Showing posts with label राज्यसेवा पूर्व परीक्षा. Show all posts
Showing posts with label राज्यसेवा पूर्व परीक्षा. Show all posts

Tuesday, April 24, 2012

प्रश्नमंजुषा -244


1. चंद्रावर जीवाचे अस्तित्व आढळत नाही कारण __________________
A. चंद्र पृथ्वी पासून दूर आहे .
B. चंद्राच्या विविध कला होतात .
C. चंद्राची नेहमी एकच बाजू पृथ्वी कडे असते .
D. चंद्रावरील तापमान विषम आहे .

Click for answer 

D. चंद्रावरील तापमान विषम आहे .

2.सूर्यकूल म्हणजे काय ?
A. सूर्य व त्याचे ग्रह
B. सूर्य व सूर्याचे उपग्रह
C. सूर्य व सूर्याचे लघुग्रह
D. सूर्य , सूर्याचे ग्रह , त्यांचे उपग्रह व लघुग्रह .

Click for answer 

D. सूर्य , सूर्याचे ग्रह , त्यांचे उपग्रह व लघुग्रह .

3. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता ?
A. 21 मार्च
B. 21 जून
C. 23 सप्टेंबर
D. 21 डिसेंबर

Click for answer 

B. 21 जून

4. ' मध्यरात्रीच्या सूर्याचा देश ' कोणत्या देशाला म्हणतात ?
A. जपान
B. ग्रीनलंड
C. नार्वे
D. ऑस्ट्रेलिया

Click for answer 

C. नार्वे

5.महाराष्ट्रातील कोणती जागा चिक्कू या फळपिकासाठी प्रसिद्ध आहे ?
A. वेंगुर्ले
B. मेहरून
C. नाशिक
D. घोलवड

Click for answer 

D. घोलवड

6. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
A. नागपूर
B. चंद्रपूर
C. अमरावती
D. सांगली

Click for answer 

C. अमरावती

7. ' खडकवासला ' धरण कोणत्या नदीवर आहे ?
A. गोदावरी
B. मुळा
C. भीमा
D. वैतरणा

Click for answer 

B. मुळा

8. ' अनेर ' पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
A. अहमदनगर
B. रायगड
C. चंद्रपूर
D. धुळे

Click for answer 

D. धुळे

9. महाराष्ट्रातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात उंच पर्वत शिखर कोणते ?
A. ब्रम्हगिरी
B. कळसूबाई
C. साल्हेर
D. त्र्यंबकेश्वर

Click for answer 

C. साल्हेर

10. 'वाल्मी' या संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?
A. नाशिक
B. औरंगाबाद
C. नागपूर
D. पुणे

Click for answer 

B. औरंगाबाद
स्पष्टीकरण : वाल्मी म्हणजे Water and Land Management Institute अर्थात ' जल व भूमी व्यवस्थापन संस्था ' औरंगाबाद शहरात आहे .

Friday, April 20, 2012

प्रश्नमंजुषा -243


1. सम्राट अशोकाची राजधानी कोठे वसलेली होती ?
A. पाटलीपुत्र
B. नालंदा
C. सारनाथ
D. वैशाली

Click for answer 

A. पाटलीपुत्र

2.पानीपतच्या तीन लढाया कधी लढल्या गेल्या ?
A. 1526, 1556, 1761
B. 1526, 1550, 1780
C. 1556, 1670, 1761
D. 1761, 1809, 1810

Click for answer 

A. 1526, 1556, 1761

3. भारत छोडो चळवळ कोणत्या वर्षी सुरु झाली ?
A. 1921
B. 1940
C. 1930
D. 1942

Click for answer 

D. 1942

4. मुस्लीम लीगने कोणत्या वर्षी पाकीस्तानची औपचारीकरीत्या पहिल्यांदा मागणी केली ?
A. 1905
B. 1921
C. 1940
D. 1945

Click for answer 

C. 1940

5. भारतातील सर्वात जुने वृत्तपत्र कोणते ?
A. द हिंदू
B. अमृत बझार पत्रिका
C. द इंडीयन एक्सप्रेस
D. द स्टेट्समन

Click for answer 

B. अमृत बझार पत्रिका

6. यक्षगान कोणत्या राज्याचे नृत्य आहे ?
A. कर्नाटक
B. केरळ
C. ओरीसा
D. प. बंगाल

Click for answer 

A. कर्नाटक

7. ' बॉम्बचे तत्त्वज्ञान ' ( The Philosophy of the Bomb ) हा ग्रंथ कोणी लिहीला ?
A. भगतसिंग
B. चंद्रशेखर आझाद
C. बटुकेश्वर दत्त
D. सेनापती बापट

Click for answer 

B. चंद्रशेखर आझाद

8. 'द व्हर्नाकुलर प्रेस अ‍ॅक्ट ' कोणत्या वर्षी संमत झाला ?
A. 1870
B. 1874
C. 1878
D. 1890

Click for answer 

C. 1878

9. ' इंडीयन असोशिएशन ' या संघटनेची स्थापना कोठे झाली ?
A. पुणे
B. मुंबई
C. कोलकता
D. नागपूर

Click for answer 

C. कोलकता

10. ' नीलदर्पण ' या नाटकाचे लेखन कोणी केले ?
A. बंकिमचंद्र चटर्जी
B. रविंद्रनाथ टागोर
C. दीनबंधू मित्रा
D. इक्बाल

Click for answer 

C. दीनबंधू मित्रा

Monday, April 16, 2012

प्रश्नमंजुषा -240


1. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्य घटना कोणी स्वीकारली ?
A. ब्रिटीश संसंदेने
B. भारतीय संसद
C. केंद्रीय मंत्रीमंडळ
D. भारताचे नागरीक

Click for answer 

D. भारताचे नागरीक

2.भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये प्रौढ मतदानाची तरतूद करण्यात आली ?
A. कलम 144
B. कलम 323
C. कलम 326
D. कलम 123

Click for answer 

C. कलम 326

3. आर्थीक आणीबाणीची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आली आहे ?
A. कलम 352
B. कलम 356
C. कलम 360
D. कलम 365

Click for answer 

C. कलम 360

4. फेरेलचा नियम कशाशी संबंधित आहे ?
A. वा‍र्‍यांची दिशा
B. वा‍र्‍यांचा वेग
C. पृथ्वीचे परिवलन
D. महासागरातील सागरप्रवाह
Click for answer 

A. वा‍र्‍यांची दिशा

5.जगातील सर्वाधीक दुभती जनावरे ( गाई, म्हशी ) कोणत्या देशात आहेत ?
A. अमेरिका
B. ऑस्ट्रेलिया
C. भारत
D. डेन्मार्क

Click for answer 

C. भारत

6. भारतात भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती सर्वप्रथम कोणत्या वर्षी झाली ?
A. 1935
B. 1947
C. 1951
D. 1956

Click for answer 

D. 1956

7.कल्पक्कम कोणत्या राज्यात आहे ?
A. कर्नाटक
B. तामीळनाडू
C. केरळ
D. उत्तरप्रदेश

Click for answer 

B. तामीळनाडू

8. पंडीत जवाहरलाल नेहरू ' भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ' अध्यक्ष किती वेळा होते ?
A. 1
B. 2
C. 3
D. 4

Click for answer 

C. 3

9. लाला लजपतराय यांच्यावर झालेल्या लाठीहल्ल्यातील गंभीर जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला. हा हल्ला कोठे झाला होता ?
A. मुंबई
B. अमृतसर
C. कराची
D. लाहोर

Click for answer 

D. लाहोर

10. पुणे ते विजयवाडा ( सोलापूर , हैद्राबादमार्ग ) कोणता राष्ट्रीय मार्ग आहे ?
A. राष्ट्रीय महामार्ग क्र. 3
B. राष्ट्रीय महामार्ग क्र. 4B
C. राष्ट्रीय महामार्ग क्र. 9
D. राष्ट्रीय महामार्ग क्र.13

Click for answer 

C. राष्ट्रीय महामार्ग क्र. 9

Tuesday, April 10, 2012

प्रश्नमंजुषा -238


1. भारत सरकारने जाहीर केलेल्या ' हवामान - बदल कृती योजना ' ( Climate Change Action Plan ) मध्ये किती राष्ट्रीय अभियानांचा समावेश आहे ?

A. चार
B. सहा
C. आठ
D. दहा

Click for answer 
C. आठ

2.भारत सरकारच्या हवामान - बदल कृती योजनेंतर्गंत जाहीर अभियानात खालीलपैकी कोणत्या अभियानांचा समावेश आहे ?

A. राष्ट्रीय सौर अभियान
B. राष्ट्रीय जल अभियान
C. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान
D. वरील सर्व

Click for answer 
D. वरील सर्व

3. खालीलपैकी कोणता करार हा पर्यावरण संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याने क्लोरोफ्ल्युरोकार्बनचा वापर निश्चीत वेळापत्रकाने रोखण्यासाठी कटीबद्ध आहे ?

A. पॅरीस करार
B. वार्सा करार
C. जिनेव्हा करार
D. माँट्रीयल करार

Click for answer 
D. माँट्रीयल करार

4. ' फोटोकेमिकल स्मॉग ' कोणत्या वायूच्या प्रदूषणामुळे तयार होतो ?

A. नायट्रीक ऑक्साईड
B. नायट्रस ऑक्साईड
C. हायड्रोजन सल्फाइड
D. अमोनिया

Click for answer 
A. नायट्रीक ऑक्साईड

5. जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो ?

A. 23 मार्च
B. 22 डिसेंबर
C. 22 एप्रिल
D. 5 जून

Click for answer 
C. 22 एप्रिल

6. पृथ्वीवरील वातावरणात ओझोनचा थर किती कि. मी. च्या मर्यादेत आढळतो ?

A. 0 ते 5 कि.मी.
B. 15 ते 25 कि.मी.
C. 25 ते 40 कि.मी.
D. 40 ते 80 कि.मी.

Click for answer 
C. 25 ते 40 कि.मी.

7. संगणक व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे कोणती नवीन पर्यावरणविषयक समस्या तयार झाली आहे ?

A. वायू प्रदूषण
B. जल प्रदूषण
C. व्हच्र्युअल कचरा
D. ई - कचरा

Click for answer 
D. ई - कचरा

8. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ( NEERI - National Enviornmetal Engineering Research Institute ) कोणत्या शहरात आहे ?

A. मुंबई
B. नाशिक
C. औरंगाबाद
D. नागपूर

Click for answer 
D. नागपूर

9. राष्ट्रीय वन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

A. डॉ. मनमोहनसिंग
B. न्या. के. जी. बालकृष्णन
C. डॉ. एम. एस. स्वामीनाथन
D. न्या. बी. एन. कृपाल

Click for answer 
D. न्या. बी. एन. कृपाल

10. ' पाणी पंचायत ' ह्या संकल्पनेचे जनक कोण ?

A. विलासराव साळुंखे
B. अण्णा हजारे
C. डॉ. राजेंद्रसिंह
D. बाबा आमटे

Click for answer 
A. विलासराव साळुंखे

Sunday, April 8, 2012

प्रश्नमंजुषा -237


1. ' ओरोस बुद्रुक ' हे कोणत्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे ?

A. रत्नागिरी
B. गडचिरोली
C. सिंधुदुर्ग
D. उस्मानाबाद

Click for answer 
C. सिंधुदुर्ग

2. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही ?

A. मुंबई शहर
B. मुंबई उपनगर
C. ठाणे
D. वरील सर्व

Click for answer 
A. मुंबई शहर

3. ' महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ ' कोणत्या शहरात आहे ?

A. अहमदनगर
B. पुणे
C. गडचिरोली
D. नाशीक
Click for answer 
D. नाशीक

4. महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून कोणते राज्य आहे ?

A. ओडीसा
B. छत्तीसगढ
C. मध्यप्रदेश
D. झारखंड

Click for answer 
B. छत्तीसगढ

5.1906 साली टिळकांवरील राजद्रोहाच्या खटल्यात टिळकांची वकीली कोणी केली ?

A. पं. मोतीलाल नेहरू
B. बॅरीस्टर जीना
C. तेजबहदूर सप्रू
D. ग. वा. जोशी

Click for answer 
B. बॅरीस्टर जीना

6. ' मित्रमेळा ' ही संघटना वि. दा. सावरकर यांनी कोठे स्थापन केली ?

A. पुणे
B. नाशीक
C. लंडन
D. कानपूर

Click for answer 
B. नाशीक

7. 1916 च्या " ऐतिहासीक " लखनौ काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले ?

A. अंबिकाचरण मुजुमदार
B. लोकमान्य टिळक
C. दादाभाई नौरोजी
D. महात्मा गांधी
Click for answer 
A. अंबिकाचरण मुजुमदार

8. ' शेर - ए - पंजाब ' ह्या नावाने कोणते व्यक्तीमत्व ओळखले जाते ?

A. लाला लजपतराय
B. भगतसिंग
C. सरदार अजितसिंग
D. सुखदेव

Click for answer 
A. लाला लजपतराय

9. पहिले मराठा - इंग्रज युद्ध कोणत्या वर्षी झाले ?

A. 1857
B. 1775
C. 1817
D. 1818

Click for answer 
B. 1775

10. संथाळांचा उठाव कोठे झाला ?

A. बंगाल
B. महाराष्ट्र
C. हरीयाना
D. केरळ

Click for answer 
A. बंगाल

Friday, February 24, 2012

प्रश्नमंजुषा -216


1. 'मूरघास' तयार करण्याकरिता कोणते पीक सर्वात जास्त उपयोगी आहे ?

A. ज्वारी
B. लसूणघास
C. बरसीम
D. मका

Click for answer 
C. बरसीम

2. हायब्रिड ज्वारीचे पीक फुला‍‍र्‍यावर येत असताना कणसावर कोणत्या भागाकडून प्रथम फुले येण्यास सुरुवात होते ?

A. कणसाच्या वरच्या टोकाकडून ( शेंड्याकडून )
B. कणसाच्या खालच्या बुडापासून
C. कणसाच्या मधल्या भागापासून
D. संपूर्ण कणसावर एकाच वेळी

Click for answer 
B. कणसाच्या खालच्या बुडापासून

3. कोणत्या राज्याचा ऊसाखालील क्षेत्रात पहिला क्रमांक व साखर उत्पादनात दुसरा क्रमांक आहे ?

A. कर्नाटक
B. तामिळनाडू
C. महाराष्ट्र
D. उत्तर प्रदेश
Click for answer 
D. उत्तर प्रदेश

4. रब्बी हंगामात कोणत्या गळीत धान्य पिकाखाली महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्र आहे ?

A. सूर्यफूल
B. करडई
C. तीळ
D. जवस

Click for answer 
B. करडई


5. पाण्याचा ताण सहन करणारे, कडक थंडीत येणारे व विम्ल जमिनीत येणारे कोणते तृणधान्य भारतात घेतात ?

A. गहू
B. सातू
C. बाजरी
D. ज्वारी

Click for answer 
B. सातू

6. कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त तेल असते ?

A. गहू
B. भात
C. मका
D. ज्वारी

Click for answer 
C. मका

7. समपातळी रेषेप्रमाणे बांध खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घालावेत ?

A. जमिनीचा उतार 2 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास
B. जमिनीचा उतार 2 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास
C. जमिनीचा उतार 3 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास
D. जमिनीचा उतार 3 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास

Click for answer 
C. जमिनीचा उतार 3 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास

8. भारतात हरित क्रांती कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली ?

A. 1950 - 51
B. 1961 - 62
C. 1975 - 76
D. 1966 - 67


Click for answer 
D. 1966 - 67

9. महाराष्ट्रात मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोणत्या गावी कार्यान्वित आहे ?

A. मांजरी
B. चास
C. मोहोळ
D. सोलापूर

Click for answer 
C. मोहोळ

10. खालीलपैकी कोणते एक पीक लागवडीसाठी महाराष्ट्रात सर्व हंगामात घेतले जाते ?

A. सूर्यफूल
B. करडई
C. गहू
D. सोयाबीन


Click for answer 
A. सूर्यफूल

Wednesday, February 8, 2012

प्रश्नमंजुषा -213


1. _____________ हे ' देशबंधू ' म्हणून ओळखले जातात .

A. एम. ए. जीना
B. सी. आर. दास
C. अण्णादुराई
D. जे. एम. नेहरू

Click for answer 
B. सी. आर. दास

2. मराठी नाटकांसाठी खालीलपैकी कोणी योगदान दिले ?

A. गणपतराव बोडस
B. वि. स. खांडेकर
C. व्ही.शांताराम
D. पं. भीमसेन जोशी

Click for answer 
A. गणपतराव बोडस

3. खालीलपैकी कोणत्या वर्षी शिवाजी महाराज ' छत्रपती ' झाले ?

A. 1630
B. 1674
C. 1673
D. 1676

Click for answer 
B. 1674

4. कोणास 'लोकहितवादी' म्हणून ओळखले जाते ?

A. गो.ग.आगरकर
B. र.ज.भांडारकर
C. गो.ह.देशमुख
D. म.गो.रानडे

Click for answer 
C. गो.ह.देशमुख


5. भगवतगीतेवर मराठीतून समीक्षण लिहिणारा संत कोण ?

A. संत ज्ञानेश्वर
B. रामदास
C. संत नामदेव
D. संत तुकाराम

Click for answer 
A. संत ज्ञानेश्वर

6. _______________ ला विरोध दर्शविण्यासाठी रविंद्रनाथ टागोरांनी 'नाईटहूड' किताब परत केला.

A. कम्युनल अवॉर्ड
B. जालियनवाला बाग दुर्घटना
C. सविनय कायदेभंग आंदोलन
D. चौरीचौरा दुर्घटना

Click for answer 
B. जालियनवाला बाग दुर्घटना

7. विधान S - मेरठ येथील शिपायांनी बंड केले
कारण R - मंगल पांडेला फाशी देण्यात आले .

A. S व R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे S चे स्पष्टीकरण नाही.
B. S व R दोन्ही बरोबर आहेत व R हे S चे बरोबर स्पष्टीकरण आहे.
C. S बरोबर आहे, R चुकीचे आहे .
D. S चुकीचे आहे, R बरोबर आहे .

Click for answer 
B. S व R दोन्ही बरोबर आहेत व R हे S चे बरोबर स्पष्टीकरण आहे.

8. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आली आहे ?

A. कलम 312
B. कलम 324
C. कलम 224
D. कलम 124

Click for answer 
B. कलम 324

9. महाराष्ट्रातील अखिल भारतीय सेवा अधिकार्‍यांची निवड कोणाकडून होते ?

A. महाराष्ट्र लोकसेवा आयोग
B. महाराष्ट्राचे राज्यपाल
C. देशाचे अध्यक्ष
D. केंद्रीय लोकसेवा आयोग

Click for answer 
D. केंद्रीय लोकसेवा आयोग

10. कोणत्या वर्षापासून अण्णा हजारेंनी महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन सुरु केले ?

A. 2003
B. 2011
C. 2005
D. 1995

Click for answer 
D. 1995

Tuesday, February 7, 2012

प्रश्नमंजुषा -210


खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा
2. MPSC PSI पूर्व परीक्षा
3. MPSC Asst पूर्व परीक्षा
4. MPSC STI पूर्व परीक्षा
5. D.Ed. CET 2012
6. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा

1. अलीकडेच CSO ( केंद्रीय सांख्यीकीय कार्यालय ) ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2010-11 या वर्षासाठी भारताचे दरडोई उत्पन्न (Per Capital Income ) किती होते ?

A. 46,117 रु.
B. 53,331 रु.
C. 4617 रु.
D. 5333 रु.

Click for answer 
B. 53,331 रु.

2.: रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने अलीकडेच ( सर्वप्रथम ) किती रुपयांच्या नोटा रुपयाचे नवीन चिन्ह अंकीत करून बाजारात आणल्या आहेत ?

A. 5 रु.
B. 100 रु.
C. 500 रु.
D. 1000 रु.

Click for answer 
C. 500 रु.

3. भारत सरकारने अलीकडेच शिकोगा विद्यापीठात कोणाच्या नावाने मानद ' चेअर ' स्थापन करून संबंधित विषयांतील संशोधनासाठी उत्तेजन मिळावे यासाठी करार केला आहे ?

A. डॉ. एस.चंद्रशेखर
B. डॉ. हरगोविंद खोराणा
C. डॉ. वेंकटरामन
D. स्वामी विवेकानंद

Click for answer 
D. स्वामी विवेकानंद

4. भारत सरकारने 1320 मेगावॅट क्षमतेचा औष्णिक विद्युत प्रकल्प 'खुलना' येथे स्थापन करण्यासाठी ____________________ देशाबरोबर करार केला आहे .

A. नेपाळ
B. भूतान
C. बांगलादेश
D. अफगाणिस्तान

Click for answer 
C. बांगलादेश

5. ' करीयर ग्रॅण्ड स्लॅम' जिंकण्याचा भीम पराक्रम करणारी पहिली भारतीय व्यक्ती ठरण्याचा बहुमान कोणी पटकविला ?

A. सानिया मिर्झा
B. प्रकाश अमृतराज
C. महेश भूपती
D. लिएंडर पेस

Click for answer 
D. लिएंडर पेस
स्पष्टीकरण : लॉन टेनिसच्या चारही मुख्य स्पर्धा म्हणजेच अमेरिकन ओपन, फ्रेंच ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डन करियरमध्ये एकदा तरी जेतेपद प्राप्त करण्याच्या पराक्रमास ' करीयर ग्रॅण्ड स्लॅम ' म्हणतात .

6. नुकतेच निधन झालेले एम.ओ.एच.फारूक हे कोणत्या राज्याचे राज्यपाल होते ?

A. आंध्रप्रदेश
B. केरळ
C. त्रिपुरा
D. आसाम

Click for answer 
B. केरळ

7. 2012 च्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्याच्या विशेष अतिथी श्रीमती यिंगलक शिनवात्रा ह्या कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत ?

A. त्रिनिनाद-टोबॅगो
B. थायलंड
C. फिलीपाइन्स
D. दक्षिण कोरीया

Click for answer 
B. थायलंड

8. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा मान सर्वप्रथम कोणत्या महिला अध्यक्ष / पंतप्रधान / राष्ट्रप्रमुखास मिळाला ?

A. श्रीमती भंडारनायके
B. यिंगलक शिनवात्रा
C. राणी एलिझाबेथ-II
D. शेख हसीना

Click for answer 
C. राणी एलिझाबेथ-II

9. चार दिवसांचा ' एलोरा - अजंठा फेस्टीवल ' 3 वर्षानंतर कोणत्या शहरात साजरा झाला ?

A. औरंगाबाद
B. दौलताबाद
C. पुणे
D. मुंबई

Click for answer 
A. औरंगाबाद

10. ' मतदार दिन ' भारतात कधी साजरा केला गेला ?

A. 1 जानेवारी
B. 12 जानेवारी
C. 25 जानेवारी
D. 26 जानेवारी

Click for answer 
C. 25 जानेवारी

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत