Showing posts with label PSI. Show all posts
Showing posts with label PSI. Show all posts

Saturday, June 25, 2011

प्रश्नमंजुषा -49

महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2010-11  वर आधारित प्रश्न

1.  सन 2009-10 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या उत्पन्नात कृषी  आणि संलग्न क्षेत्रांचा हिस्सा _______ टक्के होता.

A.  10.5
B.  28.9
C.  60.6
D.  75.0

उत्तरासाठी क्लिक  करा 
A.  10.5

2. वर्ष _________ हे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते.

A. 2009
B. 2010
C. 2008
D. 2007

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. 2010

3. राज्यातील ________ लाख हेक्टर जमीन लागवडीखाली आहे तर ________ लाख हेक्टर जमीन वनाखाली आहे.

A. 200,50
B. 224.5 , 52.1
C. 350,150
D. 240.8,20.5

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. 224.5 , 52.1

4. 2001 च्या जनगणनेनुसार देशाची साक्षरता _________ टक्के होती तर राज्याची ________ टक्के होती.

A. 65, 76.9
B. 54,65.5
C. 75,89.5
D. 76.9,65

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. 65, 76.9


5. राज्यात _________ प्रशासकीय विभाग आहेत.

A. 4
B. 5
C. 6
D. 7

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. 6

6. पवन, सौर, बायोगॅस ,जैविक, समुद्र-लाटा आणि भू औष्णिक हे अक्षय ऊर्जेचे स्त्रोत असून ह्यांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने _________ ह्या संस्थेची 'अंमलबजावणी करणारी निर्देशित संस्था 'म्हणून प्रमाणित केले आहे.

A. महाऊर्जा (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण )
B. महाजेन्को (महाराष्ट्र राज्य ऊर्जा उत्पादन कंपनी लि.)
C. महाट्रान्सको (महाराष्ट्र राज्य ऊर्जा वहन कंपनी लि.)
D. महाडिस्कॉम (महाराष्ट्र राज्य ऊर्जा वितरण कंपनी लि.)

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. महाऊर्जा (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण )

7.    6  ते 14 वयोगटातील मुलांना जवळच्या शाळेत मोफत व सक्तीचे शिक्षण प्राप्त करून देणारा ' मोफत व सक्तीच्या  शिक्षणाचा अधिकार , २००९ ' राज्यात ____________ पासून लागू झाला.

A. 1 एप्रिल 2009
B. 1 एप्रिल 2010
C. 1 एप्रिल 2011
D. 1 जानेवारी  2011

उत्तरासाठी क्लिक  करा 
1 एप्रिल 2010

8. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानात ___________ या पिकांचा समावेश आहे.

A. तांदूळ ,गहू आणि ज्वारी
B. गहू, बाजरी आणि ज्वारी
C. तांदूळ ,ज्वारी आणि कडधान्ये
D. तांदूळ ,गहू आणि कडधान्ये

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. तांदूळ ,गहू आणि कडधान्ये

9. 2008-09 साली राज्याच्या सिंचनाखालील एकूण क्षेत्राचे पिकांखालील एकूण क्षेत्राशी प्रमाण _________ होते.

A. 11.7 %
B. 17.7 %
C. 37.7 %
D. 87.7 %

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. 17.7 %

10. तुषार आणि ठिबक सिंचनामुळे पीक उत्पादनात पिकांच्या प्रकारानुसार _____________टक्के इतकी वाढ होते.

A. 10 ते 49
B. 47 ते 78
C. 12 ते 31
D. 15 ते 55

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. 12 ते 31


Sunday, June 19, 2011

प्रश्नमंजुषा -36

विज्ञान आणि तंत्रज्ञान 


1. आधुनिक आवर्त सारणीत __________आवर्त आहेत.

A. 7
B. 18
C. 9
D. 10

उत्तरासाठी क्लिक  करा 
7

2. ध्वनीचे प्रसारण _______मधून होत नाही.

A. स्थायू
B. वायू
C. द्रव
D. निर्वात पोकळी

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. निर्वात पोकळी

3. विद्युत ऊर्जा आणि चुंबकत्व यांच्यामधील संबंध सर्वप्रथम ________ ने शोधून काढला.

A. ज्यूल
B. ओहम
C. ओरस्टेड
D. फ्लेमिंग

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. ओरस्टेड

4. रक़्तातील हिमोग्लोबिनमध्ये ______ हा खनिज पदार्थ असतो.

A. लोह
B. कॅल्शीअम
C. आयोडीन
D. फॉस्फरस

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. लोह

5. शुद्ध लोखंडाचा प्रकार म्हणजे ______ होय.

A. ओतीव लोखंड
B. बीड लोखंड
C. घडीव लोखंड
D. वितळलेले लोखंड

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. घडीव लोखंड

6. कवक आणि शैवाल यांच्यातील प्रमुख फरक कोणता?

A. तंतुकणिका
B. जलव्याल
C. हरितद्रव्य
D. कॅल्शीअम

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. हरितद्रव्य

7. क्ष-किरण म्हणजे ____________ आहेत.

A. ॠण प्रभारित कण
B. धन प्रभारित कण
C. प्रभार विरहित कण
D. विद्युत चुंबकीय लहरी

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. विद्युत चुंबकीय लहरी

8. थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती __________ यामुळे सुरक्षित राहतात.

A. आर्द्रता
B. दवबिंदू
C. विशिष्ट उष्माधारकता
D. पाण्याचे असंगत आचरण

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. पाण्याचे असंगत आचरण

9. __________ यापासून मिळणारी ऊर्जा प्रदूषणरहित असते.

A. पेट्रोल
B. कोळसा
C. केंद्रकीय क्रियाधानी
D. सौर घट

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. सौर घट

10. खालीलपैकी कोणत्या इंद्रीयामध्ये पित्ताची निर्मिती होते?

A. स्वादुपिंड
B. लहान आतडे
C. जठर
D. यकृत

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. यकृत
प्रश्नमंजुषा -35

प्रश्नमंजुषा -35


1. 'मुरूड ' ह्या आपल्या जन्मगावी स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देणारा समाजसुधारक _________________

A.डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B.आगरकर
C.महर्षी कर्वे
D.छत्रपती शाहू महाराज

उत्तरासाठी क्लिक  करा 
C.महर्षी कर्वे

2. 'गुलामगिरी ' हे पुस्तक कोणी लिहिले?

A. महात्मा फुले
B. राजर्षी शाहू
C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
D. आगरकर

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. महात्मा फुले

3. ________ ह्या विदर्भकन्येस 'अनाथांची ' ची आई म्हणून ओळखले जाते.

A. इंदुताई टिळक
B. अनुताई वाघ
C. सिंधुताई सपकाळ
D. नसीमा हुरजूक

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. सिंधुताई सपकाळ

4. 'बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी'चे संस्थापक कोण होते?

A. भाऊ महाजन
B. भाऊ दाजी लाड
C. जगन्नाथ शंकरशेठ
D. लोकहितवादी

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. जगन्नाथ शंकरशेठ

5. 'स्त्री-पुरुष तुलना 'हा ग्रंथ कोणी लिहिला?

A. पंडिता रमाबाई
B. ताराबाई शिंदे
C. रमाबाई रानडे
D. आनंदीबाई जोशी

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. ताराबाई शिंदे

6. _________ रोजी डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला?

A. 16 मार्च 1927
B. 18 जून 1927
C. 14 ऑक्टोबर 1956
D. 20 नोव्हेंबर 1935

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. 14 ऑक्टोबर 1956

7. 'केसरी 'ह्या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण?

A. लोकमान्य टिळक
B. न्या. रानडे
C. आगरकर
D. गोपाळ कृष्ण गोखले

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. आगरकर

8. जुलै 1924 मध्ये 'बहिष्कृत हितकारणी सभे' ची स्थापना कोणी केली?

A. विठठ्ल रामजी शिंदे
B. महात्मा फुले
C. डॉ. भीमराव आंबेडकर
D. महर्षी कर्वे

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. डॉ. भीमराव आंबेडकर

9. महात्मा फुले यांनी __________ हे वृत्तपत्र चालू केले?

A. दीनबंधू
B. प्रभाकर
C. हास्य संजीवनी
D. संवाद कौमुदी

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. दीनबंधू

10. 'राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे.'असे म्हणणारे कर्ते समाजसुधारक हे होत?

A. महात्मा फुले
B. डॉ.बाबासाहेब आंबेडकर
C. गो.ह.देशमुख
D. लोकहितवादी

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. डॉ.बाबासाहेब आंबेडकर

Saturday, June 18, 2011

प्रश्नमंजुषा -32

भारताचा सामान्य इतिहास 1857 ते 1947 


1.'वंदेमातरम ' या गीताचे लेखक कोण?

A. दीनबंधू मित्र
B. रवींद्रनाथ टागोर
C. बंकिमचंद्र चटर्जी
D. नवीनचंद्र सेन

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. बंकिमचंद्र चटर्जी

2. आर्य समाजाचे सुप्रसिद्ध घोषवाक्य कोणते?

A. उपनिषदा कडे परत चला .
B. वेदांकडे परत चला. 
C. पुराणाकडे परत चला. 
D. स्मृतींकडे परत चला. 

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. वेदांकडे परत चला.

3. भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण?

A. लॉर्ड कर्झन
B. लॉर्ड कॅनिंग
C. लॉर्ड वेलस्ली
D. लॉर्ड डलहौसी

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. लॉर्ड कॅनिंग

4. महात्मा गांधीजींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता?

A. चंपारण्य
B. खेड
C. मुळशी
D. बारडोली

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. चंपारण्य

5. 'डिप्रेस्ड क्लास मिशन 'या संस्थेची स्थापना कोणी केली?

A. महात्मा ज्योतिबा फुले
B. विठ्ठल रामजी शिंदे
C. राजर्षी शाहू महाराज
D. डॉ.बाबासाहेब आंबेडकर

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. विठ्ठल रामजी शिंदे

6. सन १८५० साली _____येथे बिनतारी संदेश वाहन सुरु झाले.

A. मुंबई -ठाणे
B. मुंबई -दिल्ली
C. दिल्ली -कोलकाता
D. कोलकाता -आग्रा

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. कोलकाता -आग्रा

7.'आत्मीय सभा ' आणि 'ब्राम्हो समाज ' यांची स्थापना _________ यांनी केली.

A.स्वामी दयानंद सरस्वती
B. राजा राम मोहन रॉय
C.स्वामी विवेकानंद
D.आत्माराम पांडुरंग

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. राजा राम मोहन रॉय

8.स्वातंत्र्य वीर सावरकरांना इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी कोणी शिष्यवृत्ती दिली होती?

A. श्यामजी कृष्ण वर्मा
B. राशबिहारी बोस
C. लाला लजपतराय
D. मॅडम कामा
उत्तरासाठी क्लिक  करा 
A. श्यामजी कृष्ण वर्मा

9.बार्डोलीचा सत्याग्रह कोणत्या राज्यात घडला?

A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. मध्यप्रदेश
D. राजस्थान

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. गुजरात

10. मुंबई प्रांतात 'रयतवारी पध्दत' कोणी सुरु केली?

A. लॉर्ड डफरीन
B. एलफिन्स्टन
C. लॉर्ड मेकॉले
D. थॉमस मुन्‍रो

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. एलफिन्स्टन

आमचे पोस्ट आवडले असतील तर Email द्वारे अपडेट्स मिळवा

Share for Care

If you LIKE what we are posting here, please share it on your Facebook page. Just copy the URL link and paste on your Facebook status update.
आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत