Showing posts with label भारतीय राज्यपद्धती. Show all posts
Showing posts with label भारतीय राज्यपद्धती. Show all posts

Friday, January 20, 2012

प्रश्नमंजुषा -182


1. भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमाद्वारे संसदेच्या सदस्याचे पात्रतेसाठीच्या निकषांचा निर्देश केलेला आहे ?

A. कलम 88
B. कलम 84
C. कलम 89
D. कलम 91

Click for answer 
B. कलम 84

2. राज्यघटनेतील कोणत्या परीशिष्टातील नमुन्याप्रमाणे संसदेतील प्रत्येक सभासद पदग्रहण करण्यासाठीची शपथ घेतो ?

A. पहिले
B. तिसरे
C. पाचवे
D. सहावे

Click for answer 
B. तिसरे

3. राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार काही खटले सर्वोच्च न्यायालयाकडे हस्तांतरित केले जातात ?

A. कलम 139 A
B. कलम 139 B
C. कलम 139 C
D. कलम 138

Click for answer 
A. कलम 139 A

4. राज्यघटनेच्या कोणत्या कलमांद्वारे राष्ट्रपती अनुसूचीत जाती व अनुसूचित जमातींची सूची तयार करू शकतो ?

A. कलम 344-345
B. कलम 346-347
C. कलम 341-342
D. कलम 350-351

Click for answer 
C. कलम 341-342

5. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 नुसार 'पंचायत' चा अर्थ काय होतो ?

A. स्व-ग्राम पंचायत राज
B. ग्राम प्रशासन
C. स्वराज्य संस्था
D. वरीलपैकी कोणतेही नाही

Click for answer 
C. स्वराज्य संस्था

6. राज्यघटनेतील 243 व्या कलमानुसार मेट्रो शहरांसाठी किती लोकसंख्या आवश्यक आहे ?

A. दहा लाख किंवा अधिक
B. एक लाख किंवा अधिक
C. दहा लाखांपेक्षा कमी
D. पाच लाखांपेक्षा कमी

Click for answer 
A. दहा लाख किंवा अधिक

7. कोणत्या घटनादुरूस्तीद्वारे कलम 368 मध्ये पहिल्यांदा दुरुस्ती करण्यात आली ?

A. 25 वी घटनादुरुस्ती
B. 24 वी घटनादुरुस्ती
C. 26 वी घटनादुरुस्ती
D. 27 वी घटनादुरुस्ती

Click for answer 
B. 24 वी घटनादुरुस्ती

8. राज्यघटनेतील कोणत्या कलमाद्वारे अनुसूचित जाती आणि जमातींकरिता राष्ट्रीय आयोगाची तरतूद केलेली आहे ?

A. कलम 337
B. कलम 334
C. कलम 338
D. कलम 339

Click for answer 
C. कलम 338

9. आणीबाणीच्या काळातही पुढीलपैकी कोणत्या मुलभूत हक्कांची अंमलबजावणी होते ?

A. कलम 20
B. कलम 21
C. कलम 20 आणि कलम 21
D. वरीलपैकी कोणतेही नाही

Click for answer 
C. कलम 20 आणि कलम 21

10. केवळ केंद्र सरकारलाच बाह्य आक्रमण आणि अंतर्गत असुरक्षिततेच्या बाबत राज्याला संरक्षण देण्याचा अधिकार आहे असे राज्यघटनेतील कोणते कलम सांगते ?

A. कलम 359
B. कलम 360
C. कलम 355
D. कलम 361

Click for answer 
C. कलम 355

Wednesday, November 23, 2011

प्रश्नमंजुषा -118http://mpscexamination.blogspot.com ह्या ब्लॉगला अवश्य भेट द्या. आणि आपल्या प्रतिक्रियाही नोंदवा.


1. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण ?

A. डॉ. झाकीर हुसेन
B. डॉ. राजेंद्रप्रसाद
C. डॉ. एस.राधाकृष्णन
D. व्ही.व्ही.गिरी

Click for answer 
C. डॉ. एस.राधाकृष्णन

2. महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन कोठे भरते ?
A. मुंबई
B. पुणे
C. नागपूर
D. नाशिक

Click for answer 
A. मुंबई


3. लोकसभेत 'शून्य प्रहर ' केव्हा सुरु होतो ?

A. सकाळी 11 वाजता
B. दुपारी 12 वाजता
C. निश्चित अशी वेळ नसते
D. दिवसभराचे कामकाज सुरु होताना पहिला तास

Click for answer 
B. दुपारी 12 वाजता

4. राज्यसभेचा सदस्य खालीलपैकी कोणते पद भूषवू शकणार नाही ?

A. संरक्षण मंत्री
B. गृह मंत्री
C. पंतप्रधान
D. वरील पदे ती/तो भूषवू शकते/शकतो.

Click for answer 
D. वरील पदे ती/तो भूषवू शकते/शकतो.

5. संसदेत खालीलपैकी कोणत्या गटाचा समावेश होतो ?

A. राष्ट्रपती , लोकसभा , विधानसभा
B. राष्ट्रपती , लोकसभा , राज्यसभा
C. लोकसभा , राज्यसभा
D. फक्त लोकसभा

Click for answer 
B. राष्ट्रपती , लोकसभा , राज्यसभा

6. राज्यसभेत महाराष्ट्रातून ________ सदस्य पाठवले जातात.

A. 17
B. 19
C. 21
D. 23

Click for answer 
B. 19

7. 44 वी घटनादुरुस्ती ___________ साली करण्यात आली.

A. 1976
B. 1978
C. 1980
D. 1984

Click for answer 
B. 1978

8. महाराष्ट्रात विधानसभेतून विधानपरिषदेवर किती सदस्य निवडून दिले जातात ?

A. विधानपरिषदेच्या सदस्य संख्येच्या 1/3
B. विधानपरिषदेच्या सदस्य संख्येच्या 1/6
C. विधानपरिषदेच्या सदस्य संख्येच्या 1/12
D. एकही नाही.

Click for answer 
A. विधानपरिषदेच्या सदस्य संख्येच्या 1/39. ________ या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे.

A. औरंगाबाद
B. नागपूर
C. पणजी
D. वरील सर्व

Click for answer 
D. वरील सर्व

10. पंजाब आणि हरियाणा या राज्यांचे उच्च न्यायालय कोठे आहे ?

A. दिल्ली
B. सिमला
C. चंदीगड
D. नैनिताल

Click for answer 
C. चंदीगड

Monday, June 20, 2011

अलीकडील महत्त्वाच्या घटनादुरुस्ती

113 वी घटनादुरुस्ती विधेयक :
 •       'ओरिया ' भाषेचे 'ओडिया ' असे करण्यासंदर्भात . 
 • ओरिसा विधानसभेच्या विनंती नुसार हे विधेयक संसदेत मांडण्यात आले आहे. सध्या हे विधेयक प्रलंबित (pending) आहे. 
 • ह्या साठी राज्यघटनेच्या 8 व्या परीशिष्टात सुधारणा अपेक्षित आहे.

 • { 'ओरिसा ' राज्याचे 'ओडिशा ' असे करण्यासंदर्भात वेगळे 'Bill' (कायदा) ठेवण्यात आले आहे.}112 वी घटनादुरुस्ती विधेयक :
 •  नागरी स्वराज्य संस्थांमध्ये (Urban Local Bodies) महिलांना 50% आरक्षण देण्यासंदर्भात. 
 • राज्यघटनेच्या कलम 243T मध्ये सुधारणा करण्यात येईल.सध्या ह्या कलमातील तरतुदीनुसार महिलांना या संस्थांमध्ये 1/3 जागा आरक्षित आहेत. 
 • सध्या खासदार शरद यादव यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समिती (Parliamentary Standing committee) कडे हे विधेयक सखोल अभ्यासासाठी पाठविण्यात आले आहे.111 वी घटनादुरुस्ती विधेयक :
 • केंद्रीय कृषिमंत्री श्री, शरद पवार यांनी हे  विधेयक मांडले आहे.
 • हे विधेयक राज्यघटनेत मार्गदर्शक तत्त्वांमध्ये (Directive Principles of State Policy) सहकारी संस्थांसंदर्भात (co-operative societies) काही कलमे समाविष्ट करण्यासंदर्भात आहे. 
 • ह्या घटनादुरूस्तीमुळे राज्यघटनेत भाग IX B चा समावेश केला जाईल. त्यात 243ZH ते 243ZT ह्या नवीन कलमांचा समावेश होईल.
 • सध्या हे विधेयक प्रलंबित (pending) आहे.110 वी घटनादुरुस्ती विधेयक :
 •        स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (Panchayat Raj Institutions ) महिलांना 50% आरक्षण देण्यासंदर्भात. राज्यघटनेच्या कलम 243D मध्ये सुधारणा करण्यात येईल.सध्या ह्या कलमातील तरतुदीनुसार महिलांना या संस्थांमध्ये 1/3 जागा आरक्षित आहेत. 
 • सध्या खासदार श्रीमती सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समिती (Parliamentary Standing committee) कडे हे विधेयक सखोल अभ्यासासाठी पाठविण्यात आले आहे.


95 वी घटनादुरुस्ती  (109 वी घटनादुरुस्ती विधेयक ):
 • ही संमत झालेली सर्वात अलीकडील घटनादुरुस्ती आहे. 
 • 109 वी घटनादुरुस्ती विधेयक असलेले हे विधेयक संमत झाल्यांनंतर 95 वी घटनादुरुस्तीत रुपांतरीत झाले आहे. 
 • ह्या घटनादुरुस्तीने SC/ST साठी लोकसभा आणि राज्य विधानसभांमधील आरक्षण 10 वर्षांनी वाढवण्यात आले आहे. 
 • राज्यघटनेच्या कलम 334 मध्ये 60 वर्षांऐवजी 70 वर्षे अशी सुधारणा करण्यात आली आहे.

108 वी घटनादुरुस्ती विधेयक :
 • लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना 1/3 आरक्षण देण्यासंदर्भात आहे. 
 • (विधानपरिषद आणि राज्यसभेत असे आरक्षण प्रस्तावित नाही.)
 • हे विधेयक राज्यसभेत आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 मार्च 2010 संमत झाले. लोकसभेत अद्यापही ते सादर केलेले नाही. 
 • लोकसभेच्या संमतीनंतर किमान निम्म्या राज्यांच्या विधानसभांनी ते संमत केल्यावरच राष्ट्रपतींच्या सहीनंतर अंमलात येईल.
 • यातील तरतुदीनुसार ते 15 वर्षांच्या कालावधीसाठीच ही तरतूद प्रस्तावित आहे. SC/ST प्रवर्गातील महिलांना या आरक्षणाच्या अंतर्गत आरक्षण दिले जाईल.

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

If you LIKE what we are posting here, please share it on your Facebook page. Just copy the URL link and paste on your Facebook status update.
आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत