Showing posts with label DEd CET. Show all posts
Showing posts with label DEd CET. Show all posts

Monday, March 5, 2012

प्रश्नमंजुषा -223


विशेष आभार : जलसंपदा खात्याच्या वरिष्ठ लिपिक /भांडारपाल पदासाठी झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका सुनील मोहिते यांनी 'स्कॅन ' करून पाठवली. आपणही आम्हाला mpsc.mitra@gmail.com ह्या मेल आयडीवर होणाऱ्या विविध परीक्षांचे पेपर पाठवू शकता.

अंकगणित/मानसिक क्षमता चाचणी विशेष प्रश्नमंजुषा -2

खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा
2. MPSC PSI पूर्व परीक्षा
3. MPSC Asst पूर्व परीक्षा
4. MPSC STI पूर्व परीक्षा
5. D.Ed. CET 2012

1. रामरावांनी आपल्या शेताच्या 1/3 भागात ऊस लावला, 1/4 भागात भुईमूग लावला व उरलेल्या 25 एकरात ज्वारी लावली . तर ऊस किती एकर आहे ?

A. 30
B. 20
C. 60
D. 50

Click for answer 
B. 20

2.दोन संख्यांचा गुणाकार 24 आहे . त्या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल ?

A. 72
B. 48
C. 96
D. 24


Click for answer 
C. 96

3. एका वर्तुळाची परिमिती 44 सेमी आहे , तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ?

A. 134 चौ. सेमी
B. 144 चौ. सेमी
C. 164 चौ. सेमी
D. 154 चौ. सेमी

Click for answer 
D. 154 चौ. सेमी
स्पष्टीकरण:

4. संपतरावांनी एक गाय , एक म्हैस व एक बैल 9500 रुपयांना खरेदी केले. त्याच्या किंमतीचे प्रमाण अनुक्रमे 4 : 6 : 9 आहे . तर म्हशीची किंमत किती ?

A. रु. 3500
B. रु. 3000
C. रु. 4000
D. रु. 4500


Click for answer 
B. रु. 3000
5. एक पाण्याचा हौद एका नळाने 4 तासात भरतो. तर दुस‍‍‍र्‍या नळाने तो 6 तासात भरतो . दोन्ही नळ सकाळी 4 वाजता चालू केले तर किती वाजता तो रिकामा हौद पूर्ण भरेल ?

A. 6 वा 24 मि
B. 9 वा
C. 6 वा 36 मि
D. 7 वा 24 मि


Click for answer 
A. 6 वा 24 मि

6. ' अ ' एक काम 20 दिवसात पूर्ण करतो . तेच काम पूर्ण करण्यास ' ब ' ला 30 दिवस लागतात . तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ?

A. 8
B. 12
C. 15
D. 10

Click for answer 
B. 127. एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी 5 मीटर असून एका बाजूची लांबी 3 मीटर आहे . तर त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल ?

A. 15.00
B. 7.50
C. 6.00
D. 8.00

Click for answer 
C. 6.00


8. पाच व्यक्ती रांगेत उभ्या आहेत . रवी राजनच्या पुढे नही . रेखा सर्वात पुढे आहे . राजन राहुलच्या मागे आहे . रेणू रवीच्या मागे आहे .राजन रेणूच्या मागे नाही . तर रांगेत सर्वात शेवटी कोण आहे ?

A. राजन
B. रवी
C. राहूल
D. रेणू

Click for answer 
D. रेणू


9. दुपारी 12 वाजता होणार्‍या परंतू लांबून ऐकू येणार्‍या भोंग्यानुसार तुम्ही घडयाळ लावले तर


A. घडयाळ मागे असेल
B. घडयाळ पुढे असेल
C. घडयाळ योग्य वेळ दर्शवेल
D. घडयाळ प्रथम पुढे जाईल व नंतर मागे पडेल .

Click for answer 
A. घडयाळ मागे असेल

स्पष्टीकरण: ध्वनीला हवेतून प्रवास करायला जो वेळ लागतो. तेवढ्या कालावधीने तुमचे घड्याळ मागे असेल.

10. 620 चा कोटीकोन किती अंशांचा असेल ?

A. 280
B. 380
C. 1180
D. 1800

Click for answer 
A. 280
कोटीकोन = 900 -दिलेला कोन =900-620=280

Wednesday, February 29, 2012

प्रश्नमंजुषा -218

अंकगणित विशेष प्रश्नमंजुषा -1

खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा
2. MPSC PSI पूर्व परीक्षा
3. MPSC Asst पूर्व परीक्षा
4. MPSC STI पूर्व परीक्षा
5. D.Ed. CET 2012

1.


A. 25
B. 50
C. 75
D. 1

Click for answer 
D. 12. 120 पैकी 65 टक्के मुले पास झाली, तर अनुत्तीर्ण विद्यार्थी किती ?

A. 52
B. 42
C. 50
D. 58

Click for answer 
B. 42
सर्वप्रथम लक्षात घेवू या कि येथे पास झालेल्या मुलांची टक्केवारी दिली आहे. पण विचारताना अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या विचारली आहे. तेव्हा, जर 65% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असतील तर (100-65)%=35% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असणार.

जर दर 100 पैकी 35 विद्यार्थी अनुत्तीर्ण असतील
तर 120 (एकूण विद्यार्थी संख्या) पैकी ‘ x ’ विद्यार्थी अनुत्तीर्ण असतील.
3. ________या संख्येच्या 5 पट व  8 पटीतील  फरक 27 येतो.

A.  9
B.  4
C.  6
D.  12

Click for answer 
A.  9

एक संख्या 'x' समजू .

'x' च्या 5 पट 5x तर 8 पट 8x होईल.

8 आणि 5 पटीतील फरक 27 आहे.

8x-5x=27

3x=27

x=27/3=94.


A.
           
B.
           
C.
         
        
D.
         
Click for answer 
B.
           5. 4 ही संख्या 0.2 च्या किती पट आहे ?

A. 20
B. 30
C. 10
D. 40

Click for answer 
A. 20
6. एक पेला आणि एक तांब्यात अनुक्रमे 150 मि.ली. व 165 मि.ली. पाणी भरते. 13 लिटर पाणी असलेल्या बादलीतून एक पेला आणि एक तांब्या भरून पाणी बाहेर काढल्यावर बादलीत किती पाणी उरते?

A. 12.685 ली.
B. 16.285 ली.
C. 18.265 ली.
D. 22.685 ली.

Click for answer 
A. 12.685 ली.

अशा स्वरूपाच्या गणितांमध्ये दिलेल्या राशीचे एकक समान असणे आवश्यक असते.

ह्या ठिकाणी उत्तर लिटर मध्ये अपेक्षित आहे म्हणून पेला आणि तांब्या यांचे एकक लिटर करणे जास्त संयुक्तिक होईल.

1 लिटर =1000 मिलीलीटर

म्हणून पेला आणि तांब्या यांच्यात अनुक्रमे 0.150 लिटर आणि 0.165 लिटर इतके पाणी भरेल.

13 लिटर पाणी असलेल्या बादलीतून एक पेला आणि एक तांब्या भरून पाणी बाहेर काढल्यावर बादलीत

13-(तांब्यात मावणारे पाणी + पेल्यात मावणारे पाणी )= 13-(0.165+0.150)=13-0.315= 12.685 ली. इतके पाणी उरते.7.
        

A. 12
B. 14
C. 16
D. 18

Click for answer 
A. 12

16 -8 + 4= ?

8+4=128. 2,6,12,20,30,... या क्रमाने येणारी पुढील संख्या कोणती ?

A. 34
B. 32
C. 42
D. 38

Click for answer 
C. 42

अश्या प्रकारे पुढील संख्येसाठी तो फरक 12 असेल. म्हणून उत्तर =30+12=429. विक्रमने त्याला मिळणार्‍या 15000  रुपये फायद्यातील 15 %  टक्के रक्कम मुलीच्या लग्नास आणि 45 % टक्के रक्कम घरखर्चासाठी वापरली, तर उरलेली रक्कम किती ?

A. 6000 रुपये
B. 6900 रुपये
C. 9000 रुपये
D. यापैकी नाही

Click for answer 
A. 6000 रुपये

विक्रमाला मिळालेली एकूण रक्कम 15000 रुपये . यापैकी 15 % +45 % =60 % रक्कम वापरली गेली. तर उरलेली रक्कम 100-60= 40 %.

15000 रुपयांच्या 40 % म्हणजेच


इतकी रक्कम शिल्लक राहील.


10. एका वस्तूची खरेदी किंमत 50 रुपये आहे व तिची विक्री किंमत 30 रुपये आहे, तर या व्यवहारात शेकडा तोटा किती झाला ?

A. 30
B. 40
C. 20
D. 60

Click for answer 
B. 40

50 रुपयांच्या खरेदीवर 20 रुपये तोटा झाला आहे.

(खरेदी 50 रुपये -विक्री 30 रुपये )


शेकडा तोटा काढण्यासाठी 100 रुपये खरेदीवर किती तोटा झाला हे पहाणे आवश्यक असते.

50 रुपयेवर 20रुपये तोटा तर 100 रुपये खरेदीवर 40 रुपये तोटा होईल.

म्हणून शेकडा तोटा 40 रुपये.Wednesday, February 8, 2012

प्रश्नमंजुषा -212


खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. MPSC PSI पूर्व परीक्षा
2. MPSC Asst पूर्व परीक्षा
3. MPSC STI पूर्व परीक्षा
4. D.Ed. CET 2012
5. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा

1. दूरध्वनीवरून आवाजाचे दळणवळण करणार्‍‍या पाईपाची बँडविड्थ किती असली पाहीजे ?

A. 10 किलो हर्टझ्
B. 6 किलो हर्टझ्
C. 4 किलो हर्टझ्
D. 200 किलो हर्टझ्

Click for answer 
C. 4 किलो हर्डट्स

2.0.001 ग्रॅम रेणूकता असलेल्या आम्लाचा सामु ( pH ) ______________ आहे .

A. 0.001
B. 0.0001
C. 3.3
D. 3

Click for answer 
D. 3

3. वैयक्‍तिक आरोग्य म्हणजे__________________

A. रोगमुक्त राहणे
B. शारीरीक स्वच्छता
C. योग्य आहार सवय
D. वरील सर्व उपाय

Click for answer 
D. वरील सर्व उपाय

4.खालीलपैकी कुठल्या प्राणीवर्गात क्लोम श्वसन पध्दती आठळते ?

A. चक्रमुखी
B. अनेकपद कृमी
C. उभयचर
D. सस्तनी

Click for answer 
A. चक्रमुखी

5. अल्केनच्या समजात श्रेणीतील लगतच्या घटकांचे रेणुवस्तुमान _________________ ने वेगळे झालेले असते .

A. 16
B. 20
C. 14
D. 12

Click for answer 
C. 14

6. वनस्पतीच्या वाढीसाठी ____________________ हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे .

A. नायट्रोजन
B. ऑक्सीजन
C. कार्बन
D. पोटॅशिअम

Click for answer 
A. नायट्रोजन

7. जैव तंत्रज्ञान _____________________ पातळीवर कार्य करते .

A. रेणु
B. अणु
C. द्रव
D. पदार्थ

Click for answer 
A. रेणु

8. हि्र्‍याचा अपवर्तनांक किती ?

A. 1.5
B. 1.6
C. 2.42
D. 1.33

Click for answer 
C. 2.42

9. विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते ?

A. न्यूक्लीय बल
B. गुरुत्वीय बल
C. विद्युत चुंबकीय बल
D. विद्युतस्थितीक बल

Click for answer 
A. न्यूक्लीय बल

10. ___________ हे अनुवंशिक गुणधर्माचे वाहक आहेत .

A. केंद्रक
B. पेशीद्रव्य
C. जनुक
D. गुणसूत्रे

Click for answer 
C. जनुक

Tuesday, February 7, 2012

प्रश्नमंजुषा -210


खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा
2. MPSC PSI पूर्व परीक्षा
3. MPSC Asst पूर्व परीक्षा
4. MPSC STI पूर्व परीक्षा
5. D.Ed. CET 2012
6. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा

1. अलीकडेच CSO ( केंद्रीय सांख्यीकीय कार्यालय ) ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2010-11 या वर्षासाठी भारताचे दरडोई उत्पन्न (Per Capital Income ) किती होते ?

A. 46,117 रु.
B. 53,331 रु.
C. 4617 रु.
D. 5333 रु.

Click for answer 
B. 53,331 रु.

2.: रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने अलीकडेच ( सर्वप्रथम ) किती रुपयांच्या नोटा रुपयाचे नवीन चिन्ह अंकीत करून बाजारात आणल्या आहेत ?

A. 5 रु.
B. 100 रु.
C. 500 रु.
D. 1000 रु.

Click for answer 
C. 500 रु.

3. भारत सरकारने अलीकडेच शिकोगा विद्यापीठात कोणाच्या नावाने मानद ' चेअर ' स्थापन करून संबंधित विषयांतील संशोधनासाठी उत्तेजन मिळावे यासाठी करार केला आहे ?

A. डॉ. एस.चंद्रशेखर
B. डॉ. हरगोविंद खोराणा
C. डॉ. वेंकटरामन
D. स्वामी विवेकानंद

Click for answer 
D. स्वामी विवेकानंद

4. भारत सरकारने 1320 मेगावॅट क्षमतेचा औष्णिक विद्युत प्रकल्प 'खुलना' येथे स्थापन करण्यासाठी ____________________ देशाबरोबर करार केला आहे .

A. नेपाळ
B. भूतान
C. बांगलादेश
D. अफगाणिस्तान

Click for answer 
C. बांगलादेश

5. ' करीयर ग्रॅण्ड स्लॅम' जिंकण्याचा भीम पराक्रम करणारी पहिली भारतीय व्यक्ती ठरण्याचा बहुमान कोणी पटकविला ?

A. सानिया मिर्झा
B. प्रकाश अमृतराज
C. महेश भूपती
D. लिएंडर पेस

Click for answer 
D. लिएंडर पेस
स्पष्टीकरण : लॉन टेनिसच्या चारही मुख्य स्पर्धा म्हणजेच अमेरिकन ओपन, फ्रेंच ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डन करियरमध्ये एकदा तरी जेतेपद प्राप्त करण्याच्या पराक्रमास ' करीयर ग्रॅण्ड स्लॅम ' म्हणतात .

6. नुकतेच निधन झालेले एम.ओ.एच.फारूक हे कोणत्या राज्याचे राज्यपाल होते ?

A. आंध्रप्रदेश
B. केरळ
C. त्रिपुरा
D. आसाम

Click for answer 
B. केरळ

7. 2012 च्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्याच्या विशेष अतिथी श्रीमती यिंगलक शिनवात्रा ह्या कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत ?

A. त्रिनिनाद-टोबॅगो
B. थायलंड
C. फिलीपाइन्स
D. दक्षिण कोरीया

Click for answer 
B. थायलंड

8. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा मान सर्वप्रथम कोणत्या महिला अध्यक्ष / पंतप्रधान / राष्ट्रप्रमुखास मिळाला ?

A. श्रीमती भंडारनायके
B. यिंगलक शिनवात्रा
C. राणी एलिझाबेथ-II
D. शेख हसीना

Click for answer 
C. राणी एलिझाबेथ-II

9. चार दिवसांचा ' एलोरा - अजंठा फेस्टीवल ' 3 वर्षानंतर कोणत्या शहरात साजरा झाला ?

A. औरंगाबाद
B. दौलताबाद
C. पुणे
D. मुंबई

Click for answer 
A. औरंगाबाद

10. ' मतदार दिन ' भारतात कधी साजरा केला गेला ?

A. 1 जानेवारी
B. 12 जानेवारी
C. 25 जानेवारी
D. 26 जानेवारी

Click for answer 
C. 25 जानेवारी

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत