PSI Prelim Key 2011 -8

पी.एस.आय.पूर्वपरीक्षा -2011 संभाव्य उत्तरपत्रिका 
भाग -8
कृपया अंतिम उत्तरे आयोगाच्या वेबसाइटवर प्रकाशित झाल्यावर पडताळून पहा. आयोगाने जाहीर केलेलीच उत्तरे ग्राह्य माना .
1. प्रकाश संश्लेषण अभिक्रियेत सौर ऊर्जेचे रुपांतर ___________ उर्जेत होते.

A. यांत्रिक
B. रासायनिक
C. आण्विक
D. विदयुत

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. रासायनिक

2. अतिरिक्त मद्यपानाने _________ ची कमतरता जाणवते.

A. थायामिन
B. रेटीनॉल
C. निआसीन
D. अस्कोर्बिक आम्ल

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. थायामिन
अधिक माहिती पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
http://www.addictionsearch.com/treatment_articles/article/alcoholism-and-vitamin-deficiency-treatment-and-recovery_62.html

3. भारतीय कामगारांच्या लढ्यावर कोणत्या क्रांतीचा परिणाम झाला?

A. अमेरिकन राज्य क्रांती
B. फ्रेंच राज्य क्रांती
C. रशियन क्रांती
D. औद्योगिक क्रांती

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. रशियन क्रांती

4. शेतीचे व्यावसायीकरण म्हणजे ______________

A. नगदी पिके घेणे
B. शेतीत उद्योग उभा करणे
C. शेतीची खरेदी विक्री
D. परंपरागत पिके घेणे

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. नगदी पिके घेणे

5. कोणत्या भारतीयाने सर्वप्रथम 'ब्रिटिशांचे आर्थिक धोरण ' हे भारतातील गरिबीचे मूळ आहे हे प्रतिपादिले?

A. दादाभाई नौरोजी
B. व्ही.के.आर.व्ही.राव
C. रमेशचंद्र दत्त
D. विंगेट

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. दादाभाई नौरोजी

6. महात्मा फुलेंनी अस्पृश्यांकरिता वेताळ पेठेतील (पुणे)पहिली शाळा कधी सुरु केली?

A. इ.स. 1885
B. इ.स. 1852
C. इ.स. 1886
D. इ.स. 1863

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. इ.स. 1852

7. मुस्लिमांमधील बहुपत्‍नीत्व आणि पडदा पध्दतीला कोणी विरोध केला?

A. सर सैय्यद अहमद खान
B. बॅरीस्टर जीना
C. खान अब्दुल गफार खान
D. रहेमत अली

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. सर सैय्यद अहमद खान

8. असेटिक आम्लाच्या विरल (dilute) द्रावणाला _________ म्हणतात.

A. इथयालीन
B. पॅराफीन
C. बेन्झिन
D. विनेगर

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. विनेगर

9. राज्यघटनेच्या _________ भागात मुलभूत अधिकारांचा समावेश आहे.

A. भाग 1
B. भाग 2
C. भाग 3
D. भाग 4

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. भाग 3

10. भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आली ?

A. 26 नोव्हेंबर 1949
B. 26 जानेवारी 1949
C. 26 जानेवारी 1949
D. 10 नोव्हेंबर 1949

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. 26 नोव्हेंबर 1949
टीप: मी इंग्रजी प्रश्नांचा अनुवाद केलेला असल्यामुळे , मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि येथील प्रश्न यांच्या वाक्य रचनेत बदल असू शकतो.
Read More »

PSI Prelim Key 2011 -7

पी.एस.आय.पूर्वपरीक्षा -2011 संभाव्य उत्तरपत्रिका 
भाग -7
कृपया अंतिम उत्तरे आयोगाच्या वेबसाइटवर प्रकाशित झाल्यावर पडताळून पहा. आयोगाने जाहीर केलेलीच उत्तरे ग्राह्य माना .
1. 'जलमणी' योजना कशाशी संदर्भित आहे?

A. शहरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याबाबत
B. विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याबाबत
C. पावसाच्या पाण्याचे संवर्धन
D. पाण्याचा काळजीपूर्वक वापर

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याबाबत
भारत निर्माण योजनेंतर्गत ही योजना सुरु करण्यात आली आहे.
http://pib.nic.in/release/rel_print_page1.asp?relid=57339 ह्या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे.

2. भारताने 'अकुला' ही पाणबुडी कोणाकडून विकत घेतली?

A. इंग्लंड
B. फ्रान्स
C. अमेरिका
D. रशिया

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. रशिया


3. केम्ब्रिज विद्यापीठाने ह्या भारतीय पंतप्रधानांच्या नावाने शिष्यवृत्ती सुरु केली आहे?

A. इंदिरा गांधी
B. जवाहरलाल नेहरू
C. मनमोहनसिंग
D. पी.व्ही.नरसिंहराव

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. मनमोहनसिंग
मनमोहनसिंग हे ह्या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी. त्यांच्या कारकीर्दीचा त्यांच्या विद्यापीठालाही अभिमान वाटला.
पुढील संकेस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. http://www.admin.cam.ac.uk/news/dp/2009010903

4. यमुना नदी गंगेस कोठे मिळते?

A. हरिद्वार
B. अलाहाबाद
C. आग्रा
D. मीरत

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. अलाहाबाद
येथील 'त्रिवेणी संगमावर ' ती गंगेस मिळते .

5. नानावटी आयोग कोणत्या कारणासाठी घटित करण्यात आला होता?

A. मुंबई दंगली
B. अयोध्या
C. गुजरात मधील गोध्रा प्रकरण
D. लोकसभेवरील हल्ला

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. गुजरात मधील गोध्रा प्रकरण

6. खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च-न्यायालयाचे खंडपीठ नाही?

A. औरंगाबाद
B. नागपूर
C. पणजी
D. नवी मुंबई

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. नवी मुंबई

7. 'शांतता ! कोर्ट चालू आहे ' हे नाटक कोणी लिहिले?

A. विजय तेंडूलकर
B. वसंत बापट
C. संतोष पवार
D. वसंत कानेटकर

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. विजय तेंडूलकर

8. _________ हा केंद्र सरकार आणि राज्य शासन यांतील दुवा असतो.

A. मुख्यमंत्री
B. पंतप्रधान
C. राष्ट्रपती
D. राज्यपाल

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. राज्यपाल


9. राज्यपाल हा __________ ह्यांची मर्जी असे पर्यंत पदावर असू शकतो.


A. राष्ट्रपती
B. पंतप्रधान
C. संसद
D. सर्वोच्च न्यायालय

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. राष्ट्रपती

10. _________ ही देशातील सर्वात मोठी कायदा बनवणारी यंत्रणा आहे.

A. राज्य विधानसभा
B. केंद्रीय कार्यकारी मंडळ
C. संसद
D. न्यायपालिका

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. संसद
टीप: मी इंग्रजी प्रश्नांचा अनुवाद केलेला असल्यामुळे , मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि येथील प्रश्न यांच्या वाक्य रचनेत बदल असू शकतो.
Read More »

PSI Prelim Key 2011 -6

पी.एस.आय.पूर्वपरीक्षा -2011 संभाव्य उत्तरपत्रिका 
भाग -2
कृपया अंतिम उत्तरे आयोगाच्या वेबसाइटवर प्रकाशित झाल्यावर पडताळून पहा. आयोगाने जाहीर केलेलीच उत्तरे ग्राह्य माना .
1.' तृतीय रत्‍न' हे मराठी नाटक कोणी लिहिले?

A. महर्षी कर्वे
B. महात्मा फुले
C. दादोबा पांडुरंग
D. विष्णुशास्त्री पंडित

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. महात्मा फुले

2. 'भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ' मुंबई येथील पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

A. ए. ओ. ह्यूम
B. सुरेंद्रनाथ बॅनर्जी
C. व्योमेशचंद्र बॅनर्जी
D. स्वातंत्र्यवीर सावरकर

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. व्योमेशचंद्र बॅनर्जी

3. कोणत्या कायद्याने अस्पृश्यता संपुष्टात आली?

A. 1935 चा कायदा
B. 1947 चा कायदा
C. 1951 चा कायदा
D. 1955 चा कायदा

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. 1955 चा कायदा

4. ब्रिटीश शासनाने मदनलाल धिंग्रा ह्यांना कोणत्या वर्षी फाशी दिले?

A. 1860
B. 1891
C. 1900
D. 1909

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. 1909
2009 साली त्यांच्या हौतात्म्याला 100 वर्षे पूर्ण झाली.

5. पुढीलपैकी कोणत्या पद्धतीमध्ये शासकीय अधिकारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून शेतसारा घेत?

A. कायमधारा
B. रयतवारी
C. महालवारी
D. वायदा

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. रयतवारी

6. कर्वेंनी लोकसेवा करावी म्हणून ________ ही संस्था स्थापन केली .

A. ग्राममंडळ
B. महिला विद्यापीठ
C. ग्रामरक्षा
D. निष्काम कर्ममठ

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. निष्काम कर्ममठ

7. हिराकुड योजना ______ ह्या पंचवार्षिक योजनेत अस्तित्वात आली.

A. पहिल्या
B. दुसऱ्या
C. तिसऱ्या
D. चौथ्या

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. पहिल्या

8. आगरकर हे पंडिता रमाबाई यांच्या __________ ह्या संस्थेचे शुभचिंतक होते.

A. महिलाश्रम
B. स्त्री सुधारक केंद्र
C. स्त्री आधार केंद्र
D. शारदा सदन

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. शारदा सदन

9. राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्यांकरिता कोणते वसतीगृह सुरु केले?

A. व्हिक्टोरिया होस्टेल
B. मिस क्लार्क होस्टेल
C. एस. एम.क्रेझर होस्टेल
D. श्री फ्हीतझिराल होस्टेल

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. मिस क्लार्क होस्टेल

10. पहिल्या पंचवार्षिक योजनेत भारतातील पहिला खत कारखाना ________ येथे उभारला गेला.

A. भटिंडा
B. सिंद्री
C. कोची
D. हाजिरा

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. सिंद्री
टीप: मी इंग्रजी प्रश्नांचा अनुवाद केलेला असल्यामुळे , मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि येथील प्रश्न यांच्या वाक्य रचनेत बदल असू शकतो.
Read More »

PSI Prelim Key 2011 -5

पी.एस.आय.पूर्वपरीक्षा -2011 संभाव्य उत्तरपत्रिका 
भाग -5
कृपया अंतिम उत्तरे आयोगाच्या वेबसाइटवर प्रकाशित झाल्यावर पडताळून पहा. आयोगाने जाहीर केलेलीच उत्तरे ग्राह्य माना .
1. जर 3756x25=93900, तर 3.756x25=-----


A. 9.3900
B. 93.900
C. 939
D. 93900

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. 93.900

2. दिलेल्या तीन संख्यांपैकी पहिली दुसरीच्या दुप्पट तर तिसरीच्या तिप्पट आहे, त्यांची सरासरी 44 आहे. पहिली संख्या कितीअसावी ?

A. 72
B. 69
C. 70
D. 62

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. 72

3. जर 10x+24=29x+5, तर x=?

A. -1
B. +1
C. +2
D. +3

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. +1

4. खालीलपैकी 5 ने निशेष: भाग जाणारी संख्या कोणती?

A. 3752
B. 3725
C. 2537
D. 3876

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. 3725

5. 1, 5, 11, 19, -- , 41

A. 29
B. 27
C. 30
D. 31

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. 29

6. एका संख्येचे 25 % जर 0.25 असतील तर ती संख्या कोणती?

A. 12.5
B. 1.25
C. 1
D. 1.5

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. 1

7. जर एका वर्गातील विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज 2795 आणि सरासरी 65 असेल , तर वर्गातील विद्यार्थी संख्या किती?

A. 45
B. 55
C. 43
D. 40

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. 43

8. 7663 ह्या संख्येतील 6 अंकाच्या किमतीतील फरक किती?

A. 660
B. 540
C. 630
D. 450

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. 540

9. पाण्याची सर्वाधिक घनता _________ ला असते.

A. 4 डिग्री सेल्सियस
B. 25 डिग्री सेल्सियस
C. 0 डिग्री सेल्सियस
D. 73 डिग्री सेल्सियस

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. 4 डिग्री सेल्सियस

10. __________ यांनी लंडन येथे 'इंडिया हाउस' ची स्थापना केली .

A. लाल हरदयाळ
B. श्यामजी कृष्णा वर्मा
C. स्वातंत्र्यवीर सावरकर
D. सुभाषचंद्र बोस

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. श्यामजी कृष्णा वर्मा
टीप: मी इंग्रजी प्रश्नांचा अनुवाद केलेला असल्यामुळे , मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि येथील प्रश्न यांच्या वाक्य रचनेत बदल असू शकतो.
Read More »

PSI Prelim Key 2011 -4

पी.एस.आय.पूर्वपरीक्षा -2011 संभाव्य उत्तरपत्रिका 
भाग -4
कृपया अंतिम उत्तरे आयोगाच्या वेबसाइटवर प्रकाशित झाल्यावर पडताळून पहा. आयोगाने जाहीर केलेलीच उत्तरे ग्राह्य माना .
1. महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानास कोणत्या संतांचे नाव देण्यात आले आले?

A. संत तुकाराम महाराज
B. संत गाडगे महाराज
C. संत तुकडोजी महाराज
D. संत नामदेव महाराज

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. संत गाडगे महाराज

2. लोकसभा आणि राज्यसभा मिळून महाराष्ट्रातून एकूण _____ इतके सदस्य निवडले जातात.

A. 288
B. 19
C. 48
D. 67

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. 67
लोकसभेवर 48 तर राज्यसभेवर 19 सदस्य महाराष्ट्रातून निवडले जातात.

3. भारतीय न्याय व्यवस्थेचे ______ हे वैशिष्ठ्य आहे.

A. एक आणि एकात्मिक न्यायव्यवस्था
B. कायदेमंडळाचे न्यायव्यवस्थेवर नियंत्रण
C. सरकारचे न्यायव्यवस्थेवर नियंत्रण
D. वरील सर्व

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. एक आणि एकात्मिक न्यायव्यवस्था

4. जम्मू काश्मीरमधील सलाल जलविद्युत प्रकल्प __________नदीवर आहे.

A. रावी
B. बियास
C. चिनाब
D. व्यास

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. चिनाब

5. 'डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस' हे पुस्तक कोणी लिहिले?

A. लोकमान्य टिळक
B. चिपळूणकर
C. आगरकर
D. डॉ.आंबेडकर

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. आगरकर

6. कोल्हापुरात मोठ्या संख्येने मोफत शाळा कोणी चालू केल्या?

A. कर्मवीर भाऊराव पाटील
B. शाहू महाराज
C. जी.के.गोखले
D. डॉ. आंबेडकर

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. शाहू महाराज

7. टिळकांनी 'गीतारहस्य 'हा ग्रंथ ___________ येथील तुरुंगात लिहिला.

A. अंदमान
B. येरवडा
C. मंडाले
D. अहमदनगर

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. मंडाले

8. आगरकर हे ___________ चे संपादक होते.

A. शतपत्रे
B. हरिजन
C. सुधारक
D. मराठा

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. सुधारक

9. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुध्द आवाज उठविला?

A. महिलांची गुलामगिरी
B. धार्मिक गुलामगिरी
C. सामाजिक गुलामगिरी
D. शेतकऱ्यांची गुलामगिरी

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. धार्मिक गुलामगिरी

10. महर्षी कर्वे पुण्याच्या ________महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते.

A. फर्ग्युसन
B. डेक्कन
C. सर् परशुरामभाऊ
D. वाडिया

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. फर्ग्युसन
टीप: मी इंग्रजी प्रश्नांचा अनुवाद केलेला असल्यामुळे , मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि येथील प्रश्न यांच्या वाक्य रचनेत बदल असू शकतो.
Read More »

PSI Prelim Key 2011 -3

पी.एस.आय.पूर्वपरीक्षा -2011 संभाव्य उत्तरपत्रिका 
भाग -3
कृपया अंतिम उत्तरे आयोगाच्या वेबसाइटवर प्रकाशित झाल्यावर पडताळून पहा. आयोगाने जाहीर केलेलीच उत्तरे ग्राह्य माना .

1. 8 मार्च हा दिवस ____________ म्हणून पाळला जातो.

A. आंतरराष्ट्रीय महिला दिवस
B. आंतरराष्ट्रीय एड्स दिवस
C. मानवी हक्क दिन
D. जागतिक श्रमिक दिन

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. आंतरराष्ट्रीय महिला दिवस

2. गुज्जरांना नोकरीत 5 % आरक्षण ________ ह्या राज्यात होते.

A. गुजरात
B. राजस्थान
C. महाराष्ट्र
D. बिहार

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. राजस्थान

3. अभिनव बिंद्राने ऑलिम्पिक मधील सुवर्णपदक ___________ ह्या खेळत पटकाविले होते.

A. ऐअर रायफल नेमबाजी
B. कुस्ती
C. जिमनॅस्टिक्स
D. लांब उडी

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. ऐअर रायफल नेमबाजी

4. 'स्लमडॉग मिलेनियर ' ह्या चित्रपटाने किती ऑस्कर पारितोषिके पटकाविली?

A. सात
B. दहा
C. आठ
D. नऊ

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. आठ

5. कोणाच्या जन्मदिनी शिक्षकदिन मनवला जातो?

A. जवाहरलाल नेहरू
B. एस.राधाकृष्णन
C. राजेंद्र प्रसाद
D. इंदिरा गांधी

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. एस.राधाकृष्णन

6. 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हे आहेत?

A. जॉर्ज फर्नांडिस
B. आर.आर.पाटील
C. लालूप्रसाद यादव
D. शरद पवार

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. शरद पवार

7. टाटांनी तयार केलेल्या छोटया कारला ह्या नावाने ओळखले जाते?

A. नॅनो
B. अल्टो
C. सुमो
D. प्रिमो

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. नॅनो

8. 'SEZ' चे पूर्णरूप __________ असे आहे.

A. Small Economic zone
B. Social Economic zone
C. Special Economic zone
D. service Economic zone

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. Special Economic zone

9. प्रसिध्द चित्रकार एम.एफ.हुसेन यांनी __________ ह्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले .

A. लिबिया
B. ओमान
C. कुवेत
D. कतार

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. कतार

10. अमेरिकेच्या प्रसिद्ध 'ग्रॅमी 'पुरस्कारांचे विजेते हे आहेत.

A. ए. आर.रहेमान
B. झाकीर हुसेन
C. नौशाद
D. जतीन -ललित

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. ए. आर.रहेमान
टीप: मी इंग्रजी प्रश्नांचा अनुवाद केलेला असल्यामुळे , मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि येथील प्रश्न यांच्या वाक्य रचनेत बदल असू शकतो.
Read More »

PSI Prelim Key 2011 -2

पी.एस.आय.पूर्वपरीक्षा -2011 संभाव्य उत्तरपत्रिका 
भाग -2
कृपया अंतिम उत्तरे आयोगाच्या वेबसाइटवर प्रकाशित झाल्यावर पडताळून पहा. आयोगाने जाहीर केलेलीच उत्तरे ग्राह्य माना .

1. _______ हे ठिकाण 'महाराष्ट्राचे चेरापुंजी ' मानले जाते.

A. माथेरान
B. आंबोली
C. रामटेक
D. लोणावळा

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. आंबोली

2. खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे?

A. पुणे
B. नागपूर
C. ठाणे
D. कोल्हापूर

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. ठाणे
2011 च्या जनगणनेच्या हंगामी आकड्यांनुसार ठाणे हा भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे.

3. अजिंठा-वेरूळ लेण्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात वसलेल्या आहेत?

A. पुणे
B. अहमदनगर
C. औरंगाबाद
D. लातूर

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. औरंगाबाद

4. खालीलपैकी कोणत्या ठीकाणी ऊस संशोधन केंद्र सुरु करण्यात आले आहे ?

A. लोणंद
B. पाडेगाव
C. शेखामिरेवाडी
D. कागल

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. पाडेगाव

5. खालीलपैकी कोणती वसाहत महानगरपालिका नाही?

A. नागपूर
B. भिवंडी
C. पुणे
D. बुलढाणा

उत्तरासाठी क्लिक  करा 

D. बुलढाणा
पुणे येथे पुणे मनपा आहे तर नागपूर येथे नागपूर मनपा आहे. भिवंडी हे भिवंडी-निजामपूर मनपाचा हिस्सा आहे.

6. __________ हे भारतच्या नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते.

A. जवाहरलाल नेहरू
B. राजेंद्रप्रसाद
C. सी.डी.देशमुख
D. के.सी.पंत

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. जवाहरलाल नेहरू

7. अकराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी ___________ हा आहे.

A. 2008-2013
B. 2009-2014
C. 2007-2012
D. 2010-2015

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. 2007-2012

8. गोसिखुर्द धरण हे _________ ह्या जिल्ह्यात आहे.

A. बीड
B. जालना
C. चंद्रपूर
D. गडचिरोली

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. चंद्रपूर

9. ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या _________ इतकी असते.

A. 7 ते 10
B. 7 ते 17
C. 10 ते 15
D. 15 ते 20

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. 7 ते 17

10. 'टिंग्या' ची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचे आडनाव काय ?

A. ओंबळे
B. वसपुते
C. गोयेकर
D. बोयेकर

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. गोयेकर
राष्ट्रपती पारितोषिक विजेता - शरद गोयेकर

टीप: मी इंग्रजी प्रश्नांचा अनुवाद केलेला असल्यामुळे , मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि येथील प्रश्न यांच्या वाक्य रचनेत बदल असू शकतो.
Read More »

PSI Prelim Key 2011 -1

पी.एस.आय.पूर्वपरीक्षा -2011 संभाव्य उत्तरपत्रिका 
भाग -१
कृपया अंतिम उत्तरे आयोगाच्या वेबसाइटवर प्रकाशित झाल्यावर पडताळून पहा. आयोगाने जाहीर केलेलीच उत्तरे ग्राह्य माना .

1. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात ________ क्रमांक लागतो.

A. तिसरा
B. पाचवा
C. सातवा
D. नववा

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. सातवा

2. झस्कर , लडाख , काराकोरम ह्या रांगा ________ हिमालयात आहेत.

A. कुमाऊ
B. काश्मीर
C. पूर्व
D. मध्य

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. काश्मीर

3. __________ हा भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे.

A. जोग
B. नायगारा
C. कपिलधारा
D. शिवसमुद्र

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. जोग

4. भारतात पशु गणना दर _______ वर्षांनी केली जाते.

A. दहा
B. बारा
C. सात
D. पाच

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. पाच

5. तंबाखूच्या उत्पादनात भारतात _______ हे राज्य आघाडीवर आहे.

A. आंध्रप्रदेश
B. महाराष्ट्र
C. कर्नाटक
D. गुजरात

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. आंध्रप्रदेश
http://dacnet.nic.in/eands/latest_2006.htm
ह्या केंद्राच्या वेबसाईटवर टेबल क्रमांक 4.24(b) पहा

6. सोलापूर -विजापूर -हुबळी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ____________ आहे.

A. नऊ
B. तेरा
C. सात
D. आठ

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. नऊ

7. __________ ह्या नदीला बिहारचे अश्रू म्हणतात

A. कोसी
B. दामोदर
C. गंडक
D. घागरा

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. कोसी

8. महाराष्ट्रातील प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प _________ ह्या जिल्ह्यात आहे.

A. रत्नागिरी
B. सिंधुदुर्ग
C. कोल्हापूर
D. सोलापूर

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. रत्नागिरी

9. कोकण रेल्वे मार्गावरील ___________ हा सर्वात मोठा बोगदा आहे.

A. आडाव्क़लि
B. कुरबुडे
C. दिवा
D. चिपळूण

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. कुरबुडे

10. राज्यात चामड्याच्या वस्तूंची येथे मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते?

A. सिंधुदुर्ग
B. रत्नागिरी
C. सातारा
D. कोल्हापूर

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. कोल्हापूर

टीप: मी इंग्रजी प्रश्नांचा अनुवाद केलेला असल्यामुळे , मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि येथील प्रश्न यांच्या वाक्य रचनेत बदल असू शकतो.
Read More »

प्रश्नमंजुषा -49

महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2010-11  वर आधारित प्रश्न

1.  सन 2009-10 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या उत्पन्नात कृषी  आणि संलग्न क्षेत्रांचा हिस्सा _______ टक्के होता.

A.  10.5
B.  28.9
C.  60.6
D.  75.0

उत्तरासाठी क्लिक  करा 
A.  10.5

2. वर्ष _________ हे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते.

A. 2009
B. 2010
C. 2008
D. 2007

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. 2010

3. राज्यातील ________ लाख हेक्टर जमीन लागवडीखाली आहे तर ________ लाख हेक्टर जमीन वनाखाली आहे.

A. 200,50
B. 224.5 , 52.1
C. 350,150
D. 240.8,20.5

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. 224.5 , 52.1

4. 2001 च्या जनगणनेनुसार देशाची साक्षरता _________ टक्के होती तर राज्याची ________ टक्के होती.

A. 65, 76.9
B. 54,65.5
C. 75,89.5
D. 76.9,65

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. 65, 76.9


5. राज्यात _________ प्रशासकीय विभाग आहेत.

A. 4
B. 5
C. 6
D. 7

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. 6

6. पवन, सौर, बायोगॅस ,जैविक, समुद्र-लाटा आणि भू औष्णिक हे अक्षय ऊर्जेचे स्त्रोत असून ह्यांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने _________ ह्या संस्थेची 'अंमलबजावणी करणारी निर्देशित संस्था 'म्हणून प्रमाणित केले आहे.

A. महाऊर्जा (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण )
B. महाजेन्को (महाराष्ट्र राज्य ऊर्जा उत्पादन कंपनी लि.)
C. महाट्रान्सको (महाराष्ट्र राज्य ऊर्जा वहन कंपनी लि.)
D. महाडिस्कॉम (महाराष्ट्र राज्य ऊर्जा वितरण कंपनी लि.)

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. महाऊर्जा (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण )

7.    6  ते 14 वयोगटातील मुलांना जवळच्या शाळेत मोफत व सक्तीचे शिक्षण प्राप्त करून देणारा ' मोफत व सक्तीच्या  शिक्षणाचा अधिकार , २००९ ' राज्यात ____________ पासून लागू झाला.

A. 1 एप्रिल 2009
B. 1 एप्रिल 2010
C. 1 एप्रिल 2011
D. 1 जानेवारी  2011

उत्तरासाठी क्लिक  करा 
1 एप्रिल 2010

8. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानात ___________ या पिकांचा समावेश आहे.

A. तांदूळ ,गहू आणि ज्वारी
B. गहू, बाजरी आणि ज्वारी
C. तांदूळ ,ज्वारी आणि कडधान्ये
D. तांदूळ ,गहू आणि कडधान्ये

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. तांदूळ ,गहू आणि कडधान्ये

9. 2008-09 साली राज्याच्या सिंचनाखालील एकूण क्षेत्राचे पिकांखालील एकूण क्षेत्राशी प्रमाण _________ होते.

A. 11.7 %
B. 17.7 %
C. 37.7 %
D. 87.7 %

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. 17.7 %

10. तुषार आणि ठिबक सिंचनामुळे पीक उत्पादनात पिकांच्या प्रकारानुसार _____________टक्के इतकी वाढ होते.

A. 10 ते 49
B. 47 ते 78
C. 12 ते 31
D. 15 ते 55

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. 12 ते 31


Read More »

प्रश्नमंजुषा -50

प्रश्नमंजुषा -50

1.  विशेषतः युवा वर्गाला आकर्षित करणारे 'फेसबुक '  हे संकेतस्थळ ( website)  ह्याने निर्माण केली?

A. ज्युलीयन असांज
B. मार्क झुकरबर्ग
C. जिमी वेल्स
D.  डिक कोस्पलो

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. मार्क झुकरबर्ग

2. निकोलस सारकोझी हे कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत?

A. फ्रांस
B. जर्मनी
C. इंग्लंड
D. द.आफ्रिका

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. फ्रांस

3. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी 2012-13 हे वर्ष भारत _________ वर्ष म्हणून साजरे करेल असेल घोषित केले आहे.

A. पर्यटन वर्ष
B. बालिका वर्ष
C. विज्ञान वर्ष
D. तंत्रज्ञान वर्ष

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. विज्ञान वर्ष


4. न्या. ब्रिजेश कुमारांच्या अध्यक्षतेखालील लवादाने दिलेल्या निर्णयामुळे _________ राज्याला कृष्णा नदीचे सर्वाधिक पाणी मिळेल.

A. महाराष्ट्र
B. कर्नाटक
C. आंध्रप्रदेश
D. तामिळनाडू

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. आंध्रप्रदेश

5. आशियान ( ASEAN ) राष्ट्रांची 18 वी शिखर परिषद 2011 मध्ये ______येथे पार पडली.

A. लाओस
B. मनिला
C. जकार्ता
D. दिल्ली

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. जकार्ता

6. आयगेट ह्या परदेशी कंपनीने नुकतीच _________ ही भारतीय कंपनी ताब्यात घेतली.

A. TCS
B. इन्फोसिस
C. विप्रो
D. पटनी कॉम्प्युटर्स

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. पटनी कॉम्प्युटर्स

7. संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे 2011 हे वर्ष ____________म्हणून साजरे करण्यात येत आहे.

A. आंतरराष्ट्रीय पदार्थविज्ञान वर्ष
B. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र वर्ष
C. आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र वर्ष
D. आंतरराष्ट्रीय जैवअभियांत्रिकी वर्ष

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र वर्ष

8. 2010 मध्ये महाराष्ट्रातील विदर्भ , मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळांना__________वर्षांची मुदतवाढ देण्यात आली.

A. चार
B. पाच
C. दहा
D. पंधरा

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. पाच

9. 'हॅरिपॉटर' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण?

A. जे.के. रोलिंग
B. अरविंद अडिगा
C. अगाथा ख्रिस्ती
D. व्ही.एस.नायपॉल

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. जे.के. रोलिंग

10. गर्भवती महिलांसाठी प्रसूतीपूर्व व नंतर आर्थिक सहायता देण्यासाठी केंद्राने _________ही योजना सुरू केली.

A. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
B. कस्तुरबा गांधी मातृत्व सहयोग योजना.
C. बा बापू योजना
D. संजय गांधी निराधार योजना

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना

Read More »

प्रश्नमंजुषा -48

प्रश्नमंजुषा  -48

1.खालीलपैकी कोणता दिवस हा 'रंगभूमी ' दिवस म्हणून साजरा केला जातो?

A. 5  नोव्हेंबर
B. 1 डिसेंबर
C. 3 जानेवारी
D. 10 ऑक्टोबर

Click for answer 
A. 5  नोव्हेंबर

2. सध्या पंधराव्या लोकसभेतील विरोधीपक्षनेते __________म्हणून यांचा उल्लेख करावा लागेल.

A. अरुण जेटली
B. गोपीनाथ मुंढे
C. सुषमा स्वराज
D. लालकृष्ण अडवाणी

Click for answer 
C. सुषमा स्वराज


3. आशियातील पहिले सहकार विद्यापीठ ________ येथे होणार आहे.

A. मुंबई
B. हैदराबाद
C. पुणे
D. दिल्ली

Click for answer 
C. पुणे

4. सध्या महाराष्ट्रात ______ विधानसभा अस्तित्वात आहे.

A. तेरावी
B. अकरावी
C. बारावी
D. चौदावी

Click for answer 
C. बारावी

5. 2010 मध्ये बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या _________ ह्या वादळाचा आंध्रप्रदेशसह देशाच्या काही किनार्‍यावरील भागास फटका बसला.

A. फियान
B. लैला
C. झेन्थीया
D. यापैकी नाही

Click for answer 
B. लैला

6. 104 वी घटना दुरुस्तीविधेयक _________ शी संबंधित आहे.

A. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वरून 65 करणे.
B. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय 65 वरून 62 करणे.
C. महिलांना कायदेमंडळात 1/3 आरक्षण
D. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 1/2 आरक्षण

Click for answer 
A. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वरून 65 करणे.

7. 2011 मध्ये 'राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स संमेलन' ________ येथे पार पडले.

A. पणजी
B. नवी दिल्ली
C. मुंबई
D. औरंगाबाद

Click for answer 
D. औरंगाबाद

8. झारखंड मध्ये पार पडलेल्या 34 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये __________ने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.

A. महाराष्ट्र
B. सेना दल
C. भारतीय रेल्वे
D. ओ.एन.जी.सी.

Click for answer 
B. सेना दल

9. पहिल्या युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा कोठे पार पडल्या?

A. नवी दिल्ली
B. बीजिंग
C. सिंगापूर
D. लंडन

Click for answer 
C. सिंगापूर

10. __________ हे महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री आहेत.

A. आर.आर.पाटील
B. सतेज पाटील
C. रणजित कांबळे
D. सचिन अहिर

Click for answer 
B. सतेज पाटील

Read More »

प्रश्नमंजुषा -47

 प्रश्नमंजुषा -47
1.' एक ' हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट ?

A. 105
B.  760
C.  670
D.  746

Click for answer 
D.  746

2. साधे रूप द्या:

A.
B.
C.
D.

उत्तरासाठी क्लिक  करा 

A.

घातांका च्या नियमानुसार

लाल रंगाच्या चौकटीने 'मार्क' केलेल्या फॉर्मूल्याचा वापर करून :
प्रथम दिलेल्या किमतींचे घात सारखे करू यात.पहिल्या अंकाचा घातांक तर दुसऱ्याचा घातांक आहे. फक्त घातांकांचा ल.सा .वी. होईल. तेव्हा ह्या { }किमतीसाठी दिलेल्या किमतीवर क्रिया करू यात.

तर

आता 'मार्क 'केलेले सूत्र आपण असेही लिहू शकतो   
याचा वापर करून,

3. गतीमान वस्तूची गती चारपट केली, तर त्या वस्तूची गतीज ऊर्जा किती होईल?

A. 4 पट
B. 16 पट
C. 8 पट
D. 2 पट

Click for answer 
B. 16 पट
गतीज ऊर्जेचे सूत्र आहे
म्हणजेच वस्तुमान ( m ) कायम ठेवले तर हे सूत्र बनेल
त्यावरून आपण लिहू शकतो
म्हणजेच
नवीन वेग जुन्या (पहिल्या) वेगाच्या 4 पट असेल तर

ह्यावरून नवीन गतीज ऊर्जा 16 पट होईल.

4. (2,8,5 )  हे कोणत्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरुपण आहे.

A. कार्बन
B. सिलिकॉन
C. फॉस्फरस
D. मॅग्नेशियम

Click for answer 
C. फॉस्फरस
हे सुद्धा लक्षात ठेवा.
सोडियम Na=(2,8,1)
मॅग्नेशियम Mg= (2,8,2)
अल्युमिनियम Al=(2,8,3)
सिलिकॉन Si=(2,8,4)
फॉस्फरस P=(2,8,5)
सल्फर S=(2,8,6)
क्लोरीन Cl=(2,8,7)
ऑरगॉन Ar=(2,8,8)
5. 1 ज्यूल = _________

A. अर्ग
B. डाईन
C. वॅट
D. 746 वॅट

Click for answer 
A. अर्ग


म्हणून 1 ज्यूल = 1 न्युटन 1 मीटर
= डाईन सें.मी.
= अर्ग

6. एका पदार्थाचे वस्तुमान  5 kg  आहे. त्याच्यात   त्वरण निर्माण करण्यासाठी किती बल लागेल ?

A.  0.4 N
B.  1 N
C.  2.5 N
D.  10 N

Click for answer 
D. 10 N
न्यूटनच्या गतिविषयक दुसर्‍या नियमानुसार वस्तूवरील बल=वस्तुमान * (त्वरण )
म्हणजेच
दिलेल्या माहितीवरून m = 5 kg, तर a =
म्हणून N

F= 10 N

7.  एस. आय. पद्धतीत 'ज्यूल ' हे _______ याचे एकक आहे.

A. ऊर्जा
B.  बल
C.  वेग
D.  शक्ती

Click for answer 
A. ऊर्जा

8. नाभीय अंतर 25 सें.मी.असलेल्या बहिर्वक्र भिंगाचा भिंगांक किती?

A. 4 डायॉप्टर
B. -4 डायॉप्टर
C. डायॉप्टर
D. डायॉप्टर

Click for answer 
A. 4 डायॉप्टर
लक्षात ठेवा : बहिर्वक्र भिंगाचा भिंगांक धन तर अंतर्वक्र भिंगाचा भिंगांक ऋण असतो.
P (डायॉप्टरमध्ये )= (मीटरमध्ये )
दिलेल्या उदाहरणात प्रथम सें.मी. चे मीटर करू यात.
25 सें.मी.= 0.25 मी.

म्हणून भिंगांक = 1/0.25 = 4 D

9. आम्ल पर्जन्य पडण्यासाठी नायट्रोजनची ऑक्साईडस् आणि _______________ हे जबाबदार असतात.

A. कार्बन डाय ऑक्साईड
B. सल्फर डाय ऑक्साईड
C. ऑक्सिजन
D. हायड्रोजन

Click for answer 
B. सल्फर डाय ऑक्साईड

10. 1 मिलीमीटर =_________ मायक्रोमीटर

A. 10
B. 100
C. 1000
D. 10000

Click for answer 
C. 1000


Read More »

प्रश्नमंजुषा -46

प्रश्नमंजुषा -46


1. भारताची सर्वाधिक सीमा (international boundry)__________ या देशाबरोबर आहे.

A.  चीन
B.  पाकिस्तान
C.  नेपाळ
D. बांगलादेश

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. बांगलादेश


2. ____________ ही अर्थशास्त्रात नोबेल मिळविणारी पहिली महिला ठरली.

A. मेरी क़्युरी
B. एलिनोर ऑस्ट्रॉम
C. कॅथी मेडी
D. ज्युडी संवेदा

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. एलिनोर ऑस्ट्रॉम

3. खालीलपैकी एका घटनादुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेत आठव्या परीशिष्टात समाविष्ट भाषांत 4 भाषांची भर पडली.

A. 42 वी घटनादुरुस्ती
B. 61 वी घटनादुरुस्ती
C. 86 वी घटनादुरुस्ती
D. 92 वी घटनादुरुस्ती

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. 92 वी घटनादुरुस्ती

4. भारतातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर _____________ हे आहे.

A. चिल्का
B. लोणार
C. पुलिकत
D. वूलर

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. वूलर

5. राज्याच्या आर्थिक व्यवहारांवर पूर्णपणे _____________ यांचे नियंत्रण असते.

A. राष्ट्रपती
B. राज्यपाल
C. मुख्यमंत्री
D. विधानसभा

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. विधानसभा

6. भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पहिला शास्त्रीय प्रयत्‍न ________ यांनी केला.

A. दादाभाई नौरोजी
B. डॉ.व्ही.के.आर.व्ही.राव
C. पी.सी.महालनोबीस
D. सुभाषचंद्र बोस

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. डॉ.व्ही.के.आर.व्ही.राव

7. 'थ्री गॉर्जेस' धरण __________ ह्या देशात आहे.

A. अमेरीका
B. चीन
C. रशिया
D. भारत

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. चीन

8. 'द इनसाइडर' हे भारताच्या ___________ या माजी पंतप्रधानांचे आत्मचरित्र आहे.

A. पी.व्ही.नरसिंहराव
B. इंद्रकुमार गुजराल
C. व्ही.पी.सिंग
D. इंदिरा गांधी

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. पी.व्ही.नरसिंहराव

9. पुल्तीझर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?

A. समाजसेवा
B. विज्ञान तंत्रज्ञान
C. पत्रकारिता
D. साहित्य

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. पत्रकारिता

10. खालीलपैकी कोणती व्यक्तीने भारताच्या उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती पदाचा कार्यभार सांभाळला आहे.

A. प्रतिभाताई पाटील
B. ए.पी.जे.अब्दुल कलाम
C. नीलम संजीव रेड्डी
D. सर्वपल्ली राधाकृष्णन

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. सर्वपल्ली राधाकृष्णन

Read More »