Showing posts with label पद्म पुरस्कार विजेते. Show all posts
Showing posts with label पद्म पुरस्कार विजेते. Show all posts

Thursday, January 26, 2012

पद्म पारितोषिक विजेते -2012

सर्वप्रथम आपणा सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. ह्या खंडप्राय देशाचे भवितव्य असलेली भावी पिढी ही ह्या ब्लॉगची वाचक आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो आणि ती एक सर्वसमावेशक तत्त्वावर एक महासत्ता बनावी ह्या साठी आपण सर्व सर्व एकत्रितपणे ताकदीने प्रयत्न करू यात.

सालाबादाप्रमाणे ह्या वर्षीही प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला नागरी आणि शौर्य  पुरस्कारांची घोषणा झाली.यातील काही महत्वाचे पुरस्कार विजेते खालीलप्रमाणे:


# गेल्या वर्षीच्या  128  पुरस्कारांच्या तुलनेत ह्यावर्षी केवळ  109 पद्म पारितोषिके जाहीर केले गेले.

# ह्या वर्षीही 'भारतरत्‍न ' पुरस्काराचा यादीत समावेश नाही. म्हणजेच पंडित भीमसेन जोशींना बहाल केला गेलेला 'भारतरत्‍न ' पुरस्कार हा सर्वात अलीकडचा आहे.

# भारतासारख्या खंडप्राय देशात , 100 कोटींहून अधिक असलेल्या ह्या भारतात  100 हून  अधिक जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले जाते. पण ह्या एकंदर लोकसंख्येच्या  तुलनेत खुपच छोट्या असलेल्या यादी विषयी , त्यातील लोक ह्या पुरस्कारांना किती पात्र होते ह्या विषयी चर्चा होत असते. ह्या वर्षी मात्र ,यादी खरोखरच रथी-महारथींची आहे. आणि त्यातही आनंदाची बाब म्हणजे महाराष्ट्राला सिंहाचा वाटा  मिळाला आहे. (109 पैकी  23)
# पद्म पुरस्कारांचा विचार करता :
पद्मविभूषण : हा पुरस्कार 'भारतरत्‍न ' ह्या सर्वोच्च नागरी पुरस्कारा नंतरचा म्हणजे दुसर्‍या क्रमांकाचा मानला जातो आणि त्या नंतर क्रमाने पद्मभूषण आणि पद्मश्री ह्यांचा समावेश होतो.
पद्मविभूषण : हा पुरस्कार अतुलनीय आणि सर्वोच्च सेवेसाठी दिला जातो.
पद्मभूषण : उच्च कोटीच्या अतुलनीय सेवेसाठी तर
पद्मश्री :  अतुलनीय सेवेसाठी बहाल केले जातात.


# ह्या वर्षीच्या पुरस्कार विजेत्यांचा विचार करता 5 पद्मविभूषण, 27 पद्मभूषण आणि 77 पद्मश्री विजेत्यांचा यादीत समावेश आहे.
# यादीत एकूण फक्त महिलांचा विचार करता एकूण  19 महिला आहेत. गेल्या वर्षी ह्या यादीत 31 महिलांचा समावेश होता.
# परकीय नागरिक/अनिवासी भारतीय /भारतीय वंशाच्या व्यक्ती / मरणोत्तर दिलेले पारितोषिके ह्यांचा विचार करता 14 जणांचा यादीत समवेश आहे.
# यादीत एका जोडीला दिले गेलेले पारितोषिक एकच मोजावे असेही सांगण्यात आले आहे.


# ह्या यादीतील काही महाराष्ट्रीयन पुढीलप्रमाणे :

पद्मविभुषण:

डॉ.कांतीलाल हन्सीलाल संचेतीपुण्यातील प्रसिध्द अश्या हाडांच्या आजारांसाठीच्या 'संचेती हॉस्पिटल' चे प्रणेते डॉ.संचेती ह्यांना त्यांच्या 'वैद्यकीय सेवेतील योगदानासाठी' पद्मविभूषण ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार. डॉ.संचेती हे भारतातले पहिले हाडांचे डॉक्टर होत. शिवाय त्यांनीच भारतीय बनावटीची 'गुडघा रोपण शस्त्रक्रिया' सुरु केली, परिणामी अशा प्रकाराचे उपचार सामान्य माणसासाठी स्वस्त झाले आणि अशा  शस्त्रक्रिया त्यांच्याही आवाक्यात आल्या.


पद्मभुषण:

प्रा.डॉ.शां.ब.मुजुमदारवनस्पतीशास्त्रज्ञ आणि पुणे येथे मुख्यालय असलेल्या 'सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ' चे कुलगुरू प्रा.डॉ.मुझुमदार ह्यांना 2005 साली पद्मश्री बहाल करण्यात आला होता.अलीकडेच त्यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केली आहेत.


पद्मभुषण:

प्रा.शशीकुमार मधुसूदन चित्रेमुंबई विद्यापीठ आणि भारत सरकारचा अणुउर्जा विभाग यांनी सुरु केलेल्या 'सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्स 'येथील प्राध्यापक आणि ख्यातनाम खगोलभौतिकी आहेत.
पद्मभुषण:

धर्मेंद्रपद्मभुषण:

शबाना आझमीउरलेली यादी पुढच्या पोस्टमध्ये

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत