चालू घडामोडी 30ऑगस्ट 2010

 • विधानसभा निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था उत्तमरीत्या हाताळल्याबद्दल महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि गडचिरोली जिल्हा पोलीसप्रमुखांना भारतीय निवडणूक आयोगाने सर्वोत्कृष्ठ  प्रशासनाचा बहुमान जाहीर. कोल्हापूर जिल्हा पोलीसप्रमुख यशस्वी यादव 
 • 'ई सोर्स इंडिया'ने भारतातील पहिले खासगी एम्प्लायमेन्ट एक्स्चेंज सुरु केले. 
 • 'न्यूज ऑफ द वर्ल्ड' ह्या वृत्तवाहिनीने पाक संघातील खेळाडूंना लाच दिल्याचे बेटिंग उघड केले.
 • केंद्राच्या विज्ञान आणि  तंत्रज्ञान विभागाकडून  'इन्स्पायर ' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती. या अंतर्गत ६ वी ते पदव्युत्तर विद्यार्थांपैकी २ लाख विद्यार्थांना दरवर्षी ५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार.  
 • मेक्सिकोने तब्बल १० % पोलिसांना घरी पाठवले. भ्रष्टाचार, गुन्हेगारी जगताशी संबंध आणि काम करण्यास अपात्र या निकषांवर हि कारवाई.
 • केन व्याट ( Ken Wyatt  ) ठरले ऑस्ट्रेलियाच्या संसदेवर (House of Representatives) निवडून आलेले पहिले मूळ ऑस्ट्रेलीयी  वंशाची व्यक्ती (first indigenous parliamentarian)
 • हरिकेन इर्ल सध्या कॅरीबेन बेटांवर घोंघावतोय. कॅटेगरी-२ चे असलेले हे चक्रीवादळ आता कॅटेगरी-३ कडे वाटचाल करत आहे.
 • या दरम्यान अमेरिकेने ५ वर्षांपूर्वी येवून गेलेल्या कटरीना चे स्मरण केले. कॅटेगरी-३ चे हे वादळ अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक नुकसान आणि जीवितहानी करणारे वादळ ठरले.
 •  चिलीतील खाण अपघातात ३३ खाण कामगार अडकलेत. तब्बल ३ आठवड्यांपासून अडकलेल्या या लोकांना अन्न आणि इतर बाबी देण्यासाठी 'स्पायरल (स्क्रू  वरील आट्यानसारखा ) ' एक छोटासा मार्ग तयार करण्यात आला आहे.
 • नायजेरियात 'शिशाच्या' विषामुळे  (Lead Poisoning ) ३० बालकांचा मृत्यू.
 • दक्षिण आफ्रिकेतील संशोधकांना एका गुहेमध्ये तब्बल ६४ हजार वर्षांपूवीर्चे टोकदार दगडी तुकडे सापडले आहेत.
 • लक्ष असू द्या १० सप्टे १० कडे. त्या दिवशी १० वाजून १० मिनिटांनी एक चं फिगर तयार होईल  
 • 10/10/10 10:10:10
Read More »

चालू घडामोडी 29 ऑगस्ट 2010

29 ऑगस्ट : राष्ट्रीय क्रीडा दिन-मेजर  ध्यानचंद यांचा जन्मदिन
प्रादेशिक
 • नेव्हल कमांडर दिलीप दोंदे यांना यंदाचा ‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे दिला जाणारा ‘अभिमानमूर्ती’ पुरस्कार 
  • त्यांनी कापलेले अंतर: 21,600 नॉटिकल मैल
  • 'सागर परिक्रमा' या भारतीय नौदलाच्या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी हि साहसी सफर केली.
  • त्यांनी वापरलेली बोट : म्हादेई
  • एकट्यानेच न थांबता पूर्ण विश्वपरीक्रमा करण्याचा विक्रम करणारी पहिली व्यक्ती होती :सर रॉबिन नॉक्स-जॉनस्टन(Sir Robin Knox-Johnston ).(सन 1968-69)
  • कमांडर दोंदेनी त्यांच्याकडे खास प्रशिक्षणही घेतले होते.
  • कमांडर दोंदे यांना परीक्रमेसाठी लागलेला वेळ: 276 दिवस.
 • पहिले विश्व कोकणी सांस्कृतिक महोत्सव मंगलोर येथे होणार. 
 • राज्यामध्ये गेल्या वर्षी 16258 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. 
 • भुसावळ (जि.जळगाव )येथे 660 मेगावट क्षमतेचा 1 औष्णिक विद्युतप्रकल्प उभारण्यास मंजुरी.
  राष्ट्रीय :
  • मदर तेरेसा यांच्या जन्मशताद्बीचे औचित्य साधून केंद्र सरकारने पाच रुपयांचे विशेष नाणे काढले.
  • 'अन्तरद्वंद ' सुशील राजपाल दिग्दर्शित हा आगामी चित्रपट आहे चक्क नवरे मुलगे पळवण्यावर.
  • मुकेश अंबानी यांची 'वर्ल्ड इकोनॉमिक फोरम' वर निवड.
  • फेसबुक हि भारतातील सर्वाधिक पसंतीची 'सोशिअल नेटवर्किंग ' साईट ठरली.
   •  सोशिअल नेटवर्किंग मध्ये भारत जगातले ७वे मोठे मार्केट आहे.
  • भ्रष्टाचार प्रकरणी (धान्य वितरण घोटाळा ) अटक झालेले अरुणाचलचे माजी मुख्यमंत्री : गेगाँग अपांग
   आंतरराष्ट्रीय 
   • इंडोनेशियातील माउंट  सिनाबुंग (Mount Sinabung )  हा ज्वालामुखी 400 वर्षांनंतर आता जागृत  झाला.
   क्रीडा
   • राष्ट्रकुल खेळांचे 'थिम साँग': जियो उठो बढो जितो 
   Read More »

   प्रश्नमंजुषा-8

   प्रश्नमंजुषा-8


   1.व्हीडीओ कॉन्फरन्सिंगने जोडलेली महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद ठरण्याचा मान कोणत्या जिल्हा परिषदेस मिळाला?

   A.नांदेड

   B.ठाणे

   C.लातूर

   D.नाशिक

   उत्तरासाठी क्लिक  करा 

   B


   2. चर्चेतील 'वेदान्त ग्रुप 'चे चेअरमन _____ हे आहेत.

   A.नारायण मूर्ती

   B.नवीन अगरवाल

   C.अनिल अगरवाल

   D.मुकेश अंबानी

   उत्तरासाठी क्लिक  करा

   C


   3. __________या कंपनीस नुकतेच १०० वर्षे पूर्ण झाली


   A.आय टी सी लिमिटेड.

   B.टाटा  स्टील

   C.ओ एन जी सी

   D.इन्फोसिस

   उत्तरासाठी क्लिक  करा 

   A


   4.________येथे महाराष्ट्राची 'ललित कला अकादमी 'प्रस्तावित  आहे.

   A.पुणे

   B.नागपूर

   C.ठाणे

   D.मुंबई

   उत्तरासाठी क्लिक करा

   A   5. ५६ व्या राष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात या चित्रपटास 'सर्वोत्कृष्ठ चित्रपट' या सन्मानाने गौरवण्यात आले

   A.जोगवा (मराठी )

   B.हरीश्चन्द्राची फॅक्टरी (मराठी )

   C.रॉक ऑन (हिंदी)

   D.अंतहीन (बंगाली )

   उत्तरासाठी क्लिक  करा

   D


   6.हरिशंकर ब्रह्मा यांची अलीकडेच _____या पदावर नेमणूक करण्यात आली.

   A.भारताचे मुख्य-निवडणूक आयुक्त

   B.भारताचे  महा लेखापाल

   C.भारताचे  युनो मधील कायम स्वरूपी प्रतिनिधी

   D.भारताचे निवडणूक आयुक्त

   उत्तरासाठी क्लिक  करा

   D


   7.  वेदांता कंपनी खाणकाम प्रकल्पाविषयी  वाद  सुरु आहेत. हा  प्रकल्प नियमगिरी टेकड्यांमध्ये आहे. या टेकड्या कुठे आहेत ?
   A.ओरिसा

   B.आसाम

   C.प. बंगाल

   D.कर्नाटक

   उत्तरासाठी क्लिक  करा

   A


   8.२००९-१० या कालावधीत भारताचे  युनो साठी नियमित साहाय्य _______कोटी रु. होते तर युनोच्या शांती सेनेसाठीचे साहाय्य _________रु. होते

   A. ५२.७९  आणि ३६.३५

   B.  ६२.९० आणि ४६.५०

   C.  ८४.५०  आणि २४.५०

   D.  १०४ आणि १०१

   उत्तरासाठी क्लिक  करा

   A


   9.________ह्या अग्नी-II च्या प्रमुख असलेल्या महिलेची अग्नी-V (प्रस्तावित मारक क्षमता :५००० कि.मी.) च्या प्रमुख पदी नुकतीच नेमणूक झाली.

   A.निरुपमा राव

   B. टेसी थॉमस

   C.सुजाता नारायण

   D. टेसी जॉर्ज

   उत्तरासाठी क्लिक  करा

   B


   10. इराणने सुरु केलेल्या अणुभट्टीला या देशाने तांत्रिक सहकार्य केले.

   A.भारत

   B.पाकिस्तान

   C.अमेरिका

   D.रशिया
   उत्तरासाठी क्लिक  करा 

   D
   Read More »

   चालू घडामोडी 24 ऑगस्ट 2010

   • भारतीय गोल्फर अर्जुन अटवालने ग्रीन्सबोरो क्लासिक गोल्फ स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकाविले.
    • या विजयामुळे पीजीए टूरमध्ये विजेतेपद पटकावणारा तो 6 वा एशियन गोल्फर आणि पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. 
    • पीजीए टूर ही संस्था अमेरीकेतील  प्रमुख व्यावसायिक गोल्फ स्पर्धांचे आयोजन करते. त्याचे कार्यालयीन नाव हे PGA TOUR  पूर्ण कॅपिटल अक्षरांमध्ये असे आहे.


   • सचिन तेंडुलकरला आयसीसी  'पीपल्स चॉईस' पुरस्कारांसाठी नामांकन.
    • शर्यतीतील तर चौघे: 
    • श्रीलंकेचा महेला जयवर्धने, द. आफ्रिकेचा ऍबी डिबिलियर्स, ऑस्ट्रेलियाचा माईक हसी आणि इंग्लंडचा कर्णधार अंड्र्यू स्ट्रॉस
    •  आयसीसी चा हा पहिलाच 'पीपल्स चॉईस' पुरस्कार
   •  
   •  
   • मेक्सिकोची 'जिमेना नवारे'त झाली  मिस युनिव्हर्स-2010 
    • स्पर्धेचे स्थळ: लास वेगास (अमेरिका)
   •  
   • मदर तेरेसा यांचे हे जन्म-शताब्दी वर्ष . मदर तेरेसा यांचे खरे नाव Agnes Gonxha Bojaxhiu . 
    • (Gonxha या अल्बानियन शब्दाचा अर्थ होतो : गुलाबाची कळी)
    • बरुईपूर साल्वादोरचे बिशप लोबो यांनी या जन्मशताब्दी वर्षाचा दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात (प. बंगाल )शुभारंभ केला.
    • मदर तेरेसा यांच्या नंतर त्यांचे कार्य पुढे सुरु ठेवण्यासाठी
     अधिकृत वारस म्हणून सिस्टर निर्मला (निर्मला जोशी ) यांची निवड झाली आहे.
    • भारतीय रेल्वे त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने 'मदर एक्सप्रेस ' ही नवीन ट्रेन 26 ऑगस्ट 2010 पासून सुरु करणार आहे.
    • राष्ट्रीयत्व : भारतीय
     नोबेल  शांतता  पारितोषिक :1979
     भारतरत्न पुरस्कार : 1980 
    • माल्कम मुग्गेरीज ( Malcolm Muggeridge ) यांच्या 'समथिंग ब्युटीफुल फॉर गॉड ' या पुस्तक आणि चित्रफितीमुळे त्यांचे कार्य प्रकाशझोतात आले.
   Read More »

   प्रश्नमंजुषा-7

   प्रश्नमंजुषा-7


   1. महाराष्ट्र शासनाने _________या कंपनीशी ई-गर्व्हनन्स प्रकल्प राबविण्यासाठी करार केला आहे.

   A.टाटा कन्सल्तिंग सोलुशन्स (टी.सी.एस )

   B.इन्फोसिस

   C.विप्रो

   D.पटनी कम्प्युटर्स

   उत्तरासाठी क्लिक  करा 

   A


   2. _________या अभिनेत्रीची अलीकडेच युनिसेफच्या 'नॅशनल अम्बेसिडर ' पदी निवड झाली.

   A.प्रीती झिंटा

   B. काजोल

   C.दीपिका पदुकोन

   D.प्रियांका चोप्रा
   उत्तरासाठी क्लिक  करा

   D


   3. ______आणि _______या दोन अभिनेत्री सध्या युनिसेफच्या भारतातातील 'नॅशनल अम्बेसिडर ' म्हणून कार्यरत आहेत.

   A. प्रियांका चोप्रा, वहिदा रहेमान

   B.प्रियांका चोप्रा, शर्मिला टागोर

   C.प्रियांका चोप्रा, हेमामालिनी

   D.लारा दत्ता, शर्मिला टागोर
   उत्तरासाठी क्लिक  करा
   B


   4. _________हे युनिसेफचे 'गुडविल अम्बेसिडर'(सदिच्छा राजदूत) म्हणून कार्यरत आहेत.

   A.अमिताभ बच्चन

   B. अमीर खान

   C. सैफ अली खान

   D. सलमान खान
   उत्तरासाठी क्लिक करा

   A   5. युनिसेफच्या 'नॅशनल अम्बेसिडर 'चे कार्यक्षेत्र देशापुरते मर्यादित असते तर 'सदिच्छा
   राजदूताचे ' कार्यक्षेत्र _________इतके असते.

   A.खंड

   B.राज्य

   C.काही राज्यांचा समूह

   D.जग
   उत्तरासाठी क्लिक  करा

   D


   6.युनिसेफचे मुख्यालय _______येथे आहे

   A.वॉशिंग्टन  डी.सी

   B.जिनिव्हा

   C.पॅरीस

   D.न्यूयॉर्क सिटी
   उत्तरासाठी क्लिक  करा

   D


   7.  युनिसेफ म्हणजे 'युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड' असून या संस्थेचे विद्यमान अध्यक्षपद _______हि व्यक्ती विभूषित आहे .

   A.बान कि मून (Ban  Ki  Moon )

   B. अन्थनी लेक (Anthony Lake)

   C.डॉ. मार्गारेट चान (Dr. Margaret Chan)

   D.हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri)
   उत्तरासाठी क्लिक  करा

   B


   8. युनिसेफला _______वर्षाचे शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक मिळाले होते.

   A.1955

   B.1965

   C.2005

   D.2010
   उत्तरासाठी क्लिक  करा

   B


   9.__________हे सध्या भारताचे युनो मधील कायम स्वरूपी प्रतिनिधी आहेत 

   A.अनिल सुद

   B.रघुनाथ माशेलकर

   C.हरदीप सिंग पुरी

   D.निरुपम सेन
   उत्तरासाठी क्लिक  करा

   C


   10. UNCTAD  ( United Nations Conference on Trade and Development.) च्या 2010  च्या 'जागतिक गुंतवणुकीवरील ' अहवालानुसार  भारताचे स्थान _______आहे.

   A. 18

   B. 19

   C. 20

   D. 21
   उत्तरासाठी क्लिक  करा 

   C
   Read More »

   चालू घडामोडी 21 ऑगस्ट 2010

   • लोकप्रतिनिधित्व कायदा (सुधारणा )विधेयक २०१०[Representation  of People (Amendment) Bill 2010 ] राज्यसभेत सादर . या अंतर्गत आता अनिवासी भारतीयांनाही मतदानाचा अधिकार मिळणार. २००६ मध्ये अशा स्वरूपाचे आणलेले विधेयक  सरकारने मागे घेतले  होते.  आता ते सुधारित स्वरुपात मांडले गेले आहे .
   • बांगलादेश भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा त्यांच्या 1971  च्या  बांग्ला मुक्ती संग्रामातील योगदानाबद्दल विशेष सन्मान करणार आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्याला 40 वर्षे पूर्ण होत आहेत . या निमित्ताने त्यांनी जगातील 100 मान्यवरांचा सन्मान करण्याचा घाट घातला आहे. पण याच सोहळ्यात इंदिराजींचा 'विशेष ' सन्मान करण्याचे त्यांनी ठरवले आहे. 
    • बांग्लादेशाला  स्वातंत्र्याला २६ मार्च १९७१ ला मिळाले .
   • पंतप्रधानांनी 'उद्यमी हेल्पलाईन  ' या कॉल सेंटर चे उदघाटन  केले. लघु उद्योग सुरु करणाऱ्या उद्योजकांना संधी, उपलब्ध सुविधा,  बाजार आणि अनुषांगिक बाबींची  माहिती  पुरवण्यासाठी याचा वापर होणार.

     • टोल फ्री क्रमांक आहे: 1800-180-6763 
     
   • 'ट्राय' कडून 'लॅन्ड लाईन  ' चे क्रमांक 10 आकडी करण्याचे संकेत. 
   • आता रशिया पाठोपाठ लॅटीन अमेरिकेतील बोलीव्हियात  ही जंगलात वणवे भडकले. पर्यावरणाला  होत असलेल्या नुकसानाकडे  पाहत  तेथील अध्यक्षांनी 'आणीबाणी 'जाहीर केली.
   • आता रशिया पाठोपाठ लॅटीन अमेरिकेतील बोलीव्हियात  ही जंगलात वणवे भडकले. पर्यावरणाला  होत असलेल्या नुकसानाकडे  पाहत  तेथील अध्यक्षांनी 'आणीबाणी 'जाहीर केली.
   • इस्लामी स्कॉलर यु. पी. तील  आझमगड चे मौलाना वाहीदुद्दिन खान 'राजीव गांधी राष्ट्रीय सदभावना ' पारितोषिकाने सन्मानित.

    Read More »

    चालू घडामोडी 20 ऑगस्ट 2010

    • लोकसभेच्या  वास्तूचे  नूतनीकरण करण्यासाठी गठीत  उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षा: मीरा कुमार.
    • भारतीय रेल्वेच्या १५० वर्षांच्या  इतिहासातील  पहिली महिला ‘वाहतूक लेखा निरीक्षक’ (टीआयए) = राजेश्री खांडेकर.
    • सायना नेहवाल आंध्र प्रदेशच्या पर्यटन विभागाची नवी  ब्रॅंड ऍम्बेसिडर .
    • जागतिक पर्यटन दिन=27 सप्टेंबर.मातोश्री सुशीलादेवी देशमुख राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार सुरेश भटेवरा यांना.
    • पांडवांची प्राचीन राजधानी हस्तिनापुर लवकरच भारतीय रेल्वेच्या नकाशावर येईल.
    • १९ ऑगस्टला जगाने साजरा केला दुसरा मानवतावादी दिन.
     • संयुक्त राष्ट्रसंघाने (UNO) ११ डिसेंबर  २००८  रोजी हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली.
     • १९ ऑगस्ट २००३ ला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर चिटणीसांचे इराक़ मधील विशेष दूत सर्जिओ विअरा देल मेलो (Sérgio Vieira de Mello)  आणि इतर २१ जणांची बगदाद मध्ये तेथील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयावर झालेल्या  ट्रक-बॉम्ब  हल्ल्यात हत्या झाली होती. त्या दिवसाचे स्मरण म्हणून हा दिन साजरा केला जातो.
    Read More »

    प्रश्नमंजुषा-6

    प्रश्नमंजुषा-6


    1.व्हिएन्ना येथे पार पडलेल्या 18 व्या आंतरराष्ट्रीय एड्स परिषदेचे ब्रिदवाक्य (Motto) _________हे होते.

    A.Universal Action Now

    B.Rights Here, Right Now

    C.Time to Deliver

    D.Access for All

    उत्तरासाठी क्लिक  करा 

    B


    2. दर 2 वर्षांनी होणारी पुढील आंतरराष्ट्रीय एड्स परिषद______या वर्षी____स्थळी नियोजित आहे.

    A.2012 ,वॉशिंग्टन डी.सी. ,(अमेरिका)

    B.2011 , व्हिएन्ना(ऑस्ट्रिया)

    C.2012,  न्यूयॉर्क (अमेरिका)

    D.2011,  दिल्ली   

    उत्तरासाठी क्लिक  करा

    A    3. नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या
    'युनिक आयडेंटीफिकेशन प्रोजेक्ट (UID)' चे नामकरण असे करण्यात आले आहे ?

    A.पहचान

    B.आधार

    C.प्रतीक्षा

    D.प्रतिमा

    उत्तरासाठी क्लिक  करा 

    B


    4.'प्रधानमंत्री  आदर्श ग्राम योजना'(PMAGY) राबविणारे पहिले राज्य कोणते?

    A.महाराष्ट्र

    B.मध्यप्रदेश

    C.राजस्थान

    D.आंध्रप्रदेश

    उत्तरासाठी क्लिक करा 


    C    5. 'प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजने'(PMAGY) अंतर्गत प्रत्येक गावावर_____इतका खर्च केला जाणार आहे.

    A.10 लाख

    B.20 लाख

    C.50 लाख

    D.100 लाख
    उत्तरासाठी क्लिक  करा

    A


    6. 2001 च्या जनगणनेनुसार  शारीरिकदृष्ट्या विकलांगांची सर्वाधिक संख्या  या राज्यात आहे ?

    A.उत्तरप्रदेश

    B. महाराष्ट्र

    C.मध्यप्रदेश

    D. बिहार

    उत्तरासाठी क्लिक  करा

    A


    7.  भारताची  15  वी जनगणना ______या दिवशी सुरु झाली.

    A. 1 एप्रिल 2010

    B. 1 मे 2010

    C. 26 जानेवारी 2010

    D. 2 ऑक्टोबर 2009

    उत्तरासाठी क्लिक  करा

    A


    8.'बिमारू' (BIMARU) या संज्ञेने ओळखल्या जाणाऱ्या राज्यात खालीलपैकी या राज्याचा समावेश नाही

    A.उत्तराखंड

    B.राजस्थान

    C.उत्तरप्रदेश

    D.बिहार
    उत्तरासाठी क्लिक  करा

    A


    9. स्टार्ट (START -Strategic Arms Reduction Treaty ) हा खालील दोन देशातील करार आहे.

    A.अमेरिका- अफगाणिस्तान

    B. अमेरिका - रशिया

    C. भारत -पाकिस्तान

    D. अमेरिका -इराक़

    उत्तरासाठी क्लिक  करा

    B


    10. 2009-10 च्या द्रोणाचार्य पुरस्कारांसाठी निवड समिती यांच्या अध्यक्षतेखाली नेमली होती.

    A. पी.टी. उषा

    B. साईना नेहवाल

    C. अशोक मेहता

    D. अशोक कुमार
    उत्तरासाठी क्लिक  करा 

    D
    Read More »

    चालू घडामोडी 19 ऑगस्ट 2010

    • उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारांचे वितरण :
     • 2007 या वर्षासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रियरंजन दास मुन्शी यांना
     • 2008 साठी समाजवादी पक्षाचे नेते मोहन सिंग
     • 2009 साठी भाजप चे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी

    • कांगोतील ' युनो च्या पीस कीपिंग फोर्स ' मधील 3 भारतीयांची हत्या .
    • आंतरराष्ट्रीय गणिती काँग्रेस हैदराबाद येथे. 
    • मुंबईनजीकच्या समुदात झालेल्या तेलगळतीमुले तयार झालेले तवंग फस्त करण्यासाठी तेल खाणारे 'ऑइलझॅपर' हे जिवाणू वापरणार .
     • दिल्लीतील 'द एनजीर् अँड रिसोसेर्स इन्स्टिट्यूट' (टेरी) या संस्थेने तयार केले आहेत.
     
    • म्यानमार मधील लष्करी राजवटीने केलेल्या अत्याचारांच्या चौकशी साठी युनो समिती गठीत करणार.
    • वीरेंद्र सेहवाग याचे शतक रोखण्यासाठी नोबॉलच्या नियमांचा अखिलाडू प्रकाराने वापर करणारा श्रीलंकेचा गोलंदाज : सूरज रणदीव
    Read More »

    प्रश्नमंजुषा-5

    प्रश्नमंजुषा-5    1.बाभळी बंधाऱ्याला या राज्याने आक्षेप घेतला आहे?

    A.मध्यप्रदेश

    B.आंध्रप्रदेश

    C.मध्यप्रदेश

    D.कर्नाटक

    उत्तरासाठी क्लिक  करा

    B.


    2. जागतिक वारसा वास्तू यादीत स्थान मिळवलेली 'जंतर मंतर' ही वास्तू येथे आहे?

    A.जोधपूर

    B.दिल्ली

    C.जयपूर

    D.पाटणा
    उत्तरासाठी क्लिक  करा


    C


    3. भारताची पहिली आण्विक पाणबुडी आय एन एस अरिहंत कोणत्या तत्त्वावर आधारित आहे?

    A. FBR

    B. HWR

    C. LWR

    D. PHWR
    उत्तरासाठी क्लिक  करा

    D


    4. आसियान देशांपैकी कोणत्या देशाची भारतातील गुंतवणूक सर्वाधिक आहे?

    A.सिंगापूर

    B.मलेशिया

    C.कंबोडिया

    D.इंडोनेशिया
    उत्तरासाठी क्लिक करा

    A


    5. राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ(National Defence University ) चे प्रस्तावित ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
    A.लेह

    B.लडाख

    C.गुरगाव

    D.जोधपुर
    उत्तरासाठी क्लिक  करा

    C


    6. फ्रेंच ओपन 2010 मधील पुरुष एकेरीचा विजेता कोण?

    A.रॉजर फेडरर

    B. राफेल नदाफ

    C. ज्यूआन मार्टिन डेल पेट्रो

    D.अँडी मुरे
    उत्तरासाठी क्लिक  करा

    B


    7. विं.दा.करंदीकर यांना त्यांच्या कोणत्या कवितासंग्रहासाठी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
    A.विरूपिका

    B.स्वेदगंगा

    C.अष्टदर्शने

    D.मृदगंध
    उत्तरासाठी क्लिक  करा

    C


    8. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भाग घेत असणाऱ्या 71 संघांपैकी किती संघांनी आजवरच्या सर्व राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे?
    A. 2

    B. 4

    C. 6

    D. 8

    उत्तरासाठी क्लिक  करा

    C


    9. तिपाईमुख हे धरणं कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे
    A.मणिपूर

    B.अरुणाचल प्रदेश

    C.आसाम

    D.मिझोराम

    उत्तरासाठी क्लिक  करा

    A


    10. राजीव गांधी विज्ञान केंद्र कुठे आहे?
    A.मलेशिया

    B.मॉरीशस

    C.सिंगापूर

    D.इंडोनेशिया
    उत्तरासाठी क्लिक  करा

    B


    Read More »

    प्रश्नमंजुषा-4

    प्रश्नमंजुषा-4


    1. केवळ ऑनलाइनमार्फतच व्यवहार होणारी "आयप्रोटेक्‍ट' ही नवी जीवन विमा योजना कोणत्या विमा कंपनीने बाजारात आणली आहे?

    A. आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल

    B. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

    C.बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कंपनी

    D. एस बी आय लाईफ इन्शुरन्स कंपनी

    उत्तरासाठी क्लिक  करा
    A


    2. अमेरिकेतील नोकऱ्या "पळवीत' असल्याचा (आऊटसोर्सिंग) आरोप करून अमेरिकी सिनेटमध्ये "चॉप शॉप' अशा कडवट विशेषणाने टीका करण्यात आलेली कंपनी______ही होय.

    A.इन्फोसिस

    B. विप्रो

    C.टी सी एस

    D.पटनी

    उत्तरासाठी क्लिक  करा

    A


    3. मुंबई येथील प्रस्तावित क्रीडा संग्रहालयाला  या महान खेळाडूचे नाव देण्यात येणार आहे

    A.सचिन तेंडूलकर

    B.सुनील गावसकर

    C.मेजर ध्यानचंद

    D.खाशाबा जाधव

    उत्तरासाठी क्लिक  करा
    A


    4. या माजी संस्थानिकाने स्वातंत्र्य संग्रामाला मदत केली असल्याचे अस्सल पुरावे अलीकडेच सापडले.

    A.बडोद्याचे सयाजीराव गायकवाड

    B. औंधचे पंतप्रतिनिधी

    C. कोल्हापूरचे शाहू महाराज

    D. ग्वाल्हेरचे जीवाजीराजे सिंदिया

    उत्तरासाठी क्लिक करा

    C    5. SMS  म्हणजे खालीलपैकी काय?

    A. Short Message Service

    B. Short Messagener System

    C. Short Memory System

    D. Short Memory Service

    उत्तरासाठी क्लिक  करा

    A


    6. शिक्षणतज्ञ जे. पी. नाईक यांचे राज्य सरकारच्या वतीने ________येथे स्मारक उभारले जाणार तर नानासाहेब धर्माधिकारी यांचे _____येथे स्मारक नियोजित आहे


    A. रोहा, रेवदंडा

    B. रेवदंडा ,चंद्रपूर

    C. आजरा,  रेवदंडा

    D. चंद्रपूर ,रोहा

    उत्तरासाठी क्लिक  करा
    C


    7राज्यात ________येथे संतपीठ आकार घेत आहे.

    A.देहू

    B.आळंदी

    C.पैठण

    D.पंढरपूर

    उत्तरासाठी क्लिक  करा

    C


    8.ज्यूलिया गिलार्ड यांनी अलीकडेच _____या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली

    A.ऑस्ट्रेलिया

    B.न्यूझीलंड

    C.कॅनडा

    D.जर्मनी

    उत्तरासाठी क्लिक  करा

    A


    9.किशनगंगा प्रकल्प हा कोणत्या दोन देशातील वादाचा मुद्दा बनला आहे ?

    A.भारत- भूतान

    B.भारत- चीन

    C.भारत- बांगलादेश

    D.भारत -पाकिस्तान

    उत्तरासाठी क्लिक  करा

    D


    10. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती_____हे आहेत

    A.अनिल दवे

    B.मोहित शाह

    C.जे.एन .पटेल

    D.एफ. आय . रीबिलो

    उत्तरासाठी क्लिक  करा
    B
    Read More »

    प्रश्नमंजुषा-3

    प्रश्नमंजुषा-3


    1.महिंद्रा अँड महिंद्रा तोट्यात गेलेली 'सॅंगयांग मोटर्स' कंपनी ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहे . 'सॅंगयांग मोटर्स' ही कोणत्या देशातील कंपनी आहे?

    A.जपान

    B.जर्मनी

    C.द. कोरिया

    D. उ. कोरिया

    उत्तरासाठी क्लिक  करा
    C


    2. ऍम्बेसिडर मोटारीचे नवे मॉडेल लवकरच बाजारात येणार आहे. ही मोटार बनवणाऱ्या कंपनीचे नाव काय?

    A.हिंदुस्तान मोटर्स (एचएम)

    B. होंडा मोटर्स

    C.जनरल मोटर्स (जीएम )

    D.फोक्सं वॅगन  (व्ही डब्लू )
    उत्तरासाठी क्लिक  करा

    A


    3. दृष्टिहीन मोबाईलधारकांना त्यांचे बिल ब्रेल लिपीत सादर करण्याची कल्पना सर्वप्रथम ______या कंपनीने अंमलात आणली.

    A.रिलायन्स कम्युनिकेशन्स

    B.टाटा इंडिकॉम

    C.वोडाफोन

    D.आयडीया सेल्लुलर
    उत्तरासाठी क्लिक  करा
    A


    4. विक्रीकराच्या भरण्यासाठी इंटरनेट द्वारा व्यापाऱ्यांना ई-सुविधा देणारे पहिले राज्य कोणते?

    A.हरियाना

    B. गुजरात

    C. महाराष्ट्र

    D. मध्यप्रदेश
    उत्तरासाठी क्लिक करा

    C    5. महाराष्ट्राचे 'ललित कला विद्यापीठ ' ______या ठिकाणी प्रस्तावित आहे

    A.नागपूर

    B.नांदेड

    C.मुंबई

    D. पुणे
    उत्तरासाठी क्लिक  करा

    D


    6.सर्वात अलीकडे शोधलेल्या मूलद्रव्याचे नाव काय?

    A.उनउनसेप्तीयम (Ununseptium )

    B.उनउनपेंटीयम (Ununpentium )

    C.उनउनओक्टीयम(  Ununoctium )

    D.रेडॉन (Radon )
    उत्तरासाठी क्लिक  करा

    A .      (अमेरिका आणि रशियाच्या शास्रज्ञांनी संयुक्त प्रयत्नांनी २००९-१० शोधले. या पूर्वी या मूलद्रव्यासाठी ११७ अनुक्रमान्काची जागा आवर्तीसारणीत रिकामी ठेवली होती. )


    7.  युनिसेफ ची नवीन राष्ट्रीय ब्रांड अम्बेसेडर ही अभिनेत्री आहे?

    A.नंदिता दास

    B.प्रियांका चोप्रा

    C.जुही चावला

    D.भूमिका चावला
    उत्तरासाठी क्लिक  करा


    B


    8. पंधराव्या लोकसभेतील सर्वात तरुण खासदार _____हे असून ते________या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.


    A.राहुल गांधी, अमेठी (उत्तर  प्रदेश )

    B.सचिन पायलट, अजमेर (राजस्थान )

    C.अगाथा संगमा, तुरा (मेघालय )

    D.महम्मद हमदुल्ला सईद ,  लक्षद्वीप

    उत्तरासाठी क्लिक  करा

    D


    9. खालील महिला राजकारण्यांपैकी कोणती महिला मुख्यमंत्रीपदी कधीही नव्हती ?

    A.सुषमा स्वराज

    B.राबरी देवी

    C.सुचेता कृपलानी

    D.सरोजिनी नायडू
    उत्तरासाठी क्लिक  करा

    D


    10. २०१० मध्ये दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ह्या आशियातील______राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आहेत .

    A.१ ल्या

    B.२ ऱ्या

    C.3 ऱ्या

    D.४ थ्या
    उत्तरासाठी क्लिक  करा
    B. 1998 ला मलेशिया मधील कौलालम्पूर येथे झालेल्या 15 व्या राष्ट्रकुल क्रीडा सपर्धा ह्या आशियातील 1 ल्याच स्पर्धा होत्या
    Read More »

    प्रश्नमंजुषा-2

    प्रश्नमंजुषा-2


    1. प्रस्तावित गोंडवाना विद्यापीठाचे मुख्यालय येथे आहे?

    A.चंद्रपूर

    B.नागपूर

    C.भंडारा

    D.गडचिरोली

    उत्तरासाठी क्लिक  करा
    D


    2. आगामी क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेचा शुभंकर____हा आहे.

    A.फुवा

    B. स्टम्पी

    C.अप्पू

    D.झाकुमी
    उत्तरासाठी क्लिक  करा

    B


    3. अलीकडेच ______या राज्य सरकारने शाळा व कॉलेजात मोबाईल फोनच्या वापरावर बंदी जारी केली आहे.

    A.मध्यप्रदेश

    B.गुजरात

    C.महाराष्ट्र

    D.आंध्रप्रदेश
    उत्तरासाठी क्लिक  करा
    B


    4. मुंबई या द्विभाषिक राज्याची निर्मिती ____या दिवशी झाली.

    A.1  नोव्हेंबर 1956 

    B. 1  डिसेंबर 1956

    C.  1  मे 1960

    D. 15 ऑगस्ट 1947 
    उत्तरासाठी क्लिक करा

    A    5. पहिल्या बाजीराव पेशव्यांची समाधी कोठे आहे?

    A.रावळगाव , महाराष्ट्र

    B.रावेरखेडी, मध्यप्रदेश

    C.सावरखेडी , महाराष्ट्र

    D.रावेर, महाराष्ट्र
    उत्तरासाठी क्लिक  करा

    B


    6. भारताच्या 2011 च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा _____येथे प्रस्तावित आहेत.

    A.गोवा

    B.तामिळनाडू

    C.झारखंड

    D.केरळ
    उत्तरासाठी क्लिक  करा

    A


    7मास्टरकार्ड या क्रेडीट कार्ड क्षेत्रातील अग्रगण्य अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनीच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी _____या भारतीय मुळ असलेल्या व्यक्तीची निवड झाली.

    A.विनोद खोसला

    B.विक्रम पंडित

    C.इंद्रा नुयी

    D.अजय बंगा
    उत्तरासाठी क्लिक  करा

    D


    8. सध्या केंद्रीय पंचायतराज मंत्री म्हणून कार्यरत असलेली व्यक्ती?

    A.सी. पी. जोशी

    B.शरद पवार

    C.वीरप्पा मोईली

    D.ए. राजा
    उत्तरासाठी क्लिक  करा

    A


    9. अलीकडेच _______या देशात जंगलांना लागलेल्या वणव्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाले शिवाय तेथील सरासरी तापमानही वाढले .

    A.पाकिस्तान

    B.बांगलादेश

    C.रशिया

    D.अमेरिका
    उत्तरासाठी क्लिक  करा

    C


    10. भारताच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहणाऱ्या व्यक्तींचा योग्य उतरता क्रम खालीलपैकी कोणता आहे?

    A.इंदिरा गांधी -पंडित नेहरू -अटलबिहारी वाजपेयी - मनमोहनसिंग

    B.पंडित नेहरू-इंदिरा गांधी -अटलबिहारी वाजपेयी- मनमोहनसिंग

    C.पंडित नेहरू-इंदिरा गांधी - मनमोहनसिंग-अटलबिहारी वाजपेयी

    D.इंदिरा गांधी-पंडित नेहरू - मनमोहनसिंग-राजीव गांधी
    उत्तरासाठी क्लिक  करा
    C


    Read More »

    चालू घडामोडी 18 ऑगस्ट 2010

    • राज्यातील रहिवाशांना युनिक आयडेंटिटी क्रमांक (युआयडी) देण्याच्या `आधार` कार्यक्रमास १ नोव्हेंबर २०१० पासून सुरूवात होणार असून २८ फेब्रुवारी २०११ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
    • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना १९६० साली झाली.
    • मंत्रालयातील सुलभ प्रवेशासाठी महिलांसाठी वेगळी रांग.
    • जलतरण राष्ट्रीय स्पर्धा जयपुरात होत आहेत.
    • रिलायन्स कम्युनिकेशन्सने अधुदृष्टी असलेल्यांसाठी मोबाइल फोनचे बिल ब्रेललिपीमधून उपलब्ध केले आहे.
    • लोकसभेने ' झारखंड पंचायतराज सुधारणा विधेयक' पारित केले. २००५ मध्ये नियोजित असलेल्या निवडणुका विविध कारणांमुळे अद्यापही झालेल्या नाहीत. सध्या राज्यात 'राष्ट्रपती राजवट' आहे. या विध्येकामुळे तेथील पंचायतराज मधील ५०% जागा महिला सदस्यांसाठी तसेच ५०% जागा महिला पदाधिकारयांसाठी राखीव होतील.
    • रशियाचे राष्ट्राध्यक्ष दमित्री मेदवेदेव (Dmitry Medvedev ) यांनी 'अफ-पाक धोरणासंबंधी 'चतुष्कोनी परिषद (quadrilateral summit ) ' घेतली. अफगाण , पाकिस्तान आणि ताजिकिस्तान हे इतर ३ देश सहभागी . परिषदेचे ठिकाण: सोची (Sochi).
    Read More »

    प्रश्नमंजुषा-1

    प्रश्नमंजुषा-1


    1.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना या ____वर्षी झाली?
    A.1956

    B.1960

    C.1962

    D.1947

    उत्तरासाठी क्लिक  करा

    B

    2. जगातला सगळ्यात मोठा आय. पी. ओ.(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग ) या बँकेने अलीकडेच बाजारात आणला?
    A.बँक ऑफ इंग्लंड

    B. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

    C.फेडरल रिझर्व्ह 

    D.ऍग्रीकल्चरल  बँक ऑफ चीन
    उत्तरासाठी क्लिक  करा

    D


    3. बाभळी बंधारा या नदीवर आहे?
    A.पंचगंगा

    B.गोदावरी

    C.कृष्णा

    D.मांजरा
    उत्तरासाठी क्लिक  करा

    B


    4. लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार ___यांना प्रदान करण्यात आला?
    A.दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित

    B.गुजरातचे मुख्यमंत्री  नरेंद्र   मोदी

    C. आंध्रप्रदेशाचे माजी  मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू

    D. मेघालयचे मुख्यमंत्री मुकुल संगमा 
    उत्तरासाठी क्लिक करा

    A


    5. 2009 मध्ये राष्ट्रकुलातून  या देशाला निलंबित  करण्यात आले?
    A.फिजी

    B.पाकिस्तान

    C.झिम्बाम्बे

    D. मलाया
    उत्तरासाठी क्लिक  करा
    A


    6. भारतातील 28 वी जागतिक वारसा वास्तू यादीत भारतातील 28 वी म्हणून स्थान मिळवलेल्या 'जंतर मंतर'ची निर्मिती यांनी केली ?
    A. महाराजा मानसिंग (दुसरे)

    B.महादजी शिंदे

    C.महाराज जयसिंग (पहिले )

    D.महाराज जयसिंग (दुसरे)
    उत्तरासाठी क्लिक  करा

    D


    7. लेखक विचारवंत नरहर कुरुंदकर यांचे स्मारक ____येथे तयार होत आहे .
    A.नांदेड

    B.नागपूर

    C.पुणे

    D.नागपूर
    उत्तरासाठी क्लिक  करा

     A


    8. 'राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना' राज्यात कधीपर्यंत पूर्ण होणार?
    A. डिसेंबर 2010

    B. डिसेंबर 2011

    C. डिसेंबर 2012

    D. डिसेंबर 2013
    उत्तरासाठी क्लिक  करा

    A


    9. जागतिक टेनिस रँकिंगच्या अव्वल शंभरात प्रवेश करणारा दुसरा भारतीय ___हा होय?
    A.महेश भूपती

    B.सोमदेव देववर्मन

    C.लिअँडर पेस

    D.विजय अमृतराज
    उत्तरासाठी क्लिक  करा

    B


    10.  'HUMANITY- EQUALITY - DESTINY'(मानवता - समानता - नियती ) हे  खालीलपैकी कोणत्या संघटने चे बोधवाक्य (Motto) आहे ?
    A.राष्ट्रकुल क्रीडा संघटना

    B.आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समिती

    C.हॉकी इंडिया

    D.जागतिक टेनिस संघटना
    उत्तरासाठी क्लिक  करा

    A


    Read More »

    विक्रीकर निरीक्षक / सहाय्यक - मुख्य परीक्षा -2009

    विक्रीकर निरीक्षक / सहाय्यक - मुख्य परीक्षा -2009 (14 ऑगस्ट 2010 रोजी झालेल्या परीक्षेतील चालू घडामोडी/ सामान्यज्ञान विषयावरील प्रश्नांची संभाव्य उत्तरे - भाग 3.
    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रकाशित केलेली उत्तरे अंतिम समजण्यात यावीत.)

    प्रश्न:_____हे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय अध्यक्ष होय.
    उत्तर: नितीन गडकरी
    ___________________________________________________
    प्रश्न: राष्ट्रीय ग्रामीण रोजगार निर्मिती योजना 2006 आली देशातील काही मागास जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आली वर्ष 2008 -2009 सालापर्यंत ह्या योजनेची व्याप्ती किती होती ?
    उत्तर:सर्व ग्रामीण जिल्हे
    ___________________________________________________
    प्रश्न: क्ष किरणांचा शोध कोणी लावला?
    उत्तर: राँटजेन
    _________________________________________________
    प्रश्न: 'सलवा जुडूम' हि चळवळ कोणा विरुध्द सुरु केली होती?
    उत्तर: नक्षलवादी.
    • 'सलवा जुडूम' या गोंडीभाषेतील शब्दांचा होतो 'peace  march' .2005 मध्ये छत्तीसगढ मध्ये शान्ततामय मार्गाने  सुरु झालेली हि चळवळ नन्तर वादाच्या भोवऱ्यात सापडली. 
    ___________________________________________________
    प्रश्न: खालीलपैकी कोणती संगणकाची भाषा नाही?
    उत्तर: आय.बी.एम.
    ___________________________________________________
    प्रश्न:____यांची केंद्र सरकारने २०१० मध्ये 'प्रसार भारतीच्या' अध्यक्षपदी नेमणूक केली आहे.
    उत्तर: मृणाल पांडे
    • हिंदी दैनिक 'हिंदुस्तान' च्या माजी संपादक मृणाल पांडे यांची २३ जानेवारी २०१० ला 'प्रसार भारती 'च्या अध्यक्ष पदी नेमणूक झाली. 'लोकसभा टीव्ही ' वर त्या 'बातो बातो में' हा मुलाखतींवर आधारित कार्यक्रमही करतात. 
    ___________________________________________________
    प्रश्न:भारताच्या  2001 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येबाबत महाराष्ट्राचा क्रमांक कितवा लागतो?
    उत्तर:2  रा
    • 1 ला क्रमांक : उत्तरप्रदेश 
    ___________________________________________________
    सूचना: हि वेबसाईट माहितीचा 'अधिकारिक(authentic)' स्त्रोत नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रकाशित केलेली उत्तरे अंतिम समजण्यात यावीत.
    Read More »

    चालू घडामोडी 17 ऑगस्ट 2010

    • "दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले
     हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

     शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
     भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली"- कवी नारायण सुर्वे.
     कविवर्य नारायण सुर्वे यांचे निधन
     • गाजलेले कवितासंग्रह:

      • माझे विद्यापीठ
      • जाहीरनामा
      • ऐसा गा मी ब्रह्म
      • सनद 
     • 1995  च्या  परभणी येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
     • 1998  ला 'पद्मश्री' ने सन्मानित.
    • महाराष्ट्र लोकसेवा आयोग लवकरच ऑन-लाइन सर्व सेवा सुरु करेल , त्यांनी  www.mpsconline.gov.in हे पोर्टल सुरु केले. 
    • जगातील सर्वात मोठा IPO (इनिशिअल पब्लिक ऑफरिंग ) बाजारात आणले ते अग्रीकल्चरल बँक ऑफ चीनने. 

    चर्चेतील पुस्तक:
    • 'अ जर्नी '(A Journey) ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेर यांची स्वानुभवावरील पुस्तक. सप्टेंबर २०१० मध्ये प्रकशित होणारे हे पुस्तक वेगळ्याच कारणांनी सध्या चर्चेत. ब्लेर यांनी पुस्तकासाठी मिळालेली आगावू रक्कम (४६ लाख पौंड ) आणि त्यानंतर येणारी सर्व रॉयलटी युद्धात गंभीर जखमी झालेल्या सैनिकांसाठी देवू केला. पण आता त्याला शांततावादी आणि सैनिकांचे कुटुंबीय 'ब्लड मनी ' संबोधत आहेत . 

     Read More »

     विक्रीकर निरीक्षक / सहाय्यक - मुख्य परीक्षा -2009

     विक्रीकर निरीक्षक / सहाय्यक - मुख्य परीक्षा -2009 (14 ऑगस्ट 2010 रोजी झालेल्या परीक्षेतील चालू घडामोडी/ सामान्यज्ञान विषयावरील प्रश्नांची संभाव्य उत्तरे - भाग 2.
     महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रकाशित केलेली उत्तरे अंतिम समजण्यात यावीत.)

     प्रश्न :'प्रधानमंत्री ग्रामसडक योजना '  भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाकडून राबवली जाते?
     उत्तर :ग्रामीण विकास मंत्रालय.
     • 25 डिसेंबर 2000 ला सुरु केलेली ग्रामीण भागात सर्व हंगामात वापरता येण्याजोगे रस्ते तयार करण्यासाठी ची योजना 100% केंद्राच्या सहकार्याने चालते. केंद्राने हाय स्पीड डीझेल वरचा 50% अधिभार या करता राखून ठेवला आहे.
     _____________________________________________________
     प्रश्न :बाह्य आकाश गंगा तरंगाचे उगम आणि आंतग्रर्हीय वस्तूंचा अभ्यास करण्यासाठी पुणे जवळ नारायणगाव स्थित, लांब  पल्ल्याचे जागतिक शक्तिशाली कोणते उपकरण वापरले जाते?

     उत्तर :मीटर वेव्ह महा रेडीओ दूरदर्शक.
     • मीटर वेव्ह महा रेडीओ दूरदर्शक Giant Metrewave Radio Telescope (GMRT) पुण्यापासून 80 किलोमीटरवर नारायणगाव जवळील खोदड येथे आहेत.30 अन्टेना च्या सहाय्याने अवकाश निरीक्षण करणाऱ्या या दुर्बिणींचा समूह मीटर वेव्हलेन्थ वर काम करतो. अश्या प्रकारची  जगात सगळ्यात विशाल असलेली हि दुर्बीण टाटा मुलभूत संशोधन केंद्राचा उपविभाग असलेल्या 'नॅशनल सेंटर ऑफ ऍस्ट्रोफिजिक्स'(NCRA) कडून संचालित केली  जाते . NCRA  चे कार्यालय पुणे विद्यापीठाच्या आवारात आहे. 
     _____________________________________________________


     प्रश्न :सचिन तेंडूलकर याने एक  दिवसीय क्रिकेटमधील द्विशतकाचा विश्वपराक्रम ______संघाविरूध्द केला .
     उत्तर :द. आफ्रिका
     • जगातले एकदिवसीय सामान्यातले पहिले शतक : डेनिस एमीस (इंग्लंड )
     _____________________________________________________

     प्रश्न :बीजिंग ओलम्पिककरिता पत्र ठरलेला पहिला जलतरणपटू  कोण ?
     उत्तर :वीरधवल खाडे
     • पुढील लिंक्स वर हि माहिती उपलब्ध आहे.
     1. http://www.indianexpress.com/news/finally-virdhawal-khades-hopes-float-on-tru/203697/ 
     2. http://virdhawal.blogspot.com/

     _____________________________________________________
     प्रश्न :इंडियन सायन्स काँग्रेसच्या 97 व्या वार्षिक परिषदेचे उदघाटन_______यांनी केले.
     उत्तर :पंतप्रधान मनमोहनसिंग
     • उदघाटन समारंभाबद्दल हिंदू  वृत्तपत्रातील बातमीत याचा उल्लेख आहे. 
     • http://www.thehindu.com/news/states/kerala/article74189.ece
     • इंडियन सायन्स काँग्रेसची स्थापना प्रोफेसर जे.एल. सिम्सन आणि प्रोफेसर पी.एस. मॅकमोहन  या  दोन ब्रिटिशांनी केली.
     _____________________________________________________
     प्रश्न :2010  हे संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे ______वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
      उत्तर :आंतरराष्ट्रीय जैवविविधता

      • युनो (संयुक्त राष्ट्र संघटने)तर्फे 2011  वन (Forest) वर्ष म्हणून साजरे होणार .
      • 1975 - महिला वर्ष 
      • युनो (संयुक्त राष्ट्र संघटने)ने अलीकडेच 29 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र चाचणीविरोधी दिन म्हणून जाहीर केला.
      _____________________________________________________
      प्रश्न :खालील पैकी कोणत्या मराठी चित्रपटाला 2008  च्या 56  व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात पाच पुरस्कार मिळाले?
      उत्तर :जोगवा
      • जोगवाला मिळालेले पुरस्कार :
      • १. सर्वोत्कृष्ट अभिनेता: उपेंद्र लिमये
      • २. सर्वोत्कृष्ट  पार्श्वगायक: हरिहरन
      • ३. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका: श्रेया घोषाल(जोगवा आणि अंतहीन (बंगाली)साठी)
      • ४. सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत : अजय-अतुल गोगावले
      • ५. सामाजिक विषयावरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट .

      • 'गंध' चित्रपटाच्या कथेसाठी  'सर्वोत्कृष्ट पटकथा ' पुरस्कार सचिन कुंडलकर यांना.
      • तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान परेश मोकाशी दिग्दर्शित 'हरीश्चंद्राची फॅक्टरी' ला मिळाला.  
      • सविस्तर यादीसाठी पुढे क्लीक करा .
       http://pib.nic.in/archieve/others/2010/jan/r2010012302.pdf
      _____________________________________________________
      प्रश्न :ब्रिटीश भारतीय चित्रपट 'स्लमडॉग मिलेनियर ' या चित्रपटातील संगीताला तीन ऑस्कर नामांकने मिळालेला पहिला भारतीय कोण?
      उत्तर : ए. आर.रेहमान 
      • विकास स्वरूप यांच्या 'क्यू अँड  ए ' या कादंबरीवर हा चित्रपट बेतलेला आहे.
      _____________________________________________________ प्रश्न :भारताच्या राष्ट्रीय उत्त्पन्नासंबंधी आकडेवारी गोळा करण्यासाठी 1949  मध्ये कोणती समिती नेमली होती?
      उत्तर : राष्ट्रीय उत्त्पन्न समिती
      • पी.सी.महालबोनीस  याचे अध्यक्ष होते तर डी.आर. गाडगीळ आणि व्ही.के.एन.व्ही. राव हे सदस्य होते.
      • अधिक माहिती हवी असल्यास पुढे क्लिक  करा. http://www.ier.hit-u.ac.jp/COE/Japanese/Newsletter/No.2.english/kojimae.htm 
      सूचना: हि वेबसाईट माहितीचा 'अधिकारिक(authentic)' स्त्रोत नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रकाशित केलेली उत्तरे अंतिम समजण्यात यावीत. 
       Read More »

       चालू घडामोडी 16 ऑगस्ट 2010

       प्रादेशिक :
       • बांधकाम महर्षी बाबुराव गोविंदराव ऊर्फ बी. जी. शिर्के यांचे निधन.
       • राज्याने  नक्षल प्रभावित भागासाठी १३८७ कोटीची वेगळी तरतूद केली आहे. 
       • राज्यात सध्या १२ हजार मेगावॅटपर्यंत वीज उपलब्ध.
       • महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागातर्फे देशातील 'प्रथम कामगार व्यवस्थापन प्रणाली' -'महाश्रम' सुरु.
       • उच्च न्यायालयात SMS सेवा सुरु.
        • नॅशनल इन्फॉरमेटीक सेंटरचे या कामी सहकार्य घेण्यात आले असून सीआयएन हा १४ डिजिट क्रमांक दाखल्याची माहिती उपलब्ध करुन देणार आहे.
       राष्ट्रीय  :
       • मेजर लैशराम ज्योतिनसिंग यांना अशोकचक्र. काबूलमध्ये भारतीय डॉक्टरांच्या पथकावर अतिरेक्यांनी चढविलेल्या हल्ल्याप्रसंगी प्राणांची आहुती देवून  शौर्य गाजविले.
        अशोकचक्र  - शांतताकाळातील सर्वोच्च वीरपदक.
       • कॅ. देविंदरसिंग आणि विनोद कुमार यांना कीर्तीचक्र. 
       • शोले चित्रपटाच्या प्रदर्शनाला ३५ वर्ष पूर्ण . १५ ऑगस्ट १९७५ ला प्रदर्शित झाला होता. दिग्दर्शक : रमेश सिप्पी
       • भारताचे 14 वे पंतप्रधान मनमोहनसिंग यांना दिलीच्या लाल किल्ल्यावरून 7 व्यांदा तिरंगा राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान मिळाला. आता ते 15 ऑगस्टला असा मान मिळवनारयांच्या   यादीत सर्व तृतीय आहेत . सर्वाधिक 17  वेळेस असा मान पंडित नेहरुंना मिळाला तर इंदिरा गांधीनी 16 वेळा ध्वजारोहण केले.
       आंतरराष्ट्रीय  :
       • 'अफगाण वार डायरी' हि अमेरिकेच्या लष्करचे अफगाण युद्धावरील गोपनीय कागदपत्रे  'लिक ' केल्याबद्दल चर्चेत असलेली वेबसाईट : विकीलीक्स (WikiLeaks).
        त्याचा संस्थापक अध्यक्ष आहे :  जुलिअन अस्संगे (Julian Assange )
       • भारत पाकिस्तानच्या पूरग्रस्तांसाठी ५0 लाख  अमेरिकन डॉलर्स (२ कोटी रु. हून अधिक )ची मदत करणार.
        युनो ने ४६०० लाख अमेरीकन डॉलर्स ची पाकिस्तानला मदतीची गरज आहे आणि ती जगाने करावी असे आवाहन केले होते त्या नंतर भारतने असा प्रतिसाद दिला. 
       • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सुटीवर असताना पनामा सिटी जवळील मेस्किकोच्या खाडीत पोहले. ब्रिटीश पेट्रोलियम कडून झालेल्या मोठ्या तेल गळतीनंतर समुद्र अजूनही सुरक्षित असल्याची भावना  नागरिकांमध्ये तयार करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले.   
       • नेपाळ देणार गौतम बुद्ध इंटरनशनल पीस अवार्ड (GBIPA). 17  मे 2011  ला लॉर्ड गौतम बुद्धांची 2555  वी जयंतीच्या निमित्ताने या पारितोषिकाचे वितरण होईल. त्या नंतर ते दर 5  वर्षांनी दिले जाईल. 1998  ला या पारितोषिकाची संकल्पना मांडण्यात आली तर 2002  मध्ये त्या विषयी घोषणा केली गेली. 


       चर्चेतील  पुस्तक :

       • 'इंडिया फॉर अ बिलियन रीझनस'   लेखक : अमित दासगुप्ता
        
        Read More »

        विक्रीकर निरीक्षक / सहाय्यक - मुख्य परीक्षा -2009

        विक्रीकर निरीक्षक / सहाय्यक - मुख्य परीक्षा -2009 (14 ऑगस्ट 2010 रोजी झालेल्या परीक्षेतील चालू घडामोडी/ सामान्यज्ञान विषयावरील प्रश्नांची संभाव्य उत्तरे - भाग 1
        महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रकाशित केलेली उत्तरे अंतिम समजण्यात यावीत. )
        प्रश्न : मुंबई हायकोर्टाने कोणत्या महासंचालकाची( Director General of  Police) नियुक्ती रद्द केली?
        उत्तर : ए. एन. रॉय (अनामी  नारायण  रॉय)
        • फेब्रुवारी 2008 मध्ये रॉय यांची राज्याचे डी.जी.पी. म्हणून केलेली नेमणूक इतर 3 अधिकाऱ्यांची सेवा जेष्ठता डावलून केली असल्या  कारणाने उच्च न्यायालयाने रद्द केली. त्या जागी राज्य सरकारने नंतर  एस.एस .विर्क यांची नेमणूक केली .विर्क यांच्या सेवा निवृत्तीनंतर ए. एन. रॉय यांची पुन्हा नेमणूक करण्यात आली होती.
        • 31 मे 2010 ला रॉय सेवा निवृत्ती झाले. सध्या या  पदावर डी. शिवानंदन आहेत.
        • भारत स्वतंत्र झाल्यानंतर तत्कालीन मुंबई प्रांताचे पहिले डी.जी.पी. होते श्री.नारायणराव मारुतराव कामटे तर महाराष्ट्र निर्मितीनंतर पहिले डी.जी.पी. होते श्री. के. नानावटी
        प्रश्न : ढगफुटीमुळे मुंबई येथे 26 जुलै 2005 रोजी 24 तासात _____मि.मी.इतका पाऊस झाला.
        उत्तर: 948
        • महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती निवारण विभागाच्या या http://mdmu.maharashtra.gov.in/ संकेतस्थळावर सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
        • सविस्तर माहितीसाठी हि लिंक क्लिक करा. http://mdmu.maharashtra.gov.in/pdf/Flood/statusreport.pdf
        • लेह मधील अलीकडेच झालेली ढगफुटी मोजायला दुर्दैवाने तेथे कोणतेहि उपकरण  नव्हते.
        • पाऊसाचे हे भीषण असे रूप बऱ्याच वेळ मेघगर्जना आणि गारपीट हि सोबत घेवून येते. साधारणत: प्रती तास 100 मि.मी.(3.94इंच ) पेक्षा जास्त पाऊस झाल्यास त्याला ढगफुटी म्हणतात.
        प्रश्न :केंद्रीय सागरी मस्त्यव्यवसाय संशोधन आणि मस्त्यव्यवसाय तंत्रज्ञान व्यवसाय संस्था कोठे आहे?
        उत्तर : कोचीन, केरळ

        प्रश्न :महाराष्ट्रामध्ये सन 2004-05 मध्ये भात पिकाखाली _____हजार हेक्टर क्षेत्र होते.
        उत्तर : 1509
        • केंद्रशासनाच्या सांख्यिकी विभागाकडून प्रसिध्द झालेली आकडेवारी तुम्ही येथे पाहू शकता.http://dacnet.nic.in/eands/APY_96_To_06_lattest.htm  
        प्रश्न : महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली?
        उत्तर :1 मे 1960
        प्रश्न :राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनचा (National Rural Health Mission) कालावधी ____आहे.
        उत्तर :2005-2012
        • ग्रामीण भारतातील आरोग्य सेवांच्या सुधारणेसाठी हे मिशन सुरु करण्यात आले असून याचा भर देशातील 18 राज्यांवर खास करून आहे (महाराष्ट्राचा या 18 राज्यात समावेश नाही ). आयुष (AYUSH ) चा वैकल्पिक उपचार पद्धती म्हणून विकास करणे आणि आशा (ASHA) या महिला आरोग्य कार्यकर्त्यांद्वारे या आरोग्य सेवेत सुधारणा घडवून आणणे हे या योजनेचे वेगळे वैशिष्ठ्य. 
        प्रश्न : २०१० मधील महिलांची ऑस्ट्रेलिअन एकेरी खुली स्पर्धा ______ने जिंकली.
        उत्तर :सेरेना विल्यम्स
        • सेरेना विल्यम्स हि २००९ चीही विजेती होती. विशेष म्हणजे महिला दुहेरीची लढत सुध्दा तिनेच जिंकली आणि तिची तेव्हा साथीदार होती तिची बहिण व्हीनस.
        • झिम्बाबेच्या कारा ब्लॅक सोबत लिएण्डर पेसने मिस्र दुहेरी जिंकली होती.  
        प्रश्न :भारत सरकारने 'नरेगा' चे नवीन नाव ______च्या नावाशी जोडण्याची घोषणा केली.
        उत्तर :महात्मा गांधी
        • नरेगा : नॅशनल रुरल इम्प्लायमेंट गरंटी स्कीम (राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ) 
        _______________________________________________________
        सूचना: हि वेबसाईट माहितीचा 'अधिकारिक(authentic)' स्त्रोत नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रकाशित केलेली उत्तरे अंतिम समजण्यात यावीत.
           Read More »

           चालू घडामोडी 15 ऑगस्ट 2010

           प्रादेशिक :

           • प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ आणि परम संगणकाचे जनक डॉ.विजय भटकर हे राज्याचे ई-गव्हर्नन्सचे धोरण ठरविणार.
           आंतरराष्ट्रीय:
           • श्रीलंकेचे माजी लष्करप्रमुख शरथ फोन्सेका यांची सुटका होणार पण पद, सर्व पदके आणि इतर सर्व बाबी त्यांच्याकडून काढून घेतल्यावर.
            • लिट्टे बरोबरच्या गृह युद्धात मायदेशाला निर्णायक विजय मिळून देणारे फोन्सेका यांना सिंहिली जनतेने आपला हिरो बनवले होते . श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजापक्सा यांची 6 वर्षांची 'टर्म ' खरे तर 2011ला संपत होती. पण प्रभाकरन चा खातमा झाल्यावर राजकीय हिशोब मांडून राजापक्सा यांनी 2 वर्ष आधीच राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची घोषणा केली. पण याच वेळी फोन्सेका यांचीही राजकीय महत्त्वाकांक्षा प्रबळ झाली. याच कालावधीत फोन्सेका सेवानिवृत्त झाले आणि त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक राजापास्का यांच्या विरुध्द अयशस्वीपणे लढवली. 
            • येथेच वादाची ठिणगी पडली. काही कालावधीने त्यांना देशविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. कालच कोर्ट मार्शल मध्ये त्यांना दोषी जाहीर करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर त्यांना कदाचित मोठ्या सजेला सामोरे जावे लागेल असे वाटत असताना श्रीलंका सरकारने त्यांना सोडून द्यायचे ठरवले पण अर्थातच या सेनापतीला घायाळ करूनच .
           • इराण लवकरच त्याची पहिली अणुभट्टी सुरु करतोय
            • अणुभट्टी चे नाव: बुशेहर (Bushehr )
            • रशिया इराणला या कमी सहयोग देत आहे .
            • रशियाच्या अणु उर्जा महामंडळाचे नाव 'रोसातोम(Rosatom)'
           क्रीडा :
           • मतभेद विसरून लिएण्डर पेस आणि महेश भूपती राष्ट्रकुल खेळासाठी एकत्र खेळणार .
            • ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारी पहिलीच भारतीय जोडी (१९९९ ची विम्बल्डन आणि फ्रेंच ओपन ).
            • महेश भूपती ग्रँड स्लॅम जिंकणारा पहिला भारतीय (१९९७ च्या फ्रेंच ओपन मध्ये त्याने जपानच्या रिका हिराकी सोबत मिश्र दुहेरीचे पदक मिळवले होते. )
            • लिएण्डर पेस - तब्बल १२ ग्रँड स्लॅम पदके (मिश्र आणि पुरुष दुहेरी मिळून )
           • भारतीय महिला हॉकी टीम ची कप्तान : सुरिंदर कौर
           आर्थिक 
           • बँक ऑफ राजस्थान आय.सी.आय.सी.आय मध्ये विलीन
           • पॅराशुट आणि सफोला ब्रँड चे निर्माते 'मारीको इंडस्ट्रीज 'यांनी द. आफ्रिकेतील कंपनी कडून 'इग्न्वे' (Ingwe) ब्रँड विकत घेतला.
            Read More »

            चालू घडामोडी 14 ऑगस्ट 2010

            प्रादेशिक:
            • २०११-२०१२ हे वर्ष  'महाराष्ट्र' पर्यटन वर्ष म्हणून साजरे करण्यात येईल.- राज्य शासनाचा निर्णय.
            • श्री संत गजानन महाराज , शेगाव जन्मशताब्दी महोत्सव दि. ९ सप्टेंबर २०१० ते १२ सप्टेंबर २०१० या कालावधीत साजरा होत आहे. 
            शैक्षणिक
            • जागतिक बौद्धिक परंपरेत मानाचे स्थान असलेल्या हार्वर्ड विद्यापीठाला फोर्ब्स बिलिऑनर युनिव्हर्सिटीच्या सूचीतही अग्रस्थान.
             • आपल्या विद्यार्थ्यांमधून तब्बल ६२ अब्जाधीश घडविणाऱ्या हार्वर्ड विद्यापीठाने ‘फोर्ब्स’ सूचीत प्रथम स्थानावर, तर २८ अब्जाधीश पदवीधरांसह स्टॅनफोर्ड विद्यापीठ दुसऱ्या स्थानावर .
             • सिटॅडलचे संस्थापक केनेथ ग्रिफिन आणि न्यूयॉर्कचे महापौर मायकेल ब्लूमबर्ग यांच्यासह तेल आणि बँकिंग क्षेत्रातील उद्योगपती जॉर्ज कैसर हे तिघेही अब्जाधीश हार्वर्डचे.
             • अपोलो मॅनेजमेंटचे लिऑन ब्लॅक ,ईबेच्या मेग व्हिटमन आणि ब्लॅकस्टोनच्या हॅमिल्टन जेम्स हि हार्वर्डचेच.
             • स्टॅनफोर्डमधून शिक्षण पूर्ण करणाऱ्या मान्यवर अब्जाधीशांमध्ये याहूचे सहसंस्थापक जेरी यांग आणि गुगलचे संस्थापक सर्जी बिन आणि लॅरी पेज यांची नावे अग्रक्रमाने घ्यावी लागतील. सन मायक्रोसिस्टीमचे सह-संस्थापक विनोद खोसला आणि गॅपचे अध्यक्ष रॉबर्ट फिशर हे कॅलिफोर्नियास्थित स्टॅनफोर्डचे वर्गमित्र. नाइकेचे संस्थापक फिलिप नाइट हे सुद्धा स्टॅनफोर्डचे.
             
             Read More »

             इस्रोची गरुड भरारी

             • 'ग्लोबल वॉर्मिंग'मुळे समुद्राच्या पातळीत मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त होत असताना ही वाढ नेमकी किती व कोठे होते आहे याचे अचूक निरीक्षण होणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) व फ्रान्सची राष्ट्रीय अवकाश संशोधन संस्था (सीएनईएस) संयुक्तरित्या 'सरल'  (SARAL) हा उपग्रह सोडणार आहेत. या उपग्रहाचे प्रक्षेपण पुढील वर्षी होणे अपेक्षित .
             • इस्रो च्या 'चान्द्रयानाने' चंद्रावर भारतीय ध्वज कधी फडकवला?
              • भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू , ज्यांच्या दूरदृष्टीमुळे भारताचा अंतरीक्ष कार्यक्रम आज हे स्वरूप घेवू शकला, त्यांच्या जयंतीच्या दिवशी (बाल दिनी ) 14 नोव्हेंबर 2008 ला भारतीय ध्वज चंद्रावर फडकला. 
             • इस्रोने 2009 मध्ये शोधलेले 3 सूक्ष्मजीव
              • १.जानीबॅक्टर हॉइली - फ्रेड हॉइल च्या स्मरणार्थ ( जयंत नारळीकर याच हॉइल यांचे शिष्य)
              • २.बॅसिल्लस इस्रोनेन्सीस- इस्रोने हे जीव शोधताना केलेल्या 'बलून एस्क्पीरीमेंट्स' च्या योगदानाबद्दल
              • ३.बॅसिल्लस आर्यभट - प्राचीन भारतीय शास्रज्ञ आणि भारताचा पहिला उपग्रह यांच्या नावाने. 
             • अंतरीक्ष कॉर्पोरेशन लिमिटेड (Antrix Corporation Limited ) हि भारत सरकारच्या आधिपत्याखाली काम करणारी खाजगी कंपनी म्हणून काम करते. हि कंपनी पूर्णपणे सरकाच्या मालकीची आहे. इस्रो ने संशोधन केलेल्या यंत्रणा आणि तंत्रज्ञान यांचे व्यापारीकरण करण्याची जबाबदारी यांच्यावर आहे.
             • मेघा-ट्रोपीक्स (Megha-Tropiques )
              • भारत - फ्रांस यांच्या संयुक्त प्रयत्नातून आकारात येत असलेला प्रगत असा हवामान विषयक उपग्रह आहे.
             • युथसॅट- भारत आणि रशिया यांच्या संयुक्त प्रयत्नातून आकारात येत असलेला उपग्रह .
             • गगन - जी.पी.एस ला पर्याय म्हणून तयार होत असलेली संपूर्ण भारतीय बनावटीची यंत्रणा. 'इंडिअन रिजनल नेव्हीगेशनल  सॅटेलाईट सिस्टम' (IRNSS) आहे.
              • जी.पी.एस हि अमेरिकीची यंत्रणा
              • चीनची - बेईदोउ (Beidou)
              • रशियाची ग्लोनास (GLONASS )
              • तर 'गॅलिलीलो' हि युरोपिअन युनिअन ची यंत्रणा आहे
             Read More »

             चालू घडामोडी 13 ऑगस्ट 2010

             जागतिक मानवता दिन: १९ ऑगस्ट
             जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन: १० सप्टेंबर

             राष्ट्रीय:
             • दिल्ली महाविद्यालयातून सुरु केलेली रॅगिंगविरोधात फलक आणि ग्राफिटीद्वारे संदेश देणारी बस 'बस-और नही' या अभियानाचा भाग .
             आरोग्य :
             • द. आशिया आणि ब्रिटन मधील रुग्णांच्या जीन्स मध्ये सापडला नवीन सुपरबग- 'New Delhi metallo-beta-lactamase' किंवा NDM-१.
              • NDM -१ चे वैशिष्ट -हा जीवाणूंची प्रतिकारक्षमता इतकी वाढवतो कि ते कोणत्याही अँटिबायोटिक्सला दाद देत नाहीत. पाश्यात वैज्ञानिकांनी याचा दोष भारत, पाकिस्तान, बांगलादेश यांना दिला आहे.
              • अलीकडच्या काळात भारतातील चांगल्या परंतु तुलनेने खूपच स्वस्त वैद्यकीय सेवांमुळे 'वैद्यकीय पर्यटन '(Medical tourism) म्हणजे येथे येवून मोठे उपचार करून घेण्याचे प्रमाण वाढले होते. याचा परिणाम पाश्यात देशातील विशेषत: ब्रिटन मधील वैद्यकीय सेवेवर मोठ्या प्रमाणावर झाला होता. 
              • अँटिबायोटिक्सलाही दाद न देणाऱ्या सुपरबगमुळे निर्माण झालेला धोका व त्याच्याशी ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी भारताचा जोडलेला संबंध हा पूर्णपणे चुकीचा व तर्कशून्य असल्याचा भारताचा दावा.
              • वास्तविक नवा सुपरबग हा प्रकार पर्यावरणाशी संबंधित असून त्याचा संबंध एखाद्या देशाशी जोडण्याचा प्रकार दुर्दैवी आहे.
              • भारत हा देश वैद्यकीय पर्यटनासाठी पुढे येत असतानाच अशा प्रकारच्या बातम्या पसरविण्यात येणे ही दुर्दैवी बाब.
             विज्ञान - तंत्रज्ञान:
             • ओरॅकल (oracle) चा गुगलवर स्वामित्व भंग (patent violation) चा दावा.
              • गूगलने अलीकडेच मोबाईल फोनसाठी बाजारात आणलेल्या अंड्रोइड (Android) या संगणक प्रणाली (Operating system) मधील जावा तंत्रज्ञान वापरावरून हा वाद.
              • जानेवारीतच ओरॅकलने सन टेक्नोलॉजिज कडून जावा तंत्रज्ञान आणि इतर संबधित बाबींचा ताबा मिळवला होता. ओरॅकलच्या दाव्यानुसार गुगलने हे तंत्रज्ञान विनापरवाना वापरले आहे.

             आंतरराष्ट्रीय :
             • रवांडा (आफ्रिकेतील राष्ट्र ) चे राष्ट्राध्यक्ष पॉल कागमे (Paul Kagame ) पुन्हा निवडणूक जिंकले.
             • चीन मध्ये नवजात बालिकांच्या वक्षस्थळांची अनैसर्गिक वाढीला एका मिल्क पावडर (दुधाची भुकटी ) मधील हार्मोन्स वाढवणारे संप्रेरक असल्याचा संशय आल्याने चीन सरकारने चौकशीचे आदेश दिलेत - चर्चेतील कंपनी 'स्यनुत्र इंटरनॅशनल (Synutra International )' दुधभुकटीचे तब्बल ३५ % या कंपनीच्या  ताब्यात आहे. 
             • द. अमेरिकेतील पराग्वेचे राष्ट्राध्यक्ष , ज्यांना एका बालकाच्या पितृत्व दाव्यासाठी डी.एन.ए टेस्टला सामोरे जावे लागणार --->फर्नान्डो लुगो
               पर्यावरण :
             • पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक आदिवासींचे रक्षण यासाठी पेरू तील अमेझॉन खोऱ्यातील निवासी स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन करणार.
             • रशियामध्ये लागल्या वणव्यात चेर्नोबेल अणुभट्टीचा भागही आहे. त्यामुळे आता किरणोस्तर्गाचीही शंका.
              • 1986 ला झालेली रशियाच्या ब्र्यान्स्क (Bryansk)प्रांतातील चेर्नोबेलच्या अणुभट्टीतील अपघात हा आजवरची मानवनिर्मित सर्वात मोठी दुर्घटना मानली जाते.
              करमणूक:
              माणसाची खरी ओळख आहे त्याचा देश. मला भावलेला यु ट्यूब व्हिडीओ
              राष्ट्रगीताचा सन्मान करा.
              http://www.youtube.com/watch?v=7sn40JvmglE&feature=related
              Read More »

              चालू घडामोडी 12 ऑगस्ट 2010

              • 2611
               राष्ट्रीय आपत्ती च्या वेळी सर्व यंत्रणाना एकत्रित आणि सुनियोजितपणे देशभर काम करता यावे म्हणून 100,101 या नंबरच्या धर्तीवर देशभर आणि सर्व टेलिफोन ऑपरेटर्स साठी एकच एक क्रमांक वापरला जावा असा प्रस्ताव.
               पुण्याचे शास्रज्ञ दिनकर बोर्डे यांनी अश्या स्वरूपाचा प्रस्ताव केंद्रीय गृहविभागाच्या पोलीस संशोधन आणि विकास या उपविभागाकडे पाठवला आहे.
               2611 च्या मुंबई वरील दहशतवादी हल्ल्यामुळे हा क्रमांक लक्षात ठेवणे सोपे जाईल.
                
              • कागदी नोटांचे कमी आयुष्यमान पाहून रिझर्व्ह बँक प्लॅस्टिकच्या नोटा लवकरच बाजारात आणण्याच्या प्रयत्नात आहे. चालू वर्षअखेरपर्यंत १० रुपयांची प्लॅस्टिकची नोट चलनात येईल, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर १० रुपयांची नोट बाजारात आणली जाईल. त्याला मिळालेल्या प्रतिसादानंतर २० आणि ५० रुपयांची नोटही प्लॅस्टिक स्वरुपात चलनात येईल. सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाने प्लॅस्टिकच्या नोटांचा वापर सुरू केला. सध्या न्यूझीलंड, श्रीलंका, मलेशिया, हॉँगकॉँगसारख्या देशांमध्ये सध्या प्लॅस्टिकच्या नोटा चलनात आहेत. त्याठिकाणी नोटांच्या छपाईची पुरेशी क्षमता आहे. त्यामुळे या देशातून नोटा आयात करण्याचा विचार करण्यात आला होता. पण विचारविनीमयानंतर शेवटी देशातच या नोटांच्या निर्मितीचा निर्णय.
               .
              • जातीनिहाय जणगणनेस केंद्रीय मंत्रिगटाची मंजुरी.
               मंत्रिगटाचे प्रमुख: प्रणव मुखर्जी
              • भारतीय अभियंत्यांना जाचक असे विधेयक अमेरिकेच्या सिनेट मध्ये मांडण्यात आले. या नुसार अर्ध्याहून अधिक H1-B किंवा L-1 विसा असणारे कर्मचारी असलेल्या कंपन्यांना आर्थिक फटका बसेल.अमेरिकेच्या मेक्सिकोबरोबरिची सीमा सुरक्षा वाढवण्यासाठी लागणारा फंड उभा करण्यासाठी हे विधेयक आहे.
               भारताने याचा रीतसर निषेधही नोंदवला.
                
              Read More »

              युवा (उन्हाळी )ऑलम्पिक स्पर्धा 2010 सिंगापूर


               
              • पहिले युवा (उन्हाळी )ऑलम्पिक स्पर्धा सिंगापूर मध्ये 14 ते 26ऑगस्ट 2010 या कालावधीत होत आहेत. दर 4 वर्षांनी होवू घातलेली हि स्पर्धा 2014 मध्ये चीन मधील नानजिंग शहरात होणार.
              • याच धर्तीवर आधारलेली पहिली हिवाळी ऑलम्पिक स्पर्धा 2012 मध्ये ऑस्ट्रियाच्या इन्सब्रुक या शहरात होतील.
              • 2001 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समिती (IOC) चे तत्कालीन अध्यक्ष ज्ञक्क़ुएस रोग्गे (Jacques Rogge ) यांनी हि कल्पना मांडली होती.14 ते 18 वयोगटातील खेळाडूंसाठी या स्पर्धा आहेत.
              • युवा ऑलम्पिक स्पर्धा सिंगापूर स्पर्धा 2010 शुभंकर: ल्यो आणि मेर्ली
              • 1998 ला मॉस्को (रशिया)त झालेल्या 'वर्ल्ड युथ गेम्स ' चे हे प्रगत रूप आहे.
              Read More »

              चालू घडामोडी 11 ऑगस्ट 2010

              प्रादेशिक

              • नगरपालिका व महानगर पालिका क्षेत्रात शहरी वाहतुकीसाठी व तसेच एसटीच्या आगारांचा बीओटी तत्त्वावर विकास करण्यासाठी अर्बन ट्रान्स्पोर्ट ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनी स्थापन होणार .
              • विद्यापीठांच्या विभाजनाबाबत निर्णय घेण्यासाठी डॉ. राम ताकवले समिती
              • 1994 च्या विद्यापीठ सुधारणा कायद्यात सुधारणा करण्यासाठी अरुण निगवेकर समिती.
              पर्यावरण
              •  मुंबईतील तेलगळतीच्या अनुषंगाने काही बाबी:
               • ही तेल गळती जैवविविधतेला हानी पोहचवण्याची शक्यता .
               • भारताचे क्षेत्रफळ : हे जागतिक उपलब्ध भूमीच्या 2.4 %
               • पण भारतातील जैवविविधता जगाच्या 8 %.
               • भारत जगातील 12 बहुजैवविविध (Megabiodiversity regions) क्षेत्रात मोजला जातो. 
               • भारतात 89 राष्ट्रीय उद्याने आणि 15 'बायोस्फिअर रिझर्व ' आहेत.
               • 1 ला बायोस्फिअर रिझर्व निलगिरी येथे 1986 मध्ये स्थापन झाला.
               • सुंदरबन, मन्नारचे आखात आणि अगस्थीमलाई या ३ बायोस्फिअर रिझर्व मध्ये UNESCO (युनिस्को)कडून सुधारणा केली जाते. 
              राष्ट्रीय
              • देशाला हादरविणाऱ्या आरुषी तलवार हत्याकांडाच्या तपासासाठी सी.बी.आय. आता घेतेय स्कॉटलंड यार पोलिसांची मदत.
               • आरुषीच्या वडिलांच्या गोल्फ किट ची 'एल सी एन (low copy number) डी.एन.ए प्रोफिलिंग' करण्यासाठी हि मदत घेतली जात आहे. 
              • द्विस्तरीय पंचायतराज सध्या खालील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहे:
               • दादरा आणि नगर हवेली
               • दमण आणि दीउ
               • गोवा
               • लक्षद्वीप
               • मणिपूर
               • सिक्कीम
               • पदूचेररी
               • जम्मू आणि काश्मीर मध्ये त्या राज्याचा स्वतंत्र असा पंचायतराज कायदा आहे.
               • शिवाय घटनेच्या 243(M) या कलमानुसार   नागालंड , मणिपूर, मिझोरम मधील 6 व्या परिशिष्टात नमूद केलेल्या भागात आणि मणिपूरच्या पहाडी भागाला पंचायतराज कायद्याच्या घटनादुरुस्तीतून (73 वी ) वगळण्यात आले आहे. 
               • ७३व्या  घटनादुरुस्तीने त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था तयार करणे बंधनकारक. अपवाद फक्त २० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेले राज्य/केंद्रशासित प्रदेश आणि ६ व्या परीशिष्टातील अनुसूचित भूभाग .
               • झारखंड आणि जम्मू काश्मीर मध्ये अद्यापही पंचायतराजच्या निवडणुका झालेल्या नाहीत.
              आंतरराष्ट्रीय
              •  अफगाणीस्तानातील हल्ल्यात सामान्य नागरिकांच्या मृत्यूत मोठी वाढ - युनो चा अहवाल.
               • 2010 च्या जानेवारी ते जुन पर्यंत 1250 सामान्य नागरिकांचा बळी. हि वाढ तब्बल 31 %. 
               • मारले गेलेल्यात 176 लहान मुले.
               • तालिबानला मात्र हा रिपोर्ट मान्य नाही.

              • जपानने द. कोरियाची मागितली माफी.
               • 1910 ते 1945 या काळात कोरिया हि जपानची वसाहत होती. 
               • या साम्राज्यवादी भूत काळासाठी जपानकडून  वारंवार दिलगिरी व्यक्त.   
               • द. कोरिया जपानकडून मुक्त झाला : 15 ऑगस्ट 1945 ला.
               • जपानचे पंतप्रधान :नओतो कान (Naoto Kan)
              पुस्तक:
              • ‘ए जर्नी फॉरेव्हर: इंस्किलार अ‍ॅन्ड अदर स्टोरीज्’ -मराठीतील प्रख्यात कथालेखक जी. ए. कुलकर्णी यांच्या निवडक 14 कथांच्या इंग्रजी अनुवाद
               • अनुवादक:डॉ. विलास साळुंके
              Read More »

              चालू घडामोडी 10 ऑगस्ट 2010

              विज्ञान आणि तंत्रज्ञान
              • सध्या चर्चेत असलेले  ब्लॅक बेरी फोन तयार करणारी कंपनी: रिम (RIM : रीसर्च इन मोशन - कॅनडा ची कंपनी. )
              • भारत हा एकमेव विकसनशील देश आहे ज्याच्याजवळ स्वत:चे हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी उपयुक्त असलेले भूस्थिर उपग्रह (Geostationary  satellite) आहेत . 
              • भारतात 7 मुख्य वेधशाळा आहेत . त्या पैकी 3 महाराष्ट्रात आहेत - पुणे, मुंबई आणि नागपूर. 
              • भारतात  आजपर्यंत 100  स्वयंचलित (ऑटोमॅटिक ) वेदर स्टेशन्स आहेत . पैकी राज्यात 12 आहेत .- राहुरी, कुलाबा,सांताक्रुझ,मुरुड,दापोली, देवगड, महाबळेश्वर,पुणे ,राजगुरुनगर, पाषाण , नाशिक, नागपूर .

              राष्ट्रीय:
              • केंद्र सरकार ओ.एन.जी.सी. मधील 5% समभाग विकणार.
               • सरकारचा या कंपनीतील हिस्सा सध्याच्या 74.14% वरून 69.14% वर येणार.
               • ओ.एन.जी.सी.= ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन.
               • शिवाय आई.ओ.सी.(इंडिअन अँड कंपनी ) तील 10% समभाग हि विकणार आहे.
              • भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार उघडकीस आणणा-यांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या प्रस्तावित 'पब्लिक इंटरेस्ट डिसक्लोझर अँड प्रोटेक्शन टू पर्सन्स मेकिंग द डिसक्लोजर बिल 2010' विधेयकाला सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी 


              पर्यावरण:
              • मुंबईत अरबीसमुद्राच्या किनार्‍या जवळ एमएससी चित्रा आणि एमव्ही खलिजा-111 या दोन जहाजांत झालेल्या धडकेनंतर समुद्रात तेलगळती.
               • काही दिवसांपूर्वी अमेरीकेजवळच्या मेक्सिकोच्या आखातात तेलगळती झाली होती . जबाबदार असलेली कंपनी होती : B.P अर्थात ब्रिटीश पेट्रोलियम. 
              • मध्यप्रदेश शासनाची व्याघ्र दर्शन योजना टीकेच्या केंद्रस्थानी.
               • चर्चेतील अभयारण्य :  बांधवगड अभयारण्य ( मध्यप्रदेश )
              आंतरराष्ट्रीय:
              • एलेना कगान (Elena Kagan) यांचा अमेरिकेतील सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश म्हणून शपथविधी झाला. या पदावरील त्या 4थ्या महिला.
               • सोनिया सोटोमयोर या गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये या पदावर विराजमान झाल्या. त्या 3 ऱ्या महिला न्यायाधीश होत्या.)
               • (भारतात आता पर्यंत सर्वोच्च न्यायालयात 4 महिलांनी न्यायाधीश म्हणून काम पाहीले आहे. यांपैकी 'ग्यान सुधा मिश्रा' या सध्याही कार्यरत आहेत.त्या पूर्वी झारखंड उच्च न्यायालयात न्यायाधीश होत्या.
               • पहिल्या महिला न्यायाधीश: फातिमा बीबी.
               • त्याशिवाय सुजाता मनोहर, आणि रुमा पॉल  यांनी न्यायाधीश म्हणून काम पाहिले. )
              Read More »

              चालू घडामोडी 9 ऑगस्ट 2010

              प्रादेशिक  
              'पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम 'योजनाच्या संबधित काही महत्वाच्या बाबी:
              • भौतिक (Physical), सामाजिक (Social) व उत्पन्न साधने (Livelyhood) या तीन क्षेत्रात लोकांच्या पुढाकाराने, प्रशासनच्या मदतीने विकास अपेक्षित.
              • अंमलबजावणी तालुका पातळीवर पंचायत समिती तर जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद करणार. हि योजना ग्रामविकास खात्याची आहे.
              • योजनेचे निकष:
              १. अ) वृक्ष लागवड ब) वृक्ष संवर्धन
              २. हगणदारीमुक्त
              ३. कर वसुली (घरपट्टी,पाणीपट्टी)
              ४.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान
              ५.यशवंत पंचायत राज अभियान
              ६.अपारंपारिक उर्जा
              ७.घनकचरा व्यवस्थापन
              ८. सांडपाणी व्यवस्थापन
              • देशात पंचायतराज मध्ये सर्व प्रथम महिलांना आरक्षण देणारे राज्य महाराष्ट्र.
              राष्ट्रीय

              •  RTE ( Right To Education ) शिक्षणाचा मुलभूत अधिकार विधेयकाची अमलबजावणी करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रायालाला पुढील 3 वर्षात मिळणार 2,31,000 कोटी रुपये.
              • गुजरात सरकारने वीज वितरणातील गळती थांबवण्यासाठी सुरु केलेली योजना: ज्योतिग्राम
              आंतरराष्ट्रीय:
              • 6 ऑगस्ट रोजी हिरोशिमा वरील अमेरिकेने केलेल्या बॉम्ब हल्ल्याला 65 वर्षे पूर्ण झाली.त्यानिमित्ताने झालेल्या श्रद्धांजली सभेस त्यावेळी अमेरिकेतर्फे जॉन रूस हे राजदूत उपस्थित होते.

               # 6 ऑगस्ट 1945 ला झालेल्या बॉम्ब हल्ल्यात 140000 जणांचा मृत्यू. बॉम्ब चे नाव: लिटल बॉय (Little Boy) - रूसवेल्ट या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवरून  
               # तर 9 ऑगस्ट 1945 ला नागासाकी वर झालेल्या हल्ल्यात
               80,000 जणांचा बळी. नागासाकीवर वापरलेला बॉम्ब: Fat Man
               # जपानने 15 ऑगस्टला शरणागती पत्करली.
              क्रीडा
              •  तेजस्विनी सावंत जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक.
                       स्थळ : म्युनिक (जर्मनी)
                       50 मीटर रायफल प्रोन प्रकारात विश्वविक्रमाची बरोबरी करीत ऐतिहासिक
                       कामगिरी
                       ( तिने बरोबरी केली ती रशियाच्या मरीना बोब्कोवाच्या आधीच्या विक्रमाशी.)
                       विश्वविक्रम करणारी ती पहिलीच भारतीय महिला नेमबाज
              • संतोष कप - (फुटबॉल मधील राष्ट्रीय स्तरावरची प्रतीष्टीत ट्रॉफी) प. बंगाल ने जिंकला.
              Read More »

              PSI पूर्व परीक्षा -चालू घडामोडीवरील प्रश्नोत्तरे -भाग 1

              २० जून 2010 ला झालेल्या PSI पूर्व परीक्षेतील चालू घडामोडीवरील प्रश्नांची उत्तरे व त्या अनुषंगाने इतर माहिती ( भाग -1 )
              • आय.पी.एल 2009 चा विजेता संघ कोणता? ---> डेक्कन चार्जर्स हैदराबाद
                      आय.पी.एल 2008 चा विजेता --> राजस्थान रॉयल्स
                      आय.पी.एल 2010 चा विजेता --> चेन्नई सुपरकिंग्स
               • आशिया खंडातील सर्वात लांब रेल्वे बोगदा या जिल्यात आहेत?--> रत्नागिरी (करबुडे :लांबी 6 .5 कि.मी.)
               • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची करणे शोधण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष -->डॉ. नरेंद्र जाधव 
               • राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषणा :-->डॉल्फिन
               • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे--> नाशिक
               • (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ : नागपूर ;
                कर्मयोगी गाडगे महाराज विद्यापीठ : अमरावती ;
                स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ: नांदेड)
               • दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष : मंगेश पाडगावकर
                (ठिकाण :दुबई )
                तिसरे लंडन येथे होणार आहे. 
               • भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार : शिव शंकर मेनन (4 थे सुरक्षा सल्लागार)
                या पूर्वी एम. के. नारायणन होते. ते सध्या प. बंगालचे राज्यपाल आहेत .
               • स्वाईन फ्लू ची साथ 2009 मध्ये सर्वप्रथम कोणत्या देशात सुरु झाली..> मेक्सिको
                स्वाईन फ्लू --> H1N1
                बर्ड फ्लू --- > H5N1
               •  स्वाईन फ्लचा  भारतातील पहिला रुग्ण कोठे सापडला -->हैदराबाद


               • कानू सन्याल कशाशी संबधित होते?---> कष्टकरी -कामगार चळवळ (साम्यवादी विचारसरणीचे कानू सन्याल हे नक्षलबारी येथील उठावाचे प्रमुख नेते होते . हीच चळवळ पुढे नक्षलवादी चळवळ बनली. त्यांनी अलीकडेच आत्महत्या केली .)
               • भोपाळ येथील कारखान्यातील मिथिल आयसो साईनाईड च्या विषारी वायुगळतीमुळे हजारोंचे बळी गेले.
                (1984 ला झालेली दुर्घटना. संबधित कंपनी: युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड .- कीटकनाशक बनवारणी कंपनी .
                प्रमुख :वार्रेन अंडरसन)
               •   हॉकी विश्वचषक सलामी सामन्यात ......या खेळाडूवर 3 सामन्यांची बंदी घातली गेली --> शिवेंद्र सिंग
                (हॉकी विश्वचषक स्पर्धा संपन्न झाली : नवी दिल्ली येथे.
                भारताचे स्थान : 8 वे.
                विजेता संघ : ऑस्ट्रेलिया; उपविजेता संघ: जर्मनी )
               Read More »

               फिफा फुटबॉल वर्ल्ड कप 2010

               फिफा फुटबॉल वर्ल्ड कप 2010 (परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण नोंदी) :

               • स्पर्धा संपन्न झाली: द. आफ्रिकेत (आफ्रिका खंडातील पहिलीच स्पर्धा )
               • अंतिम सामना : सॉकर सिटी स्टेडीयम,जोहान्नेसबुर्ग, द. आफ्रिका
               • विजेता :स्पेन         उपविजेता :नेदरलंड         ३ रे स्थान : जर्मनी
               • गोल्डन बॉल अवार्ड : दिएगो फोर्लन (उरुग्वेचा खेडाळू) - स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू
               • गोल्डन बूट अवार्ड: थोमस मुल्लर (जर्मनी)

               • शुभंकर : झाकुमी 
               • स्पर्धेचे गीत: वाका वाका (Waka Waka ) - कोलंबियाची गायिका शकिरा हिने तयार केले.
               • स्पर्धेत वापरलेला चेंडू : जाबुलानी (निर्माता : आदिदास कंपनी ) या चेंडूवर बरीच टीका झाली.
               • वूवूझेला (Vuvuzela): : लांब शिंगासारखे मोठा आवाज असलेले वाद्य प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय .; मात्र बऱ्याच खेळाडूंनी एकाग्रता भंग होत असल्याचा आरोप केला.

               • 19 वी वर्ल्ड कप स्पर्धा
               • स्पेन पहिल्यांदाच विजेता .
               • सर्वाधिक विजेतेपदे: ब्राझील (एकूण 5 )
               • FIFA चे पूर्ण रूप: Fédération Internationale de Football Association 

               Read More »