Showing posts with label राष्ट्रीय गणित दिवस. Show all posts
Showing posts with label राष्ट्रीय गणित दिवस. Show all posts

Monday, December 26, 2011

{ विशेष } 2012 राष्ट्रीय गणिती वर्ष

2012  " राष्ट्रीय गणिती वर्ष (National Mathematical Year )"
22  डिसेंबर = राष्ट्रीय गणित दिवस (National Mathematics Day)
----------------------------------------------------------------------------


सुप्रसिद्ध भारतीय गणित-तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचे हे  125  वे जन्मशताब्दी  वर्ष. त्यांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा यथोचित सन्मान करण्यासाठी भारत सरकार 2012  हे वर्ष राष्ट्रीय गणिती वर्ष म्हणून साजरे करणार . शिवाय यापुढे 22  डिसेंबर हा रामानुजन यांचा जन्मदिवस दरवर्षी  'राष्ट्रीय गणित दिवस' म्हणून साजरा केला जाईल.


श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22  डिसेंबर 1887 रोजी तामिळनाडू मधील इरोड (Erode) ह्या छोट्याशा गावात झाला.(योगायोगाची बाब म्हणजे 1983 चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे ,'चंद्रशेखर  लिमिट ' ह्या खगोलीय-भौतिकशास्त्रातील कल्पनेचे जनक डॉ.एस.चंद्रशेखर  ह्यांचे हि मूळ गाव हेच.) अतिशय गरीब आणि खडतर परिस्थितीत जन्माला आलेल्या रामानुजन ह्यांना महाविद्यालयीन जीवनात अपयशाला तोंड द्यावे लागले.अत्युच्च कोटीची गणिती प्रतिभा लाभलेल्या रामानुजन ह्यांना इतर विषयांत काठावर उत्तीर्ण होणे हि अवघड जात होते. तद् नंतरच्या आयुष्यात क्लार्क म्हणून काम करत असतानाच  त्यांनी गणितातील त्यांचा व्यासंग जपला.( अल्बर्ट आईनस्टाईन हे देखील ज्या काळात त्यांनी सापेक्षतेचा सिध्दांत मांडला तेव्हा पेटंट च्या कार्यालयात कारकुनी स्वरूपाचेच काम करीत होते. )  त्रिनिटी कॉलेज , लंडन येथील प्राध्यापक सुविख्यात गणिती जी.एच.हार्डी ह्यांच्याशी त्यांनी पत्रांद्वारे संवाद साधला. प्राध्यापक हार्डींनाही ह्या गणितीची ओळख पटली. त्यांच्याच निमंत्रणावरून रामानुजन ह्यांनी इंग्लंड दौराही केला. अर्थात ह्याच कालखंडाने त्यांच्या प्रतिभेची जगाला ओळख करून दिली. मात्र अल्पावधीतच त्यांना परत यावे लागले आणि परतल्यानंतर अवघ्या वर्षभरात प्रकृती अस्वास्थ्यामुळे वयाच्या 32  व्या वर्षीच (26 एप्रिल 1920) त्यांचे निधन झाले. लंडन येथील प्राध्यापक जी.एन.वॅटसन ह्यांनी 1918 ते 1951 ह्या कालखंडात रामानुजन ह्यांच्या मागे राहिलेल्या वह्यांच्या आधारे रामानुजन ह्यांची प्रमेये  (Theorems stated by Ramanujan) ह्या  शीर्षकाखाली  30 प्रमेये प्रकाशित केली. सांख्यिकी ने ह्या आधीच रामानुजन ह्यांचा गौरव करण्यासाठी विशिष्ट संख्यांना ना 'रामानुजन -हार्डी संख्या (Ramanujan–Hardy number)' असे नामकरण केले आहे. राष्ट्राच्या ह्या महान गणीतीला आमचाही सलाम !!!


{
काय आहेत हे ' रामानुजन  हार्डी संख्या ' ?
रामानुजन जेव्हा प्राध्यापक हार्डीना भेटण्यास लंडनला गेले तेव्हा त्यांनी जी टॅक्सी (cab) केली होती , तिचा क्रमांक होता  1729  ह्या संख्येला पहिल्यावर ह्या हाडाच्या गणीतीला आनंद झाला ,त्याचे कारण त्यांनी सांगितले ते म्हणजे हि संख्या दोन संख्याच्या घनाची बेरीज म्हणून दोन वेगवेगळ्या प्रकारे लिहिता येतो.
1729=13+123=93+103
अर्थात  आता अशा संख्यांना रामानुजन  हार्डी संख्या म्हणतात.

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत