आता नोकरीविषयक सर्व अपडेट्स संक्षिप्त स्वरुपात- नोकरी मार्गदर्शक सेक्शनला (वर पहा) भेट द्या.
Showing posts with label मानवी हक्क. Show all posts
Showing posts with label मानवी हक्क. Show all posts

Saturday, February 4, 2012

प्रश्नमंजुषा -202


1. 'शारीरिक छळ ' या शब्दाची परिभाषा कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, 2005 ने खालीलप्रमाणे केले आहे .

A. शारीरिक मारहाण
B. जीविताला धोका
C. हल्ला
D. वरीलपैकी सर्व

Click for answer 
D. वरीलपैकी सर्व

2.अस्पृश्यतेच्या नावाखाली सामाजिक दुर्बलता आणणार्‍या व्यक्तीच्या विरुद्ध खालीलपैकी कोणत्या कायद्याने शिक्षा दिली जाऊ शकते ?

A. मानवी हक्क संरक्षण अधिनियम,1993
B. अ.जाती व अ.जमाती(अत्याचारास प्रतिबंध)अधिनियम, 1989
C. नागरी हक्क संरक्षण अधिनियम,1955
D. वरीलपैकी एकही नाही

Click for answer 
C. नागरी हक्क संरक्षण अधिनियम,1955

3. 1961 च्या हुंडाबंदी कायद्यानुसार हुंडा देणे व हुंडा घेणे यासाठी कोणती शिक्षा होऊ शकते ?

A. कमीत कमी 1 वर्ष कारावास व कमीत कमी 5,000 रु. दंड
B. कमीत कमी 5 वर्ष कारावास व कमीत कमी 15,000 रु. दंड
C. कमीत कमी 3 वर्ष कारावास व कमीत कमी 5,000 रु. दंड
D. कमीत कमी 5 वर्ष कारावास व कमीत कमी 5,000 रु. दंड

Click for answer 
B. कमीत कमी 5 वर्ष कारावास व कमीत कमी 15,000 रु. दंड

4. विवाह झालेल्या महिलेच्या व्यतिरिक्त इतर कुणीही त्या विवाहासंबंधी हुंडा घेतला असल्यास ती हुंड्याची रक्कम त्या व्यक्तीने नमूद केलेल्या वेळेच्या आत कोणाच्या सुपूर्द करावयास हवी ?

A. संबंधित विवाहित महिला
B. विवाहित महिलेचे पालक
C. विवाहित महिलेचा पती
D. न्यायालय

Click for answer 
A. संबंधित विवाहित महिला

5. _______________ ह्या कायद्याचे कलम 7(1)(d) अनुसूचित जातीच्या लोकांना अस्पृश्यतेच्या आधारावर अपमानित करणे किंवा अपमानित करण्याचा प्रयत्‍न करणे, ह्यावर प्रकाश टाकते.

A. मानव अधिकार संरक्षण कायदा,1993
B. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, 1989
C. नागरी हक्क संरक्षण कायदा,1955
D. वरील सर्व

Click for answer 
C. नागरी हक्क संरक्षण कायदा,1955

6. मानवी हक्क संरक्षण अधिनियम,1993 च्या प्रयोजनार्थ मानवी हक्क म्हणजे ____________________.

A. व्यक्तीचे जीवन व स्वातंत्र्य
B. समता व प्रतिष्ठा
C. दोन्ही (1)व(2) बरोबर
D. दोन्ही (1)व(2) चुक

Click for answer 
C. दोन्ही (1)व(2) बरोबर

7. हुंडा म्हणजे कोणतीही संपत्ती किंवा किमती रोखवस्तु जी _________ दिलेली आहे .

A. विवाहाच्या वेळी
B. विवाहाच्या आधी
C. विवाहानंतर
D. वरील सर्व वेळी

Click for answer 
D. वरील सर्व वेळी

8. आत्मनिर्धाराचा अधिकार ___________ चा मानव अधिकार आहे .

A. पहिल्या पिढी
B. दुसर्‍या पिढी
C. तिसर्‍या पिढी
D. वरीलपैकी कुठलाही नाही

Click for answer 
C. तिसर्‍या पिढी

9. बलात्कार ह्या गुन्ह्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या भारतीय संविधानाच्या ______________ ने हमी दिलेल्या मुलभूत अधिकाराचे हनन होते, हे मानवी अधिकाराच्या जागतिक मसुद्यात स्पष्ट केले आहे.

A. कलम 23
B. कलम 21
C. कलम 51
D. कलम 19

Click for answer 
B. कलम 21

10. नागरी व राजकीय अधिकारांच्या आंतराष्ट्रीय करारनाम्याचे 6 वे कलम __________ च्या प्रश्नांशी निगडीत आहे .

A. सशस्त्र संघर्ष
B. ओलीस ठेवणे
C. आंतरराष्ट्रीय दहशतवाद
D. देहांत शिक्षा

Click for answer 
D. देहांत शिक्षा

प्रश्नमंजुषा -201


धन्यवाद !
आधीच्या पोस्टमध्ये आम्ही आवाहन केल्याप्रमाणे आमच्या 300 हून अधिक मित्र-मैत्रिणींनी ई-मेल द्वारे आमच्याविषयी लिहिले. आम्ही आपले त्यासाठी आभारी आहोत. सोमवारी रात्रीपर्यंत आम्ही अश्या इमेलची दखल घेऊ. मंगळवार सकाळपासून आपणाला अपडेट्स येणे सुरु होईल. धन्यवाद !!

1. मानव अधिकारांचे संरक्षण अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी भारतीय संसदेने मानव अधिकार संरक्षण कायदा , 1993 च्या अंतर्गत _____________ ची स्थापना केली आहे .

A. राष्ट्रीय मानव अधिकार आयोग
B. राज्य मानव अधिकार आयोग
C. मानव अधिकार न्यायालय
D. वरील सर्व

Click for answer 
D. वरील सर्व

2.राज्य मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्ष पदी अशी व्यक्ती आरूढ होऊ शकते जी ने __________________ पदी काम केलेले आहे .

A. उच्च न्यायालयातील न्यायाधीश
B. त्या संबंधित राज्यातील जिल्हा न्यायाधीश
C. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश
D. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश

Click for answer 
C. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश

3. मानव अधिकारांच्या हननामुळे निर्माण झालेल्या गुन्ह्यांचा त्वरित निपटारा करण्यासाठी राज्य शासन प्रत्येक जिल्ह्यातील ____________ ला त्या गुन्ह्यांचा निवडा करण्यासाठी मानव अधिकार न्यायालय म्हणून नामनिर्देश करू शकते .

A. न्याय चौकशी न्यायालय
B. सत्र न्यायालय
C. विशेष न्यायालय
D. वरीलपैकी कोणतेही नाही

Click for answer 
B. सत्र न्यायालय

4. देऊन टाकता न येणार्‍या अधिकारांची संकल्पना ________________ यांनी केली .

A. थॉमस होबेज
B. रॉस्यो
C. जॉन लॉके
D. वरील कोणीही नाही

Click for answer 
C. जॉन लॉके

5. भारताने नागरी व राजकीय हक्कांनवरील आंतरराष्ट्रीय प्रसंविदा , 1966 ला , केव्हा मंजुरी दिली ?

A. 27 मार्च 1979
B. 27 एप्रिल 1978
C. 27 एप्रिल 1980
D. 27 मार्च 1978

Click for answer 
A. 27 मार्च 1979

6. भारतीय संविधानाच्या कोणत्या विभागात आर्थिक ,सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कावरील आंतरराष्ट्रीय प्रसंविदा, 1966 मधील हक्क नमूद केलेली आहे ?

A. विभाग 4-A
B. विभाग 2
C. विभाग 3
D. विभाग 4

Click for answer 
D. विभाग 4

7. नागरी व राजकीय हक्कांनवरील आंतरराष्ट्रीय प्रसंविदा , 1966 भारतातील खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे ?

A. वैधानिक हक्क
B. मुलभूत अधिकार
C. पारंपारिक अधिकार
D. वरीलपैकी कोणतेही नाही

Click for answer 
B. मुलभूत अधिकार

8. खालील नमूद अधिकारांपैकी कोणत्या अधिकाराची भारतीय संविधानात स्पष्टपणे मुलभूत अधिकार म्हणून गणना केली आहे ?

A. गुप्ततेचा अधिकार
B. जलद न्यायदानाचा अधिकार
C. कायदेविषयक सहाय्य देण्याचा अधिकार
D. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार

Click for answer 
D. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार

9. हुंडा घेण्यासाठी अथवा देण्यासाठी केलेला करार _________ ठरतो .

A. वैध
B. अवैधक्षम
C. शून्य (अंमलात येऊ न शकणारा )
D. वरीलपैकी कोणतेही नाही

Click for answer 
C. शून्य (अंमलात येऊ न शकणारा )

10. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनिय , 2005 मध्य खालीलपैकी कोणता आदेश नमूद केलेला नाही ?

A. ताबा देण्यासंबंधीचा आदेश
B. भरपाई देण्याचा आदेश
C. निवासी आदेश
D. मनाई आदेश

Click for answer 
D. मनाई आदेश

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत