Showing posts with label माहिती तंत्रज्ञान. Show all posts
Showing posts with label माहिती तंत्रज्ञान. Show all posts

Thursday, February 2, 2012

प्रश्नमंजुषा -197


1. माहितीच्या अधिकाराची चळवळ महाराष्ट्रात सुरु करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणत्या व्यक्तीकडे जाते ?

A. श्री.गोपीनाथ मुंडे
B. श्री.शरद पवार
C. किरण बेदी
D. श्री. अण्णा हजारे

Click for answer 
D. श्री. अण्णा हजारे

2.कुलवल विरुद्ध जयपूर म्युनसिपल कॉर्पोरेशनच्या निवाड्यात सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे भारतीय संविधानाने दिलेल्या खालीलपैकी कोणत्या "स्वातंत्र्यामध्ये" माहितीचा अधिकार अंतर्भूत आहे ?

A. धर्माविषयीचे स्वातंत्र्य
B. भाषण आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्य
C. संघ किंवा संघटना बनविण्याचे स्वातंत्र्य
D. भारतीय संघराज्यात कोठेही भ्रमण करण्याचे स्वातंत्र्य

Click for answer 
B. भाषण आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्य

3. माहिती अधिकाराच्या कायद्यानुसार खालीलपैकी कोणते सार्वजनिक प्राधिकरण आहे ?

A. येस-बॅंक
B. शासकीय विधी महाविद्यालय मुंबई
C. इन्फोसिस
D. रिलायन्स उद्योगसमूह

Click for answer 
B. शासकीय विधी महाविद्यालय मुंबई

4. अपील प्रधिका‌‍र्‍याच्या निर्णयामुळे व्यथित झालेल्या एखाद्या व्यक्तीस राज्य माहिती आयोगाकडे दुसरे अपील करायचे असल्यास किती दिवसात करता येते ?


A. नव्वद दिवसात
B. साठ दिवसात
C. पन्नास दिवसात
D. अठेठ्चाळीस दिवसात

Click for answer 
A. नव्वद दिवसात


5. "माहिती" च्या व्याख्येमध्ये खालीलपैकी कशाचा अंतर्भाव होत नाही ?

A. ई-मेल
B. अधिकार्‍यांच्या वैयक्तिक डायर्‍या
C. अभिप्राय
D. सूचना

Click for answer 
B. अधिकार्‍यांच्या वैयक्तिक डायर्‍या

6. राज्य मुख्य माहिती आयुक्क्तांचा पदावधी ( पद धारण करण्याचा काल ) खालीलपैकी आहे ?

A. पाच वर्षे किंवा वयांची 65 वर्ष जे अगोदर असेल ते
B. तीन वर्षे किंवा वयांची 65 वर्ष जे अगोदर असेल ते
C. पाच वर्षे किंवा वयांची 67 वर्ष जे अगोदर असेल ते
D. तीन वर्षे किंवा वयांची 67 वर्ष जे अगोदर असेल ते

Click for answer 
A. पाच वर्षे किंवा वयांची 65 वर्ष जे अगोदर असेल ते

7. माहिती अधिकाराच्या कायद्याचा (2005) खालीलपैकी कोणत्या कायद्यांवर अधिभावी परिणाम (overriding effect) असेल ?

A. शासकीय गुपितांचा कायदा
B. त्या त्या वेळी अंमलात असलेला अन्य कोणताही कायदा
C. अन्य कायद्याच्या आधारे अंमलात आलेले कोणतेही संलेख
D. वरीलपैकी सर्वांवर

Click for answer 
D. वरीलपैकी सर्वांवर

8. केंद्रीय जनमाहिती अधिकार्‍याने कोणत्याही वाजवीकारणाशिवाय माहिती मिळवण्याबाबतचा अर्ज स्वीकारण्यास एखाद्या व्यक्क्तीला नकार दिला असेल तर किती रुपये दंड आकारता येतो ?

A. प्रत्येक दिवसाला रु.25 परंतु 250 रु.पेक्षा जास्त नाही
B. प्रत्येक दिवसाला रु.250 परंतु 25,000 रु.पेक्षा जास्त नाही
C. प्रत्येक दिवसाला रु.100 परंतु 1,000 रु.पेक्षा जास्त नाही
D. प्रत्येक दिवसाला रु.50 परंतु 500 रु.पेक्षा जास्त नाही

Click for answer 
B. प्रत्येक दिवसाला रु.250 परंतु 25,000 रु.पेक्षा जास्त नाही

9. खालीलपैकी कोणती संज्ञा माहितीचा अधिकार कायदा , 2005 याच्याशी संबंधित आहे ?

A. जन संपर्क अधिकारी
B. माहिती आणि नभोवाणी मंत्री
C. जन माहिती अधिकारी
D. मुख्य कार्यकारी अधिकारी

Click for answer 
C. जन माहिती अधिकारी

10. डिस्केट्स किंवा फ्लॉपी या स्वरूपातील माहिती पुरविण्यासाठी प्रत्येक डिस्केट्स किंवा फ्लॉपीकरिता टपाल खर्च वगळून खालीलपैकी किती रुपये फी आकारण्यात येते ?

A. दहा रुपये
B. पन्नास रुपये
C. शंभर रुपये
D. वरीलपैकी कोणतीही नाही

Click for answer 
B. पन्नास रुपये

प्रश्नमंजुषा -195

---------------------------------------------------------------------------
येत्या शुक्रवारपासून इंटरनेट चे आयपी अड्रेस (IP Address) पूर्णपणे बदलतील. आजतागायत सुरु असलेली IP V4 (आय पी व्हर्जन 4) ची जागा आता IP V6 ( इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 6) घेईल. 1980 च्या दशकात सुरु झालेली आय पी व्हर्जन 4 ही सुमारे 4.1 अब्ज आय.पी. देण्यासाठी सक्षम होती. कधीकाळी गगनासारखा भासणारा हा क्रमांक , परंतु बदलत्या काळात त्याहून जास्त आय.पी. असतील हे स्पष्ट झाल्यानंतर नवीन आवृत्ती (व्हर्जन) आता कार्यान्वित होत आहे.
---------------------------------------------------------------------------
1. नेटवर्कमध्ये जोडलेला संगणक खालीलपैकी कशामुळे शोधता येईल ?

A. आय. पी. अड्रेस
B. सब नेट मास्क
C. स्वीच
D. मोडेम

Click for answer 
A. आय. पी. अड्रेस

2.माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या प्रयोजनार्थ " माहिती" मध्ये काय येत नाही ?

A. साउंड
B. कोड
C. मायक्रो फिल्म
D. वरीलपैकी कोणतेही नाही

Click for answer 
D. वरीलपैकी कोणतेही नाही

3. यु. आर. एल.(URL) या शब्दाची फोड खालील प्रमाणे आहे ?

A. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर
B. युनिवर्स रिसोर्स लोकेटर
C. युनायटेड रिसोर्स लोकेटर
D. युनिअन रिसोर्स लोकेटर

Click for answer 
A. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर

4. वेब पेजेस साठवण्यास व त्यांना ‍‌दृ‍‌‍‍‌श्यरुपात आणण्यास कोणता सर्व्हर उपयोगी येतो ?

A. वेब सर्व्हर
B. मेल सर्व्हर
C. प्रिंट सर्व्हर
D. वरीलपैकी नाही

Click for answer 
A. वेब सर्व्हर

5. एखादी व्यक्ती भू- तलावर कुठे आहे हे शोधण्यासाठी ______________ या नवीन टेक्नोलॉजीचा वापर होतो .

A. जी.पी.एस.सिस्टम
B. रडार सिस्टम
C. रेडीओ व्हेव सिस्टम
D. रेडीओ फ्रिक्वेंसी सिस्टम

Click for answer 
A. जी.पी.एस.सिस्टम

6. मिडिया लॅब एशियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झीक्युटीव्ह ऑफीसर श्री ________________ आहेत .


A. सी.व्ही.रामाराजू
B. जी.व्ही.रामाराजू
C. एस.व्ही.रामाराजू
D. यापैकी नाही

Click for answer 
B. जी.व्ही.रामाराजू

7. ___________________ ही संस्था " कंट्रोलर ऑफ सर्टिफाइंग अथोरीटी " (CCA) म्हणून काम पहाते .

A. एन.आय.सी.
B. डि.आय.सी.
C. एल.आय.सी.
D. आय.आर.बी.

Click for answer 
A. एन.आय.सी.

8. मिडीया लॅब एशियाने टेलीमेडीसिन क्षेत्रात टाकलेले पाऊल _____________ या नावाने ओळखले जाते .

A. इ-मेडीसिन
B. इ-धन्वंतरी
C. इ-डॉक्टर
D. इ-मेडहेल्प

Click for answer 
B. इ-धन्वंतरी

9. ज्या लोकांना सर्वसाधारण पुस्तके व वाचनीय साहित्य वाचता येत नाही (अंध व्यक्ती) अशा लोकांना त्यांच्या वाचनाच्या माध्यमात पुस्तके व साहित्य उपलब्ध करून देणारी ___________ ही संस्था आहे .

A. डी.एफ.आय.
B. सि.एफ.आय.
C. एन.ए.बी.एल.
D. एम.एफ.आय.

Click for answer 
C. एन.ए.बी.एल.

10. डी.आय.टी. या शासनाच्या संस्थेने 60,000 देशातील शाळांना संगणक सुविधा, परिपूर्ण लॅब , वेब प्रसारण आणि इ - लर्निंग ह्या सुविधा 3 वर्षात देणारा ___________________ हा उपक्रम सुरु केला

A. "विद्या वाहिनी"
B. "ज्ञान गंगा"
C. "सरस्वती वाहिनी"
D. "ज्ञानकेंद्र"

Click for answer 
A. "विद्या वाहिनी"

Saturday, December 17, 2011

प्रश्नमंजुषा -146


1. 1 किलोबाईट म्हणजे किती बाईट ?

A. 1000
B. 10000
C. 1024
D. 948

Click for answer 
C. 1024

2. बिल गेटस्‌ हे नाव कोणत्या संगणक प्रणालीशी जोडलेले आहे ?

A. विंडोज
B. लिनक्स
C. अंड्रॉईड
D. सिम्बियन

Click for answer 
A. विंडोज

3. लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन हे ____________ ह्या कंपनीचे संस्थापक आहेत.

A. याहू
B. गुगल
C. मायक्रोसॉफ्ट
D. फेसबुक

Click for answer 
B. गुगल

4. 'द सोशल नेटवर्क ' हा चित्रपट ___________ ह्या 'फेसबुक ' च्या निर्मात्याच्या आयुष्यावर बेतलेला आहे.

A. जॅक डॉर्सी
B. मार्क झुकरबर्ग
C. दिव्या नरेंद्रा
D. सियान पार्कर

Click for answer 
B. मार्क झुकरबर्ग

5. खालीलपैकी कोणती ऑनलाईन सेवा बरीचशी 'एसएमएस ' शी साधर्म्य ठेवणारी (140 characters ची मर्यादा ) आहे ?

A. ऑर्कुट
B. गुगल-प्लस
C. ट्विटर
D. फेसबुक

Click for answer 
C. ट्विटर


6. खालीलपैकी कोणती सेवा सोशल नेटवर्किंग सेवा म्हणून ओळखता येणार नाही ?

A. फेसबुक
B. गुगल प्लस
C. स्कायपे
D. ऑर्कुट

Click for answer 
C. स्कायपे (ही VoIP म्हणजे Voice Over Internet Protocol) सेवा आहे.

7. खालीलपैकी कोणती मोबाईल मधील संगणक प्रणाली (Operating System)नाही ?

A. अंड्रॉईड
B. सिम्बियन
C. विंडोज सी.ई
D. विंडोज -XP

Click for answer 
D. विंडोज -XP

8. 'राऊटर्स ' कशासाठी वापरले जातात ?

A. दोन संगणक जोडण्यासाठी
B. दोन नेटवर्क जोडण्यासाठी
C. प्रिंट-आउट काढण्यासाठी
D. इमेल सेवा वापरण्यासाठी

Click for answer 
B. दोन नेटवर्क जोडण्यासाठी

9. 'मोझिला फायर फॉक्स ' किंवा 'इंटरनेट एक्सप्लोरर ' नेमके काय आहेत ?

A. ऑपरेटिंग सिस्टीम
B. अन्टी व्हायरस सॉफ्टवेअर
C. इंटरनेट ब्राउझर
D. स्पीच प्रोसेसिंग प्रोग्राम

Click for answer 
C. इंटरनेट ब्राउझर

10. 'कृत्रिम बुध्दीमत्ता' ही संज्ञा कोणत्या पिढीतील संगणकांविषयीची आहे?

A. पाचव्या
B. चौथ्या
C. तिसर्‍या
D. दुसर्‍या

Click for answer 
A. पाचव्या

Monday, November 21, 2011

प्रश्नमंजुषा -1141. अलीकडेच निधन पावलेले 'स्टीव्ह जॉब्स' हे कोणत्या कंपनीशी संबंधित होते?

A. मायक्रोसॉफ्ट
B. ऍपल
C. नोकिया
D. फेसबुक

Click for answer 
B. ऍपल

2.जगातला पहिला संगणक कोणत्या कंपनीने बाजारात आणला होता ?
A. लोटस
B. आय.बी.एम.
C. मायक्रोसॉफ्ट
D. ऍपल

Click for answer 
D. ऍपल

3. लॅनच्या तुलनेत वॅन चे भौगोलिक क्षेत्र ______________ असते.

A. कमी
B. जास्त
C. सारखेच
D. तुलना शक्य नाही.

Click for answer 
B. जास्त

4. प्रस्तावित 'ई-भारत ' प्रकल्प केंद्राच्या कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे ?

A. माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
B. गृह मंत्रालय
C. ग्रामीण विकास मंत्रालय
D. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

Click for answer 
A. माहिती तंत्रज्ञान मंत्रालय


5. भारतातील इंटरनेट क्षेत्रातील पहिली कंपनी कोणती ?

A. बी.एस.एन.एल.
B. व्ही.एस.एन.एल.
C. एम.टी.एन.एल.
D. रिलायन्स कम्युनिकेशन्स

Click for answer 
B. व्ही.एस.एन.एल.

6. दूरसंचार क्षेत्राशी संबंधित कोणत्या सेवेला 'भारतातील  चौथी क्रांती ' असे संबोधतात ?

A. वाय- फाय  सुविधा 
B. मोबाईल सेवा
C. वाय-मॅक्स सुविधा
D. डायरेक्ट -टू -होम सुविधा

Click for answer 
D. डायरेक्ट -टू -होम सुविधा

7. महाराष्ट्र शासनाचा ________ प्रकल्प 'गाव तेथे संगणक ' व 'गाव तेथे इंटरनेट' या उदिष्टासाठी सुरु करण्यात आला आहे.

A. विचारगंगा
B. ज्ञानगंगा
C. संगणकगंगा
D. ई-क्रांती

Click for answer 
A. विचारगंगा

8. प्रोग्राम आणि डाटा तात्पुरता साठविण्यासाठी ___________ चा उपयोग होतो.

A. CD
B. DVD
C. RAM
D. ROM

Click for answer 
C. RAM

9. इंटरनेटवरील माहिती शोधण्याच्या प्रक्रियेला ______________ असे नाव आहे.

A. सर्च इंजिन
B. डिरेक्टरी
C. वेब डिरेक्टरी
D. डिक्शनरी

Click for answer 
A. सर्च इंजिन

10. स्मार्ट (SMART) प्रशासनाची संकल्पना राबविणारे राज्य कोणते?

A. गुजरात
B. महाराष्ट्र
C. मध्यप्रदेश
D. केरळ

Click for answer 
B. महाराष्ट्र

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत