Showing posts with label marathi current. Show all posts
Showing posts with label marathi current. Show all posts

Tuesday, August 10, 2010

चालू घडामोडी 10 ऑगस्ट 2010

विज्ञान आणि तंत्रज्ञान
 • सध्या चर्चेत असलेले  ब्लॅक बेरी फोन तयार करणारी कंपनी: रिम (RIM : रीसर्च इन मोशन - कॅनडा ची कंपनी. )
 • भारत हा एकमेव विकसनशील देश आहे ज्याच्याजवळ स्वत:चे हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी उपयुक्त असलेले भूस्थिर उपग्रह (Geostationary  satellite) आहेत . 
 • भारतात 7 मुख्य वेधशाळा आहेत . त्या पैकी 3 महाराष्ट्रात आहेत - पुणे, मुंबई आणि नागपूर. 
 • भारतात  आजपर्यंत 100  स्वयंचलित (ऑटोमॅटिक ) वेदर स्टेशन्स आहेत . पैकी राज्यात 12 आहेत .- राहुरी, कुलाबा,सांताक्रुझ,मुरुड,दापोली, देवगड, महाबळेश्वर,पुणे ,राजगुरुनगर, पाषाण , नाशिक, नागपूर .

राष्ट्रीय:
 • केंद्र सरकार ओ.एन.जी.सी. मधील 5% समभाग विकणार.
  • सरकारचा या कंपनीतील हिस्सा सध्याच्या 74.14% वरून 69.14% वर येणार.
  • ओ.एन.जी.सी.= ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन.
  • शिवाय आई.ओ.सी.(इंडिअन अँड कंपनी ) तील 10% समभाग हि विकणार आहे.
 • भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार उघडकीस आणणा-यांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या प्रस्तावित 'पब्लिक इंटरेस्ट डिसक्लोझर अँड प्रोटेक्शन टू पर्सन्स मेकिंग द डिसक्लोजर बिल 2010' विधेयकाला सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी 


पर्यावरण:
 • मुंबईत अरबीसमुद्राच्या किनार्‍या जवळ एमएससी चित्रा आणि एमव्ही खलिजा-111 या दोन जहाजांत झालेल्या धडकेनंतर समुद्रात तेलगळती.
  • काही दिवसांपूर्वी अमेरीकेजवळच्या मेक्सिकोच्या आखातात तेलगळती झाली होती . जबाबदार असलेली कंपनी होती : B.P अर्थात ब्रिटीश पेट्रोलियम. 
 • मध्यप्रदेश शासनाची व्याघ्र दर्शन योजना टीकेच्या केंद्रस्थानी.
  • चर्चेतील अभयारण्य :  बांधवगड अभयारण्य ( मध्यप्रदेश )
आंतरराष्ट्रीय:
 • एलेना कगान (Elena Kagan) यांचा अमेरिकेतील सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश म्हणून शपथविधी झाला. या पदावरील त्या 4थ्या महिला.
  • सोनिया सोटोमयोर या गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये या पदावर विराजमान झाल्या. त्या 3 ऱ्या महिला न्यायाधीश होत्या.)
  • (भारतात आता पर्यंत सर्वोच्च न्यायालयात 4 महिलांनी न्यायाधीश म्हणून काम पाहीले आहे. यांपैकी 'ग्यान सुधा मिश्रा' या सध्याही कार्यरत आहेत.त्या पूर्वी झारखंड उच्च न्यायालयात न्यायाधीश होत्या.
  • पहिल्या महिला न्यायाधीश: फातिमा बीबी.
  • त्याशिवाय सुजाता मनोहर, आणि रुमा पॉल  यांनी न्यायाधीश म्हणून काम पाहिले. )

Monday, August 9, 2010

महाराष्ट्र - सांस्कृतिक धोरण

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरणातील प्रमुख बाबी:
 •  'राज्य सांस्कृतिक निधी' ची स्थापना. - शासकीय अर्थसहाय्य आणि लोकसहभाग यातून; या निधीतून केवळ शासकीय तरतुदींतून सहजगत्या न राबविता येणाऱ्या योजना /उपक्रम राबविले जातील.
 •  मराठी भाषा विभाग स्थापन केला जाईल.
 •  भाषा सल्लागार मंडळ स्थापन होणार.
 •  मुंबईत भाषाभवन उभे राहणार.- भाषा आणि साहित्यविषयक उपक्रम राबविण्यासाठी.
 •  मराठीसाठी 'प्रमाण भाषा कोश ' मंडळ स्थापन होणार.
 •  प्रत्येक तालुक्यात एक खुले नाट्यगृह.
 •  जिल्हा पातळीवर खाजगी सहकार्याने नाट्यगृह.
 • मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज (नियोजित स्थळ: अरबी समुद्रात), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चैत्यभूमी ), महात्मा फुले आणि राजर्षी  शाहू महाराज यांचे स्मारक उभे राहणार.
 • प्रत्येक महसुली विभागात, विभागीय पातळीवर 'कलासंकुल' उभे करणार.
 • साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक किंवा त्यांच्या नावाने अध्यासन रशियात स्थापण्याचा प्रयत्न करणार.
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कोलंबिया विद्यापीठ (अमेरिकेत) तर महर्षी वि.रा.शिंदे यांच्या नावाने ऑक्सफर्ड (ब्रिटन ) विद्यापीठात अध्यासन निर्माण करण्यात शासन प्रयत्न करेल.
 • शिवकालीन किल्ल्यांच्या ठिकाणी "शिवकिल्ले मालिका योजना " तयार करणार.
 • पैठण येथे संतपीठ
 • महाराष्ट्र ललित कला अकादमीची स्थापना.
 • मराठी बोली भाषा अकादमी उभारणार.
 • महाराष्ट्र प्रगत अध्ययन केंद्र नावाची स्वायत्त संस्था उभी राहणार- 'महाराष्ट्रविद्या' या नवीन ज्ञानशाखेच्या अभ्यासासाठी.

चालू घडामोडी 9 ऑगस्ट 2010

प्रादेशिक  
'पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम 'योजनाच्या संबधित काही महत्वाच्या बाबी:
 • भौतिक (Physical), सामाजिक (Social) व उत्पन्न साधने (Livelyhood) या तीन क्षेत्रात लोकांच्या पुढाकाराने, प्रशासनच्या मदतीने विकास अपेक्षित.
 • अंमलबजावणी तालुका पातळीवर पंचायत समिती तर जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद करणार. हि योजना ग्रामविकास खात्याची आहे.
 • योजनेचे निकष:
१. अ) वृक्ष लागवड ब) वृक्ष संवर्धन
२. हगणदारीमुक्त
३. कर वसुली (घरपट्टी,पाणीपट्टी)
४.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान
५.यशवंत पंचायत राज अभियान
६.अपारंपारिक उर्जा
७.घनकचरा व्यवस्थापन
८. सांडपाणी व्यवस्थापन
 • देशात पंचायतराज मध्ये सर्व प्रथम महिलांना आरक्षण देणारे राज्य महाराष्ट्र.
राष्ट्रीय

 •  RTE ( Right To Education ) शिक्षणाचा मुलभूत अधिकार विधेयकाची अमलबजावणी करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रायालाला पुढील 3 वर्षात मिळणार 2,31,000 कोटी रुपये.
 • गुजरात सरकारने वीज वितरणातील गळती थांबवण्यासाठी सुरु केलेली योजना: ज्योतिग्राम
आंतरराष्ट्रीय:
 • 6 ऑगस्ट रोजी हिरोशिमा वरील अमेरिकेने केलेल्या बॉम्ब हल्ल्याला 65 वर्षे पूर्ण झाली.त्यानिमित्ताने झालेल्या श्रद्धांजली सभेस त्यावेळी अमेरिकेतर्फे जॉन रूस हे राजदूत उपस्थित होते.

  # 6 ऑगस्ट 1945 ला झालेल्या बॉम्ब हल्ल्यात 140000 जणांचा मृत्यू. बॉम्ब चे नाव: लिटल बॉय (Little Boy) - रूसवेल्ट या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवरून  
  # तर 9 ऑगस्ट 1945 ला नागासाकी वर झालेल्या हल्ल्यात
  80,000 जणांचा बळी. नागासाकीवर वापरलेला बॉम्ब: Fat Man
  # जपानने 15 ऑगस्टला शरणागती पत्करली.
क्रीडा
 •  तेजस्विनी सावंत जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक.
         स्थळ : म्युनिक (जर्मनी)
         50 मीटर रायफल प्रोन प्रकारात विश्वविक्रमाची बरोबरी करीत ऐतिहासिक
         कामगिरी
         ( तिने बरोबरी केली ती रशियाच्या मरीना बोब्कोवाच्या आधीच्या विक्रमाशी.)
         विश्वविक्रम करणारी ती पहिलीच भारतीय महिला नेमबाज
 • संतोष कप - (फुटबॉल मधील राष्ट्रीय स्तरावरची प्रतीष्टीत ट्रॉफी) प. बंगाल ने जिंकला.

Friday, August 6, 2010

चालू घडामोडी 6 ऑगस्ट 2010


राष्ट्रीय
 • 'ऑनर किलिंग' (सामाजिक प्रतिष्टा जपण्यासाठी केलेली हत्या) विरोधातील विधेयक केंद्र सरकार संसदेच्या मान्सून सत्रात मांडणार.
 • मुगल-ए-आझम' ची ५० वर्षे पूर्ण. - 'शोले' च्या निर्मितीपुर्वी सर्व रेकॉर्ड्स या चित्रपटाच्या नावावर होते.

कृषी
 • ओक्सीटोसीन आणि इतर संप्रेरकांचा फळे आणि भाजीपाला पिके यांवर होणारा परिणाम शोधण्यासाठी सरकारकडून उच्चस्तरीय समितीची घोषणा. - शेतकरी फळे लवकर पिकवण्यासाठी यांचा वापर करतात परंतु ते आरोग्यासाठी हानिकारक असलायचा दावा केला जातो.
आंतरराष्ट्रीय
 • बांगलादेशात आता राष्ट्रगीताचा रिंगटोन वापरणे अवैध.  
 • पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात मोठ्या पूर परिस्थितीमुळे  40 लाख लोकांना फटका बसल्याची
   UN (संयुक्त राष्ट्रसंघाकडून ) माहिती.
 • पश्चिम रशियात लागलेला मोठा वणवा अद्याप विझला नाही.

क्रीडा

 • विद्या स्टोक्स (वय ८२ वर्षे) या हॉकी इंडियाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा.या आधी त्याच प्रभारी अध्यक्षा होत्या.
  परंतु काही तासांतच केंद्रीय क्रीडा खात्याने हॉकी इंडियाची संलग्नता रद्द केली असल्याची घोषणा केली."हॉकी इंडिया'ने केंद्रीय क्रीडा खात्याच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यास नकार दिला होता, त्या पार्श्वभूमीवर हि कारवाई.

 • टेबल टेनिस :
  शरथ कमल ह्या भारतीय खेळाडूचा जगभरातील पहिल्या 50  खेळाडूंत प्रवेश . अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय. सध्या 45 व्या क्रमांकावर. त्याने अलीकडेच टेबल टेनिस ची यु.एस. ओपन आणि इजिप्त ओपेन ह्या स्पर्धा जिंकल्या होत्या.  
 • अर्जुन,ध्यानचंद,द्रोणाचार्य तसेच खेळ प्रोत्साहन पुरस्कार जाहीर.
  - वितरण 29 ऑगस्ट रोजी होते . 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन आहे. तो हॉकीपटू ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो.
 • महिला हॉकी सेक्‍स स्कॅंडलप्रकरणी सरदा अली खान यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून चौकशी समिती.
  (वादग्रस्त महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक एम. के. कौशिक)

Wednesday, August 4, 2010

चालू घडामोडी 4 ऑगस्ट 2010

राष्ट्रीय:

 • झारखंडच्या 3 आमदारांनी राज्यसभा निवडणुकीसाठी पैसे घेवून मतदान करण्याची तयारी दाखली होती. त्याचे स्टिंग ऑपरेशन खाजगी वाहिनीवरून प्रसारित झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून झारखंड सरकारला चौकशीचे आदेश.

 • गुजरात सरकारने शाळा व कॉलेजात मोबाईल फोनच्या वापरावर बंदी जारी केली.


क्रीडा:

 • न्यूझीलंडचे वयोवृद्ध कसोटपटू एरिक टिंडिल यांचे निधन
 • राष्ट्रकुल स्पर्धेचे ६ "ब्रॅंड अम्बेसिडर'
  १.ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा,
२.बॅडमिंटन खेळाडू साईना नेहवाल,
३.ऑलिंपियन ब्रॉंझपदक विजेता मुष्टियोद्धा विजेंद्रसिंग
४.नेमबाज समरेश जंग,
५.ऑलिंपियन ब्रॉंझपदक विजेता कुस्तिगीर सुशीलकुमार आणि
६.जागतिक मुष्टियुद्ध विजेती एम. सी. मेरी कोम
 • भारताच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
  2007 राष्ट्रीय खेळ झारखंड
  2009 केरळ
  2011 गोवा
  पण अद्यापही यातील एकही स्पर्धा झालेली नाही,
स्पर्धा - शुभंकर (Mascot)
   क्रिकेट वर्ल्ड कप -2011 (आगामी )- स्टम्पी
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा -2010 - शेरा
राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा -2008 -जिगर
फिफा फुटबाल वर्ल्ड कप -2010 -झाकुमी
बीजिंग ऑलम्पिक 2008 - फुवा
आशियाई क्रीडा स्पर्धा (अशियाड) -1982 -अप्पू

अंतरराष्ट्रीय:


 • दक्षिण चीनच्या गुआंगझाऊ शहरात कँटोनीज भाषा वाचविण्यासाठी हजारो नागरिकांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
 • आफ्रिका खंडातील 'मलावी' देशाने स्वतःचा राष्ट्रध्वज बदलला.
 • बांगलादेशाच्या सुप्रीम कोर्टचा ऐतिहासिक निर्णय: जातीयवादी राजकीय पक्ष बेकायदेशीर.
 • कातालोनिया (Catalonia ) या स्पेन मधील स्वायत्त प्रदेशाच्या संसदेने "बुल फायटिंग " वर बंदी आणायच्या बाजूने मतदान केले. (बुल फायटिंग - हा स्पेन चा राष्ट्रीय खेळ आहे.) 
   काही देशांचे राष्ट्रीय खेळ
देश- राष्ट्रीय खेळ
१. बांगलादेश - कबड्डी
२. श्रीलंका - वोलीबॉल
३. अफगाणिस्तान - बुझकाशी
४. भारत - मैदानी हॉकी

 • रवांडाचा (आफ्रिका खंडातील ) माजी शासक डोमिनिक़ुए न्तावूकुलील्यायो (Dominique Ntawukulilyayo) याला त्याने घडवलेल्या नरसंहारासाठी अंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून २५ वर्ष कैदेची शिक्षा.

 • इंटरपोलचे माजी प्रमुख आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी पोलीस प्रमुख जाकी सेलेबी (Jackie Selebi ), यांना भ्रष्टाचारासाठी 15 वर्षे तुरुंगवास.

चर्चेतील पुस्तक
1. कीपिंग द फेथ: मेमोईर्स ऑफ अ पार्लीअमेंटरिअन लेखक -सोमनाथ चटर्जी

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

If you LIKE what we are posting here, please share it on your Facebook page. Just copy the URL link and paste on your Facebook status update.
आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत