरी चरण सिंग
D. राजीव गांधी

Click for answer 
A. इंदिरा गांधी


8. केंद्रीय सांख्यिकी संघटना ( Central Statistical Organisation )चे मुख्यालय _________ येथे आहे.

A. मुंबई
B. दिल्ली
C. कोलकाता
D. भुवनेश्वर

Click for answer 
B. दिल्ली

9. तिसरी पंचवार्षिक योजना कोणत्या काळात राबवली गेली ?

A. 1956-61
B. 1961-66
C. 1960-65
D. 1659-64

Click for answer 
B. 1961-66

10. चलनवाढीच्या काळात कर्जदार शेतकर्‍याला _______________.

A. नुकसान होईल
B. फायदा होईल
C. नुकसान किंवा फायदा काहीही होणार नाही.
D. अधिक कर्ज मिळेल .

Click for answer 
B. फायदा होईल
Read More »

प्रश्नमंजुषा -148


1. 'ब्र', 'छिन्न' ह्या दर्जेदार कलाकृती कोणत्या मराठी साहित्यिकेने लिहिल्या आहेत ?

A. दुर्गा भागवत
B. कविता महाजन
C. मेघा पेठे
D. मंगला नारळीकर

Click for answer 
B. कविता महाजन

2. 'बटाट्याची चाळ ' चे लेखक कोण ?
A. पु.ल.देशपांडे
B. आचार्य अत्रे
C. राजन गवस
D. राम गणेश गडकरी

Click for answer 
A. पु.ल.देशपांडे

3. मालगुजारी तलाव महाराष्ट्राच्या कोणत्या भागात पाहायला मिळतात ?

A. कोकण
B. खानदेश
C. मराठवाडा
D. विदर्भ

Click for answer 
D. विदर्भ

4. 'फड सिंचन ' हा पारंपारिक सिंचनाचा प्रकार कोणत्या जिल्ह्यात विशेषतः सापडतो ?

A. नाशिक
B. भंडारा
C. परभणी
D. सिंधुदुर्ग

Click for answer 
A. नाशिक

5. पैनगंगा आणि वर्धा यांचा संगम ________ ह्या जिल्ह्यात झाला आहे ?

A. वर्धा
B. यवतमाळ
C. चंद्रपूर
D. गडचिरोली

Click for answer 
B. यवतमाळ

6. महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता ?

A. कोल्हापूर
B. सिंधुदुर्ग
C. सोलापूर
D. गडचिरोली

Click for answer 
B. सिंधुदुर्ग

7. कारखानदारी हा ____________ श्रेणीचा व्यवसाय आहे.

A. प्राथमिक
B. द्वितीय
C. तृतीय
D. चतुर्थ

Click for answer 
B. द्वितीय

8. अष्टमीच्या दिवशी चंद्र __________ दिसतो.

A. अर्धा
B. पाव
C. पूर्ण
D. पाऊण

Click for answer 
A. अर्धा


9. पृथ्वीच्या परिवलनास ____________ म्हणतात.

A. दैनिक गती
B. वैश्विक गती
C. वार्षिक गती
D. यापैकी नाही

Click for answer 
A. दैनिक गती

10. खालीलपैकी कोणते वर्ष हे लीपवर्ष नव्हते ?

A. 2000
B. 1984
C. 1994
D. 2004

Click for answer 
C. 1994
Read More »