Showing posts with label चालू घडामोडी. Show all posts
Showing posts with label चालू घडामोडी. Show all posts

Wednesday, July 13, 2011

प्रश्नमंजुषा -66

प्रश्नमंजूष-66

सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी

1. "  ते दिवस " हे कोणत्या लेखकाने लिहिलेले  शेवटचे पुस्तक होते ?

A. निळू फुले
B. विजय तेंडूलकर
C. आचार्य अत्रे
D. वि.स. खांडेकर

Click for answer 
B. विजय तेंडूलकर

2. महाराष्ट्र राज्य सेंद्रीय शेती धोरण समितीचे अध्यक्ष ___________ हे आहेत.

A. न्या.व्यंकटेश चपळगावकर
B. डॉ. आ.ह.साळुंखे
C. वसंत गोवारीकर
D. डॉ.शंकर राउत

Click for answer 
D. डॉ.शंकर राउत

3. चिमण्यांच्या घटत्या संख्येबाबत जनजागृती करून त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून "जागतिक चिमणी दिन ( World Home-Sparrow Day)" _______ ह्या दिवशी साजरा केला जातो.

A. 21 एप्रिल
B. 20  मार्च
C. 21 मे
D. 18 जानेवारीClick for answer 
B. 20  मार्च
याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.
4.  1984  मध्ये झालेल्या भोपाळ वायू दुर्घटनेशी संबंधित कंपनी ____________ ही होती.

A. युनियन कार्बाईड
B. युनियन आयसोसायनेट
C. युनियन महिंद्रा लिमिटेड
D. यापैकी नाही.

Click for answer 
A. युनियन कार्बाईड

5.  ई.एन.राममोहन समिती _______________ ह्या कारणासाठी नेमण्यात आली .

A. विद्यापीठ अनुदान
B.  महिला आरक्षण
C.  बाबरी मस्जिद चौकशी
D.  दांतेवाडा येथील माओवादी हल्ला चौकशी

Click for answer 
D.  दांतेवाडा येथील माओवादी हल्ला चौकशी

6. 56 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक म्हणून __________ ह्यांना 'जोगवा ' ह्या चित्रपटातील गाण्यांसाठी गौरविण्यात आले.

A. सुरेश वाडकर
B. सोनू निगम
C. अजय- अतुल
D. हरिहरन

Click for answer 
D. हरिहरन


7. 'फॉकलंड' बेटांवरून _____________ ह्या दोन देशांमध्ये वाद सुरु आहे.

A. अर्जेंटिना व ब्रिटन
B. जर्मनी व ब्रिटन
C. भारत व पाकिस्तान
D. उत्तर कोरिया व जपान

Click for answer 
A. अर्जेंटिना व ब्रिटन

8. भारताने 2010 हे वर्ष ___________म्हणून साजरे केले.

A. व्याघ्र वर्ष
B. सिंह वर्ष
C. साक्षरता वर्ष
D. युवा वर्ष

Click for answer 
A. व्याघ्र वर्ष

9. हरियाणा सरकारने लोकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ____________ हे वेबपोर्टल सुरु करण्यात आले.

A. संतुष्ट
B. समाधान
C. लोकमानस
D. पीपल-फर्स्ट

Click for answer 
B. समाधान

10. 'अखील भारतीय लोकमंच ' हा नवा राजकीय पक्ष ______________ यांनी स्थापन केला.

A. उमा भारती
B. रामदेवबाबा
C. अमरसिंह
D. जगमोहन रेड्डी

Click for answer 
C. अमरसिंह

Sunday, June 5, 2011

प्रश्नमंजुषा-15

Question Bank-6

1.पवन उर्जा निर्मितीत भारतचे जागतिक स्थान ______आहे .

A. 2रे
B. 3रे
C. 4थे
D. 5वे

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. 4थे

2. नियोजित सार्क उर्जा निर्मिती प्रकल्पाचे स्थान येथे आहे?

A. नवी दिल्ली
B. काठमांडू
C. ढाका
D. इस्लामाबाद

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. इस्लामाबाद

3.शिवराज पाटील समिती कशाशी संदर्भित आहे

A. लोकपाल विधयक मसुदा
B. 2-जी स्पेक्ट्रम घोटाळा
C. राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा
D. परदेशातील कला पैसा आणण्यासंदर्भात शिफारसी

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. 2-जी स्पेक्ट्रम घोटाळा

4. साक्षरता मोजताना भारतात किती वयावरील व्यक्तीचा विचार केला जातो ?

A. 4 वर्षे वरील
B. 5 वर्षे वरील
C. 6 वर्षे वरील
D. 7 वर्षे वरील

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. 7 वर्षे वरील

5.केंद्र सरकारने 'बदलांचे दशक' म्हणून जाहीर केलेली वर्षे हि आहेत

A. 2001-2010
B. 2005-2014
C. 2011-2020
D. 2008-2017

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. 2011-2020

6.'करेज ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

A. डेव्हिड कॅमेरुन
B. गोर्डन ब्राऊन
C. अरविंद अडिगा
D. व्ही .एस .नायपौल

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. गोर्डन ब्राऊन

7. शिकागो बिझनेस स्कूलचे अधिष्ठाता म्हणून या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड झाली आहे.

A. प्रोफेसर विनोद कुमार
B. प्रोफेसर सुशील कुमार
C. प्रोफेसर सुनील कुमार
D. प्रोफेसर सुनील खन्ना

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. प्रोफेसर सुनील कुमार

8. आय. सी .सी. चे विद्यमान अध्यक्षपद भूषविणारे शरद पवार हे या पदावर विराजमान होणारे ______भारतीय आहेत.

A. पहिले
B. दुसरे
C. तिसरे
D. चौथे

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. दुसरे

9. 2014 च्या फिफा फुटबाल विश्वचषक स्पर्धा येथे होणार आहेत?

A. अर्जेन्टिना
B. यु.के.
C. ब्राझील
D. जपान

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. ब्राझील

10. भारतात वित्त आयोगाची स्थापना राज्यघटनेच्या ह्या कलमानुसार होते

A. कलम 124
B. कलम 280
C. कलम 324
D. घटनेत अशी तरतूद नाही

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. कलम 280

Saturday, June 4, 2011

संकीर्ण चालू घडामोडी भाग-10

 • 'बखर : भारतीय प्रशासनाची': कोल्हापूरचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी त्यांच्या अनुभवातून आणि अभ्यासातून लिहिलेले पुस्तक
 • स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानात  (National Rural Livelihoods Mission- NRLM)  रुपांतर
 • राज्य शासनाने नुकताच जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी ५० टक्के जागा आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यासाठी मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
 • राज्यातील विद्यार्थ्यांना पाचवीपासून व्यवसायशिक्षणाचे धडे देण्याचा राज्य शासन विचार करीत आहे..
 • जगातील सर्वाधिक महाकाय क्रेनची निर्मिती केल्याचा दावा चीनने केला आहे.
 • राज्यात 1999 पासून पल्स पोलिसो लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
 • राज्यात भूगर्भातील औष्णिक ऊर्जेपासून (जिओथर्मल) वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी "महाऊर्जा' व थरमॅक्‍स कंपनीमध्ये सामंजस्य करार करण्याच्या प्रस्तावाला मान्यता.
 • 'नॅशनल लिगल ई-लायब्ररी ' हे  कायदेविषयक ऑन-लाईन ग्रंथालय 15 ऑगस्ट 2011 रोजी कार्यान्वित होणार.
 •  ग्रामीण भारतचा चेहरामोहरा बदलण्यासाठी  राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान  (National Rural Livelihoods Mission- NRLM) चे ३ जून  २०११ रोजी राजस्थानातील बांसवारा येथे सोनिया गांधींच्या हस्ते उद्-घाटन.
 • सुनील मित्रा यांची भारतचे अर्थ- सचिव म्हणून नियुक्ती.
 • महिला आणि बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट  कार्य  करणाऱ्या व्यक्ती आणि समाजसेवी संस्था तसेच स्वयंसेवी संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार दिला जातो.  
 • आंतरराष्ट्रीय महिला दिनी ( ८ मार्च ) तेव्हाच्या रेल्वे मंत्री ममता बनर्जी यांनी विद्यार्थींनीसाठी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत रेल्वे प्रवासाची घोषणा केली. 
 • २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम ओळंबे यांचा गिरगाव चौपाटी येथे पुतळा उभारण्यात येणार.
 • राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात औरंगाबाद जिल्हा परिषदेला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार.
 • जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश लोकायुक्तांच्या  कार्यकक्षेत करण्यात आला.

Thursday, June 2, 2011

संकीर्ण चालू घडामोडी भाग-9

 संकीर्ण चालू घडामोडी (31 मे 2011 पर्यंत)
 • राज्यातील पहिले कायमस्वरूपी बालन्यायालय : नाशिक जिल्ह्यात सुरु.
 • प्रादेशिक सेनेची स्थापना: 1 ऑक्टोबर 1942
 • स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांनी केली. प्रवेश  फक्त  पुरुषांसाठी असून वयोमर्यादा 18 ते  42  वर्ष इतकी आहे.
 • राष्ट्रीय मतदार दिवस :  25  जानेवारी. (घटनेच्या कलम 324 नुसार निवडणूक आयोगाची स्थापना झाली आहे. )
 • ई- स्कॉलरशिप योजना - सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून राबविण्यात येत आहे.
 • ध्वजदिन : 7 डिसेंबर
 • पहिले आंतरराष्ट्रीय उर्जा संमेलन : व्ही.एन. आय.टी. नागपूर येथे संपन्न
 • कार्यालयीन कामकाजात सुसूत्रतता यावी यासाठी अहमदनगर महसूल प्रशासनाने 'ई-मित्र ' हि सेवा सुरु केली आहे.
 • महाराष्ट्र शासन औरंगाबाद शहरात 'हज हाउस' उभारणार आहे.
 • सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निकालानुसार दुचाकी तयार करणाऱ्या कंपन्यांना आता दुचाकी सोबत हेल्मेट ची विक्री करणे बंधनकारक आहे.
 • देशातील सध्याचे सेंद्रिय शेतीचे क्षेत्र : साडे दहा लाख हेक्टर इतके आहे.
 • राज्याचा 21% वरून  33% इतके वनक्षेत्र वाढवण्याचा निर्णय.
 • महाराष्ट्र आणि बिहार मधल्या दुर्मिळ आणि नष्ट होत चाललेल्या वनस्पतींचे सर्वेक्षण करण्याचा प्रकल्प 'सी डक ' ने हाती घेतला आहे.
 • "कोकण राजा" हि सड साठी उपयोगात येणारी आंब्याची नवीन जात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राकडून विकसित.
 • स्पेन हा फिफा फुटबल वर्ल्ड कप जिंकणारा जगातला आठवा देश ठरला.
 • जागतिक पर्यटन दिन:  27  सप्टेंबर 
 • संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची सुरुवात  2000-01  साली झाली.
 • 'सुपरमून ' हि घटना  20  मार्च 2011 रोजी घटली. सुपरमून ह्या घटनेत चंद्र आणि पृथ्वी यांतील अंतर सर्वात कमी होते. यापूर्वी सुपरमून घटना 2005 साली घटली होती .
 • भाभा अणुसंशोधन केंद्राच्या (BARC) वैज्ञानिकांनी हायड्रोजन गस वर चालणाऱ्या  "हायड्रोजन टर्च" ची निर्मिती केली आहे.
 •  भारत-रत्न  पुरस्काराने  सन्मानित  झालेले  पहिले  महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्त्व => महर्षी धोंडो केशव कर्वे
 • 2011  च्या जनगणनेच्या हंगामी आकड्यांनुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा --> ठाणे जिल्हा
 • राजीव गांधी जीवनदायी योजना राज्य शासनाकडून 1 लाख रुपये व त्या पेक्षा  कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी सुरु करण्यात आली आहे.
 • शनल फिल्म डेव्हलपमेंट कार्पोरेशन (NDFC)  चे अध्यक्ष : ओम पुरी 

Tuesday, May 31, 2011

संकीर्ण चालू घडामोडी भाग-8प्रश्न १ .कोणते पुस्तक भारताचे माजी राष्ट्रपती प्रा.ए.पी.जे.कलाम यांनी लिहिले आहे
उत्तर : विंग्स ऑफ फायर
  उत्तरातील इतर विकल्प आणि त्यांचे लेखक :
 • डिस्कवरी ऑफ इंडिया - पंडित जवाहरलाल नेहरू 
 •  ए कॉल टू ऑनर - जसवंतसिंग 
 • माझे सत्याचे प्रयोग - महात्मा गांधी
प्रश्न २ . भारतातील पहिले मॉडेल ई-कोर्ट कुठे सुरु करण्यात आले?
उत्तर : नवी दिल्ली

प्रश्न ३ . 'टू द लास्ट बुलेट ' या पुस्तकाच्या लेखिका कोण?
उत्तर : श्रीमती विनिता कामटे व विनिता देशमुख
 • व्हू  किल्ड करकरे -लेखक  एस. एम. मुश्रीफ
 • 26/11 वोह 59 अवर्स - लेखक जितेंद्र दीक्षित 
 • आय डेअर, इट्स अल्वेज पॉसिबल, गवर्नमेंट@नेट,वॉट वेंट राँग -- लेखिका किरण बेदी
 • ('येस, मॅडम  सर' हा किरण बेदी यांच्या जीवनावर आधारित लघुपट ऑस्ट्रेलिअन चित्रपट निर्माता मेगन डोनेमन (Megan Doneman ) याने तयार केला आहे. )
=============================================================

किशोरवयीन मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्यात  'सबला' (राजीव गांधी किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण) हि  केंद्र पुरस्कृत योजना 11 जिल्ह्यात सुरु.  
================================================================
भारतात राष्ट्रीय महामार्गांची लांबी या राज्यात आढळते. ---> उत्तरप्रदेश.
नियोजन आयोगातील सध्याच्या एकमेव महिला सदस्य ह्या आहेत. ---> डॉ. सयेदा सैयदीन हमीद
नियोजन आयोगातील सध्याच्या एकमेव महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्त्व --> ॉ. नरेंद्र जाधव
2009 -10 हे केंद्र सरकारने 'ग्राम सभा ' वर्ष म्हणून साजरे केले.
2010 साठी भारताची ऑस्कर अर्थात अकडमी पुरस्कारासाठी 'ऑफिशल' एन्ट्री हा चित्रपट  होता: पिपली लाईव्ह
2009 साठी होता : हरीचन्द्राची फ्टरी (दिग्दर्शक: परेश मोकाशी )
2008 : तारे जमीन पर
भाभा अणुसंशोधन  केंद्र (BARC) मुंबई येथे असून त्याचे सध्याचे निर्देशक (Director) आहेत: आर. के. सिन्हा

  Sunday, May 29, 2011

  संकीर्ण चालू घडामोडी भाग-7

  • नर्मदा नदीवरील धरणाजवळ उभारण्यात येणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १८२ मीटर उंचीचा प्रस्तावित पुतळ्यासाठी २ हजार कोटी रुपये खर्च येणार. हा पुतळा 'एकता पुतळा' म्हणून ओळखला जाईल. नर्मदा धरणापासून ३.५ किलोमीटरवर असलेल्या साधू बेटावर हा पुतळा उभारण्यात येणार आहे.
  • वरिष्ठ सनदी अधिकारी अजितकुमार सेठ यांची कॅबिनेट सचिव म्हणून  नियुक्ती .
  • नागरी विकासावरील जागतिक संसदीय संघाच्या सचिवपदी महाराष्ट्र विधानसभेतील भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांची आशिया विभागातून निवड . क्रोएशियामधील झादर येथे ही परिषद झाली होती.
  • शरावती प्रकल्प कोणत्या राज्यात  आहे?  कर्नाटक
  • पृथ्वी अक्षाभोवती कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे
  • जागतिक अन्न दिवस या दिवशी साजरा करतात ? १६ ऑक्टोबर
  • ऑलम्पिक स्पर्धेदरम्यान हॉकीचे विजेते पद या देशास मिळाले? जर्मनी
  • भास्कर घोष समिती कशाशी संदर्भित होती? सांस्कृतिक योजना
  • मायक्रोचीप या कंपनीने ५० वर्षे साजरी केली .
  • 'प्रोजेक्ट संकल्प' कशाशी संदर्भित आहे ? एच.आय.व्ही. /एड्स
  • अपेडा (APEDA) काय आहे?  Agricultral and processed food products  export development  authority
  • विजयनगर कुठे वसले आहे? तुंगभद्रा नदीच्या किनारयावर.

  Wednesday, May 25, 2011

  अस्सा हा महाराष्ट्र

  • महाराष्ट्रात ३५ जिल्हे असून ते ६ प्रशासकीय विभागात विभागलेले आहेत. ६ विभाग: कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद , अमरावती आणि नागपूर.
  • राज्यात एकूण भौगोलिक क्षेत्र ३.०८ लक्ष चौ. कि.मी. इतके आहे.
  • राज्यात २२४.५ लाख हेक्टर जमीन लागवडीखाली आहे तर ५२.१ लाख हेक्टर जमीन वनांखाली   आहे.
  • स्थूल  राज्य उत्पन्नातील कृषी आणि संलग्न क्षेत्राचा हिस्सा ११ टक्के इतका आहे.
  • तर औद्योगिक आणि सेवा क्षेत्राचा मिळून ८९ टक्के इतका आहे.
  • देशातील पशुधनात राज्याचा हिस्सा ६.८ टक्के आहे.
  • 'महिला  व बाल विकास ' या स्वतंत्र विभागाची स्थापना करून अर्थसंकल्पीय तरतूद करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य होते.
  • वातावरण बदलाच्या समस्येवर ठोस कृती आराखडा तयार करण्यासाठी राज्य शासनाने 'द एनर्जी अंड रिसोर्सेस इंस्टीटयूट '(टेरी) या संस्थेबरोबर करार केला आहे.
  • भारतातले पहिले 'आधार गाव ' ठरण्याचा बहुमान नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली गावाला मिळाला, हि नोंदणी २९ सप्टेंबर २०१० रोजी करण्यात आली.
  • राज्यात माहिती आणि तंत्रज्ञान संचालनायास  आधार कार्यक्रम राबविण्यासाठी प्रमुख संस्था म्हणून नेमण्यात आले आहे.
  • "द्वार वितरण व्यवस्था " ह्या प्रकारची सार्वजनिक वितरण व्यवस्था आदिवासी तसेच दुष्काळग्रस्त भागामध्ये राबविली जाते.
  • सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत गहू, तांदूळ, पामतेल, साखर आणि तुरडाळ या पाच वस्तूंची किंमती स्थिर ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
  • २०१० हे राज्याच्या निर्मितीचे सुवर्णमहोत्सवी  वर्ष होते.
  •  तेराव्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार २०१०-२०१५ या कालावधीसाठी महाराष्ट्राचा केंद्रीय करांतील राज्यांना वितरणासाठी निश्चित केलेल्या हिस्स्यापैकी ५.१९९ % इतका आहे . तो १२ व्या आयोगाच्या शिफारासीपेक्षा जास्त आहे.
  • राज्यावरील ऋणभार १८३८२५ कोटी रु. इतका आहे.
  • रिझर्व बँकेने २००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना वित्तीय सेवा देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. 

  Tuesday, May 24, 2011

  संकीर्ण चालू घडामोडी भाग-6

  • "आई मला मारू नको' हा पहिलावहिला थ्रीडी चित्रपट लवकरच रूपेरी पडद्यावर.
  • 1972 साली परभणी येथे मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना.
  • 17 सप्‍टेबर रोजी मराठवाडा मुक्‍ती संग्रामदिन.
  • दुसरी जागतिक महाराष्ट्र परिषद जानेवारी 2011 मध्ये औरंगाबादेत संपन्न.
  • जेष्ठ अभिनेत्री सायराबानू आणि शशिकला यांना 2011 च्या  पुणे  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा जीवनगौरव पुरस्कार .
  • जानेवारी 2011 मध्ये चेन्नई येथे 98  वी राष्ट्रीय सायन्स काँग्रेस संपन्न. उदघाटक होते: पंतप्रधान डॉ.  मनमोहन सिंग . हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शताब्दी वर्ष. त्यामुळे केंद्रशासनाचा 2011 -12 हे विज्ञान वर्ष म्हणून साजरे करायचा निर्णय. हे सुद्धा लक्षात ठेवा कि 2011 हे आंतरराष्ट्रीय रसायन शास्राचे वर्ष म्हणून साजरे होत आहे,
  • युनो च्या सुरक्षा समितीवर अस्थायी सदस्य म्हणून भारताची अलीकडे निवड झाली. तब्बल 19 वर्षांनी भारताला पुन्हा तशी संधी मिळाली.
  •  भाटीय हवाई दलाच्या  उपप्रमुखपदी ए. के. ब्राउणी  .
  • ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक व्यवहार करता यावे यासाठी भारतीय टपाल खात्याने क्रेडीट कार्डसारखे कार्ड देण्याची योजना आखली आहे.
  • संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो ) सुरक्षा परिषदेत दहशतवाद विरोधी समितीच्या प्रमुखपदी भारतचे राजदूत हरदीप सिंह यांची निवड झाली आहे.
  • पहिले वार्षिक भारतीय संमेलन नवी दिल्लीत संपन्न
  • सचिन तेंडूलकरने  कसोटीतील 51 वे शतक द. आफ्रिकेतील केपटाऊन च्या मैदानावर झळकावले.
  • देशभरात   5000  ग्राम-न्यायालये सुरु केली जाणार आहेत. या योजनेचा शुभारंभ झाला 2 आक्टोबर 2009 रोजी.
  • 2011 चे अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन नागपुरात .
  • कर्मचारी  भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचाऱ्यांच्या  खाते क्रमांकाऐवजी युआयडी क्रमांक वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

  Thursday, May 19, 2011

  संकीर्ण चालू घडामोडी भाग-5

  • अमेरिकन कादंबरीकर फिलीप रॉथ चौथ्या मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पारितोषिकाचे मानकरी ठरले आहेत.
  • हे पारितोषिक पहिल्यांदा २००५मध्ये दिले गेले, त्यानंतर दर दोन वर्षांनी मूळ इंग्रजीतील किंवा इंग्रजीत अनुवाद झालेल्या पुस्तकांचा या पारितोषिकासाठी विचार केला जातो.
  • लक्षात  ठेवा बुकर पारितोषिक फक्त राष्ट्रकुल देशातील साहित्यिकालाच दिले जाते. तर मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पारितोषिक कुठल्याही साहित्यिकाला मिळू शकते.
  • बांगलादेशचे नोबेल विजेते मोहम्मद युनूस यांनी ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा दिला. मायक्रो फायनान्स करणा-या ग्रामीण बँकेचे युनूस संस्थापक होत.
  • दुसऱ्या महायुद्धात जागतिक शांततेचा घास घेणारा नाझी भस्मासुर अॅडॉल्फ हिटलर आणि अमेरिकेच्या भूमीवर दहशतवादाचे थैमान घालून जागतिक दहशतवादाचा चेहेरा बनलेला ओसामा बिन लादेन यांचा अस्त एकाच दिवशी : १ मे
  • जपानमधील भूकंपानंतर किरणोत्साराने धोक्याची सर्वोच्च पातळी गाठण्यामुळे चर्चेत आलेला अणुप्रकल्प : फुकुशिमा दाईईची
  • या पूर्वीचा मोठा अश्या स्वरूपाचाकिरणोत्सार रशियातील चेनोर्बिल अणुभट्टीत 1979 मध्ये झाला होता.
  • दिवंगत ज्येष्ठ कवयित्री आणि कथालेखिका इंदू शर्मा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा 'आंतरराष्ट्रीय इंदू शर्मा कथा सन्मान' पुरस्कार भारतीय कादंबरीकार विकास कुमार झा यांना त्यांच्या 'मॅकक्लुस्कीगंज' या कादंबरीला जाहीर.
  • फ्रान्समध्ये बुरखा बंदी.युरोपातील सर्वाधिक मुस्लिम नागरिक असलेल्या फ्रान्सने स्त्री-हक्काच्या नावाखाली हे धाडसी पाऊल उचलले .
  • ' हेपेटायटिस बी ' या विषाणूचा शोध लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे नोबेल विजेते शास्त्रज्ञ ब्रुच ब्लुमबर् यांचे दयविकाराच्या झटक्याने नासामध्ये सुरू असलेल्या परिषदेत निधन झाले. 1976 सालचे नोबेल मिळाले होते.
  • भारतीय वंशाच्या अधिकारी गीता पासी यांची बराक ओबामायांच्या कडून अमेरिकेचे जिबौती या अफ्रिका खंडातील देशाच्या राजदूतपदी नियुक्ती .
  • अमेरिकेच्या  ' सिलिकॉन व्हॅली ' मध्ये नवीन जैन या भारतीय अमेरिकन उद्योजकाने चंद्रावर खाणकाम करण्याचा ध्यास घेऊन ' मून एक्स्प्रेस ' नावाची कंपनी स्थापन केली आहे.

  संकीर्ण चालू घडामोडी भाग-4

  • जागतिक साक्षरता दिन: 8 सप्टेंबर
  • 2001 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची स्री साक्षरता : 67 %
  • महाराष्ट्राचे महसुली वर्ष: 1 ऑगस्ट
  • नियोजित ललित कला केंद्र : पुणे
  • महाराष्ट्रात विकास नियोजनाची सुरुवात: 3 री पंचवार्षिक योजना
  • वर्धा प्लॅन  : सहाव्या योजनेपासून
  • महाराष्ट्र आणि बिहार मधील दुर्मिळ व नष्ट होत चाललेल्या वनस्पतींचे सर्वेक्षण करण्याचा प्रकल्प 'सी-डॅक ' या संस्थेने हाती घेतला आहे.
  • राज्यातील वनक्षेत्र झपाट्याने  वाढविण्यासाठी २०१०-२०१५ या कालावधीत विशेष कार्यक्रम - महिला बचत गटांचा सहभाग वाढविण्याचा निर्णय.
  • कृषी दिन- 1 जुलै- माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस
  • 'एक व्यक्ती एक झाड ' हि ग्रामीण विकास विभागाची योजना असून या अंतर्गत राज्यातील एक कोटीव्या झाडाचे वृक्षारोपण अन्न हजारे यांच्या हस्ते सातारा जिल्यात झाले.
  • आर्थिक साक्षरतेसाठी यु.टी.आय बँकेचा नवीन उपक्रम - '100 डेज 100 सिटीज  '

  Wednesday, May 18, 2011

  संकीर्ण चालू घडामोडी भाग-3

  Wednesday, May 11, 2011

  संकीर्ण चालू घडामोडी भाग-2

  • मुंबई आणि नागपुर महानगरपालिकांमध्ये अतिरिक्त आयुक्त पद निर्माण करण्यात आले. 
  • महाराष्ट्र शासनाचा 2010  चा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार देवून डॉ.जयंत नारळीकर यांना गौरविण्यात आले.  ते खगोलशास्त्रज्ञ आहेत. पुण्याच्या 'आयुका ' संस्थेचे संस्थापक होत.
  • महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1997  सालापासून दिले जातात. पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार :पु.ल.देशपांडे
  • सन 2020 पर्यंत राज्याचे दरडोई उत्पन्न चौपट करण्याच्या दिशेने राज्य शासनाचे प्रयत्न .
  • 24 एप्रिल हा राष्ट्रीय पंचायत राज दिन. (पंचायत राज संस्थांना कायदेशीर दर्जा देणारी 73  वी घटना दुरुस्ती 24 एप्रिल 1993  राजी लागू झाला.)
  • 48  वा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा मुंबईत संपन्न.
  1. 2010 -11 चा 'राज कपूर जीवन गौरव ' पुरस्कार गोविंद निहलानी यांना तर चित्रपटातील विशेष कामगिरीचा राज कपूर पुरस्कार शबाना आझमी यांना प्रदान.
  2. तर मराठी चित्रपटातील योगदानासाठीचा 'व्ही. शांताराम जीवन गौरव ' पुरस्कार जब्बार पटेल यांना तर व्ही. शांताराम विशेष पुरस्कार स्मिता तळवलकर यांना प्रदान.

  Friday, May 6, 2011

  संकीर्ण चालू घडामोडी भाग-1

  • महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने महसूल विभागाकडून राबविण्यात येणारे अभियान : सुवर्ण जयंती राजस्व अभियान .
  • महाराष्ट्राचे विद्यमान मुख्य सचिव : रत्नाकर गायकवाड
  • जगभरातील ‘वनांचे संवर्धन, शाश्वत व्यवस्थापन आणि विकास’ याबाबत जन जागृती करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने 2011 हे वर्ष ‘जागतिक वन वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे.
  • राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम ही योजना राज्य शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडून राबविण्यात येते.
  • ग्रामीण भागात स्वच्छता आणि आरोग्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने 2000-01 पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरु केले.
  • संपूर्ण महाराष्ट्र राज्य निर्मल 19 फेब्रुवारी 2011 (छत्रपती शिवाजी महाराज  जयंती) रोजी पासून राज्यात निर्मल स्व-राज्य मोहिम राबविली . समारोप : 14 एप्रिल 2011 (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती).
  • आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आईसीएमआर)च्या स्थापनेस 100 वर्ष पूर्ण . स्थापना: 1911 इंडियन रिसर्च फंड एसोसिएशन (आईसीएमआर) ह्या नावाने. 1949 मध्ये भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आईसीएमआर) असे नामकरण.
  • भारतातील पहिल्या 'हवाई टपाल सेवे'स 100 वर्ष पूर्ण.  18 फेब्रुवारी 1911 रोजी अलाहाबाद ते नैनी दरम्यान पहिली सेवा सुरु. 

  Tuesday, August 31, 2010

  चालू घडामोडी 30ऑगस्ट 2010

  • विधानसभा निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था उत्तमरीत्या हाताळल्याबद्दल महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि गडचिरोली जिल्हा पोलीसप्रमुखांना भारतीय निवडणूक आयोगाने सर्वोत्कृष्ठ  प्रशासनाचा बहुमान जाहीर. कोल्हापूर जिल्हा पोलीसप्रमुख यशस्वी यादव 
  • 'ई सोर्स इंडिया'ने भारतातील पहिले खासगी एम्प्लायमेन्ट एक्स्चेंज सुरु केले. 
  • 'न्यूज ऑफ द वर्ल्ड' ह्या वृत्तवाहिनीने पाक संघातील खेळाडूंना लाच दिल्याचे बेटिंग उघड केले.
  • केंद्राच्या विज्ञान आणि  तंत्रज्ञान विभागाकडून  'इन्स्पायर ' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती. या अंतर्गत ६ वी ते पदव्युत्तर विद्यार्थांपैकी २ लाख विद्यार्थांना दरवर्षी ५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार.  
  • मेक्सिकोने तब्बल १० % पोलिसांना घरी पाठवले. भ्रष्टाचार, गुन्हेगारी जगताशी संबंध आणि काम करण्यास अपात्र या निकषांवर हि कारवाई.
  • केन व्याट ( Ken Wyatt  ) ठरले ऑस्ट्रेलियाच्या संसदेवर (House of Representatives) निवडून आलेले पहिले मूळ ऑस्ट्रेलीयी  वंशाची व्यक्ती (first indigenous parliamentarian)
  • हरिकेन इर्ल सध्या कॅरीबेन बेटांवर घोंघावतोय. कॅटेगरी-२ चे असलेले हे चक्रीवादळ आता कॅटेगरी-३ कडे वाटचाल करत आहे.
  • या दरम्यान अमेरिकेने ५ वर्षांपूर्वी येवून गेलेल्या कटरीना चे स्मरण केले. कॅटेगरी-३ चे हे वादळ अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक नुकसान आणि जीवितहानी करणारे वादळ ठरले.
  •  चिलीतील खाण अपघातात ३३ खाण कामगार अडकलेत. तब्बल ३ आठवड्यांपासून अडकलेल्या या लोकांना अन्न आणि इतर बाबी देण्यासाठी 'स्पायरल (स्क्रू  वरील आट्यानसारखा ) ' एक छोटासा मार्ग तयार करण्यात आला आहे.
  • नायजेरियात 'शिशाच्या' विषामुळे  (Lead Poisoning ) ३० बालकांचा मृत्यू.
  • दक्षिण आफ्रिकेतील संशोधकांना एका गुहेमध्ये तब्बल ६४ हजार वर्षांपूवीर्चे टोकदार दगडी तुकडे सापडले आहेत.
  • लक्ष असू द्या १० सप्टे १० कडे. त्या दिवशी १० वाजून १० मिनिटांनी एक चं फिगर तयार होईल  
  • 10/10/10 10:10:10

  Sunday, August 29, 2010

  चालू घडामोडी 29 ऑगस्ट 2010

  29 ऑगस्ट : राष्ट्रीय क्रीडा दिन-मेजर  ध्यानचंद यांचा जन्मदिन
  प्रादेशिक
  • नेव्हल कमांडर दिलीप दोंदे यांना यंदाचा ‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे दिला जाणारा ‘अभिमानमूर्ती’ पुरस्कार 
   • त्यांनी कापलेले अंतर: 21,600 नॉटिकल मैल
   • 'सागर परिक्रमा' या भारतीय नौदलाच्या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी हि साहसी सफर केली.
   • त्यांनी वापरलेली बोट : म्हादेई
   • एकट्यानेच न थांबता पूर्ण विश्वपरीक्रमा करण्याचा विक्रम करणारी पहिली व्यक्ती होती :सर रॉबिन नॉक्स-जॉनस्टन(Sir Robin Knox-Johnston ).(सन 1968-69)
   • कमांडर दोंदेनी त्यांच्याकडे खास प्रशिक्षणही घेतले होते.
   • कमांडर दोंदे यांना परीक्रमेसाठी लागलेला वेळ: 276 दिवस.
  • पहिले विश्व कोकणी सांस्कृतिक महोत्सव मंगलोर येथे होणार. 
  • राज्यामध्ये गेल्या वर्षी 16258 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. 
  • भुसावळ (जि.जळगाव )येथे 660 मेगावट क्षमतेचा 1 औष्णिक विद्युतप्रकल्प उभारण्यास मंजुरी.
   राष्ट्रीय :
   • मदर तेरेसा यांच्या जन्मशताद्बीचे औचित्य साधून केंद्र सरकारने पाच रुपयांचे विशेष नाणे काढले.
   • 'अन्तरद्वंद ' सुशील राजपाल दिग्दर्शित हा आगामी चित्रपट आहे चक्क नवरे मुलगे पळवण्यावर.
   • मुकेश अंबानी यांची 'वर्ल्ड इकोनॉमिक फोरम' वर निवड.
   • फेसबुक हि भारतातील सर्वाधिक पसंतीची 'सोशिअल नेटवर्किंग ' साईट ठरली.
    •  सोशिअल नेटवर्किंग मध्ये भारत जगातले ७वे मोठे मार्केट आहे.
   • भ्रष्टाचार प्रकरणी (धान्य वितरण घोटाळा ) अटक झालेले अरुणाचलचे माजी मुख्यमंत्री : गेगाँग अपांग
    आंतरराष्ट्रीय 
    • इंडोनेशियातील माउंट  सिनाबुंग (Mount Sinabung )  हा ज्वालामुखी 400 वर्षांनंतर आता जागृत  झाला.
    क्रीडा
    • राष्ट्रकुल खेळांचे 'थिम साँग': जियो उठो बढो जितो 

    Tuesday, August 24, 2010

    चालू घडामोडी 24 ऑगस्ट 2010

    • भारतीय गोल्फर अर्जुन अटवालने ग्रीन्सबोरो क्लासिक गोल्फ स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकाविले.
     • या विजयामुळे पीजीए टूरमध्ये विजेतेपद पटकावणारा तो 6 वा एशियन गोल्फर आणि पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. 
     • पीजीए टूर ही संस्था अमेरीकेतील  प्रमुख व्यावसायिक गोल्फ स्पर्धांचे आयोजन करते. त्याचे कार्यालयीन नाव हे PGA TOUR  पूर्ण कॅपिटल अक्षरांमध्ये असे आहे.


    • सचिन तेंडुलकरला आयसीसी  'पीपल्स चॉईस' पुरस्कारांसाठी नामांकन.
     • शर्यतीतील तर चौघे: 
     • श्रीलंकेचा महेला जयवर्धने, द. आफ्रिकेचा ऍबी डिबिलियर्स, ऑस्ट्रेलियाचा माईक हसी आणि इंग्लंडचा कर्णधार अंड्र्यू स्ट्रॉस
     •  आयसीसी चा हा पहिलाच 'पीपल्स चॉईस' पुरस्कार
    •  
    •  
    • मेक्सिकोची 'जिमेना नवारे'त झाली  मिस युनिव्हर्स-2010 
     • स्पर्धेचे स्थळ: लास वेगास (अमेरिका)
    •  
    • मदर तेरेसा यांचे हे जन्म-शताब्दी वर्ष . मदर तेरेसा यांचे खरे नाव Agnes Gonxha Bojaxhiu . 
     • (Gonxha या अल्बानियन शब्दाचा अर्थ होतो : गुलाबाची कळी)
     • बरुईपूर साल्वादोरचे बिशप लोबो यांनी या जन्मशताब्दी वर्षाचा दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात (प. बंगाल )शुभारंभ केला.
     • मदर तेरेसा यांच्या नंतर त्यांचे कार्य पुढे सुरु ठेवण्यासाठी
      अधिकृत वारस म्हणून सिस्टर निर्मला (निर्मला जोशी ) यांची निवड झाली आहे.
     • भारतीय रेल्वे त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने 'मदर एक्सप्रेस ' ही नवीन ट्रेन 26 ऑगस्ट 2010 पासून सुरु करणार आहे.
     • राष्ट्रीयत्व : भारतीय
      नोबेल  शांतता  पारितोषिक :1979
      भारतरत्न पुरस्कार : 1980 
     • माल्कम मुग्गेरीज ( Malcolm Muggeridge ) यांच्या 'समथिंग ब्युटीफुल फॉर गॉड ' या पुस्तक आणि चित्रफितीमुळे त्यांचे कार्य प्रकाशझोतात आले.

    Sunday, August 22, 2010

    चालू घडामोडी 21 ऑगस्ट 2010

    • लोकप्रतिनिधित्व कायदा (सुधारणा )विधेयक २०१०[Representation  of People (Amendment) Bill 2010 ] राज्यसभेत सादर . या अंतर्गत आता अनिवासी भारतीयांनाही मतदानाचा अधिकार मिळणार. २००६ मध्ये अशा स्वरूपाचे आणलेले विधेयक  सरकारने मागे घेतले  होते.  आता ते सुधारित स्वरुपात मांडले गेले आहे .
    • बांगलादेश भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा त्यांच्या 1971  च्या  बांग्ला मुक्ती संग्रामातील योगदानाबद्दल विशेष सन्मान करणार आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्याला 40 वर्षे पूर्ण होत आहेत . या निमित्ताने त्यांनी जगातील 100 मान्यवरांचा सन्मान करण्याचा घाट घातला आहे. पण याच सोहळ्यात इंदिराजींचा 'विशेष ' सन्मान करण्याचे त्यांनी ठरवले आहे. 
     • बांग्लादेशाला  स्वातंत्र्याला २६ मार्च १९७१ ला मिळाले .
    • पंतप्रधानांनी 'उद्यमी हेल्पलाईन  ' या कॉल सेंटर चे उदघाटन  केले. लघु उद्योग सुरु करणाऱ्या उद्योजकांना संधी, उपलब्ध सुविधा,  बाजार आणि अनुषांगिक बाबींची  माहिती  पुरवण्यासाठी याचा वापर होणार.

      • टोल फ्री क्रमांक आहे: 1800-180-6763 
      
    • 'ट्राय' कडून 'लॅन्ड लाईन  ' चे क्रमांक 10 आकडी करण्याचे संकेत. 
    • आता रशिया पाठोपाठ लॅटीन अमेरिकेतील बोलीव्हियात  ही जंगलात वणवे भडकले. पर्यावरणाला  होत असलेल्या नुकसानाकडे  पाहत  तेथील अध्यक्षांनी 'आणीबाणी 'जाहीर केली.
    • आता रशिया पाठोपाठ लॅटीन अमेरिकेतील बोलीव्हियात  ही जंगलात वणवे भडकले. पर्यावरणाला  होत असलेल्या नुकसानाकडे  पाहत  तेथील अध्यक्षांनी 'आणीबाणी 'जाहीर केली.
    • इस्लामी स्कॉलर यु. पी. तील  आझमगड चे मौलाना वाहीदुद्दिन खान 'राजीव गांधी राष्ट्रीय सदभावना ' पारितोषिकाने सन्मानित.

     Friday, August 20, 2010

     चालू घडामोडी 20 ऑगस्ट 2010

     • लोकसभेच्या  वास्तूचे  नूतनीकरण करण्यासाठी गठीत  उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षा: मीरा कुमार.
     • भारतीय रेल्वेच्या १५० वर्षांच्या  इतिहासातील  पहिली महिला ‘वाहतूक लेखा निरीक्षक’ (टीआयए) = राजेश्री खांडेकर.
     • सायना नेहवाल आंध्र प्रदेशच्या पर्यटन विभागाची नवी  ब्रॅंड ऍम्बेसिडर .
     • जागतिक पर्यटन दिन=27 सप्टेंबर.मातोश्री सुशीलादेवी देशमुख राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार सुरेश भटेवरा यांना.
     • पांडवांची प्राचीन राजधानी हस्तिनापुर लवकरच भारतीय रेल्वेच्या नकाशावर येईल.
     • १९ ऑगस्टला जगाने साजरा केला दुसरा मानवतावादी दिन.
      • संयुक्त राष्ट्रसंघाने (UNO) ११ डिसेंबर  २००८  रोजी हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली.
      • १९ ऑगस्ट २००३ ला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर चिटणीसांचे इराक़ मधील विशेष दूत सर्जिओ विअरा देल मेलो (Sérgio Vieira de Mello)  आणि इतर २१ जणांची बगदाद मध्ये तेथील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयावर झालेल्या  ट्रक-बॉम्ब  हल्ल्यात हत्या झाली होती. त्या दिवसाचे स्मरण म्हणून हा दिन साजरा केला जातो.

     Thursday, August 19, 2010

     चालू घडामोडी 19 ऑगस्ट 2010

     • उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारांचे वितरण :
      • 2007 या वर्षासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रियरंजन दास मुन्शी यांना
      • 2008 साठी समाजवादी पक्षाचे नेते मोहन सिंग
      • 2009 साठी भाजप चे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी

     • कांगोतील ' युनो च्या पीस कीपिंग फोर्स ' मधील 3 भारतीयांची हत्या .
     • आंतरराष्ट्रीय गणिती काँग्रेस हैदराबाद येथे. 
     • मुंबईनजीकच्या समुदात झालेल्या तेलगळतीमुले तयार झालेले तवंग फस्त करण्यासाठी तेल खाणारे 'ऑइलझॅपर' हे जिवाणू वापरणार .
      • दिल्लीतील 'द एनजीर् अँड रिसोसेर्स इन्स्टिट्यूट' (टेरी) या संस्थेने तयार केले आहेत.
      
     • म्यानमार मधील लष्करी राजवटीने केलेल्या अत्याचारांच्या चौकशी साठी युनो समिती गठीत करणार.
     • वीरेंद्र सेहवाग याचे शतक रोखण्यासाठी नोबॉलच्या नियमांचा अखिलाडू प्रकाराने वापर करणारा श्रीलंकेचा गोलंदाज : सूरज रणदीव

     Wednesday, August 18, 2010

     चालू घडामोडी 18 ऑगस्ट 2010

     • राज्यातील रहिवाशांना युनिक आयडेंटिटी क्रमांक (युआयडी) देण्याच्या `आधार` कार्यक्रमास १ नोव्हेंबर २०१० पासून सुरूवात होणार असून २८ फेब्रुवारी २०११ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
     • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना १९६० साली झाली.
     • मंत्रालयातील सुलभ प्रवेशासाठी महिलांसाठी वेगळी रांग.
     • जलतरण राष्ट्रीय स्पर्धा जयपुरात होत आहेत.
     • रिलायन्स कम्युनिकेशन्सने अधुदृष्टी असलेल्यांसाठी मोबाइल फोनचे बिल ब्रेललिपीमधून उपलब्ध केले आहे.
     • लोकसभेने ' झारखंड पंचायतराज सुधारणा विधेयक' पारित केले. २००५ मध्ये नियोजित असलेल्या निवडणुका विविध कारणांमुळे अद्यापही झालेल्या नाहीत. सध्या राज्यात 'राष्ट्रपती राजवट' आहे. या विध्येकामुळे तेथील पंचायतराज मधील ५०% जागा महिला सदस्यांसाठी तसेच ५०% जागा महिला पदाधिकारयांसाठी राखीव होतील.
     • रशियाचे राष्ट्राध्यक्ष दमित्री मेदवेदेव (Dmitry Medvedev ) यांनी 'अफ-पाक धोरणासंबंधी 'चतुष्कोनी परिषद (quadrilateral summit ) ' घेतली. अफगाण , पाकिस्तान आणि ताजिकिस्तान हे इतर ३ देश सहभागी . परिषदेचे ठिकाण: सोची (Sochi).

     Follow us by Email Absolutely FREE

     Share for Care

     आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
     You can share the links to this blog.

     हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत