Showing posts with label विज्ञान-तंत्रज्ञान. Show all posts
Showing posts with label विज्ञान-तंत्रज्ञान. Show all posts

Wednesday, April 18, 2012

प्रश्नमंजुषा -241


1. 'सोलर सेल' _______________ ऊर्जा चे रूपांतर _________________ ऊर्जेत मध्ये करतात .
A. उष्णता, प्रकाश
B. फोटो-व्होल्टाईक, प्रकाश
C. प्रकाश, विद्युत
D. प्रकाश, उष्णता

Click for answer 

C. प्रकाश , विद्युत

2.खालीलपैकी कोणत्या संप्रेरकामध्ये ( Harmone ) आयोडीन असते ?
A. इन्शुलीन
B. टेस्टोस्टेरॉन
C. थायरॉक्सीन
D. अ‍ॅड्रेनालाइन

Click for answer 

C. थायरॉक्सीन

3. 'निशांत ' काय आहे ? A. भारताने स्वतः तयार केलेला रणगाडा
B. मानवरहीत विमान
C. भारताची आण्वीक पाणबुडी
D. अंटार्क्टीकावरील संशोधन केंद्र

Click for answer 

B. मानवरहीत विमान

4. भारताने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास केव्हापासून बंदी घातली ?
A. जानेवारी 2007
B. ऑक्टोबर 2007
C. जानेवारी 2008
D. ऑक्टोबर 2008

Click for answer 

D. ऑक्टोबर 2008

5. NRHM (एन.आर.एच.एम.) कसले संक्षिप्त रूप आहे ?
A. नॉन रुरल हेल्थ मिशन
B. नॅशनल रुरल हेल्थ मिशन
C. नॅशनल रेसिडेंशियल हाऊसिंग मिशन
D. नॅचरल रुरल हाऊसिंग मटेरीयल

Click for answer 

B. नॅशनल रुरल हेल्थ मिशन

6. बेरियम , स्ट्रानशिअम इ. धातूंच्या संयुगांचा वापर शोभेच्या दारूकामात कशासाठी केला जातो ?
A. आवाज वाढावा यासाठी
B. आवाज प्रदूषण कमी व्हावे यासाठी
C. फटाका लवकर पेटावा म्हणून
D. विविध रंगछटा दिसण्यासाठी

Click for answer 

D. विविध रंगछटा दिसण्यासाठी

7. सौर शक्तीवर चालणारा भारतातील सर्वात मोठा दूरदर्शक ( Telescope ) कोणत्या वर्षी कार्यान्वीत होणे अपेक्षित आहे ?
A. 2011
B. 2013
C. 2015
D. 2020

Click for answer 

B. 2013

8. ______________ ही संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली अणुभट्टी होय .
A. अप्सरा
B. पूर्णीमा-I
C. ध्रुव
D. कामीनी

Click for answer 

C. ध्रुव

9. सेबिन (Sebin) ही पोलीओवरील लस कशाप्रकारे दिली जाते?
A. तोंडाद्वारे
B. इंजेक्शनद्वारे
C. दुधात मिसळून
D. वाफेद्वारे

Click for answer 

A. तोंडाद्वारे

10. 'गोवर' हा कोणत्या स्वरूपाचा आजार/रोग आहे ?
A. एकपेशीय आदीजीवांपासून होणारा रोग
B. जीवाणूजन्य रोग
C. विषाणूजन्य रोग
D. असंसर्गजन्य रोग

Click for answer 

C. विषाणूजन्य रोग

Tuesday, March 27, 2012

प्रश्नमंजुषा -232


1. HIV विषाणूचा जनुकीय पदार्थ ______________ आहे.

A. RNA
B. DNA
C. प्रथिने
D. कोणताही नाही

Click for answer 
A. RNA

2.मानवी शरीरात किती खनिजे असतात ?

A. 18
B. 24
C. 58
D. 202

Click for answer 
B. 24

3. ____________ पासून प्लॅस्टर ऑफ पॅरीस बनवतात .

A. धुण्याचा सोडा
B. जिप्सम
C. मोरचूद
D. बॉक्साईट

Click for answer 
B. जिप्सम

4. ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजली जाते ?

A. हर्टझ्‌
B. अम्पियर
C. वॅटस्
D. डेसीबेल


Click for answer 
D. डेसीबेल

5. खालीलपैकी कोणता पर्याय वेबजाल हुडक्या(Web browser) नाही ?

A. गुगल क्रोम
B. नेटस्केप नेव्हीगेटर
C. मोझीला फायरफॉक्स
D. एच.टी एम एल

Click for answer 
D. एच.टी एम एल

6. 'इंडीयन इन्स्टीट्यूट ऑफ ट्रॉपीकल मेटेऑरॉलॉजी' कोणत्या शहरात आहे ?

A. नाशीक
B. नागपूर
C. मुंबई
D. पुणे

Click for answer 
D. पुणे

7. मोटारबोट व विमानाची गतीमानता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो ?

A. टेलीस्कोप
B. स्फेरोमीटर
C. टॅकोमीटर
D. व्हिस्कोमीटर

Click for answer 
C. टॅकोमीटर

8. भारतातील कोणत्या शहरास 'इलेक्ट्रॉनिक्स शहर' म्हणतात ?

A. बेंगलोरु
B. हैद्राबाद
C. नोएडा
D. पुणे

Click for answer 
A. बेंगलोरु

9. काक्रापारा अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे ?

A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. राजस्थान
D. उत्तरप्रदेश


Click for answer 
B. गुजरात

10. भारतीय संरक्षण प्रणालीचा विचार करता 'कर्ण' काय आहे ?

A. क्षेपणास्त्र
B. अत्याधुनिक रणगाडा
C. आण्वीक पाणबुडी
D. रडार

Click for answer 
B. अत्याधुनिक रणगाडा

Friday, February 17, 2012

प्रश्नमंजुषा -215


1. सि-डॅक(पुणे)यांनी सर्वात अलीकडे बनवलेल्या सुपर कॉम्प्यूटरचे नाव ______________.

A. परम-शौर्य
B. परम-युवा
C. परम-I
D. परम-II

Click for answer 
B. परम-युवा

2. यापैकी कोणत्या टेक्नोलॉजीचा 4G मध्ये समावेश होतो ?

A. यु.एल.बी.
B. एडज्
C. सीडीएमए
D. जीपीआरएस्

Click for answer 
A. यु.एल.बी.

3. सि-डॅकने शासनाच्या महसूल विभागासाठी स्टँप व रजिस्ट्रेशनची जी सिस्टिम बनवली त्याचे नाव ___________

A. एस.ए.आर.आई.टी.ए.
B. आर.ए.आर.आई.टी.ए.
C. आर.एस.आर.आई.टी.ए.
D. वरीलपैकी कोणतीही नाही

Click for answer 
A. एस.ए.आर.आई.टी.ए.(SARITA)

4. "नॅशनल टास्क फोर्स ऑन आय टी अँण्ड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट" ची स्थापना पंतप्रधान ऑफिसतर्फे ____________ या दिवशी झाली .


A. 22मे1997
B. 22मे1998
C. 22मे1999
D. 22मे2000

Click for answer 
B. 22मे1998

5. गूगल या सर्च इंजिन कंपनीचा 'ध्येयवाक्य' (motto) काय आहे?

A. डू नॉट बी ईव्हील
B. जस्ट डू इट
C. एव्हर टू एक्सेल
D. लाइव्ह फ्री ओर डाय

Click for answer 
A. डू नॉट बी ईव्हील
(तो सुचवला होता : अमित पटेल आणि पॉल बुच्चेत ह्या गुगल च्या अभियंत्यांनी )


6. सि-डॅक (पुणे) ने अलीकडे मानवी जीवशास्त्रीय माहिती संशोधनासाठी वेगाने 'प्रोसेस' करण्यासाठी कोणत्या नावाने 'सुपर काम्प्युटिंग क्लस्टर' विकसित केले आहे ?

A. बायोक्रोम
B. ह्यूमक्रोम
C. डीप ब्ल्यू
D. परम युवा

Click for answer 
A. बायोक्रोम

7. सि-डॅक (CDAC) ह्या संस्थेचे पूर्ण नाव काय आहे ?

A. Centre for Development of Advanced Computers
B. Centre for Development of Automatic Computing
C. Council of Development of Advanced Computing
D. Centre for Development of Advanced Computing

Click for answer 
D. Centre for Development of Advanced Computing अर्थात 'प्रगत संगणन विकास केंद्र'

8. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील कामगिरीसाठी 'नोबेल पारितोषिक ' देण्याचा स्पष्टपणे उल्लेख नाही ?

A. पदार्थविज्ञान
B. शांतता
C. वैद्यकीय संशोधन
D. अभियांत्रिकी संशोधन

Click for answer 
D. अभियांत्रिकी संशोधन

9. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून कोणाला गौरविले जाते ?

A. डॉ.होमी भाभा
B. डॉ.विक्रम सेठना
C. डॉ.मेघनाद सहा
D. डॉ.विक्रम साराभाई

Click for answer 
D. डॉ.विक्रम साराभाई

10. इस्त्रोचे माजी चेअरमन जी.माधवन नायर यांच्या कार्यकाळातील कोणत्या कंपनीशी केलेला करार सध्या वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे ?

A. अंट्रिक्स
B. देवास
C. अरेवा
D. जनरल इलेक्ट्रिक

Click for answer 
B. देवास

Thursday, December 8, 2011

प्रश्नमंजुषा -134


1. भारताचे पहिले विज्ञान धोरण कधी जाहीर करण्यात आले ?

A. 1948
B. 1954
C. 1958
D. 1966

Click for answer 
C. 1958
4 मार्च 1958 रोजी भारताने पहिले विज्ञान धोरण जाहीर केले.

2. 'वेस्टर्न ब्लॉट' ही चाचणी कोणत्या आजाराशी संबंधित आहे ?
A. हिवताप
B. मलेरिया
C. मधुमेह
D. एड्स

Click for answer 
D. एड्स

3. 'सूर्यसिध्दांत' हा ग्रंथ कोणत्या प्राचीन ग्रंथकाराने लिहिला ?

A. कणाद
B. आर्यभट्ट
C. वराहमिहिर
D. भास्कराचार्य

Click for answer 
C. वराहमिहिर


4. कोणत्या प्रकारचे आधुनिकीकरण प्रगत राष्ट्रांमध्ये असते ?

A. प्राथमिक
B. द्वितियक
C. ऐच्छिक
D. नियोजित

Click for answer 
A. प्राथमिक

5. न्यूटनचे तीन नियम _______ शी संबंधित आहेत.

A. गुरुत्वाकर्षण
B. सापेक्षता
C. ऊर्जा परिवर्तन
D. गती

Click for answer 
D. गती

6. पैलू पाडलेला हिरा चकाकण्याचे कारण _____________.

A. प्रकाशाचे परावर्तन
B. प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तन
C. प्रकाशाचे अपवर्तन
D. प्रकाशाचे अपस्करण

Click for answer 
B. प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तन

7. 'बोरलॉग अवार्ड ' कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाते ?

A. सहकार
B. शेती
C. विज्ञान
D. अवकाश तंत्रज्ञान

Click for answer 
B. शेती

8. भारतात 'हर्षा चावला' ही पहिली टेस्ट टयूब बेबी ________ ह्या वर्षी जन्माला आली.

A. 1980
B. 1986
C. 1982
D. 1975

Click for answer 
B. 1986

9. शून्याचा शोध लावण्याचा मान _______________ ह्या प्राचीन भारतीय वैज्ञानिकाकडे जातो.

A. आर्यभट्ट
B. भास्कराचार्य
C. वराहमिहीर
D. बाणभट्ट

Click for answer 
C. वराहमिहीर

10. _________ ही भारतीय बनावटीची पहिली क्षेपणास्त्रवाहू बोट होय.

A. विभूती
B. विपुल
C. शाल्की
D. शंकुल

Click for answer 
A. विभूती

Friday, July 29, 2011

प्रश्नमंजुषा -78

विज्ञान-तंत्रज्ञान घटक


1.____________  हे द्रव्याच्या तीनही भौतिक स्थितीत आढळते.

A. अधातू
B. धातू
C. धातुसदृश्य
D. यापैकी  नाही

Click for answer 
A. अधातू

2. अणूच्या केंद्रकाचा शोध ____________ या शास्त्रज्ञाने लावला.

A. मेरी क़्युरि
B. चॅडविक
C. बोर
D. रुदरफोर्ड

Click for answer 
D. रुदरफोर्ड

3. चेंडू वर फेकला असता त्याच्या गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य ___________ असते.

A. शून्य
B. धन
C. ऋण
D. अनंत

Click for answer 
C. ऋण


4. _______________ ही भारताची अणु उर्जेवर चालणारी पहिली पाणबुडी होती.

A. INS शंकुल
B. INS चक्र
C. INS निलगिरी
D. INS शिवाजी

Click for answer 
B. INS चक्र

5. खाली नमूद केल्यापैकी कोणती संशोधन व विकास संस्था 'आंतरराष्ट्रीय विज्ञान व प्रौद्योगिकी परस्पर सहकार्य ' कार्यक्रमा अंतर्गत प्रस्थापित करण्यात आली नाही ?

A. मॉस्को येथील "ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग" संशोधन केंद्र
B. हैदराबाद येथील "ओशन इन्फरमेशन सर्विसेस" संशोधन केंद्र
C. हैदराबाद येथील "पावडर मेटालर्जी " संशोधन केंद्र
D. नवी दिल्ली येथील "सेंटर फॉर मेडिकल अप्लिकेशन ऑफ लो लेवल ट्रीटमेंट ऑफ टीबी अन्ड अलायड डिसीजेस "

Click for answer 
B. हैदराबाद येथील "ओशन इन्फरमेशन सर्विसेस" संशोधन केंद्र

6. आधुनिक सौर घटामध्ये _______ चा वापर केला जातो.

A. निकेल
B. कार्बन
C. सिलिकॉन
D. लीड

Click for answer 
C. सिलिकॉन

7. प्रतिध्वनी हे ध्वनीच्या _________ चे उदाहरण आहे.

A. अपवर्तन
B. परावर्तन
C. अभिसरण
D. विकिरण

Click for answer 
B. परावर्तन

8. निसर्गात ________ मूलद्रव्ये मूळस्वरुपात आढळतात .

A. 105
B. 92
C. 100
D. 90

Click for answer 
B. 92

9. हळद आम्लारीमध्ये ________ रंग प्राप्त करते.

A. पिवळा
B. लाल
C. गुलाबी
D. काळा

Click for answer 
B. लाल

10. १ जुलै २००६ रोजी जगातील सर्वात उंचावरची आगगाडी कोणत्या देशात सुरु झाली?

A. फ्रान्स
B. जपान
C. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरीका
D. चीन

Click for answer 
D. चीन

Friday, July 22, 2011

प्रश्नमंजुषा - 73

विज्ञान तंत्रज्ञान

1.  गॅलीलियो व न्युटन ह्यांनी ____________ हि संकल्पना मांडली .

A.  कारणाची उद्देशमुलक संकल्पना
B.  कारणाची यांत्रिकी संकल्पना
C. कारणाची शास्त्रीय संकल्पना
D. कारणाची व्यावहारिक संकल्पना


Click for answer 
B.  कारणाची यांत्रिकी संकल्पना

2. "वनस्पतींची पैदास " या संकल्पनेच्या भारतीय जनकाचे नाव _______________--

A. डॉ.पुष्करनाथ
B. डॉ.राधाकृष्णन
C. डॉ.जंबूनाथन
D. डॉ.बी.पी.पाल

Click for answer 
D. डॉ.बी.पी.पाल

3. मूळ वस्तूच्या हुबेहूब प्रतिकृतीस ( Replica of Original ) ____________ प्रतिकृती म्हणतात .

A. समरूपी ( Homeomorph )
B. होलोग्राफ ( Holograph )
C. समजातीय ( Homologous )
D. बहुरुपिक ( Polymorph )

Click for answer 
A. समरूपी ( Homeomorph )

4. डब्ल्यू.एम.ओ. म्हणजे _________________

A. वायरलेस मॉनिटोरिंग ऑर्गनायझेशन
B. वुमेन मेंबर्स ऑर्गनायझेशन
C. वर्ल्ड मॉनिटोरिंग ऑर्गनायझेशन
D. वर्ल्ड मास्टर्स ऑर्गनायझेशन

Click for answer 
C. वर्ल्ड मॉनिटोरिंग ऑर्गनायझेशन

5. एड्स ( Acquired Immuno Deficiency Syndrome )__________यामुळे होतो.

A. विषाणू ( Virus )
B. जीवाणू ( Bacteria )
C. कवक ( Fungi )
D. आदिजीव ( Protozoa )

Click for answer 
A. विषाणू ( Virus )

6._____________ ही आधुनिकीकरणाची सहनिर्मिती होय.

A.  शहरीकरण
B.  राष्ट्रीयीकरण
C.  सुसंस्कृत समाज
D.  अधिभौतिक प्रगती

Click for answer 
A. शहरीकरण

7. जड पाणी _____________ वापरतात.

A. साबण तयारी करण्यासाठी
B. स्टोरेज बटरीत पाणी टाकण्यासाठी
C. अणुसंयंत्रामध्ये
D. कारच्या रेडीएटरमध्ये टाकण्यासाठी

Click for answer 
C. अणुसंयंत्रामध्ये

8.  लक्स हे __________ चे एकक आहे.

A. प्रकाशाची अपस्करण 
B. दीपन
C. अनुदीप्त  तीव्रता
D. ध्वनीची तीव्रता

Click for answer 
B. दीपन

9. कुष्ठरोग बरा करण्यासाठी ___________चा प्रभावी औषधी म्हणून वापर करतात.

A. स्ट्रेप्टोमायसीन
B. क्लोरोमायासीटीन
C. क्लोरोक़्क़िन
D. डॅप्सन

Click for answer 
D. डॅप्सन

10. लोहित पेशी मानवाच्या ________ निर्माण होतात.

A. यकृतात
B. प्लिहेत
C. हृदयात
D. अस्थीमज्जेत

Click for answer 
D. अस्थीमज्जेत

Sunday, June 19, 2011

प्रश्नमंजुषा -36

विज्ञान आणि तंत्रज्ञान 


1. आधुनिक आवर्त सारणीत __________आवर्त आहेत.

A. 7
B. 18
C. 9
D. 10

उत्तरासाठी क्लिक  करा 
7

2. ध्वनीचे प्रसारण _______मधून होत नाही.

A. स्थायू
B. वायू
C. द्रव
D. निर्वात पोकळी

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. निर्वात पोकळी

3. विद्युत ऊर्जा आणि चुंबकत्व यांच्यामधील संबंध सर्वप्रथम ________ ने शोधून काढला.

A. ज्यूल
B. ओहम
C. ओरस्टेड
D. फ्लेमिंग

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. ओरस्टेड

4. रक़्तातील हिमोग्लोबिनमध्ये ______ हा खनिज पदार्थ असतो.

A. लोह
B. कॅल्शीअम
C. आयोडीन
D. फॉस्फरस

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. लोह

5. शुद्ध लोखंडाचा प्रकार म्हणजे ______ होय.

A. ओतीव लोखंड
B. बीड लोखंड
C. घडीव लोखंड
D. वितळलेले लोखंड

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. घडीव लोखंड

6. कवक आणि शैवाल यांच्यातील प्रमुख फरक कोणता?

A. तंतुकणिका
B. जलव्याल
C. हरितद्रव्य
D. कॅल्शीअम

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. हरितद्रव्य

7. क्ष-किरण म्हणजे ____________ आहेत.

A. ॠण प्रभारित कण
B. धन प्रभारित कण
C. प्रभार विरहित कण
D. विद्युत चुंबकीय लहरी

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. विद्युत चुंबकीय लहरी

8. थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती __________ यामुळे सुरक्षित राहतात.

A. आर्द्रता
B. दवबिंदू
C. विशिष्ट उष्माधारकता
D. पाण्याचे असंगत आचरण

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. पाण्याचे असंगत आचरण

9. __________ यापासून मिळणारी ऊर्जा प्रदूषणरहित असते.

A. पेट्रोल
B. कोळसा
C. केंद्रकीय क्रियाधानी
D. सौर घट

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. सौर घट

10. खालीलपैकी कोणत्या इंद्रीयामध्ये पित्ताची निर्मिती होते?

A. स्वादुपिंड
B. लहान आतडे
C. जठर
D. यकृत

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. यकृत
Tuesday, May 10, 2011

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस

उद्या (11  मे )भारत साजरा करणार 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस '.
(राष्ट्रीय विज्ञान दिवस: 28 फेब्रुवारी सर सी.व्ही.रमण यांचा जन्मदिवस ).
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस उद्याच का साजरा केला जातो?
1998 मध्ये भारताने घेतलेल्या अणु चाचण्या 11  व 13 मे रोजी घेतल्या होत्या. तंत्रज्ञानातील या भरारीला गौरविण्यासाठी हा दिवस.
या संदर्भात हे ही लक्षात ठेवा:
 • पोखरण-1 ( 18 मे 1974) चा सांकेतिक  शब्द होता 'आणि बुद्ध हसला ' तर 'पोखरण-2 ' च्या चाचण्या घेतल्या गेल्या तेव्हा 11  मे ला 'बुद्ध जयंती ' होती. भारताने  'शांततेसाठी अणु ' ही संकल्पना किती विचारांती निवडली आहे आणि त्या साठी किती गांभीर्य जपले गेले हे ही लक्षात घेण्या जोगे आहे.
 • पोखरण-1  चे नाव होते 'स्माइलिंग बुद्धा' तर पोखरण-2 हे 'ऑपरेशन शक्ती ' ह्या नावाने ओळखले गेले.
 • पोखरण-1 च्या वेळी पंतप्रधान पदी होत्या इंदिरा गांधी तर पोखरण-2 च्या वेळी अटल बिहारी बाजपेयी होते.

Friday, August 13, 2010

इस्रोची गरुड भरारी

 • 'ग्लोबल वॉर्मिंग'मुळे समुद्राच्या पातळीत मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त होत असताना ही वाढ नेमकी किती व कोठे होते आहे याचे अचूक निरीक्षण होणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) व फ्रान्सची राष्ट्रीय अवकाश संशोधन संस्था (सीएनईएस) संयुक्तरित्या 'सरल'  (SARAL) हा उपग्रह सोडणार आहेत. या उपग्रहाचे प्रक्षेपण पुढील वर्षी होणे अपेक्षित .
 • इस्रो च्या 'चान्द्रयानाने' चंद्रावर भारतीय ध्वज कधी फडकवला?
  • भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू , ज्यांच्या दूरदृष्टीमुळे भारताचा अंतरीक्ष कार्यक्रम आज हे स्वरूप घेवू शकला, त्यांच्या जयंतीच्या दिवशी (बाल दिनी ) 14 नोव्हेंबर 2008 ला भारतीय ध्वज चंद्रावर फडकला. 
 • इस्रोने 2009 मध्ये शोधलेले 3 सूक्ष्मजीव
  • १.जानीबॅक्टर हॉइली - फ्रेड हॉइल च्या स्मरणार्थ ( जयंत नारळीकर याच हॉइल यांचे शिष्य)
  • २.बॅसिल्लस इस्रोनेन्सीस- इस्रोने हे जीव शोधताना केलेल्या 'बलून एस्क्पीरीमेंट्स' च्या योगदानाबद्दल
  • ३.बॅसिल्लस आर्यभट - प्राचीन भारतीय शास्रज्ञ आणि भारताचा पहिला उपग्रह यांच्या नावाने. 
 • अंतरीक्ष कॉर्पोरेशन लिमिटेड (Antrix Corporation Limited ) हि भारत सरकारच्या आधिपत्याखाली काम करणारी खाजगी कंपनी म्हणून काम करते. हि कंपनी पूर्णपणे सरकाच्या मालकीची आहे. इस्रो ने संशोधन केलेल्या यंत्रणा आणि तंत्रज्ञान यांचे व्यापारीकरण करण्याची जबाबदारी यांच्यावर आहे.
 • मेघा-ट्रोपीक्स (Megha-Tropiques )
  • भारत - फ्रांस यांच्या संयुक्त प्रयत्नातून आकारात येत असलेला प्रगत असा हवामान विषयक उपग्रह आहे.
 • युथसॅट- भारत आणि रशिया यांच्या संयुक्त प्रयत्नातून आकारात येत असलेला उपग्रह .
 • गगन - जी.पी.एस ला पर्याय म्हणून तयार होत असलेली संपूर्ण भारतीय बनावटीची यंत्रणा. 'इंडिअन रिजनल नेव्हीगेशनल  सॅटेलाईट सिस्टम' (IRNSS) आहे.
  • जी.पी.एस हि अमेरिकीची यंत्रणा
  • चीनची - बेईदोउ (Beidou)
  • रशियाची ग्लोनास (GLONASS )
  • तर 'गॅलिलीलो' हि युरोपिअन युनिअन ची यंत्रणा आहे

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

If you LIKE what we are posting here, please share it on your Facebook page. Just copy the URL link and paste on your Facebook status update.
आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत