Showing posts with label समाजसुधारक. Show all posts
Showing posts with label समाजसुधारक. Show all posts

Sunday, March 4, 2012

प्रश्नमंजुषा -220


1. ' मराठी साम्राज्यातील नाणी व चलन ' ह्या निबंधाचे लेखन कोणी केले ?

A. रा. गो. भांडारकर
B. न्यायमुर्ती रानडे
C. लोकमान्य टिळक
D. सुधारक गो. ग. आगरकर

Click for answer 
B. न्यायमुर्ती रानडे

2.' वेदांग ज्योतीष ' हा प्रबंध कोणत्या राजकीय नेत्याने / समाजसुधारकाने लिहीला ?

A. गोपाळ गणेश आगरकर
B. लोकमान्य टिळक
C. न्यायमुर्ती रानडे
D. महात्मा फुले

Click for answer 
B. लोकमान्य टिळक

3. ' नारायण श्रीपाद राजहंस ' यांना ___________________ नावानेही लोकप्रियता मिळाली होती ?

A. बालगंधर्व
B. कुमारगंधर्व
C. सवाईगंधर्व
D. राजगंधर्व
Click for answer 
A. बालगंधर्व

4. सन 1848 मध्ये महात्मा फुलेंनी मुलींसाठी पुण्यातील पहिली शाळा पुण्यातल्या कोणत्या भागात सुरु केली होती ?

A. वेताळ पेठ
B. रास्ता पेठ
C. रविवार पेठ
D. बुधवार पेठ

Click for answer 
D. बुधवार पेठ

5. महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर निष्प्राण होत चाललेल्या सत्यशोधक चळवळीला संजीवनी देण्याचे कार्य कोणत्या समाजसुधारकाने केले होते ?

A. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B. विठ्ठल रामजी शिंदे
C. छत्रपती शाहू महाराज
D. कर्मवीर भाऊराव पाटील

Click for answer 
C. छत्रपती शाहू महाराज


6. ' संततीनियमना ' वर तत्कालीन काळात , काळाच्या खूप पुढे जाऊन दूरदर्शीपणे परखडपणे विचार मांडण्याचे धाडस खालीलपैकी कोणी दाखविले होते ?

A. महात्मा फुले
B. महर्षी वि. रा. शिंदे
C. महर्षी धों. के. कर्वे
D. रघुनाथ धों. कर्वे

Click for answer 
D. रघुनाथ धों. कर्वे

7. कुष्ठरोग्यांसाठी खालीलपैकी कोणी विशेष कार्य केले होते ?

A. विनोबा भावे
B. डॉ. शिवाजीराव पटवर्धन
C. डॉ. पंजाबराव देशमुख
D. अच्युतराव पटवर्धन

Click for answer 
B. डॉ. शिवाजीराव पटवर्धन

8. अमरावती येथे ' श्रद्धानंद छात्रालय ' कोणी सुरु केले होते ?

A. डॉ. शिवाजीराव पटवर्धन
B. डॉ. पंजाबराव देशमुख
C. भाई बागल
D. विनोबा भावे

Click for answer 
B. डॉ. पंजाबराव देशमुख

9. ' ..... जेव्हा माणूस जागा होतो', हे स्वतःच्या अनुभवावर आधारित पुस्तक कोणी लिहिले ?

A. अनुताई वाघ
B. गोदावरी परुळेकर
C. दुर्गाबाई भागवत
D. प्रा. गं. बा. सरदार
Click for answer 
B. गोदावरी परुळेकर

10. ' भावार्थसिंधु ' चे लेखन कोणी केले ?

A. भाऊ दाजी लाड
B. विष्णु बुवा ब्रम्हचारी
C. न्यामुर्ती रानडे
D. लोकहितवादी

Click for answer 
B. विष्णु बुवा ब्रम्हचारी

Thursday, December 15, 2011

प्रश्नमंजुषा -142


1. 'गुलामगिरी' ह्या प्रसिध्द ग्रंथाचे लेखक कोण ?

A. गोपाळ कृष्ण गोखले
B. महात्मा फुले
C. गोपाळ गणेश आगरकर
D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Click for answer 
B. महात्मा फुले

2. कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणासाठी हंटर कमिशन समोर साक्ष कोणी दिली होती ?

A. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B. महात्मा फुले
C. महात्मा गांधी
D. लोकमान्य टिळक

Click for answer 
B. महात्मा फुले


3. महात्मा फुले यांचे मूळ आडनाव _________ हे होते.

A. चिपळूणकर
B. गोर्‍हे
C. माळी
D. कटगुणकर

Click for answer 
B. गोर्‍हे

4. 'द अनटचेबल' ह्या ग्रंथाचे लेखन कोणी केले ?

A. महात्मा गांधी
B. महात्मा फुले
C. महर्षी वि.रा.शिंदे
D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Click for answer 
D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

5. डॉ.आंबेडकरांनी धर्म बदलण्याची घोषणा _________ येथे केली.

A. महू
B. नागपूर
C. मुंबई
D. येवले

Click for answer 
D. येवले

6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म ______ येथे झाला.

A. दापोली
B. महू
C. येवले
D. नागपूर

Click for answer 
B. महू

7. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धर्माची दीक्षा ________ येथे घेतली.

A. मुंबई
B. महू
C. येवले
D. नागपूर

Click for answer 
D. नागपूर

8. महर्षी कर्वेंना 'भारतरत्‍न ' पुरस्कार त्यांच्या कोणत्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल दिला गेला ?

A. अस्पृश्यता निवारण
B. संतती नियमन
C. प्रौढ शिक्षण
D. महिला शिक्षण

Click for answer 
D. महिला शिक्षण

9. महर्षी कर्वे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात कोणता विषय शिकवत ?

A. गणित
B. इंग्रजी
C. संस्कृत
D. कायदा

Click for answer 
A. गणित

10. ___________ हे 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन ' चे संस्थापक होते.

A. महर्षी कर्वे
B. महात्मा फुले
C. महर्षी वि.रा.शिंदे
D. छत्रपती शाहू महाराज

Click for answer 
C. महर्षी वि.रा.शिंदे

Thursday, August 4, 2011

प्रश्नमंजुषा -84
1. एकही तालुका नसलेला महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा __________ हा आहे.

A. मुंबई उपनगर
B. मुंबई शहर
C. ठाणे
D. पुणे

Click for answer 
B. मुंबई शहर

2. मुंबई उपनगर ह्या जिल्ह्याचे मुख्यालय _________ येथे आहे.

A. कुर्ला
B. वांद्रे
C. परळ
D. दादर

Click for answer 
B. वांद्रे


3.महाराष्ट्रात सर्वाधिक तालुके _________  विभागात आहेत तर सर्वाधिक जिल्हे ____________विभागात  आहेत.

A. कोकण ,औरंगाबाद
B. औरंगाबाद ,पुणे 
C.  नागपूर ,औरंगाबाद
D. औरंगाबाद , औरंगाबाद

Click for answer 
D. औरंगाबाद , औरंगाबाद

4. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक कोण करते?

A. राष्ट्रपती
B. विधानसभा
C. राज्यपाल
D. राज्यातील जनता

Click for answer 
C. राज्यपाल

5. भारतीय राज्यघटनेचे __________ भारतीय नागरिकांना घटनात्मक उपायांचा अधिकार बहाल करते.

A. कलम 134
B. कलम 368
C. कलम 124
D. कलम 32

Click for answer 
D. कलम 32

6. भारतीय राज्यघटनेने ____________ ला राष्ट्रध्वज संमत केला.

A. 15 ऑगस्ट 1947
B. 22 जुलै 1947
C. 25 जानेवारी 1950
D. 26 नोव्हेंबर 1949

Click for answer 
B. 22 जुलै 1947

7. भारतीय राज्यघटनेच्या कलम 81 नुसार लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त ________ इतकी निश्चित केली आहे.

A. 545
B. 551
C. 238
D. 250

Click for answer 
B. 551

8. धन विधेयक मांडल्यास राज्यसभेला _________च्या आत निर्णय घेणे बंधनकारक असते.

A. 14 दिवसां
B. 1 महिन्या
C. 6 महिन्या
D. 1 वर्षा

Click for answer 
A. 14 दिवसां

9. गोपाळ गणेश आगरकर ह्यांचे जन्मस्थळ ________________ हे होय.

A. टेंभू
B. शेरवली
C. कागल
D. महू

Click for answer 
A. टेंभू

10.  नाग हे क्षेपणास्त्र _________ विरोधी आहे.

A. विमान
B. रणगाडा
C. जहाज
D. शत्रू-क्षेपणास्त्र

Click for answer 
B. रणगाडा

Sunday, June 19, 2011

प्रश्नमंजुषा -35

प्रश्नमंजुषा -35


1. 'मुरूड ' ह्या आपल्या जन्मगावी स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देणारा समाजसुधारक _________________

A.डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B.आगरकर
C.महर्षी कर्वे
D.छत्रपती शाहू महाराज

उत्तरासाठी क्लिक  करा 
C.महर्षी कर्वे

2. 'गुलामगिरी ' हे पुस्तक कोणी लिहिले?

A. महात्मा फुले
B. राजर्षी शाहू
C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
D. आगरकर

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. महात्मा फुले

3. ________ ह्या विदर्भकन्येस 'अनाथांची ' ची आई म्हणून ओळखले जाते.

A. इंदुताई टिळक
B. अनुताई वाघ
C. सिंधुताई सपकाळ
D. नसीमा हुरजूक

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. सिंधुताई सपकाळ

4. 'बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी'चे संस्थापक कोण होते?

A. भाऊ महाजन
B. भाऊ दाजी लाड
C. जगन्नाथ शंकरशेठ
D. लोकहितवादी

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. जगन्नाथ शंकरशेठ

5. 'स्त्री-पुरुष तुलना 'हा ग्रंथ कोणी लिहिला?

A. पंडिता रमाबाई
B. ताराबाई शिंदे
C. रमाबाई रानडे
D. आनंदीबाई जोशी

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. ताराबाई शिंदे

6. _________ रोजी डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला?

A. 16 मार्च 1927
B. 18 जून 1927
C. 14 ऑक्टोबर 1956
D. 20 नोव्हेंबर 1935

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. 14 ऑक्टोबर 1956

7. 'केसरी 'ह्या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण?

A. लोकमान्य टिळक
B. न्या. रानडे
C. आगरकर
D. गोपाळ कृष्ण गोखले

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. आगरकर

8. जुलै 1924 मध्ये 'बहिष्कृत हितकारणी सभे' ची स्थापना कोणी केली?

A. विठठ्ल रामजी शिंदे
B. महात्मा फुले
C. डॉ. भीमराव आंबेडकर
D. महर्षी कर्वे

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. डॉ. भीमराव आंबेडकर

9. महात्मा फुले यांनी __________ हे वृत्तपत्र चालू केले?

A. दीनबंधू
B. प्रभाकर
C. हास्य संजीवनी
D. संवाद कौमुदी

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. दीनबंधू

10. 'राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे.'असे म्हणणारे कर्ते समाजसुधारक हे होत?

A. महात्मा फुले
B. डॉ.बाबासाहेब आंबेडकर
C. गो.ह.देशमुख
D. लोकहितवादी

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. डॉ.बाबासाहेब आंबेडकर

Friday, June 10, 2011

महर्षी धोंडो केशव कर्वे - 1

महर्षी धोंडो केशव कर्वे
 • महर्षी म्हणजे महान संत (ऋषी)
 • जन्म : 18 एप्रिल 1858 => शेरवली ( जिल्हा: रत्नागिरी) =>; जन्म आजोळी झाला.
 • मूळ गाव: मुरुड तालुका: दापोली
 • ( या ठिकाणी हेही ध्यानात ठेवा: कर्वेंनी सन 1886 मध्ये 'मुरुड फंडा 'ची स्थापना केली होती. तसेच पुर्नविवाह केल्यामुळे त्यांच्यावर त्यांच्या गावाने ( मुरुड ) बहिष्कार घातला होता.)
 • प्राथमिक शिक्षण : मुरुड
 • 1881 साली मॅट्रीक उत्तीर्ण.
 • उच्च  शिक्षण: आधी विल्सन  आणि नंतर एलफिस्टन (दोन्हीही मुंबईत.)
 • मुंबईत सुरुवातीला मुलींच्या शाळेत आधी शिक्षक .
 • नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आमंत्रणावरून फर्ग्युसन कॉलेजात गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू.
 • येथून पुढे पुणे हीच त्यांची कर्मभूमी बनली .
 • 1892 => डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे चे आजीव सदस्य बनले.
 • 1893 => विधवाविवाहास चालना मिळावी म्हणून विधवा विवाहोत्तेजक मंडळी हि संस्था काढली.
 • 1895 साली बदलून 'विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळी ' असे ठेवले .
 • स्वतः पहिल्या पत्नीच्या निधनानंतर विधवेशी विवाह करून आदर्श घालून दिला.
 • १८९९ साली पुण्यात 'अनाथ बालीकाश्रम ' ह्या संस्थेची स्थापना केली .
 • १९०० साली हि संस्था पुण्याजवळील हिंगणे येथे हलवली.
 • १९०७ साली त्यांनी हिंगणे येथे 'महिला विद्यालया 'ची स्थापना केली.
 • १९१६ साली महिला विद्यापीठाची स्थापना केली,
 • १९२० साली या संस्थेला शेठ विट्ठल दास ठाकरसी यांनी त्यांच्या मातोश्री यांच्या नावाने २० लाख रुपयांची देणगी दिली, त्यामुळे संस्थेला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले, परिणामी विद्यापीठाचे 'SNDT' असे नामकरण झाले .
 • महिला विद्यापीठातून मातृभाषेतून शिक्षण देण्याचा सल्ला कर्वेंना  महात्मा गांधीनी  दिला होता . 
 • सहावीची  परीक्षा त्याकाळी सरकारी असे आणि त्यासाठी ठराविकच केंद्र असत .कर्वेंना सातारा केंद्र घावे लागले होते आणि त्यासाठी कुंभार्ली घाटातून तब्बल १२५ मैल अन्तर चालून परीक्षेस पोहचले होते.
 • १०४ वर्षांचे दिर्घायुष्य लाभले.
 • भारत सरकारने पद्मभूषण आणि भारतरत्न या पुरस्कारांनी सन्मानित केले.
 • १९४२ साली बनारस हिंदू विद्यापीठाने डी.लिट बहाल केली तर १९५१ साली पुणे विद्यापीठाने डी.लिट बहाल केली. सन १९५४ ला एस.एन.डी.टी. ने डी.लिट बहाल केली.
 • १९५८  साली त्यांना त्यांच्या वयाच्या  शताब्दी साली 'भारतरत्न 'ने सन्मानित करण्यात आले.

Wednesday, May 25, 2011

प्रश्नमंजुषा-12

प्रश्नमंजुषा-12


1."मानवी समता " हे वृत्तपत्र कोणी चालविले होते?

A. महर्षी कर्वे

B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

C.  महात्मा फुले

D. गोपाळ गणेश आगरकर

उत्तरासाठी क्लिक  करा 


A.  महर्षी कर्वे2. "हिमालयाची सावली ' ह्या  महर्षी कर्वेंच्या जीवनावर आधारित नाटकाचे लेखन कोणी केले?

A. पु.ल.देशपांडे

B. वसंत कानिटकर

C. कुसुमाग्रज

D.  वि.स.खांडेकर


उत्तरासाठी क्लिक  करा 


C. कुसुमाग्रज


3. "Looking back" हे कोणाचे आत्मचरित्र  आहे?

A. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

B.महर्षी कर्वे

C.महात्मा फुले

D.गोपाळ गणेश आगरकर

उत्तरासाठी क्लिक  करा 


B.महर्षी कर्वे4. "विद्या खात्यातील ब्राम्ह पंतोजीचा पोवाडा " चे निर्माते हे होत.

A.गोपाळ गणेश आगरकर

B. महर्षी कर्वे

C.महात्मा फुले  

D.लोकमान्य टिळक

उत्तरासाठी क्लिक  करा 


C.महात्मा फुले


5. महात्मा फुले आपल्या पत्रकांवर नेहमी ________ हे लिहित

A.सत्यमेव जयते

B.तुकारामांची वचने

C.जय सत्यशोधक

D.निर्मिक
उत्तरासाठी क्लिक  करा 


A.सत्यमेव जयते

6. "सुधारक " हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?

A. विष्णूशास्त्री  चिपळूणकर

B. गोपाळ गणेश आगरकर

C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

D. लोकमान्य टिळक

उत्तरासाठी क्लिक  करा 


B. गोपाळ गणेश आगरकर


7.  "समाज स्वास्थ ' हे मासिक कोणी सुरु केले?

A.र. धों. कर्वे

B.महर्षी कर्वे

C.छत्रपती शाहू महाराज

D.महात्मा फुले

उत्तरासाठी क्लिक  करा 


A.र. धों. कर्वे


8.महात्मा फुले यांनी हंटर कमिशनला ________साठी शासनाने अग्रक्रम देण्याबाबत प्रस्ताव मांडला होता.

A. उच्च शिक्षण

B. मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण

C.  प्रौढ शिक्षण

D.  स्री शिक्षण

उत्तरासाठी क्लिक  करा 


B. मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण


9.सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?

A.महात्मा फुले

B.छत्रपती शाहू महाराज

C.विठ्ठल रामजी शिंदे

D.महर्षी कर्वे
उत्तरासाठी क्लिक  करा 


A.महात्मा फुले


10.महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात २० व्या शतकातील सामाजिक क्रांतीचे अग्रणी म्हणून कोणाला ओळखले जाते?

A.विठ्ठल रामजी शिंदे

B.छत्रपती शाहू महाराज

C.पंडिता रमाबाई

D.गो.ग. आगरकर

उत्तरासाठी क्लिक  करा 


B.छत्रपती शाहू महाराज

Thursday, May 19, 2011

आगरकर भाग-१

सुधारक 'आगरकर'
गोपाळ गणेश आगरकर
 • सतीची चाल, केशवपन,बालविवाह या प्रथांना विरोध केला.
 • संमतीवय , घटस्फोट, पुर्नविवाह यांचा पुरस्कार.
 • बुद्धिवाद, व्यक्तिवाद, समता, मानवतावाद यांचा पुरस्कार.
 • सामाजिक सुधारणांना पाठींबा.
 • ग्रंथप्रामाण्यास व चातुर्वर्ण्यास विरोध केला.
 • स्वातंत्र्यासाठी लोकशिक्षण व जनजागृती हे उपाय सांगितले होते. 
 • 'सुधारक ' या त्यांच्या वृत्तपत्रात राजकीय आणि अर्थशास्रविषयक लेखही येत.
 • हिंदी लोकांच्या दुर्गुणांवर 'गुलामांचे राष्ट्र ' या लेखात हल्ला चढवला.
 • बुद्धीच्या निकषांखेरीज अन्य कोणतेही निकष ते मानीत नसल्यामुळे समाज-सुधारणांचे समर्थन करण्यासाठी स्मृतीवचनांचा आधार घेणे त्यांना मान्य नव्हते .
 • आगरकरांची आणखी काही ग्रंथसंपदा
 1.  गुलामगिरीचे शस्र
 2. स्री दास्य विमोचन
 3. राजकारणाचे अध्यात्म
 4. स्वराज्याच्या दिशेने वाटचाल
 5. वाक्य मीमांसा आणि वाक्य पृथ:करण
 6. शेठ माधवदास रघुनाथदास व धनकुवरबाई यांचे पुनर्विवाहचरित्र

 • सुमारे 125 वर्षांपूर्वी त्यांनी लोकसंख्या मर्यादेसाठी व स्री स्वातंत्र्यासाठी संतती नियमाचा पुरस्कार केला.
 • स्वातंत्र्यासाठी त्यांनी लोकशिक्षण आणि जनजागृती हे उपाय संगितले होते.
 • त्यांनी "हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी ?" या निबंधात ब्रिटीश सरकार स्वाठी असल्याचे सिद्ध केले.
 •  

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

If you LIKE what we are posting here, please share it on your Facebook page. Just copy the URL link and paste on your Facebook status update.
आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत