Showing posts with label current affairs. Show all posts
Showing posts with label current affairs. Show all posts

Thursday, April 17, 2014

संकीर्ण चालू घडामोडी - वनसेवा व PSI पूर्व विशेष-1


महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2014 आणि पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा 2014 लक्षात घेवून आम्ही चालू घडामोडी संकीर्ण स्वरुपात देत आहोत.
सामान्यत: कोणत्याही परीक्षेत त्या परीक्षेपूर्वीच्या एक ते दीड वर्षांच्या कालावधीत झालेल्या चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जातात, हे लक्षात घेवून आम्ही एप्रिल 2013 ते आज पर्यंतच्या घटनांवर आधारित नोट्स आपल्यासाठी येथे देत आहोत.

Latest Current Events 17 April 2014


  61st National Film Awards
 • Best feature film-Ship of Theseus (Director Anand Gandhi )
 • Best Actor – Raj Kumar for Shahid in hindi and Suraj Venjaramoodu for Perariyathavar in Malyalam
 • Best Actress – Geetanjali Thapa for Liar’s Dance in Hindi
 • Best Direction – to Hansal Mehta for film Shahid
 • Best Children’s Film – Kaphal (Hindi), directed by Batul Mukhtiar
 • Best Child Artist – Somnath Avghade for Fandy in Marathi and Sadhana for Thanga Meengal in Tamil
 • Indira Gandhi Award for Best Debut Film of a Director – Fandry in Marathi directed by Nagraj Manjule
 • Nargis Dutt Award for Best Feature Film on National Integration – Thalaimuraigal (Tamil) directed by Balu Mahindra


 • PC Parakh authored book Crusader or Conspirator? Coalgate and other Truths released
  PC Parekh -Former Coal Secretary
 • Portal ‘RAILSAVER’ launched to Improve Energy Efficiency in Indian Railways
 • Government of India (GOI) extended the Tourist Visa-on-Arrival Scheme to the citizens of the South Korea (ROK) with effect from 15 April 2014.With the extension of TVOA facility to South Korea, the total number of countries to which India has issued TVOA facility stands at 181 countries.
 • The Central Bureau of Investigation (CBI) established a Sport Integrity Unit on 15 April 2014 to investigate the cases related to fraud in sports. Betting and Match fixing are the most common cases of sports fraud.


चालू घडामोडी प्रश्नमंजुषा - 17 एप्रिल 2014

current affairs


मराठी चालू घडामोडी प्रश्नमंजुषा-517

1. 2013 चा दादासाहेब फाळके पुरस्कार कवी, गीतकार, दिग्दर्शक गुलजार यांना जाहिर करण्यात आला आहे. कवी गुलजार यांचे पूर्ण नाव काय आहे ?

A. संजय सिंग
B. संपूर्ण सिंह कालरा
C. गुलजार शर्मा
D. गुलजारीलाल नंदा


Click for answer 

B. संपूर्ण सिंह कालरा
2. सर्वोच्च न्यायालयाने 15 एप्रिल 2014 रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार कोणत्या वर्गवारीस पुरुष आणि स्त्री या दोन वर्गवारीखेरीज कायद्याने मान्यता दिली आहे ?

A. तृतीय पंथी
B. गे
C. लेस्बियन
D. वरील पैकी नाही


Click for answer 

A. तृतीय पंथी
3. क्रुसेडर ऑर कांसपीरेटर? कोलगेट एंड अदर ट्रुथ्स () Crusader or Conspirator? Coalgate and other Truths ह्या कोणत्या माजी कोळसा सचिवाने लिहीलेल्या पुस्तकाचे नुकतेच उद्घाटन झाले ?

A. पी. सी. पारेख
B. सी. के. श्रीवास्तव
C. आर. आर. पांडे
D. अजय खेमका


Click for answer 

A. पी. सी. पारेख
4. 'द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर-द मेकिंग एंड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंह' ह्या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे ?

A. संजीव श्रीवास्तव
B. संजय बारू
C. पी. सुनीलकुमार
D. चारुदत्त कुलकर्णी


Click for answer 

B. संजय बारू
5. सन 2020 पर्यंत 15% पर्यंत वीज बचत करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक टप्पा म्हणून कोणते वेबपोर्टल नुकतेच भारतीय रेल्वेने नुकतेच सुरु केले आहे ?

A. ECORAIL
B. GREENRAIL
C. LIGHTSAVER
D. RAILSAVER


Click for answer 

D. RAILSAVER
6. वित्त सचिव सुमित बोस 31 मार्च 2014 रोजी निवृत्त झाले. त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

A. विजय केळकर
B. अरविंद मायाराम
C. रघुराम राजन
D. टी. सदाशिवम


Click for answer 

B. अरविंद मायाराम
7. ब्रिटनच्या महाराणी एलिजाबेथ यांच्याद्वारा जीबीई (नाइट ग्रँड क्रॉस) सन्मानाने नुकतेच सन्मानित करण्यात आलेले भारतीय उद्योगपती कोण?

A. रतन टाटा
B. अजीझ प्रेमजी
C. नारायण मूर्ती
D. गौतम थापर


Click for answer 

A. रतन टाटा

Wednesday, April 16, 2014

61 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते

 •  'फॅंड्री'तील भूमिकेसाठी बालकलाकार सोमनाथ अवघडे याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार जाहीर झाला. याच चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.

 • 61 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा राजधानी नवी दिल्लीमध्ये करण्यात आली. मराठीमध्ये अभिनेत्री अमृता सुभाष हिला 'अस्तू' चित्रपटातील अभिनयाबद्दल सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'यलो' चित्रपटाला विशेष परीक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 • अर्शद वारसी आणि सौरभ शुक्ला यांच्या अभिनयाने सजलेल्या 'जॉली एलएलबी' या हिंदी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. मराठीमध्ये हा मान प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या 'आजचा दिवस माझा' या चित्रपटाने पटकावला.

 • सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - जॉली एलएलबी
 • सर्वोत्कृष्ट इंग्रजी चित्रपट - द कॉफीनमेकर
 • सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा - आजचा दिवस माझा
 • विशेष ज्युरी अवॉर्ड - गौरी गाडगीळ (यलो) आणि मिस लव्हली
 • सर्वोत्कृष्ट बालकलाकार - सोमनाथ अवघडे (फॅंड्री)
 • सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक - नागराज मंजुळे (फॅंड्री)
 • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - बेला शेंडे (तुह्या धर्म कंचा?)
 • सर्वोत्कृष्ट संवाद - सुमित्रा भावे (अस्तू)
 • सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री - अमृता सुभाष (अस्तू)
 • सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता - सौरभ शुक्ला (जॉली एलएलबी)
 • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- हंसल मेहता (शहीद)
 • सर्वोत्कृष्ट अभिनेता- राजकुमार (शहीद) आणि मल्याळम अभिनेता सुरज वेन्जारामुडू

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा - 16 एप्रिल 2014

current affairs


मराठी चालू घडामोडी प्रश्नमंजुषा-516

1. G-8 मधून कोणत्या देशाला निलंबित करण्यात आले आहे?

A. भारत
B. रशिया
C. युक्रेन
D. इटली


Click for answer 

B. रशिया
2. G-7 (रशियाला बाहेर काढल्यामुळे आता G-8 पूर्वीप्रमाणेच G-7 झाला आहे) देशांच्या राष्ट्रप्रमुखांची 2014 ची शिखर (summit) परिषद कोठे होणार आहे ?

A. मास्को , रशिया
B. ब्रुसेल्स, बेल्जीयम
C. वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका
D. लंडन, युके


Click for answer 

B. ब्रुसेल्स, बेल्जीयम

2014 ची हि शिखर परिषद पूर्वी रशियात होणे नियोजित होते, तथापि रशियाच्या हकालपट्टी नंतर हि परिषद आता बेल्जियम मध्ये होणार आहे.
3. कोणत्या भारतीय अमेरिकी व्यक्तीला 2014 चा 'काव्य' (Poerty) गटातील 'पुलित्झर' पुरस्कार प्राप्त झाला आहे ?

A. विजय शेषाद्री
B. विजयकांत सहाय
C. विजयालक्ष्मी
D. विजय पंडित


Click for answer 

A. विजय शेषाद्री

अत्यंत प्रतिष्ठेच्या पुलित्झर 2014 या पुरस्कारावर भारतीय वंशाचे कवी विजय शेषाद्री यांनी मोहोर उमटवली आहे. पत्रकारिता, साहित्य, नाटक आणि संगीताच्या क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या 98 व्या पुरस्कारांची घोषणा, कोलंबिया युनिव्हर्सिटीने सोमवारी केली.
शेषाद्री यांना मिळालेला कविता विभागासाठीचा पुरस्कार दहा हजार अमेरिकी डॉलरचा आहे.
पुलित्झर मिळविणारे ते पाचवे भारतीय ठरले आहेत.

शेषाद्री यांच्या '3 सेक्शन्स' काव्यसंग्रहाला पुरस्कार आहे.

जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या मानवी जाण‌िवांचा शोध त्यांनी या कवितांतून घेतला.
ते सध्या न्यूयॉर्कमधील कॉलेजात कविता आणि कथाबाह्य लिखाण हा विषय शिकवतात. त्यांच्या कविता आणि लेख अनेक नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
4. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञ मनुप्रकाश यांच्या नेतृत्त्वाखालील टीमने अलीकडेच कोणत्या अतिशय स्वस्त आणि उपयोगी अशा सूक्ष्मदर्शकाचा (Microscope)शोध लावला आहे ?

A. फोल्डोस्कोप
B. सुपर मायक्रोस्कोप
C. मायक्रो मायक्रोस्कोप
D. मायक्रो


Click for answer 

A. फोल्डोस्कोप
5. 'जागतिक क्षयरोग दिन' कधी साजरा केला गेला?

A. 24 फेब्रुवारी
B. 24 मार्च
C. 24 एप्रिल
D. 24 जानेवारी


Click for answer 

C. 24 एप्रिल
6. कोणती विमानवाहू युध्दनौका तिचा नियत कार्यकाल संपल्यानंतर नुकतीच 60 कोटी रुपयांना भंगारात विकली?

A. आयएनएस विक्रम
B. आयएनएस विक्रमादित्य
C. आयएनएस विक्रांत
D. आयएनएस विराट


Click for answer 

C. आयएनएस विक्रांत
7. बेसेल -III मानकांच्या बँकांकडून होणा‌र्‍या अंमलबजावणीचा कार्यकाल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वाढवून किती केला आहे?

A. 31 मार्च 2017
B. 31 मार्च 2019
C. 31 मार्च 2018
D. 31 मार्च 2020


Click for answer 

B. 31 मार्च 2019

Tuesday, April 15, 2014

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा - 15 एप्रिल 2014

current affairs


मराठी चालू घडामोडी प्रश्नमंजुषा-515

1. भारताचे 41 वे सरन्यायाधीश म्हणून 27 एप्रिल 2014 पासून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

A. न्या. आर.एम.लोधा
B. न्या. पी.सथसिवम
C. न्या. जी.रोहिणी
D. न्या. ए.पी.शाह


Click for answer 

A. न्या. आर.एम.लोधा
2. इंडियन फिल्म फेस्टीवल ऑफ लॉस एंजलिस महोत्सवात सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा पुरस्कार 'ज्यूरी ग्रँड प्राइझ' या पुरस्काराने कोणत्या मराठी चित्रपटाला सन्मानित करण्यात आले ?

A. टाईमपास
B. मंगलाष्टक पुन्हा एकदा
C. फँड्री
D. बालक पालक


Click for answer 

C. फँड्री
3. सोलर इम्पल्स-2 (Solar Impulse 2) हे सौरउर्जेवर चालणारे विमान नुकतेच कोणत्या देशात तयार करण्यात आले आहे ?

A. अमेरिका
B. जर्मनी
C. भारत
D. स्वित्झर्लंड


Click for answer 

D. स्वित्झर्लंड
4.WHO आणि भारताने _________ चे संरक्षण करण्यासाठी IVR2020 हा कार्यक्रम सुरु केला आहे.

A. वाघ
B. हत्ती
C. एक शिंगी गेंडा
D. माळढोक


Click for answer 

C. एक शिंगी गेंडा
5. कोणत्या विद्यापीठातील संशोधकांनी नुकतेच सिंथेटिक क्रोमोझोम (कृत्रिम गुणसूत्र) विकसित केल्याची घोषणा केली आहे?

A. AIIMS
B. शिकागो
C. ऑक्सफोर्ड
D. न्यूयार्क


Click for answer 

D. न्यूयार्क
6. BCCI चे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्ती करण्यात आली आहे?

A. सचिन तेंडूलकर
B. एन. श्रीनिवासन
C. सुनिल गावसकर
D. कपिल देव


Click for answer 

C. सुनिल गावसकर
7. पुढील विधानांचा विचार करा.
I. शिला दिक्षीत यांची केरळच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
II. त्यांनी निखीलकुमार ह्या दिल्लीच्या माजी पोलीस प्रमुखांची जागा घेतली.

वरीलपैकी चुकीचे विधाने कोणते?

A. I फक्त
B. II फक्त
C. दोन्हीही
D. दोन्हीही नाहीत


Click for answer 

D. दोन्हीही नाहीत

Monday, April 14, 2014

गुलजार यांना 2013 चा 'दादासाहेब फाळके पुरस्कार' जाहीर

 • दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणार्‍या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे.
 • इ.स. 1969 मध्ये दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे.
 • हा पुरस्कार भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी खात्यातर्फे दिला जातो.
  दादासाहेब फाळके:
 • भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक.
 • जन्म त्र्यंबकेश्वर (जि. नासिक) येथे.
 • पूर्ण नाव धुंडिराज गोविंद फाळके.
 • दादासाहेब या नावानेच ते प्रसिद्ध होते.


 • गुलजार यांना जाहीर झालेला पुरस्कार  45 वा दादासाहेब फाळके पुरस्कार आहे.
 • 2012 चा पुरस्कार अभिनेते प्राण यांना देण्यात आला होता.
 • 2011 चा पुरस्कार सौमित्र चॅटर्जी यांना

 • सुवर्णकमळ, रुपये 10 लक्ष व शाल असे पुरस्काराचे स्वरूप.

 • गुलजार यांचे पूर्ण नाव "संपूर्ण सिंह कालरा" असून त्यांचा जन्म फाळणीपूर्व (आताच्या पाकिस्तानातील ) पंजाब मध्ये झाला.
 • ते कवी, गीतकार, दिग्दर्शक आहेत.
 • ' मेरे अपने ' ,' कोशिश ', 'खुशबू', 'अंगूर', 'लिबास' आणि  'माचिस' या चित्रपटांचे दिग्दर्शन
 • 2002 चा साहित्य अकादमी सन्मान आणि 2004 मध्ये  पद्म भूषण पुरस्कार प्राप्त.
 • स्लमडॉग मिलेनियर चित्रपटातील 'जय हो' गाण्यासाठी 2009 चा ऑस्कर आणि 2010 चा ग्रॅमी  पुरस्कार प्राप्त.
 • कारकीर्दीची सुरुवात बिमल रॉय यांच्या  ‘बंदिनी’ चित्रपटासाठी गीत लिहून .
 • अभिनेत्री राखीशी विवाह केला होता. मेघना गुलजार हि त्यांची मुलगी.

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा - 14 एप्रिल 2014

current affairs


मराठी चालू घडामोडी प्रश्नमंजुषा-514

1. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला गेला?

A. 5 एप्रिल
B. 6 एप्रिल
C. 7 एप्रिल
D. 8 एप्रिल


Click for answer 

C. 7 एप्रिल
2. 'जागतिक आरोग्य दिन 2014' चा विषय (theme) काय होता?

A. सर्वांसाठी आरोग्य
B. शाश्वत आरोग्य
C. कीटकांमार्फत पसरणारे आजार
D. कर्करोग निर्मूलन


Click for answer 

C. कीटकांमार्फत पसरणारे आजार (vector borne diseases)
3. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कधी झाली?

A. 5 एप्रिल 1947
B. 5 एप्रिल 1948
C. 7 एप्रिल 1947
D. 7 एप्रिल 1948


Click for answer 

D. 7 एप्रिल 1948
4. अक्कमपल्ली येथे 7000 वर्ष प्राचीन लेणी नुकतीच शोधली गेली, हि लेणी खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

A. केरळ
B. कर्नाटक
C. आंध्रप्रदेश
D. महाराष्ट्र


Click for answer 

C. आंध्रप्रदेश
5. खालीलपैकी कोणत्या कंपनीला ग्रामीण भागात आगामी 3 वर्षात 9000 'व्हाईट लेबल एटीएम' (WLAs) उघडण्याची परवानगी रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने अलीकडेच दिली आहे?

A. सेरी इन्फ्रास्ट्रक्चर फायन्सास लि.
B. रिलायन्स फायनान्स
C. बंधन फायन्सास सर्व्हीसेस
D. आयडीएफसी


Click for answer 

A. सेरी इन्फ्रास्ट्रक्चर फायन्सास लि.
6. सर्व नास्तीकांना दहशतवादी ठरवणारा कायदा कोणत्या देशाने लागू केला आहे?

A. इराक
B. अफगाणिस्तान
C. इंडोनेशिया
D. सौदी अरेबिया


Click for answer 

D. सौदी अरेबिया
7. अँड्रॉइड या संगणकप्रणालीवर चालणा‌र्‍या स्मार्टफोनासाठी हानीकारक ठरू शकणारा कोणता 'व्हायरस' अलीकडील काळात चर्चेत आहे?

A. Ebola
B. Dendroid
C. Trojan Horse
D. Win32


Click for answer 

B. Dendroid

Friday, April 11, 2014

Online Current Affairs Marathi- 11 April 2014

current affairs


मराठी चालू घडामोडी प्रश्नमंजुषा-513

1. पहिला 'नामदेव ढसाळ शब्द पुरस्कार' विष्णू खरे यांना जाहीर झाला आहे. ते कोणत्या भाषेतील कवी आहेत?

A. उडीया
B. मराठी
C. संस्कृत
D. हिंदी


Click for answer 

D. हिंदी
2. दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या कोणत्या चित्रपट छायालेखकाचे नुकतचे निधन झाले?

A. रामलाल वर्मा
B. व्ही. के. मूर्ती
C. मुर्तीराज पटेल
D. मल्लिक खान


Click for answer 

B. व्ही. के. मूर्ती
3. 'अ‍ॅट प्ले इन फिल्डस् ऑफ लॉर्ड' ह्या पुस्तकाच्या कोणत्या लेखकाचे नुकतेच निधन झाले?

A. पीटर मॅथिएसन
B. जॉन रस्कीन
C. पीटर पिहीर
D. जॉर्ज मथ्थू


Click for answer 

A. पीटर मॅथिएसन
4. व्हिक्टर ओर्बान हे तिसऱ्यांदा कोणत्या देशाचे पंतप्रधान झालेत?

A. ऑस्ट्रिया
B. हंगेरी
C. इटली
D. फ्रान्स


Click for answer 

B. हंगेरी
5. नॅशनल अल्युमिनियम कंपनी लिमिटेड (नाल्को) ह्या सार्वजनिक उद्योगाच्या डायरेक्टर पदी पहिल्यांदाच महिला अधिका‌र्‍याची नियुक्ती झाली आहे, ही व्यक्ती कोण आहे?

A. उषा अनंतसुब्रमण्यम
B. सोमा मंडल
C. सुजाता सिंह
D. सुमिता भावे


Click for answer 

B. सोमा मंडल
6. 2014 च्या लोकसभा निवडणुकींसाठी भारतीय निवडणूक आयोगाने कोणत्या 5 व्यक्तींना 'नॅशनल आयकॉन ' म्हणून नियुक्त केले आहे?

A. आमीर खान, मेरी कोम, ए.पी.जे.अब्दुल कलाम, महेंद्रसिंग धोणी व साईना नेहवाल
B. विराट कोहली, शाहीद कपूर, मेरी कोम, अंजली भागवत-वेदपाठक, प्रतिभाताई पाटील
C. सानिया मिर्झा, पी. व्ही. सिंधू, मेरी कोम, साईना नेहवाल व ज्वाला गुट्टा
D. बायचुंग भुतिया, ए.पी.जे.अब्दुल कलाम, विश्वनाथन आनंद व सलमान खान


Click for answer 

A. आमीर खान, मेरी कोम, ए.पी.जे.अब्दुल कलाम, महेंद्रसिंग धोणी व साईना नेहवाल
7. 'जागतिक आरोग्य दिन' (World Health Day)कधी साजरा केला गेला?

A. 4 एप्रिल
B. 5 एप्रिल
C. 6 एप्रिल
D. 7 एप्रिल


Click for answer 

D. 7 एप्रिल

Thursday, April 10, 2014

Online Current Affairs Marathi- 10 April 2014

current affairs


मराठी चालू घडामोडी प्रश्नमंजुषा-512

1. 'फेमिना मिस इंडीया 2014' किताब कोणी जिंकला?

A. कोयल राणा
B. जटलेखा मल्होत्रा
C. मेगन यंग
D. नवनीत कौर धिल्लन


Click for answer 

A. कोयल राणा
2. आयसीसी T-20 विश्वचषक कोणत्या संघाने जिंकला?

A. भारत
B. श्रीलंका
C. बांगलादेश
D. द. आफ्रिका


Click for answer 

B. श्रीलंका
3. 'टेम्पेस्ट स्टेला' काय आहे?

A. जगातील सर्वात पुरातन मूर्ती
B. जगातील सर्वात पुरातन हवामानविषयक शिलालेख
C. जगातील सर्वात पुरातन हवामानविषयक ह्स्तलीखित
D. जगातील सर्वात पुरातन छपाई केलेला ग्रंथ


Click for answer 

B. जगातील सर्वात पुरातन हवामानविषयक शिलालेख
4. फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी कोणत्या युद्धात भारतीय सेनादलाचे नेतृत्व केले होते?

A. 1947 भारत-पाकिस्तान
B. 1962 भारत-चीन
C. 1971 भारत-पाक
D. 1965 भारत-पाक


Click for answer 

C. 1971 भारत-पाक
5. रॅनबॅक्सी ही औषध कंपनी नुकतीच कोणी विकत घेतली?

A. जॉनसन अँड जॉनसन
B. सन फार्मास्युटिकल्स
C. पिरामल इंडस्ट्रीज
D. रिलायन्स इंडस्ट्रीज


Click for answer 

B. सन फार्मास्युटिकल्स
6. 2013 चा गांधी शांतता पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला?

A. अण्णा हजारे
B. चंडीप्रसाद भट्ट
C. पी. रामबाबू
D. इला भट्ट


Click for answer 

B. चंडीप्रसाद भट्ट
7. महाराष्ट्र शासनाने कधी पर्यंतच्या झोपडपट्ट्या कायद्याने नियमित केल्या आहेत?

A. 1 जानेवारी 1995
B. 1 जानेवारी 2000
C. 1 जानेवारी 2005
D. 1 जानेवारी 2010


Click for answer 

B. 1 जानेवारी 2000

Wednesday, April 9, 2014

भारतातील मुलींसंबंधीची योजना

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा - 9 एप्रिल 2014

question answer


मराठी चालू घडामोडी प्रश्नमंजुषा-511

1. मिग-21 FL (MiG-21 FL) ह्या लढाऊ विमानांऐवजी कोणती भारतीय बनावटीचे विमाने तैनात केली जात आहेत?

A. तेजस
B. पिनाका
C. धनुष
D. ध्रुव


Click for answer 

A. तेजस
2. IUCN (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर) च्या अहवालात किती भारतीय वनस्पती व प्राणी यांचा Critically Endangered वर्गवारीत समावेश करण्यात आला आहे?

A. 132
B. 290
C. 587
D. 102


Click for answer 

A. 132
3. डिसेंबर 2014 मध्ये राष्ट्रार्पण करण्यात आलेली 1000 किमी लांबीची दाभोळ बेंगळूरु गॅस पाईपलाईन कोणत्या कंपनीची आहे?

A. गेल इंडीया (GAIL India)
B. इंडीयन ऑईल
C. भारत पेट्रोलियम
D. शेल


Click for answer 

A. गेल इंडीया (GAIL India)
4. अलीकडेच राष्ट्रगीत समूहगायनाचा विश्वविक्रम कोणत्या देशात झाला?

A. भारत
B. अमेरीका
C. बांगलादेश
D. श्रीलंका


Click for answer 

C. बांगलादेश
5. 'जागतिक क्षयरोग दिन' कधी साजरा केला गेला?

A. 24 जानेवारी
B. 24 फेब्रुवारी
C. 24 मार्च
D. 24 डिसेंबर


Click for answer 

C. 24 मार्च
6. 2011 च्या जनगणनेतील अहवालानुसार भारतीय शेतकर्‍यांच्या संख्येबाबत योग्य विधान कोणते?

A. 10 वर्षात 50 लाखांनी वाढली
B. 10 वर्षात 50 लाखांनी कमी झाली
C. 10 वर्षात 90 लाखांनी वाढली
D. 10 वर्षात 90 लाखांनी कमी झाली


Click for answer 

D. 10 वर्षात 90 लाखांनी कमी झाली
7. कोणत्या क्षेत्रातील परिस्थितीकी चे संरक्षण करण्यासाठी केंद्राने फेब्रुवारी 2014 मध्ये राष्ट्रीय कार्य योजना सुरु केली?

A. सह्याद्री
B. हिमालय
C. निलगिरी
D. अंदमान


Click for answer 

B. हिमालय

Tuesday, April 8, 2014

Current Affairs Marathi -8 April 2014

mpsccurrent


मराठी चालू घडामोडी प्रश्नमंजुषा-510

1. कोणत्या देशाने स्वतःकडील सर्व रासायनिक अस्त्रांचा नाश केल्याने चर्चेत होता?

A. सिरीया
B. लिबिया
C. जपान
D. युक्रेन


Click for answer 

B. लिबिया
2. 'ऑक्युलस व्हीआर ' ही आभासी वास्तव तंत्रज्ञान ( Virtual Reality) मधील कंपनी कोणत्या कंपनीने विकत घेतली?

A. गुगल
B. फेसबुक
C. याहू
D. मायक्रोसॉफ्ट


Click for answer 

B. फेसबुक
3. निवडणूक आयोगाने 'सर्वात संवेदनशील जिल्हा' म्हणून कोणास घोषीत केले आहे?

A. नंदूरबार
B. सिंधुदुर्ग
C. गडचिरोली
D. सोलापूर


Click for answer 

C. गडचिरोली
4. चीनी संशोधकांनी 'वाय-फाय' पेक्षा जलद आणि स्वस्त असे कोणते तंत्रज्ञान शोधले आहे?

A. लाई-फाई
B. साई-फाई
C. ई- फाय
D. टेट्रा-फाय


Click for answer 

A. लाई-फाई
5. ब्रिटनमधील ब्रिस्टन येथे कोणत्या भारतीय समाजसुधारकाचा हस्तंदती अर्धपुतळा (Lvory Miniature Bust)बसवण्यात आला?

A. पं. ईश्वरचंद्र विद्यासागर
B. राजा राममोहन रॉय
C. पं. मदनमोहन मालविय
D. पंडीता रमाबाई


Click for answer 

B. राजा राममोहन रॉय
6. डॉ. नेल्सन मंडेला यांना 'भारतरत्न' पुरस्काराने कोणत्या वर्षी सन्मानित केले गेले?

A. 1980
B. 1990
C. 2000
D. 2010


Click for answer 

B. 1990
7. 'गांधी मेमोरीयल लेप्रसी फाउंडेशनतर्फे' दिला जाणारा आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार यावर्षी कोणाला देण्यात आला?

A. डॉ. झॅंग ग्यूचेंग आणि डॉ. विजय कुमार डोंगरे
B. डॉ. किंग जोंग व डॉ. एम. एस. स्वामीनाथन
C. डॉ. ग्येन चाँग ली व डॉ. विजय भटकर
D. डॉ. रघुनाथ माशेलकर व बी. के. एस. अय्यंगार


Click for answer 

A. डॉ. झॅंग ग्यूचेंग आणि डॉ. विजय कुमार डोंगरे

Monday, April 7, 2014

चालू घडामोडी 7 April 2014

marathi quiz

प्रश्नमंजुषा-509

1. जागतिक हवामान बदलावर लक्ष ठेवण्यासाठी 'युरोप' च्या अंतरीक्ष संस्थेने नुकताच कोणता उपग्रह प्रक्षेपित केला?

A. INSAT 3E
B. सेंटिनल -1A
C. IRNSS-1B
D. ओडीसी


Click for answer 

B. सेंटिनल -1A
2. पाकीस्तान च्या T-20 संघाचा कप्तान __________ ने नुकताच पदाचा राजीनामा दिला.

A. शाहीद आफ्रीदी
B. मोहम्मद हफीज
C. शोएब मलिक
D. यासीर अराफत


Click for answer 

B. मोहम्मद हफीज
3. ह्या वर्षी कोणत्या भारतीय स्थलसेना प्रमुखाचे जन्मशताब्दी वर्ष साजरे होत आहे?

A. फिल्ड मार्श अरीअप्पा
B. फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ
C. जनरल अरुणकुमार वैद्य
D. जनरल के. व्ही. के. राव


Click for answer 

B. फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ
4.'मानवी संगणक' म्हणून ख्यातनाम असलेल्या कोणत्या महिला गणितज्ञाचे 2013 मध्ये निधन झाले?

A. मेरी हॉग्ज
B. शकुंतला देवी
C. सरोज कुमारी
D. परिणीता बॅनर्जी


Click for answer 

B. शकुंतला देवी
5. रॉबर्ट एडवर्डस् यांचे 2013 मध्ये निधन झाले. त्यांना कोणत्या महान शोधाचे श्रेय दिले जाते?

A. टेस्ट ट्यूब बेबी
B. कॉम्प्यूटर माऊस
C. आय-फोन
D. क्लोनिग तंत्रज्ञान


Click for answer 

A. टेस्ट ट्यूब बेबी
6. 2013 च्या 'अमेरीकन ओपन' टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकाविले?

A. व्हिनस विल्यम्स
B. सेरेना विल्यम्स
C. समंथा स्टोसूर
D. ली ना


Click for answer 

B. सेरेना विल्यम्स
7. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) हंगामी अध्यक्षपदी कोणाची सर्वोच्च न्यायालयाने नियुक्ती केली आहे?

A. एन. श्रीनिवासन
B. एन. रामचंद्रन
C. सुनिल गावसकर
D. रवी शास्त्री


Click for answer 

C. सुनिल गावसकर

Saturday, April 5, 2014

चालू घडामोडी 5 April 2014

marathi quiz

प्रश्नमंजुषा-509

1. नोकिया द्वारे उत्पादित करण्यात आलेल्या पहिल्या Android-आधारीत फोन मालिकाचे नाव काय आहे?

A. N-सेरीज
B. A-सेरीज
C. O-सेरीज
D. X-सेरीज


Click for answer 

D. X-सेरीज
2. भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतेच कोणत्या दोन खासगी कंपन्यांना बँक परवाने जारी केले आहेत?

A. आयडीएफसी आणि बंधन फायनान्स सर्व्हिसेस
B. आयडीएफसी आणि बर्धन फायनान्स सर्व्हिसेस
C. टाटा सन्स आणि रिलायन्स कॅपिटल
D. अनिल अंबानी रिलायन्स ग्रुप आणि भारतीय पोस्ट


Click for answer 

A. आयडीएफसी आणि बंधन फायनान्स सर्व्हिसेस
3. भारत सरकारने कोणत्या खाजगी बँकेतून आपली 9 टक्के भागीदारी परत घेतली आहे?

A. आयसीआयसीआय बँक
B. अॅक्सिस बँक
C. देना बँक
D. मुथ्थू फायनान्स


Click for answer 

B. अॅक्सिस बँक
4.'ब्लड ऑन कॉल' किंवा 'जीवन अमृत सेवा योजना' महाराष्ट्रात केव्हापासून सुरु करण्यात आली?

A. 7 जानेवारी 2014
B. 7 फेब्रुवारी 2014
C. 7 मार्च 2014
D. 7 एप्रिल 2014


Click for answer 

A. 7 जानेवारी 2014
5. इंडीयन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च (आयसर)' ही संस्था कोणत्या शहरात आहे?

A. मुंबई
B. नागपूर
C. औरंगाबाद
D. पुणे


Click for answer 

D. पुणे
6. फॅण्ड्री या चर्चित मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?

A. राजीव पाटील
B. नागनाथ मंजुळे
C. रवी जाधव
D. जब्बार पटेल


Click for answer 

B. नागनाथ मंजुळे
7. ज्युथिका रॉय यांचे वयाच्या 93 वर्षी फेब्रुवारी 2014 मध्ये निधन झाले. त्या कशासाठी प्रसिद्ध होत्या?

A. पॉप गायीका
B. भजन गायीका
C. पर्यावरणवादी कार्यकर्त्या
D. लेखिका


Click for answer 

B. भजन गायीका

Committees and Commissions [ Marathi ]


केंद्र व राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समित्या आणि आयोग:-

*भूषण गगराणी समिती-
महाराष्ट्रातील ग्रामपंचायती व त्यांच्या समस्यांबाबत शिफारसी करण्याकरिता

*डॉ. नरेंद्र जाधव समिती- 

विदर्भातील शेतकऱ्यांच्या सतत नापिकी व कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या विशेष पॅकेजच्या अंमलबजावणीबाबत मूल्यमापन करण्यासाठी

*राम प्रधान समिती- 

२६/११ च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या संदर्भात शासनाने नेमलेली समिती.

*माधवराव चितळे समिती- 

मुंबईतील पूर परिस्थितीवर अभ्यास करण्यासाठी

*न्या. गुंडेवार आयोग- मुंबईतील घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर गोळीबाराची चौकशी करण्यासाठी

*बाळकृष्ण रेणके आयोग- भटक्या विमुक्त जाती- जमातीच्या कल्याणाकरिता

*न्या. बापट आयोग (२००८)-

 मराठा समाजास आरक्षणसंबंधी नेमलेला आयोग (आरक्षण देऊ नये अशी शिफारस)

*न्या. सराफ आयोग (२००९) -

मराठा समाज आरक्षणासंबंधी नेमलेल्या बापट आयोगाच्या अहवालाची फेरतपासणी करण्याकरिता.

*न्या. राजन कोचर समिती-
सातारा जिल्ह्य़ातील मांढरदेवी येथील झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी

*डॉ. अभय बंग समिती- 

कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूच्या चौकशीकरिता अमरावती पॅटर्न ही मोहीम राज्य शासनाने कुपोषण निर्मूलन- संदर्भात सुरू केली.

*विलासराव देशमुख निवडणूक व्यवस्थापन समिती-

 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव दशमुख यांच्याकडे सोपविण्यात आले.

*देशमुख, दांडेकर, देऊस्कर समिती- 

पाणी वाटप प्रश्नी राज्यात नेमलेली समिती

*प्रा. वि. म. दांडेकर समिती-

 प्रादेशिक असमतोलाचा अभ्यास करून त्यावर उपाय सुचविण्यासाठी

*द. म. सुकथनकर समिती (जून १९९६)-
मुंबईतील जुन्या मोडकळीस आलेल्या- इमारतींचा प्रश्नसोडविण्यासाठी व उपाय सुचविण्यासाठी

*डॉ. विजय केळकर समिती- 

देशातील साखर उद्योगाचा सर्वागीण आढावा घेऊन ठोस उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी नेमलेली समिती

*व्ही. रंगनाथन समिती- 

महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण क्षेत्रातील सिंचनाचा तालुका निहाय अनुशेष निश्चित करण्यासाठी व निर्मूलन करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेली समिती

* नंदलाल समिती-

 नागपूर महानगरपालिकेतील क्रीडा साहित्य घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी

*प्रमोद नवलकर समिती- 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य सरकारने अल्पवयीन वेश्यांचा अभ्यास करण्यासाठी नेमलेली समिती

*प्रा. जनार्दन वाघमारे समिती- 

नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाच्या स्थापनेसाठी नेमलेली समिती

*पी. एस. पाटणकर समिती- 

महाराष्ट्रातील नवीन नांदेड महसूल आयुक्तालयाच्या स्थापनेसंबंधी

*वसंत पुरके समिती (२००८)- 

शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा समावेश करण्याबाबत परीक्षण करण्याकरिता राज्य सरकारने नेमलेली समिती

*सुनील तटकरे समिती (२००९)- 

रायगडावरील किल्ल्यातील मेघडंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासंदर्भात नेमलेली समिती

*अशोक बसाक समिती- 

दूध दरवाढ व खरेदी विक्री धोरण ठरविण्याबाबत

*न्या. राजिंदर सच्चर समिती-
मुस्लिमांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दर्जाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेली समिती

*जगदीश सागर समिती (१९९५)-
नवी दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची चौकशी करण्यासाठी

*न्या. बी. एन. श्रीकृष्ण आयोग- 

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांची चौकशी करण्यासाठी

*के. नलिनाक्षण समिती - 

ठाणे महानगर पालिकाअंतर्गत धोकादायक इमारतीमागील कारणे शोधण्यासाठी नेमलेली समिती तसेच ठेकेदारांचे भ्रष्टाचाराबद्दल

*नंदलाल समिती- 

ठाणे महानगरपालिकेतील गैरव्यवहारप्रकरणी नेमलेली समिती

*न्या. बी. एन. श्रीकृष्ण-

 सहाव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष

*न्या. कुलदीपसिंग समिती -
मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्या संबंधीचा अभ्यास करण्यासाठी

*लिबरहान आयोग 

बाबरी मशीद विध्वंसप्रकरणी चौकशी करण्यासाठी

*न्या. नानावटी आयोग/ न्या. बॅनर्जी समिती-

 गोध्रा हत्याकांड चौकशी करण्यासाठी

*फुकन आयोग (२००४)- संरक्षण क्षेत्रातील लाचखोरी व तहलका चौकशी करण्यासाठी

*मणिसाना आयोग-
पत्रकारासाठी नेमलेल्या वेतन आयोगानुसार वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्या पत्रकार व गैरपत्रकार कर्मचाऱ्यांना वेतनात ३० टक्के वाढ

Friday, April 4, 2014

Marathi Current affairs Daily -4 April 2014

marathi quiz

प्रश्नमंजुषा-508

1. 3 एप्रिल 2014 रोजी सादर झालेल्या 'ऍसोचम() The Associated Chambers of Commerce and Industry of India'- ASSOCHAM च्या अहवालानुसार 2013-14 ह्या वित्तीय वर्षात सर्वाधिक परकीय गुंतवणूक कोणत्या राज्यात झाली ?

A. गुजरात
B. ओडिशा
C. महाराष्ट्र
D. तामीळनाडू


Click for answer 

C. महाराष्ट्र
2. इस्त्रोने 1 एप्रिल 2014 पासून कोणत्या उपग्रहाचा वापर थांबवला ?

A. इनसॅट-1B
B. इनसॅट-1E
C. इनसॅट-2D
D. इनसॅट-3E


Click for answer 

D. इनसॅट-3E
3. जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहेत ?

A. जिम योंग किम
B. क्रिस्टीन लेगार्ड
C. बान की-मून
D. युकिया अमानो


Click for answer 

A. जिम योंग किम
4. 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' हे पुस्तक कोणत्या अधिका‌र्‍याच्या लेखणीतून साकारलेले आहे?

A. विश्वास पाटील
B. लक्ष्मीकांत देशमुख
C. नीला सत्यनारायण
D. प्रभाकर देशमुख


Click for answer 

B. लक्ष्मीकांत देशमुख
5. 2014 च्या आंतरराष्ट्रीय धैर्य पुरस्कार (International Woman of Courage Award) लक्ष्मी अगरवाल यांना मिशेल ओबामा यांच्या हस्ते बहाल करण्यात आला. लक्ष्मी अगरवाल यांची कोणती स्वयंसेवी संस्था आहे?

A. स्टॉप बॅड टच
B. स्टॉप अ‍ॅसीड अटॅक्स
C. स्टॉप रेपस् प्रोटेक्ट वूमेन
D. नो बॅड टच


Click for answer 

B. स्टॉप अ‍ॅसीड अटॅक्स
6. महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत?

A. जयंतकुमार बांठीया
B. जे. एस. सहारीया
C. जे. पी. डांगे
D. नीला सत्यनारायण


Click for answer 

B. जे. एस. सहारीया
7. मुंबई महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त कोण आहेत?

A. सीताराम कुंटे
B. विकास देशमुख
C. हर्षदीप कांबळे
D. राधेश्याम मोपलवार


Click for answer 

A. सीताराम कुंटे

हि फाईल pdf स्वरुपात हवी आहे, खालील "Print Friendly" बटणाचा वापर करा.

Print Friendly and PDF

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत