Showing posts with label marathi current affairs. Show all posts
Showing posts with label marathi current affairs. Show all posts

Monday, August 16, 2010

चालू घडामोडी 16 ऑगस्ट 2010

प्रादेशिक :
 • बांधकाम महर्षी बाबुराव गोविंदराव ऊर्फ बी. जी. शिर्के यांचे निधन.
 • राज्याने  नक्षल प्रभावित भागासाठी १३८७ कोटीची वेगळी तरतूद केली आहे. 
 • राज्यात सध्या १२ हजार मेगावॅटपर्यंत वीज उपलब्ध.
 • महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागातर्फे देशातील 'प्रथम कामगार व्यवस्थापन प्रणाली' -'महाश्रम' सुरु.
 • उच्च न्यायालयात SMS सेवा सुरु.
  • नॅशनल इन्फॉरमेटीक सेंटरचे या कामी सहकार्य घेण्यात आले असून सीआयएन हा १४ डिजिट क्रमांक दाखल्याची माहिती उपलब्ध करुन देणार आहे.
राष्ट्रीय  :
 • मेजर लैशराम ज्योतिनसिंग यांना अशोकचक्र. काबूलमध्ये भारतीय डॉक्टरांच्या पथकावर अतिरेक्यांनी चढविलेल्या हल्ल्याप्रसंगी प्राणांची आहुती देवून  शौर्य गाजविले.
  अशोकचक्र  - शांतताकाळातील सर्वोच्च वीरपदक.
 • कॅ. देविंदरसिंग आणि विनोद कुमार यांना कीर्तीचक्र. 
 • शोले चित्रपटाच्या प्रदर्शनाला ३५ वर्ष पूर्ण . १५ ऑगस्ट १९७५ ला प्रदर्शित झाला होता. दिग्दर्शक : रमेश सिप्पी
 • भारताचे 14 वे पंतप्रधान मनमोहनसिंग यांना दिलीच्या लाल किल्ल्यावरून 7 व्यांदा तिरंगा राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान मिळाला. आता ते 15 ऑगस्टला असा मान मिळवनारयांच्या   यादीत सर्व तृतीय आहेत . सर्वाधिक 17  वेळेस असा मान पंडित नेहरुंना मिळाला तर इंदिरा गांधीनी 16 वेळा ध्वजारोहण केले.
आंतरराष्ट्रीय  :
 • 'अफगाण वार डायरी' हि अमेरिकेच्या लष्करचे अफगाण युद्धावरील गोपनीय कागदपत्रे  'लिक ' केल्याबद्दल चर्चेत असलेली वेबसाईट : विकीलीक्स (WikiLeaks).
  त्याचा संस्थापक अध्यक्ष आहे :  जुलिअन अस्संगे (Julian Assange )
 • भारत पाकिस्तानच्या पूरग्रस्तांसाठी ५0 लाख  अमेरिकन डॉलर्स (२ कोटी रु. हून अधिक )ची मदत करणार.
  युनो ने ४६०० लाख अमेरीकन डॉलर्स ची पाकिस्तानला मदतीची गरज आहे आणि ती जगाने करावी असे आवाहन केले होते त्या नंतर भारतने असा प्रतिसाद दिला. 
 • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सुटीवर असताना पनामा सिटी जवळील मेस्किकोच्या खाडीत पोहले. ब्रिटीश पेट्रोलियम कडून झालेल्या मोठ्या तेल गळतीनंतर समुद्र अजूनही सुरक्षित असल्याची भावना  नागरिकांमध्ये तयार करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले.   
 • नेपाळ देणार गौतम बुद्ध इंटरनशनल पीस अवार्ड (GBIPA). 17  मे 2011  ला लॉर्ड गौतम बुद्धांची 2555  वी जयंतीच्या निमित्ताने या पारितोषिकाचे वितरण होईल. त्या नंतर ते दर 5  वर्षांनी दिले जाईल. 1998  ला या पारितोषिकाची संकल्पना मांडण्यात आली तर 2002  मध्ये त्या विषयी घोषणा केली गेली. 


चर्चेतील  पुस्तक :

 • 'इंडिया फॉर अ बिलियन रीझनस'   लेखक : अमित दासगुप्ता
 

  Friday, August 13, 2010

  चालू घडामोडी 13 ऑगस्ट 2010

  जागतिक मानवता दिन: १९ ऑगस्ट
  जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन: १० सप्टेंबर

  राष्ट्रीय:
  • दिल्ली महाविद्यालयातून सुरु केलेली रॅगिंगविरोधात फलक आणि ग्राफिटीद्वारे संदेश देणारी बस 'बस-और नही' या अभियानाचा भाग .
  आरोग्य :
  • द. आशिया आणि ब्रिटन मधील रुग्णांच्या जीन्स मध्ये सापडला नवीन सुपरबग- 'New Delhi metallo-beta-lactamase' किंवा NDM-१.
   • NDM -१ चे वैशिष्ट -हा जीवाणूंची प्रतिकारक्षमता इतकी वाढवतो कि ते कोणत्याही अँटिबायोटिक्सला दाद देत नाहीत. पाश्यात वैज्ञानिकांनी याचा दोष भारत, पाकिस्तान, बांगलादेश यांना दिला आहे.
   • अलीकडच्या काळात भारतातील चांगल्या परंतु तुलनेने खूपच स्वस्त वैद्यकीय सेवांमुळे 'वैद्यकीय पर्यटन '(Medical tourism) म्हणजे येथे येवून मोठे उपचार करून घेण्याचे प्रमाण वाढले होते. याचा परिणाम पाश्यात देशातील विशेषत: ब्रिटन मधील वैद्यकीय सेवेवर मोठ्या प्रमाणावर झाला होता. 
   • अँटिबायोटिक्सलाही दाद न देणाऱ्या सुपरबगमुळे निर्माण झालेला धोका व त्याच्याशी ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी भारताचा जोडलेला संबंध हा पूर्णपणे चुकीचा व तर्कशून्य असल्याचा भारताचा दावा.
   • वास्तविक नवा सुपरबग हा प्रकार पर्यावरणाशी संबंधित असून त्याचा संबंध एखाद्या देशाशी जोडण्याचा प्रकार दुर्दैवी आहे.
   • भारत हा देश वैद्यकीय पर्यटनासाठी पुढे येत असतानाच अशा प्रकारच्या बातम्या पसरविण्यात येणे ही दुर्दैवी बाब.
  विज्ञान - तंत्रज्ञान:
  • ओरॅकल (oracle) चा गुगलवर स्वामित्व भंग (patent violation) चा दावा.
   • गूगलने अलीकडेच मोबाईल फोनसाठी बाजारात आणलेल्या अंड्रोइड (Android) या संगणक प्रणाली (Operating system) मधील जावा तंत्रज्ञान वापरावरून हा वाद.
   • जानेवारीतच ओरॅकलने सन टेक्नोलॉजिज कडून जावा तंत्रज्ञान आणि इतर संबधित बाबींचा ताबा मिळवला होता. ओरॅकलच्या दाव्यानुसार गुगलने हे तंत्रज्ञान विनापरवाना वापरले आहे.

  आंतरराष्ट्रीय :
  • रवांडा (आफ्रिकेतील राष्ट्र ) चे राष्ट्राध्यक्ष पॉल कागमे (Paul Kagame ) पुन्हा निवडणूक जिंकले.
  • चीन मध्ये नवजात बालिकांच्या वक्षस्थळांची अनैसर्गिक वाढीला एका मिल्क पावडर (दुधाची भुकटी ) मधील हार्मोन्स वाढवणारे संप्रेरक असल्याचा संशय आल्याने चीन सरकारने चौकशीचे आदेश दिलेत - चर्चेतील कंपनी 'स्यनुत्र इंटरनॅशनल (Synutra International )' दुधभुकटीचे तब्बल ३५ % या कंपनीच्या  ताब्यात आहे. 
  • द. अमेरिकेतील पराग्वेचे राष्ट्राध्यक्ष , ज्यांना एका बालकाच्या पितृत्व दाव्यासाठी डी.एन.ए टेस्टला सामोरे जावे लागणार --->फर्नान्डो लुगो
    पर्यावरण :
  • पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक आदिवासींचे रक्षण यासाठी पेरू तील अमेझॉन खोऱ्यातील निवासी स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन करणार.
  • रशियामध्ये लागल्या वणव्यात चेर्नोबेल अणुभट्टीचा भागही आहे. त्यामुळे आता किरणोस्तर्गाचीही शंका.
   • 1986 ला झालेली रशियाच्या ब्र्यान्स्क (Bryansk)प्रांतातील चेर्नोबेलच्या अणुभट्टीतील अपघात हा आजवरची मानवनिर्मित सर्वात मोठी दुर्घटना मानली जाते.
   करमणूक:
   माणसाची खरी ओळख आहे त्याचा देश. मला भावलेला यु ट्यूब व्हिडीओ
   राष्ट्रगीताचा सन्मान करा.
   http://www.youtube.com/watch?v=7sn40JvmglE&feature=related

   Wednesday, August 11, 2010

   चालू घडामोडी 11 ऑगस्ट 2010

   प्रादेशिक

   • नगरपालिका व महानगर पालिका क्षेत्रात शहरी वाहतुकीसाठी व तसेच एसटीच्या आगारांचा बीओटी तत्त्वावर विकास करण्यासाठी अर्बन ट्रान्स्पोर्ट ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनी स्थापन होणार .
   • विद्यापीठांच्या विभाजनाबाबत निर्णय घेण्यासाठी डॉ. राम ताकवले समिती
   • 1994 च्या विद्यापीठ सुधारणा कायद्यात सुधारणा करण्यासाठी अरुण निगवेकर समिती.
   पर्यावरण
   •  मुंबईतील तेलगळतीच्या अनुषंगाने काही बाबी:
    • ही तेल गळती जैवविविधतेला हानी पोहचवण्याची शक्यता .
    • भारताचे क्षेत्रफळ : हे जागतिक उपलब्ध भूमीच्या 2.4 %
    • पण भारतातील जैवविविधता जगाच्या 8 %.
    • भारत जगातील 12 बहुजैवविविध (Megabiodiversity regions) क्षेत्रात मोजला जातो. 
    • भारतात 89 राष्ट्रीय उद्याने आणि 15 'बायोस्फिअर रिझर्व ' आहेत.
    • 1 ला बायोस्फिअर रिझर्व निलगिरी येथे 1986 मध्ये स्थापन झाला.
    • सुंदरबन, मन्नारचे आखात आणि अगस्थीमलाई या ३ बायोस्फिअर रिझर्व मध्ये UNESCO (युनिस्को)कडून सुधारणा केली जाते. 
   राष्ट्रीय
   • देशाला हादरविणाऱ्या आरुषी तलवार हत्याकांडाच्या तपासासाठी सी.बी.आय. आता घेतेय स्कॉटलंड यार पोलिसांची मदत.
    • आरुषीच्या वडिलांच्या गोल्फ किट ची 'एल सी एन (low copy number) डी.एन.ए प्रोफिलिंग' करण्यासाठी हि मदत घेतली जात आहे. 
   • द्विस्तरीय पंचायतराज सध्या खालील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहे:
    • दादरा आणि नगर हवेली
    • दमण आणि दीउ
    • गोवा
    • लक्षद्वीप
    • मणिपूर
    • सिक्कीम
    • पदूचेररी
    • जम्मू आणि काश्मीर मध्ये त्या राज्याचा स्वतंत्र असा पंचायतराज कायदा आहे.
    • शिवाय घटनेच्या 243(M) या कलमानुसार   नागालंड , मणिपूर, मिझोरम मधील 6 व्या परिशिष्टात नमूद केलेल्या भागात आणि मणिपूरच्या पहाडी भागाला पंचायतराज कायद्याच्या घटनादुरुस्तीतून (73 वी ) वगळण्यात आले आहे. 
    • ७३व्या  घटनादुरुस्तीने त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था तयार करणे बंधनकारक. अपवाद फक्त २० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेले राज्य/केंद्रशासित प्रदेश आणि ६ व्या परीशिष्टातील अनुसूचित भूभाग .
    • झारखंड आणि जम्मू काश्मीर मध्ये अद्यापही पंचायतराजच्या निवडणुका झालेल्या नाहीत.
   आंतरराष्ट्रीय
   •  अफगाणीस्तानातील हल्ल्यात सामान्य नागरिकांच्या मृत्यूत मोठी वाढ - युनो चा अहवाल.
    • 2010 च्या जानेवारी ते जुन पर्यंत 1250 सामान्य नागरिकांचा बळी. हि वाढ तब्बल 31 %. 
    • मारले गेलेल्यात 176 लहान मुले.
    • तालिबानला मात्र हा रिपोर्ट मान्य नाही.

   • जपानने द. कोरियाची मागितली माफी.
    • 1910 ते 1945 या काळात कोरिया हि जपानची वसाहत होती. 
    • या साम्राज्यवादी भूत काळासाठी जपानकडून  वारंवार दिलगिरी व्यक्त.   
    • द. कोरिया जपानकडून मुक्त झाला : 15 ऑगस्ट 1945 ला.
    • जपानचे पंतप्रधान :नओतो कान (Naoto Kan)
   पुस्तक:
   • ‘ए जर्नी फॉरेव्हर: इंस्किलार अ‍ॅन्ड अदर स्टोरीज्’ -मराठीतील प्रख्यात कथालेखक जी. ए. कुलकर्णी यांच्या निवडक 14 कथांच्या इंग्रजी अनुवाद
    • अनुवादक:डॉ. विलास साळुंके

   Monday, August 9, 2010

   चालू घडामोडी 9 ऑगस्ट 2010

   प्रादेशिक  
   'पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम 'योजनाच्या संबधित काही महत्वाच्या बाबी:
   • भौतिक (Physical), सामाजिक (Social) व उत्पन्न साधने (Livelyhood) या तीन क्षेत्रात लोकांच्या पुढाकाराने, प्रशासनच्या मदतीने विकास अपेक्षित.
   • अंमलबजावणी तालुका पातळीवर पंचायत समिती तर जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद करणार. हि योजना ग्रामविकास खात्याची आहे.
   • योजनेचे निकष:
   १. अ) वृक्ष लागवड ब) वृक्ष संवर्धन
   २. हगणदारीमुक्त
   ३. कर वसुली (घरपट्टी,पाणीपट्टी)
   ४.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान
   ५.यशवंत पंचायत राज अभियान
   ६.अपारंपारिक उर्जा
   ७.घनकचरा व्यवस्थापन
   ८. सांडपाणी व्यवस्थापन
   • देशात पंचायतराज मध्ये सर्व प्रथम महिलांना आरक्षण देणारे राज्य महाराष्ट्र.
   राष्ट्रीय

   •  RTE ( Right To Education ) शिक्षणाचा मुलभूत अधिकार विधेयकाची अमलबजावणी करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रायालाला पुढील 3 वर्षात मिळणार 2,31,000 कोटी रुपये.
   • गुजरात सरकारने वीज वितरणातील गळती थांबवण्यासाठी सुरु केलेली योजना: ज्योतिग्राम
   आंतरराष्ट्रीय:
   • 6 ऑगस्ट रोजी हिरोशिमा वरील अमेरिकेने केलेल्या बॉम्ब हल्ल्याला 65 वर्षे पूर्ण झाली.त्यानिमित्ताने झालेल्या श्रद्धांजली सभेस त्यावेळी अमेरिकेतर्फे जॉन रूस हे राजदूत उपस्थित होते.

    # 6 ऑगस्ट 1945 ला झालेल्या बॉम्ब हल्ल्यात 140000 जणांचा मृत्यू. बॉम्ब चे नाव: लिटल बॉय (Little Boy) - रूसवेल्ट या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवरून  
    # तर 9 ऑगस्ट 1945 ला नागासाकी वर झालेल्या हल्ल्यात
    80,000 जणांचा बळी. नागासाकीवर वापरलेला बॉम्ब: Fat Man
    # जपानने 15 ऑगस्टला शरणागती पत्करली.
   क्रीडा
   •  तेजस्विनी सावंत जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक.
            स्थळ : म्युनिक (जर्मनी)
            50 मीटर रायफल प्रोन प्रकारात विश्वविक्रमाची बरोबरी करीत ऐतिहासिक
            कामगिरी
            ( तिने बरोबरी केली ती रशियाच्या मरीना बोब्कोवाच्या आधीच्या विक्रमाशी.)
            विश्वविक्रम करणारी ती पहिलीच भारतीय महिला नेमबाज
   • संतोष कप - (फुटबॉल मधील राष्ट्रीय स्तरावरची प्रतीष्टीत ट्रॉफी) प. बंगाल ने जिंकला.

   Sunday, August 8, 2010

   चालू घडामोडी 8 ऑगस्ट 2010

   प्रादेशिक 

   • मानव विकास मिशन व जिल्हा परिषद गडचिरोलीच्या शिक्षण विभागामार्फत संयुक्तरित्या ई-विद्या प्रकल्प स्थापन.
   • स्पेन येथील जगविख्यात जिब्राल्टर खाडी पोहणारा पहिला आदिवासी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सुखदेव धुर्वे.
   • पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेकरिता दरवर्षी किमान 332  कोटी रूपये इतका खर्च अपेक्षित .
   • माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे  'महा-आयटी-राष्ट्र' या न्यूज लेटर प्रकाशित. दर महिन्याला प्रसिद्ध होणार्‍या या न्यूज लेटरमध्ये शासनाच्या विविध विभागांनी ई-गव्हर्नन्स क्षेत्रात केलेल्या वैविध्यपूर्ण कामांची माहिती देण्यात येणार.
   • मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय झाले 125 वर्षांचे.
   • वन विभागाने या वर्षी 10  कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे.
   • पुण्यातील यशदा येथे ग्रामविकास व जलसंधारण विभागाद्वारे आयोजित पंचायत महिला शक्ती अभियान या पंचायत संस्थांमधील निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषद अलीकडेच संपन्न.
   राष्ट्रीय 
   • तामिळनाडूत मंदिरात श्रद्धाळूंना हत्तीकडून आशिर्वाद देण्यास प्रतिबंध.
   • भारताकडून बांगलादेशला 1 अब्ज अमेरिकन डोल्लरचे कर्ज.
   • भारतातील 75 % काजुंचे उत्पादन केरळात होते.
   • देशातील जंगलांच्या विस्तारीकरणासाठी नियोजित आहे 'ग्रीन इंडिया मिशन' .
   • दूरदर्शन 2013 पर्यंत डीजीटल करण्याची ट्रायची शिफारस पाळू शकणार नाही.
    प्रसारभारती 2017 पर्यंत पूर्णपणे डीजीटल होणार.
    ट्राय- TRAI - टेलीकॉम रेगुलेटरी ऑथरिटी ऑफ इंडिया
   आंतरराष्ट्रीय
   • सागरी सहकार्य परिषद श्रीलंकेत संपन्न. 
   • केनियाने स्वीकारली नवीन राज्यघटना. 
   • जुआन मनुएल सांतोस (Juan Manuel Santos ) कोलोम्बियाचे नवीन अध्यक्ष. 
   • Hewlett Packard या आघाडीच्या software कंपनी चे सि.इ.ओ. मार्क  हुर्ड, यांचा लैंगिक छळवणुकीचे आरोप झाल्यामुळे पदाचा राजीनामा.
   विज्ञान तंत्रज्ञान
   • रोबोनाट- २( Robonaut 2 ) हा मानवसदृश्य यंत्रमानव आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर दुरुस्तीला मदत करेल शिवाय तो त्याचे अनुभव ट्वीटर वर ट्वीट करेल.

   Follow us by Email Absolutely FREE

   Share for Care

   If you LIKE what we are posting here, please share it on your Facebook page. Just copy the URL link and paste on your Facebook status update.
   आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
   You can share the links to this blog.

   हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत